Submitted by तृप्ती आवटी on 22 May, 2014 - 17:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
_१ वाटी बारीक रवा
_पाणी
क्रमवार पाककृती:
रवा पूर्ण बुडून थोडं वर पाणी राहील अशा हिशेबाने एक पूर्ण दिवस भिजत ठेवावा. दुसर्या दिवशी वरचं पाणी काढून टाकावं. एक वाटी पाणी आधणास ठेवावं. त्यात अंदाजाने मीठ घालावं. रवा पाण्यात घालून नीट घोटून घ्यावा. मिश्रण फार दाट झाल्यास अंदाजानं गरम पाणी घालावं. झाकण ठेवून वाफ आणावी. लगेचच चीक तयार होतो.
वाढणी/प्रमाण:
एक-दीड वाटी चीक होतो.
अधिक टिपा:
_नुसता खाण्यासाठी तसा झटपट आणि वासविरहीत वातावरणात चीक तयार होतो
_या चिकाच्या कुरडया पण होतात
_चिकास आंबटपणा येत नाही पण आपल्या त्या ह्या गावी कुरडयांसाठी असा आंबट नसलेलाच चीक करतात
माहितीचा स्रोत:
मावशी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मावेत किती वेळ शिजवलास गं? २४
मावेत किती वेळ शिजवलास गं? २४ तास रवा भिजवून चव आंबूस आली होती का?
मावेत झाकण टाकून हाय पॉवरवर ३
मावेत झाकण टाकून हाय पॉवरवर ३ मिनिटं शिजवला. पण आधी हा.पॉ.वर १ मिनिट शिजवून, ढवळून पुन्हा २ मिनिटं हा.पॉ.वर शिजवलेला अधिक बरा पडेल असं वाटतंय. (मी मावेचं दार उघडलं तर वाफेनं झाकण ढकलून दिलं होतं आणि चीकाचं पाणी उसळून थोडं बाहेर सांडलं होतं.)
नंतर भांडं बाहेर काढून, चीक चांगला हलवून १० मिनिटं तसाच झाकून ठेवला.
चव बर्यापैकी आंबूस आली होती. काल रात्री रव्याचं पाणी बदललं होतं. आज सकाळी ते पाणी ओतल्यावर रवा हुंगला, तर सेम टू सेम आंबलेल्या गव्हाचा वास आला. म्हटल्यावर माझा हुरूप जो काही वाढला म्हणता...
मावेतून काढल्या काढल्या घेतलेली चव आणि १० मिनिटांनंतर घेतलेली चव यात आंबटपणा वाढल्याचं लक्षात आलं.
ओक्के! इथेही मावेत झाकण
ओक्के!
इथेही मावेत झाकण
मावेत झाकण वरून कुठेतरी खमंग
मावेत झाकण वरून कुठेतरी खमंग चर्चा झालेली दिसतेय (जी मी वाचलेली नाही. 'मावेत पुन्हा झाकणं काय घालता? - असं काही आहे का? )
युसुयुसां वाच. सॉरी सिंडे,
युसुयुसां वाच.
सॉरी सिंडे, अवांतर होतंय.
(No subject)
ललिता, चीक करून खाल्ल्याचं
ललिता, चीक करून खाल्ल्याचं आणि आवडल्याचं सांगितल्या बद्दल मावशीतर्फे धन्यवाद
आज करून पाहिला. जबरी झाला
आज करून पाहिला. जबरी झाला होता. चव अगदी गव्हाच्या चीकासारखी आलेली. अगदी बारीक रवा वापरला मी.
धन्यवाद तृप्ती . मावशीनाही धन्यवाद सांग.
नक्की करुन पहाण्यात येइल ....
नक्की करुन पहाण्यात येइल ....:)
सुंदर झाला होता. मी रवा २+
सुंदर झाला होता. मी रवा २+ दिवस (रोज पाणी बदलत) आंबवला. मावशींना अनेक धन्यवाद.
स्वाती, एकदम तोंपासु फोटो.
स्वाती, एकदम तोंपासु फोटो. आता करून बघितलाच पाहिजे.
सिंडे, तुला धन्यवाद.. मावशींच्या वतीने माझ्यासारख्या अनेकींचे दुवे घेतले असशीलच आत्तापर्यंत, त्यात माझीही भर
त्यापेक्षा कुरड्या विकतच आणा
त्यापेक्षा कुरड्या विकतच आणा की! एकदम इन्स्टंट कुरड्याच!,
नि २४ तास भिजवणे, पाणी गरम करणे, अंदाजे मीठ, वाफ आणणे यात इंस्टंट काय?
हे असले उद्योग करायला वेळ कसा मिळतो तुम्हाला? का मला भरपूर वेळ आहे, काय करायचे हे सुचवायला माझ्या फाञद्यासाठी हे लिहीता??
करा आणि खा. मला हा चीक आवडत
करा आणि खा. मला हा चीक आवडत नाही हे पुन्हा सांगते. दुवे मात्र ठेवून घेते
तुला चीक आवडतो की नाही ही
तुला चीक आवडतो की नाही ही अतिशयच दुय्यम/तिय्यम बाब आहे इथे
तरीही 'जे जे आपणांस ठावे..' या उक्तीचं पालन केल्याबद्दलही धन्यवाद
तेच तर, चिकाचं राहू द्या दुवे
तेच तर, चिकाचं राहू द्या दुवे तेवढे द्या
अॅक्च्युअली सांगायचं राहिलं,
अॅक्च्युअली सांगायचं राहिलं, मी आधणात रवा ओतून नाही केला - सरळ वरवरचं पाणी काढून बाकी मीठ घालून शिजायला ठेवला. लगेच शिजायला लागतो, पटापट घोटत रहायचं. चकचकीत झाला की झाला तयार.
आणि मी बारीक रवाच वापरला, त्यामुळे गाळावं लागलं नाही अजिबात.
मस्तं फोटो आलाय. मोत्यांच्या
मस्तं फोटो आलाय. मोत्यांच्या पिठल्यासारखा!
धन्यवाद. (पण मोत्यांचं पिठलं
धन्यवाद.
(पण मोत्यांचं पिठलं )
मोत्यांचं पिठलं >> मला तर
मोत्यांचं पिठलं
>> मला तर खळीसारखा वाटला. पण मी सिंडी कॅटेगरी आहे तव्हा माझं मनावर घेउ नका
हो, पण चांगला चीक खळीसारखाच
हो, पण चांगला चीक खळीसारखाच दिसतो
अहाहा मस्त फोटो. अगदी तोपासुच
अहाहा मस्त फोटो. अगदी तोपासुच
सोप्पा आहे त्यामुळे करून बघणेत येईल
चीक नुसता खातात असा? खाताना
चीक नुसता खातात असा? खाताना टाळ्याला चिकट्त नाही का?
नीट शिजला तर नाही चिकटत.
नीट शिजला तर नाही चिकटत.
चांगली खळ चिकासारखी दिसते पण
चांगली खळ चिकासारखी दिसते पण कितीही चिकासारखी दिसली तरी खाऊ नका टाळ्याला चिकटेल.
टाळ्या
टाळ्या
कित्त्ती ते जळवायचं!! आता कहर
कित्त्ती ते जळवायचं!! आता कहर म्हणजे एकदम तोंपासु फोटो. छे, आज रवा भिजत घातलाच पाहिजे.
चांगली खळ चिकासारखी दिसते पण
चांगली खळ चिकासारखी दिसते पण कितीही चिकासारखी दिसली तरी खाऊ नका टाळ्याला चिकटेल.
>>
नावातच चीक आहे तरी चिकटणार नाही म्हणता? हा चीक चिकटलो तर नाव बदलीन असं म्हणतो का?
बदललेलं नाव खळ अर्थात
आता मला चिक्प्रेमी लोकांच्या लाथा मिळायच्या आत मी चालू पडते.
फारच कामाला लावता ब्वा तुम्ही
फारच कामाला लावता ब्वा तुम्ही लोक्स...(ते पण ही डीश कशी लागते ते अजाबात माहित नसताना ;))
स्वातीने टाकलेला फोटो सॉलिड टेम्पिटंग आहे
मोत्याचं पिठलं>>
मोत्याचं पिठलं>> अरारारारारा!!
चीक चिकटला नाही तरी तो चिकटच असतो, चिकाचं भांडं घासायला खूप कष्ट पडतात.
केला केला शेवटी चीक केलाच!!
केला केला शेवटी चीक केलाच!!
2 वाट्या रवा भिजत घातला. आंबट वासासाठी ओव्हन मधे ठेवला. (ओव्हन बंदच होता. केवळ उबदार जागा असावी म्हणून तिथे ठेवला) ४८ तास तरी ठेवायचाच असा संकल्प केला. २४ तासांनी पाणी बदलण्यासाठी म्हणून पाहिलं तर छान मंद वास येत होता. <लाळ गाळणारी बाहूली> मग अगदीच राहावलं नाही म्हणून डावभर सत्त्व घेऊन चीक शिजवला. थोडी जिरेपूड आणि मीठ घातलं. वरून तीळ आणि कच्चं तेल. गरमागरम मटकावला. चव अगदी डिक्टो तशी नव्हती पण बरीच सारखी होती. आणि बरेच दिवसांनी खाल्ला म्हणून जास्त आनंद.
Pages