आईची रेसिपी - पावाच्या वड्या

Submitted by स्वप्ना_राज on 16 December, 2013 - 05:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शिळ्या पांढर्या ब्रेडच्या ७-८ स्लाईसेस, ८-१० चमचे साखर, चिमुटभर बेकिंग पावडर/सोडा, २-३ वेलदोड्याची पूड, दुध, तूप, बेदाणे

क्रमवार पाककृती: 

ब्रेड स्लाईसेसचा बारीक चुरा करा. त्यात साखर, बेकिंग पावडर/सोडा, वेलदोड्याची पूड, मावेल एव्हढं दुध घालून मिक्स करा.
२ तास ठेवा म्हणजे साखर विरघळेल.
पसरट भांड्यात तळाला तूप लावा. त्यावर हे मिश्रण थापा. हवं तर वरून बेदाणे लावा.
भांडं गॅसवर ठेवा. वर एक ताटली ठेवून मंद गॅसवर १०-१५ मिनिटं खरपूस भाजा.
थंड झालं की वड्या पाडा आणि मटकावून टाका. Happy

pav.JPG

अधिक टिपा: 

ब्रेडच्या कडा कापू नका. एक्स्ट्रा काम करनेका नै रे बाबा.
साईडच्या स्लाईसेस चालतीलच नाही तर धावतील
जास्त दुध घालू नका. मिश्रण घट्टसरच राहिलं पाहिजे. ही खिरीची रेसिपी नाही हे लक्षात असू द्या.
भांड्याच्या कडेच्या वड्या जास्त चविष्ट लागतात हा स्वानुभव आहे. Happy

माहितीचा स्रोत: 
श्रीमंत आईसाहेब
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही ह्या प्रकाराचे झटपट व्हर्शन करतो.

अंड्याविना फ्रेंच टोस्ट सारखे. दूध+साखर+ वेलदोडा पूड यांच्या मिश्रणात पावाच्या स्लाइसेस बुडवायच्या आणि तव्यावर तूप गरम करून व्यवस्थित पसरवून घेऊन त्यावर खमंग भाजायच्या. साखरेचा कॅरेमलायझिंग इफेक्ट येतो त्यामुळे मस्त खमंग लागतो हा प्रकार. पण गरमागरम खाण्यातच जास्त मजा येते. चवीसाठी काहीजण कणभर मीठही घालतात.

तूप नको असेल तर अमूलचे लोणी तव्यावर वितळवून त्यावर भाजायचे पाव. आणखी वेगळी चव येते.

>>पीठी साखर घातली तर?

घालू शकतो पण त्यामुळे चव बदलेल. अगदी २ तास थांबायची गरज नाही. साखर विरघळेपर्यंत ठेवायचं नाहीतर वड्या केल्यावर साखर दाताखाली येते.

आजच करुन पाहिले wheat bread वापरून. मस्त झाला प्रकार. लेकाने खुप आवडीने खाल्ले. धन्यवाद स्वप्ना.

स्वप्ना_राज, आजच करुन पाहिल्या. अप्रतिम झाल्या होत्या..एक वाटीभर जाड साय टाकली होती..आणि थोडे दुध..मस्त चव आली होती. तुमच्या आईला खुप धन्यवाद!! Happy

खुप सोपेी सुटसुटेीत रेसिपेीनक्केी करुन बघेन.टिप नक्केी लक्षात ठेविन.एक्स्त्रा काम नइ करने का.