Submitted by स्वप्ना_राज on 16 December, 2013 - 05:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
शिळ्या पांढर्या ब्रेडच्या ७-८ स्लाईसेस, ८-१० चमचे साखर, चिमुटभर बेकिंग पावडर/सोडा, २-३ वेलदोड्याची पूड, दुध, तूप, बेदाणे
क्रमवार पाककृती:
ब्रेड स्लाईसेसचा बारीक चुरा करा. त्यात साखर, बेकिंग पावडर/सोडा, वेलदोड्याची पूड, मावेल एव्हढं दुध घालून मिक्स करा.
२ तास ठेवा म्हणजे साखर विरघळेल.
पसरट भांड्यात तळाला तूप लावा. त्यावर हे मिश्रण थापा. हवं तर वरून बेदाणे लावा.
भांडं गॅसवर ठेवा. वर एक ताटली ठेवून मंद गॅसवर १०-१५ मिनिटं खरपूस भाजा.
थंड झालं की वड्या पाडा आणि मटकावून टाका.
अधिक टिपा:
ब्रेडच्या कडा कापू नका. एक्स्ट्रा काम करनेका नै रे बाबा.
साईडच्या स्लाईसेस चालतीलच नाही तर धावतील
जास्त दुध घालू नका. मिश्रण घट्टसरच राहिलं पाहिजे. ही खिरीची रेसिपी नाही हे लक्षात असू द्या.
भांड्याच्या कडेच्या वड्या जास्त चविष्ट लागतात हा स्वानुभव आहे.
माहितीचा स्रोत:
श्रीमंत आईसाहेब
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!! नक्की कर के देखेंगे!!
वाह!!
नक्की कर के देखेंगे!!
२ तास ठेवा म्हणजे साखर
२ तास ठेवा म्हणजे साखर विरघळेल.>>> पीठी साखर घातली तर?
आम्ही ह्या प्रकाराचे झटपट
आम्ही ह्या प्रकाराचे झटपट व्हर्शन करतो.
अंड्याविना फ्रेंच टोस्ट सारखे. दूध+साखर+ वेलदोडा पूड यांच्या मिश्रणात पावाच्या स्लाइसेस बुडवायच्या आणि तव्यावर तूप गरम करून व्यवस्थित पसरवून घेऊन त्यावर खमंग भाजायच्या. साखरेचा कॅरेमलायझिंग इफेक्ट येतो त्यामुळे मस्त खमंग लागतो हा प्रकार. पण गरमागरम खाण्यातच जास्त मजा येते. चवीसाठी काहीजण कणभर मीठही घालतात.
तूप नको असेल तर अमूलचे लोणी तव्यावर वितळवून त्यावर भाजायचे पाव. आणखी वेगळी चव येते.
तसे झटपट version मी लोण्याचे
तसे झटपट version मी लोण्याचे करते.
माझी रिक्षा http://www.maayboli.com/node/42625
>>पीठी साखर घातली तर? घालू
>>पीठी साखर घातली तर?
घालू शकतो पण त्यामुळे चव बदलेल. अगदी २ तास थांबायची गरज नाही. साखर विरघळेपर्यंत ठेवायचं नाहीतर वड्या केल्यावर साखर दाताखाली येते.
झाकण ठेवून कसं काय भाजायचं
झाकण ठेवून कसं काय भाजायचं बाॅ
अंड्याविना फ्रेंच टोस्ट
अंड्याविना फ्रेंच टोस्ट सारखे. दूध+साखर+ >>> +१
छान, आमच्याघरी पण हेच.
छान, आमच्याघरी पण हेच. अंड्याशिवायच !
छान रेसिपी. मी नारळ व ब्रेड
छान रेसिपी. मी नारळ व ब्रेड वड्या करते, पण या कधी केल्या नव्हत्या.नक्की करेन.
आजच करुन पाहिले wheat bread
आजच करुन पाहिले wheat bread वापरून. मस्त झाला प्रकार. लेकाने खुप आवडीने खाल्ले. धन्यवाद स्वप्ना.
स्वप्ना_राज, आजच करुन
स्वप्ना_राज, आजच करुन पाहिल्या. अप्रतिम झाल्या होत्या..एक वाटीभर जाड साय टाकली होती..आणि थोडे दुध..मस्त चव आली होती. तुमच्या आईला खुप धन्यवाद!!
ब्रेड पुडिंग च्या वड्या!मस्त!
ब्रेड पुडिंग च्या वड्या!मस्त!
व्वा, छानच लागत असतील...
व्वा, छानच लागत असतील... करायला लागेल...
खुप सोपेी सुटसुटेीत
खुप सोपेी सुटसुटेीत रेसिपेीनक्केी करुन बघेन.टिप नक्केी लक्षात ठेविन.एक्स्त्रा काम नइ करने का.
छान आहे डिश पण मला वाटतं मी
छान आहे डिश पण मला वाटतं मी फ्रेंच टोस्टच करेन