आजवर इतके उद्योग माझ्या लेकीने केले आहेत की ही खरं तर उसका "उद्योगपती ऑफ द डिकेड " अॅवॉर्ड तो बनता है ... (नुकतीच दहा पुर्ण केलीत ना आम्ही )
तर अशाह्या उद्योगांसाठी दरवेळी नविन धागे माबोवर काढून भरपूर सर्व्हर स्पेस अडवण्यापेक्षा आम्ही सुट्टीतील उद्योगांचा एकच धागा काढत आहोत....
ही उन्हाळी सुट्टी आम्ही भरपूर उनाडक्या करण्यात घालवली पण दुपारच्या वेळात घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने तो वे़ळ असा सत्कारणी लावला.....
सुरुवात करुया चित्रकलेपासून....
वारली पेंटिंग
ह्या लोकांच्या बाबतीत आमच म्हणण अस आहे की "व्हेरी स्वीट पीपल.... कुण्णाच काहीही चालेलं असुदे सारखे नाचत असतात"
हा आम्ही बर्याच दिवसांनी वॉटर कलरवर हात आजमावला....भरुन आलेलं आभाळ
हे आमच आवडत कार्टुन कॅरेक्टर .. " चिप "
(चिपेनडेल हे जोडनाव नसून दोन वेगवेगळ्या खारींची ही नाव आहेत अशी बहूमोल माहीती मला हे चित्र पाहूनच कळली. आता ही गोष्ट वेगळी आहे की सोबत एक तुक ही मिळाला पण महत्वाच काय तर....ह्या दोन खारींमध्ये ज्याचे दात चिकटलेले अन नाक डार्क चॉकलेटी तो चिप आणि नाक रेड दातात फट तो डेल....संपल बाबा एकदाच, केवढ ते ज्ञान... आम्ही मेलं नुसत कार्टुन पहायचो )
ह्याच दरम्यान आमच्याकडे माझी भाची रहायला आली. ती ह्यावर्षी चित्रकलेची दुसरी परीक्षा देतेय...तिच्या सोबत आमच्या मॅडमपण बसल्या चित्र काढायला...(हि सगळी चित्र तिने पहिल्यांदाच काढली आहेत फक्त पुस्तक वाचून)
स्मरणचित्र
रंगवायचा आम्हाला भारी कंटाळा आला....
निसर्गचित्र
संकल्पचित्र
मुक्तहस्त चित्र
ह्यात हात इतका बांधावा लागतो तरी ह्याला मुक्तहस्तचित्र का म्हणतात ,आई ?? ह्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही देता आलेले नाही
अक्षर लेखनाचा कन्सेप्ट भाचीला समजावे पर्यंत आमची चित्र तयार ही झाली....
हे आमचं ठसेकाम... खर तर हे भेंडीच्या ठश्यांच चित्र असणार होत पण भेंडी रंगवताना रंगलेले आमचे हात मस्त आयडिया देऊन गेले ...यातल आकाश नी जमीनच ब्रशने रंगवलीय.
आता आमची दुसरी आवड ... माती काम (चिकन माती )
कॅट
डॉग
राक्षस
हत्ती
बॅलेरीना (काय बाई नाव तरी..... )
बॅलेरीना पासून गणपती न पणती (रुपांतरण )
टॉकन पक्षी (उच्चार तपासून घ्यावा )
रिफर करायला हा फोटो
ट्वीटी
शेपूट पहा आमच
इस्टर बनी
स्नो मॅन... (पांढरा रंग संपल्याने व सप्लायरने हात वर केल्याने कलरफुल वेशात )
मॅलीफिसन्ट - स्लिपींग ब्युटीची व्हीलन
इतक करुनही एक दुपार फारच डोक्यात गेली...तेंव्हा केलेला उपाय ... )
या नंतर आम्ही भिंती रंगवण्याच काम काढल....खर तर हॉलची भिंत रंगवायची होती पण खूप बार्गेन करुन गॅलरीवर मांडवली झाली.....
पर्सनल हाईट चार्ट...
(काढायच्या आधी माहित नव्हत की इतक चांगल काढेल म्हणून वॉटर कलर वापरू दिले..आता हे चित्र प्रिझव्ह कसं कराव? असा प्रश्न पडलाय ...)
तर हे व असे बरेच उद्योग करुन ही सुट्टी आम्ही संपवली.... पण सुट्टी संपली म्हणजे उद्योग संपले असं नाही....
वी विल बी बॅक सुन
कलावंत आणि गुणी लेक आहे.
कलावंत आणि गुणी लेक आहे.
आईशप्पथ काय भारी भारी केलंय
आईशप्पथ काय भारी भारी केलंय काय काय... हाईट चार्ट तर सॉल्लिड...
आमच्याकडे आत्ता कुठे सुट्टी सुरू झालीये. मुलीला हा धागा दाखवावाच लागणार आता.
फुलांची चित्रे तर अगदी
फुलांची चित्रे तर अगदी चित्रकलेच्या परिक्षेच्या दर्जाची आहेत. आपल्याकडच्या पाटील यांचे जे लेख येताहेत त्यावर अवश्य काम करु द्या तिला. ( खरे तर ते आपणहून स्वतंत्र मार्गदर्शन करतील अशी आशा वाटतेय मला. )
सुंदर आहेत सगळे उद्योग
सुंदर आहेत सगळे उद्योग
वॉर्निश स्प्रे करून वॉटर कलर नीट राहातात असे एका मैत्रिणीकडून नुकतेच समजले.
खुपच भारी! कलावंत आणि गुणी
खुपच भारी!
कलावंत आणि गुणी लेक आहे.>>+१
भारी..
भारी..
कसल्या सुंदर कलाकृती केल्या
कसल्या सुंदर कलाकृती केल्या आहेत! सगळे प्रकार आवडले.
उंचीचा तक्ता आणि मातीकामतर अप्रतिम!
केलेला प्रत्येक अन प्रत्येक
केलेला प्रत्येक अन प्रत्येक उद्योग वाखाणण्याजोगा आहे. मुलगी एकदम कलाकार आहे.
सगळेच उद्योग एकदम एक नंबर.
सगळेच उद्योग एकदम एक नंबर.
पर्सनल हाईट चार्ट... आणि
पर्सनल हाईट चार्ट... आणि ट्वीटी फार फार फारच आवड्ले
मी आधी अनेकदा म्हणलंय तसं -
मी आधी अनेकदा म्हणलंय तसं - रत्न आहे हे अर्चू,
खुप लकी आहेस तू.
अनन्याला खुप सारी शाबासकी. भेटेल तेंव्हा एक गिफ्ट पक्का!
आणि खुप खुप पप्प्या
जियो अनन्या! अशीच बहरत रहा.
कोणती एक गोष्ट आवडली ते ठामपणे सांगता येणार नाही.
अनन्या, मला तो स्नोमॅन आणि ट्वीटी करायला शिकवशील का?
अप्रतिम! सगळ्याच गोष्टी छान
अप्रतिम! सगळ्याच गोष्टी छान झाल्यात. १० वर्षाच्या मुलीने हे केले ह्यावर विश्वास बसत नाही. फुले, हाईटचार्ट , कोळिण,पाण्यात खेळणारी मुले तर फारच सुंदर! हे असे उद्योग सुट्टी संपल्यावरही आम्हांला बघायला आवडतील, हे तिला आवर्जुन सांगा.
मस्त.. अप्रतिम.. तिला परिक्षा
मस्त.. अप्रतिम.. तिला परिक्षा द्यायला लाव चित्रकलेच्या.. अशी चित्र काढत असेल तर सरावाने बी+ ग्रेड नक्की जात नाही कुठेच..
कसले क्लास उद्योग आहेत.. तिला
कसले क्लास उद्योग आहेत.. तिला आणखी उद्योग करण्यासाठी मला गिफ्ट द्यायला नक्कीच आवडेल..
मस्तच चित्रे फार सुरेख काढली
मस्तच
चित्रे फार सुरेख काढली आहेत.
आता हे चित्र प्रिझव्ह कसं कराव? >> पेन्सिल / चारकोल स्केच / वॉटरकलर चित्र प्रिझर्व करायला एक ट्रान्स्परंट स्प्रे मिळतो . त्याचं नाव विसरलेय पण ठाण्यातल्या मँगो नावाच्या दुकानात पाहीला आहे. ( पुन्हा गेले तर नाव बघुन ठेवेन) तो भिंतीवर चालतो की नाही माहित नाही पण प्रयत्न करुन बघता येईल.
अमेझिंग सफाईदार काम आहे सगळच.
अमेझिंग सफाईदार काम आहे सगळच. सॉल्लिड आहे तुमची अनन्या.
सगळेच उद्योग मस्त! हाईट चार्ट
सगळेच उद्योग मस्त! हाईट चार्ट तरी एकदम सही!
१० वर्षाच्या मुलीने केले
१० वर्षाच्या मुलीने केले हे?
आमची लायकी नाही बाबा कमेंट करण्याची
_________/\__________
जबरदस्त. पाण्यात होड्या
जबरदस्त. पाण्यात होड्या सोडणारी मुले एकदम मस्त. मातीकामही सुंदर, विशेषतः टूकन पक्षी.
१० वर्षाच्या मुलीने केले
१० वर्षाच्या मुलीने केले हे?
आमची लायकी नाही बाबा कमेंट करण्याची
_________/\__________
>>> +१ खरच भारी आहे कलाकारी.
अर्रे! मस्त आहेत हे उद्योग.
अर्रे! मस्त आहेत हे उद्योग. अनन्याबेटा, जियो!
हाईट चार्ट, ट्विटी आणि राक्षस्पण क्युट
एक से बढकर एक आहेत सगळेच!
एक से बढकर एक आहेत सगळेच!
OMG!
OMG!
बोटात जादू आहे हो तुमच्या
बोटात जादू आहे हो तुमच्या मुलीच्या. सगळीच एका पेक्षा एक सरस. खूप आवडली.
कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय
कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय इतकी उत्कृष्ट चित्रं आणि मातीकाम! उपजत कलावंत आहे लेक.
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
गुणवान आहे तुमची लेक! उंचीचा
गुणवान आहे तुमची लेक! उंचीचा तक्ता फार आवडला.
एका सुट्टीत आमचेकडे पाठवून
एका सुट्टीत आमचेकडे पाठवून द्या...आमची एक भिंत रंगवायचं प्रोजेक्ट आहे शिवाय मुलांना उत्तेजना वगैरे पण होऊन जाईल. कलाप्रांतात आम्ही दोघंही आपलं ते" हे "असल्याने उत्तेजना द्यायची राहूनच जाते..
सगळेच उद्योग मस्त...
फारच सुंदर! तिला नक्की ग्रेड
फारच सुंदर!
तिला नक्की ग्रेड (एलिमेंटरी/इंटर) परिक्षांना बसवा.
वेका, उत्तेजन.
वेका, उत्तेजन.
Pages