डब्बा

Submitted by नीधप on 24 June, 2014 - 02:01

इथे विविध प्रकारच्या डब्यांची चर्चा अपेक्षित आहे. त्यातल्या पदार्थांची नव्हे.
हा मुद्दा आधीच कुठे चघळून झाला असेल तर इथला रवंथ तिथे हलवून हा बाफ 'भुर्रर्रर्र काऊ घेऊन गेला!' करून टाकावा अशी मान्नीय अ‍ॅडमिन वा वेबमास्तरांस विनंती.

अन्नं न सांडणारे, वस्तू गार व गरम ठेवणारे, मावेबल नॉनमावेबल, स्टीलचे, प्लास्टिकचे, कागदाचे, दगडाचे, मातीचे, सोन्याचे वगैरे कुठल्याही मटेरियलचे, सर्व आकार, प्रकार वगैरेचे अन्न वाहून नेणारे डबे हा इथला मूळ विषय.

स्टोरेजसाठीचे डबे चघळण्यासाठी हा बाफ नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा सेट माझ्याकडे ४ वर्षे आहे. ऑलमोस्ट रोज वापरून देखील नवा कोरा दिसतो.
http://www.containerstore.com/shop/kitchen/foodStorage/leftoversGlass?pr...{ifpla:17588969}{ifpe:27500988}&ci_sku=10057243&srccode=cii_17588969&cpncode=33-310177882-2&utm_source=channelintelligence&utm_medium=feed&utm_campaign=google

वेका, धनश्री +१ पण सध्या मिळतायत ते रंगीबेरंगी झाकणाचे नाही आवडले मला .. आधी हिरव्या झाकणाचा सेट मिळाला तो आहे माझ्याकडे .. एकदम बेस्ट ..

प्लास्टीकचे डबे स्वतः घासायचे तर संकटच वाटतं मला .. पण हे त्याही दृष्टीने बेस्ट ..

अमेरिकेत मुलांना शाळेत डबा द्यायला काय वापरता तुम्ही?>>> thermos funtainer असा एक येतो डबा! त्यात गरम पदार्थ ठेवायच्या आधी गरम पाणि भरुन काही मिनिट ठेवायचे मग पाणि काढुन गरम पदार्थ भरायचा.. लेक पास्ता नेते असा,
बाकी सगळच आयदर फॉइल रॅप़ मधे कि.न्वा झिपलॉक मधे..

सानुली मी माझ्या मुलीला तिची शाळा सुरू झाल्यापासून असा थर्मास बॉक्स देते. डे केअर मधे अन्न गरम ताजं तिथेच मिळायचं. पण शाळा सुरु झाल्यावर गरम पदार्थांसाठी प्रश्न पडायला लागला. मग असले डबे आणले.
http://www.amazon.com/Thermos-Funtainer-Minnie-Mouse-Ounce/dp/B00332UFL6...

सकाळी ६:३० च्या आसपास गरमागरम भात-आमटी, सूप, पास्ता यात भरला तर ११:३० पर्यन्त मस्त गरम राहतो. तिच्या वर्गात एकच मावे असल्याने लंचटाईमला गर्दी असते. त्यात काही मुलं मॅक-चिझ तिथे कुक करतात. ४ मि पर पॅक वेळ लागतो. त्यामुळे लेकीला वेळ मिळत नाही

डिश वॉशर मधे घालू नये असे रेकमेंडेड आहे. पण मी बरेचदा घातलाय. वरच्या कप्प्यामधे. Happy
सँडवीच साठी देसी स्टोअर मधून स्टिलचा डब्बा आणलाय.
बाकी स्नॅकसाठी झिप लॉकच्या बॅगांच्या साईज च्या पिशव्या आहेत. ज्या लाँड्रीमधे धुता येतात. अगदी या नाही पण अशा टाईप आहेत.
http://www.amazon.com/Lunchskins2-Multi-Pack-Reusable-Sandwich-Ladybug/d...

या वर्षी स्कुल सुरु व्हायच्या आधी अशा बॅगा घरी शिवण्याचा विचार आहे. बघुया कितपत जमतंय.

गरमागरम भात-आमटी>>> अरे वा वा! ( हे खर कौतुक आहे) आमच्याकडे भारतिय जेवण बिग नो नो असत बळच दिल तर डबा परत येतो( तसाच).

आमच्याकडे सुद्धा फार उत्साह नसतो तिला . सलग २ दिवसांनंतर आज परत इंडियन असं नाक वाकडं होतं. Happy बाकीचे कुझीन टाईप जास्त आवडतात. मग मी पराठे, पास्ता, सँडवीच, भाताचा प्रकार, पुन्हा पास्ता/ सँडवीच असा फिरता मेनु ठेवते. मग ती खुश आणि मी पण. Happy
तिला फळ, भाजी पण रिपीट आवडत नाही. तिच्या काही मैत्रिणी रोज सॅडवीच + बेबी गाजर + सफरचंद अस ३-५ दिवस खाऊ शकतात. आमच्या कडे सफरचंद, केळ, पेअर, बेरीच्या दिवसांत बेरी अशी व्हराईटी लागते. भाज्यांच तेच.

भाज्या -करीज वगैरे न्यायला ,डबा मायक्रोवेव्ह मधे रिहिट करायला वगैरे प्लॅस्टीक बिग नो फॉर मी !
माझं मत काचेच्याच डब्याला विथ एअरटाइट लिड . प्लॅस्टीक सारखे डाग वास रहात नाही , डिशवॉशर मधे स्वच्छ होतात !

अशा टाइप चे:
http://i01.i.aliimg.com/photo/v9/755121681/keep_food_font_b_hot_b_font.jpg

हो. सशल त्याच टाईपचे आहे. जरा जास्त उंच आहे. आम्ही ६-७ वर्षांपूर्वी घेतले होते. आता तो ब्रॅन्ड नाहिये पण इतर ब्रॅन्ड्सही चांगले आहेत. सूप, सांबार, पावभाजीची भाजी वगैरे सगळे मस्त गरम रहाते. मी दूधासाठी देखील वापरलाय. गेल्या वर्षी दूध, चॉकलेट मिल्क वगैरे साठी bubba ची हिरो इन्सुलेटेड बॉटल आणली. त्याला झाकणाला उघडमीट करायला स्नॅप आहे. त्यामुळे ऑन द गो साठी बरे पडते. गार/गरम दोन्हीसाठी वापरतो.

मी फक्त काचेचे व स्टीलचे डबे वापरते. विविध आकाराच्या स्टीलच्या चपट्या डब्यांची चळत घेउन आले आहे तुळशी बागेतून. लिक्वीड न्यायचे असेल तर प्लॅस्टीकच्या रोल मधून एक लहान तुकडा झाकणाच्या आत घालते. ही होतो एअरटाईट.
काचेचे डबेसुद्धा उत्तम मिळतात हल्ली. ताक व सॅलड मस्त रहाते. आंबट नाही होत. टपर्वेअर मधे कडधान्ये किंवा ताक असेल तर स्फोट होऊन झाकणे उघडली गेली आहेत ह्यापूर्वी. टवे आउट करून टाकले आहे. एक पारदर्शक प्लॅस्टीकचा डार्क निळ्या रंगाचे प्रेस फिट झाकण असलेल्या प्रकारचा डबा मिळतो बहुतेक ईझेडलॉक नावाचा तो साफ करायला चांगला आहे कारण त्याला गास्केट नसते. जेवताना लॉ.अ‍ॅ.लॉ वाल्यांच्या डब्यांच्या गास्केटकडे लक्श ठेवून असते मी...हिरव्या, पिवळ्या, काळ्या रंगाचे गास्केट झाले तरी गावीही नसते कोणाच्या.

प्राजक्ता, धनश्री -- धन्यवाद! thermos funtainer पाहिला मी पण, पण कितपत बरा आहे कळलं नाही. तुमच्याकडुन ऐकून बरं वाटलं. करते आता ऑर्डर. त्या स्नॅक बॅगीज पण छान वाटत आहेत.

मी पण कोस्ट्कोचे स्नॅपवेअर वापरते. पण अता २ एक वर्ष्यांनंतर झाकणाचे रबर जरा काळे पडले आहे. डब्बा मात्र एकदम क्लिन. छोटे जास्त लागतात म्हणुन मी कोर्नींग वेअरच्या दुकानातुन $४:९९ एक असे घेतलेत.ते ही छान आहेत.
सॅलड साठी मी बेड बाथ अ‍ॅड बियोन्ड मधे असे डब्बे घेतले आहेत. ह्यात खाली मोठा बाउल आणि वर एक २ खचे आहेत. खालच्या कप्प्यात पालक्/लेटस आणि वर चेरी टोमॅटो, काकडी गाजराचे तुकडे, नटस् ठेवता येतात.
http://www.bedbathandbeyond.com/store/product/chill-it-to-go-container/1...

http://www.amazon.com/Libbey-6-25-Ounce-Small-Plastic-16-Piece/dp/B001K4...
मी अ‍ॅमेझॉन वरुन हे घेतले आहेत १ वर्षापुर्वी मस्त आहेत एकदम काचेचे आहेत पण झाकण प्लास्टीक ची आहेत. मी दही लाउन ठेवते त्यात. ऑफीस साठी घरात खायला १ वाटी दही बरोबर होत.
आणि इतर गोष्टी पण सांडत नाहियेत अगदी आमटी सारखे पातळ पदार्थ नाही घातले कधी पण भाजीचा रस बाहेर नाही येत.
आणि रोज अन्न काढून ठेवणे किंवा स्वयंपाक तयारी साठी पायरेक्स चे सेट घेतले आहेत वेगवेगळ्या आकारातले.
ते बेकींग ला पण चालतात. त्यामुळे त्यातच काहीतरी बनवता पण येते.

धनश्री तुझ्या मुलीला तो ड्बा उघडायला जमतो का? पहिलीतल्या मुलाला जमेल का? माझ्याकडे सुरूवातीचे काही डब्बे उघडता येत नाहीत या कारणाने रद्द झाले आहेत.

I have used this type of lunch container for my kids for last 6 years. The bag has room for a watter bottle .
http://www.amazon.com/Zojirushi-SL-NCE09-Bento-Stainless-Steel-Vacuum/dp...

There are three containers and one of them has a small divider type box. I often put salad dressing in the small divided, carrots, broccoli or cucumbers on the other side. Then the main item - paratha, idali, pasta, sandwich, noodles, fried rice, quesadilla, etc. in the middle one and another sweet or savory snacks thing in the bottom.

Frozen gogurts or yogurt or cheese sticks go in the bag. I microwave the warm food in a ceramic or glass container and then pack in these boxes. Food stays warm to touch till 11:30 or so.

The containers are not dishwasher safe. They are microwave safe, but I don't use them in the microwave. I have had no issue with turmeric discoloration or lingering smell of spice.

Recently, I bought these boxes -just to add some variety -http://www.allthingsforsale.com/lock-lock-lunch-box-set/2612-high-qualit...

The food does not stay as warm, so I use it on the days I pack sandwiches. Some come with a water bottle inside but that bottle is too small.
The containers are microwave safe and really spill proof. Kids like the design and colors of these boxes better than the zojirushi one.

जरा अवांतर आहे पण..
इथे सगळ्या स्त्री आयडीजच बोलताहेत.
माबोवरचे सगळे पुरुष कँटीन मध्ये जेवतात का?
किंवा डबा त्यांच्या बायका/ आई सिलेक्ट करत असतील तरी डबा या विषयावर त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही का?

काही सिरियस नाही. जस्ट पट्कन जाणवलं.

इथे सगळ्या स्त्री आयडीजच बोलताहेत.<<< इतक्या ठामपणे लिहिलंस म्हणून मी_केदार, दिनेश आणी गजानन या तीन मेल आयडीच्या पोस्ट्स याच बाफवर आहेत. (जास्त करून स्त्री आयडी लिहितात असं वाक्य असतं तर एक वेळ ठिक!!)

नीरजा.. तुझ्यासाठी तीन पुडीचा स्टीलचा डबा बेस्ट आहे.. बाई चालत जाऊन डबा देऊन येणार, त्यामुळे डबा सरळ व्यवस्थित धरला तर सांडण्याचा प्रश्न नाही.. आणि सगळाच्या सगळा डबा परत येणार ह्याची खात्री...

टवे उत्तम आहे एकदम.. मी गेले ८ वर्ष टवे चे डबे वापरतो आहे लंच बॉक्स म्हणून.. योग्य पद्धतीत घासल्यास पिवळा वगैरे नक्कीच पडत नाही. आणि कुठलाही वास येत नाही...

टवेचा डबा लावणे हे स्कीलच आहे.. व्यवस्थित लागला नाहीतर झाकण हमखास उडते... आमच्याकडे अगदी छोट्यापासून एकदम मोठ्या पर्यंत सगळे डबे आहेत.. तूप, मध, तेल, दूध अश्या गोष्टी कुठे घेऊन जायच्या असतील तर ह्या डब्यांना पर्याय नाही... बाकीचे वापरुन मगच हे निष्कर्ष काढले आहेत.

मी सुद्धा टवे चेच डबे घेतलेत, मस्त वाटतात. लिक्विड सोप ने स्वच्छ होतात. ते काम मात्र मीच करते. Wink अगदिच तेलकट वाटले तर थोडं गरम पाणी.

मी पण टवे चे डबे वापरते पण त्यात पदार्थ ठेवून मावेत गरम केला की संपलं. डाग पडतात. मग ते जात नाहीत.
पण कापलेली फळं (पपई/कलिंगड) वगैरे जर संध्याकाळ पर्यंत फ्रेश ठेवायचं असेल तर टवे ला पर्याय नाही. मी सकाळी कापलेलं सॅलड (एक लंच ला आणि एक रात्री घरी येताना असं खाते) टवे च्या डब्यात एकदम फ्रेश. एकदा मैत्रिणीने विचारलं सुद्धा की इथे कापलंस का म्हणून.

टवे अगदी मावे सेफ वगैरे जरी म्हटलं असेल तरीही प्लॅस्टिक गरम करत जाऊ नका मावेत. त्याकरता वर दिपांजलीने लिंक दिलेले काचेचा बेस असलेले डबे जरी जड पडले तरी बेस्ट आहेत. एखादीच भाजी असेल तर तो एक डबा आणि बाकी टवे असंही करता येईल.

मी टपरवेअरच्या डब्याचं झाकण बंद करायच्या आधी डबा क्लिंग फिल्मने झाकते. त्यामुळे झाकण्याच्या कडांमधे तेल किंवा मसाले शिरून डाग राहाणे वगैरे प्रकार होत नाहीत.

टवे जर ईतक चांगल असेल तर मायक्रोवेव साठी ऑफिसमधे एखादा काचेचा बाउल ठेवला तर प्लास्टिकचा टवे वापरावा लागणार नाही.

अदिति + १

प्लॅस्टिक कितीही चांगल्या प्रतीचे असले तरी मावे मध्ये त्याचे विघटन होतेच. त्यामुळे मावे मध्ये फक्त काच, चायना ग्लास, किंवा काही मावे मध्ये स्टिल पण चालते.

भारतात मिल्टनचा उभा डबा मिळायचा. अलिकडे कधी दिसला नाही. त्यात वरून इन्स्युलेटेड प्लास्टिक/फायबर प्रकारचे आवरण आणि आत जुन्या टाईपच्या छोट्या स्टेनलेस स्टील डब्याची उतरंडी असा सेट होता. त्यामध्ये अन्न गरम पण राहते आणि स्टिल मुळे धुण्याचे काम सोपे.

टवे वापरणार्‍यांनो (मी सोडून इतर), टवेमध्ये ताक दही कसं नेता?

मी लॉ़क अ‍ॅण्ड सील सारखे डबे आणि टवे दोन्ही डबे आलटून पालटून वापरते. जर व्यवस्थित धुतले तर दोन्ही डबे छान राहतात. लहान मुलांच्या वॉटरबॉटलचे स्ट्रॉ धुवायचे ब्रश येतात ते वापरून टवेच्या झाकणांच्या कडा आणि लॉक अ‍ॅण्ड सीलसारख्या डब्यांचे रबर काढल्यावर जिथे तेल अडकतं तो झाकणाचा भाग व्यवस्थित धुता येतो. लॉ&सी च्या डब्यांना सीलचे रबर काढून धुणे याला पर्याय नाही.

मला सुद्धा जर चांगल्या न सांडणार्‍या स्टीलच्या डब्यांचा ऑप्शन मिळाला तर टवे आणि लॉ&सी ला मोडीत काढेन.

स्वाती, धन्यवाद. मी मुंबईत आहे. इथं कुठं मिल्टनच्या डब्यांची अशी नुसती झाकणं मिळतील याची चौकशी करतो. (इथं कुणाला ठाऊक असेल तर सांगा कृपया). नाहीतर तुबात कधी गेलो तर लक्षात ठेवायला लागेल. Happy

वेल,

माझ्याकडे हा एक आणि अजून ३ आहेत, त्यात एक टपरवेअर चा आहे, पण तो अगदीच टिचका आहे. त्यात मी फावल्या वेळेत पिण्यासाठी ताक नेते. बाकी तीन जम्बो साईजचे आहेत. फार ब्रँन्डेड नाहीत. मग मीही जास्ती नाही वापरत. दर दोन तीन महिन्यांनी सुट्टी.

20140626_140251.jpg

Pages