Submitted by नीधप on 24 June, 2014 - 02:01
इथे विविध प्रकारच्या डब्यांची चर्चा अपेक्षित आहे. त्यातल्या पदार्थांची नव्हे.
हा मुद्दा आधीच कुठे चघळून झाला असेल तर इथला रवंथ तिथे हलवून हा बाफ 'भुर्रर्रर्र काऊ घेऊन गेला!' करून टाकावा अशी मान्नीय अॅडमिन वा वेबमास्तरांस विनंती.
अन्नं न सांडणारे, वस्तू गार व गरम ठेवणारे, मावेबल नॉनमावेबल, स्टीलचे, प्लास्टिकचे, कागदाचे, दगडाचे, मातीचे, सोन्याचे वगैरे कुठल्याही मटेरियलचे, सर्व आकार, प्रकार वगैरेचे अन्न वाहून नेणारे डबे हा इथला मूळ विषय.
स्टोरेजसाठीचे डबे चघळण्यासाठी हा बाफ नको.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पुण्यातल्या तु.बा मधल्या
मी पुण्यातल्या तु.बा मधल्या तुलसीतून आणले होते, सावली. ब्रॅन्डचे नाव माहित/आठवत नाही. मिल्टनचे आणले कलकत्त्यात तर त्याची झाकणं तेवढी पक्की लीकप्रूफ नाहीत असं लक्षात आलं
सावली, गोखले रोडवर अमर शूज
सावली, गोखले रोडवर अमर शूज दुकानाच्या थोडं अलिकडे एक भांड्यांचं दुकान आहे तिकडे बघ. नाहीतर कोरम मॉलला रिलायन्स लिविंग, होम शॉप वा तत्सम दुकानांमधे.
टपर वेअर नको वाटत आहे ,
टपर वेअर नको वाटत आहे , वापरून झाले आहे. सध्या स्टील चा डब्बा वापरत आहोत. म्हणून
लॉक & लॉक वापरणाऱ्या लोकांना काही प्रश्न -
कितीही नीट साफ केलं तरी हळदिचा, मसाल्यांचा एक बारीक वास रहातोच टवे ला सुद्धा. ह्याला पर्याय लॉक & लॉक आहे का?
पांढरे & पारदर्शक डबे असल्याने हळदीचा वैगरे रंग लागला तर लगेच दिसून येते का? का साफ केल्या वर परत चकाचक होतात.
मृणाल, मला टवेपेक्षा लॉक&लॉक
मृणाल, मला टवेपेक्षा लॉक&लॉक बरे वाटले. माझे डबे हळदीने पिवळे नाही झालेत अजून तरी.
म्हणजे अजून त्यांच्या अंगाला
म्हणजे अजून त्यांच्या अंगाला हळद लागली नाही? शो ना हो
धिस लाईन इज डेडिकेटेड टू पिवळट डबे -
अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं
(पुढेकोवळ्यारबराबद्दललिहीलेहोतेपणभलतीचपांशाहवीत्यासाठी)
थन्क्स अश्विनी . प्लास्टिक ला
थन्क्स अश्विनी .
प्लास्टिक ला राहणारा रंग & वास म्हणजे यक वाटते.
आणि जर का ते डब्बे न वापरता काही दिवस बंद राहिले कि यक्क्कक्क्क्क.
लॉक & लॉक चा वरिजनल डब्बा कसा ओळखावा. ह्यांचीपण ट वे सारखी multi level मार्केटिंग असते का?
का दुकानात मिळतात ?
दुकानात मिळतात आशूडी _/\_
दुकानात मिळतात
आशूडी _/\_
आणि जर का ते डब्बे न वापरता
आणि जर का ते डब्बे न वापरता काही दिवस बंद राहिले कि यक्क्कक्क्क्क.
कधी असे ठेवायचे झाले तर पेपर कोंबुन थेवायचा आत
ट्परवेअर चे डबे हे आपणच घासणं
ट्परवेअर चे डबे हे आपणच घासणं 'मस्ट' आणि मी ते बाईकडे टाकत नाही. लिक्विड सोप ने खूप वेळ ही लागत नाही. ऑफीस मधे लन्च टाईम मधे वेळ मिळाल्यास टीश्यु पेपर ने पुसून घ्यावे, अजिबात तेल रहात नाही. तेलकट काही अस्ल्यास मी धुवून झाल्यावर घरी ही टीश्यु पेपर ने पुसून घेते, हळद , तेलाचे डाग रहात नाहीत.
१/१/२ वर्षाने डबे चांगले असतील तरी मी बदलते. कारण रोजच वापर होतो त्यामुळे एक्दम खराब होई परयंत वैगरे वापरत नाही.
फळ वैगरे न्यायला येरा चे लहान काचेच बाऊल्स चांगले आहेत, प्लॅस्टीक चे झाक्ण असलेले.
मी प्लॅस्टीकचे जेवणाचे डबे
मी प्लॅस्टीकचे जेवणाचे डबे वापरात नसतील तर बंद ठेवत नाही. झाकणं काढूनच ठेवते.
आंबट नसणारे कोरडे पदार्थ, (
आंबट नसणारे कोरडे पदार्थ, ( चपात्या, इडली, हांडवो वगैरे ) साठी मला अॅल्यूमिनियम फॉईल सोयीची वाटते.
पदार्थ ताजा राहतोच शिवाय परत आणताना ओझे नसते. थोड्याफार रसदार भाज्यांसाठी मी काचेच्या रुंद तोंडाच्या बाटल्या वापरतो ( इथे दह्यापासून अनेक पदार्थ त्यात मिळतात ) या बाटल्या मनाप्रमाणे स्वच्छ करता येतात. ताक, लस्सी, कोल्ड कॉफी साठी स्टीलचे ( इगलचे ) फ्लास्कस.
आणि जर का ते डब्बे न वापरता
आणि जर का ते डब्बे न वापरता काही दिवस बंद राहिले कि यक्क्कक्क्क्क.
कधी असे ठेवायचे झाले तर पेपर कोंबुन थेवायचा आत
थान्क्स ग .
आता जास्त वापरात नसलेल्या डब्यात घासून ठेवतानाच TISSU ठेवणार
पांढरे & पारदर्शक डबे
पांढरे & पारदर्शक डबे असल्याने हळदीचा वैगरे रंग लागला तर लगेच दिसून येते का? >> गरम पाण्यात धुवायचे मग नाही रंग रहात.
टवे सारखा बॅगसकट जो लॉ-लॉ च सेट मिळतो त्यातले डबे ग्रे / वाईन इ. कलरचे असतात. त्यात एक पाण्याची चपटी बाटली पण असते, शिवाय चमचा + काटा सेट.
भाजीचा डबा विथ / विदाऊट पार्टीशनचा पण असतो.
सामी - काचेचे डबे बॅग जड नाही होत?
इथे फक्त 'टिफिन' डब्यांबद्दल
इथे फक्त 'टिफिन' डब्यांबद्दल चर्चा अपेक्षित आहे, स्टोरेजबद्दल नाही.>> माफी करा... ठळक नोट दिसली नाही पाहा... नंबर नक्कीच असणार.
मलाही टवे पेक्षा लॉक अँड लॉक बरे वाटले. टवे पिवळट पडतात. आणि बाईकडे टाकल्यावर कशाने घासेल नेम नाही...
प्लास्टीक पेक्षा काचेच्या बाटल्या ताक, लस्सी साठी बर्या वाटतात (नकोसा वास येत नाही) पण ट्रेन मधून जंगली पद्धतीने ट्रॅव्हल करताना त्या बाटल्यांचं काही खरं नाही.
http://locknlock.in/product_details.aspx?id=88 अशा टाईपचे कंटेनर्स बरे पडतात.
मलाही 'NAYASA' चा चांगला
मलाही 'NAYASA' चा चांगला अनुभव आलाय. तेलाचे / हळदीचे डाग रहात नाहीत.
अलीकडेच मी 'signoraware' चा टिफिन आणला. टवे सारखाच आहे. चांगला वाट्तोय
monalip अग फळे किंवा दही
monalip अग फळे किंवा दही वैगरे असे काही असेल तरच काचेचे बाऊल्स नेते. जड नाही होत
माझ्या ट्परवेअर च्या बॅग मधे नीट फिट होतात.
माझे मत टप्परवेअरलाच.
माझे मत टप्परवेअरलाच. सिग्नोरावेअर्चा एक सेट गिफ्ट आलाय, तोदेखील चांगला आहे. अर्थात आम्हाला काय रोजच्यारोज हापिसात डबे न्यायचे नसतात. कधीमधी प्रवासत लागले तरच
मी अगदी आत्ताआत्तापर्यंत
मी अगदी आत्ताआत्तापर्यंत टप्परवेअरच्याच डब्यात भाजी वगैरे देत होते. पण हल्ली हल्ली जाणवलं की त्या डब्यांचं तेल जातच नाही पूर्ण. अगदी गरम पाणी आणि लिक्विड सोप भरून ठेवलं तरी नंतर टिश्यूने पुसून घ्यावा लागायचाच. त्यामुळे सध्या टप्परला फाट्यावरच मारलंय.
आता 'ग्लास लॉक' या कोरियन कंपनीचा अगदी काचेचाच डबा देतेय. काचेचा असल्याने छान स्वच्छ होतो. चौकोनी आकाराचा असला तरी काहीही बाहेर येत नाहीये, अगदी उसळी, रसभाज्या सुद्धा.
थँक्यु मंजूडी, अश्विनी, वरदा.
थँक्यु मंजूडी, अश्विनी, वरदा. आता गो. रो. वर जाऊन पाहीन. आणले की लिहीते इथे.
मी प्लॅस्टीकचे जेवणाचे डबे वापरात नसतील तर बंद ठेवत नाही. झाकणं काढूनच ठेवते. >>++
माझे मत स्टीलच्या डब्यांनाच.
माझे मत स्टीलच्या डब्यांनाच. रोज प्लास्टीकमधे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही असे वाटते. पातळ पदार्थांसाठी घट्ट झाकणाचे डबे वापरते. मागे प्लास्टीक झाकण + स्टील डबा असे वापरून पाहिले पण झाकण स्वच्छ होत नाहीच.
मी corning / borosil चे
मी corning / borosil चे काचेचे डब्बे आणी त्याला लीक प्रुफ प्लास्टिक ची झाकणे असे अनेक वर्ष वापरत आहे. बाई ला ट्रेनिन्ग देणे , सान्डणे, हायजिन साम्भाळणे , पिवळे पडणे, ई ई पासुन मुक्त आहे.....
फक्त फुटणे आणी जड ह्या पासुन मुक्तता नाही. काचेचे असल्याने जड असतात नक्किच .
मिल्टनचे टिपिकल स्टीलचे डबे
मिल्टनचे टिपिकल स्टीलचे डबे आणि त्यावर प्लॅस्टिकचा मोठा डबा हेही गोड असतात. ज्यांना स्टीलच हवे आहे त्यांच्यासाठी चांगला पर्याय. पण ते एअर टाईट नसतात. सरळसोट ठेवले तरच त्यातून रस सांडत नाही. <<< हो. अश्या डब्यांची फक्त झाकणेच मिळतात का कुठे? कारण काहींची झाकणे खराब झालीत. खालचा डब्बा चांगला असतानाही झाकणांसाठी दुसरा संच घ्यायला लागला शिवाय या बिनझाकणाच्या डब्याचे काय करायचे असा प्रश्नही आहेच.
बिन झाकणाचे डबे लहान कुकर मधे
बिन झाकणाचे डबे लहान कुकर मधे वापरता येतात. थोडं थोडं काही वाफवायच असल्यास
Gajanan, zaakane miltat.
Gajanan, zaakane miltat. Punyaat asaal tar tulshibaget miltat.
माझ्याकडे मावेत वापरायला
माझ्याकडे मावेत वापरायला कॉर्निंगचे डबे आहेत. झाकण लीकप्रुफ आहे आणि त्याला वाफ जाण्यासाठी उघडझाप करता येइल असे वेंट आहे. मावे वापरणे शक्य नाही अशा वेळी थर्मली इंन्स्युलेटेड फूड जार वापरतो. त्यात गरम/गार जे काही भराल ते ६-८ तास छान रहाते.
स्वती२, असलं काही का?
स्वती२, असलं काही का?
http://www.amazon.com/LunchBots-Thermal-Stainless-Insulated-Container/dp...
कोणता ब्रँड रेकमेन्डेड् ?
मी एक डेमो पाहिलेला
मी एक डेमो पाहिलेला प्रदर्शनात(अर्थात प्रदर्शन काचेची भांडीचे होते).
कुठलहि प्लास्टीक हळदीशी, मसाल्याशी पदार्थाच्या संयोगात ज्यास्त वेळ ठेवू नये. प्लास्टीकचे पहिले लेयर त्या पदार्थाशी संयोग होवून क्रिया होते तेव्हाच डाग पडतात. म्हणून मसाले वगैरे पण काचेतच भरणं चांगलं.
मी त्या डेमो नंतर बरेच काचेचे डबे, बरण्या, बोल्स घेवून आले त्या प्रदर्शनातून अर्थात. जोक्स अपार्ट, पण मलाही प्लॅस्टीक नकोच वाटते. मी येराचे सुद्धा वापरते.
वर्तमान पत्र सुद्धा कोंबून ठेवू नका. त्याची शाई असते.
जर वापरातच असाल व तेच आवडत असतील तर धूवून, लगेच पुसून उघडे ठेवा. अधून मधून बेकींग सोडाच्या पाण्यात बुडवून ठेवा. साबांना कितीही सांगितले तर टवे च कौतुक गातील. पण त्या अगदी नेमाने एक दिवस आड असे लाड करून ठेवतात त्या टवे डब्यांच( बेकींग सोडात बुडवून वगैरे, पुसून, पंख्याखाली ठेवून... मग सकाळी वापरणे वगैरे लाड). बघा तुम्ही करून.
मी हल्लीच कॉस्टकोमधून लॉक न
मी हल्लीच कॉस्टकोमधून लॉक न लॉक सारख्या झाकणाचे पण काचेची भांडी असलेले डब्बे घेतलेत. त्यावर snap ware लिहिलंय. मला माझ्यासाठी तरी आवडलेत. तिकडे मिळतात का? मला ट्प्पर्वेअर आणि एकंदरित कुठलंच प्लास्टीक नको होतं म्हणून मी काचेचे घेतलेत. (आणि मला काही ट्रेनने वगैरे प्रवास करायचा नाही त्यामुळे वजन वगैरे चिंता नाही)
हा सेट वेगवेगळे आकार आणि साइजेसचे डब्बे असल्यामुळे दही वगैरे पण न सांडता नेता येतं.
अमेरिकेत मुलांना शाळेत डबा
अमेरिकेत मुलांना शाळेत डबा द्यायला काय वापरता तुम्ही? शाळेत डबा गरम करून देत नाहीत. सकाळी भरलेलं लंच टाईम पर्यंत गरम्\वॉर्म राहीलं तर बरं होईल. आणि बाकी स्नॅक्स साठी -- जे गरम राहीले नाहीत तरी चालतील -- काय वापरता? प्लॅस्टिक नकोय. खरं तर काच पण नको. त्याला हँडल करता येणार नाही बहुदा. तर अशा सगळ्या अटी पूर्ण करणारं काही आहे का?
वेक + १. मला पण snap ware चे
वेक + १. मला पण snap ware चे काचेचे डबे आवडतात. स्वच्छ करायला पण एकदम सोपे.
झाकणे प्लॅस्टिकची असली तरी बीपीए फ्री आहेत. आणि हळदीचे वगैरे डाग नाही पडत. घरी उरलेले अन्न पण यातच काढून ठेवते. नंतर मावे वर तापवायला सोपे.
हे डबे ओव्हन मधे चालत नाहीत पण मावे मधे बिन्धास्त.
Pages