पालक पराठासाठी साहित्य :--
१ कप कणिक ,
२ मध्यम आकाराचे बटाटे .
१ कप चिरलेला पालक,
२ टे.स्पू. चिरलेली कोथिंबीर,
७-८ पुदीना पाने,
१ लहान चीज क्युब /१ टे.स्पू चीज स्प्रेड किंवा एक चीज स्लाईस,
१ टी स्पू.हिरवी मिरची व आले जाडसर वाटलेले,
१/२ टी स्पून प्रत्येकी भाजलेले जिरे व चाटमसाला,
१/४ टी स्पू मिरे पूड,
१ टे स्पू टोमॅटो केचप,
चवीनुसार मीठ.
२ टे स्पू पराठा भाजताना वरुन लावायला तेल..
पुदीना चटणी साहित्यः--
१ कप पुदीना पाने कोवळ्या देठासकट,
२ मध्यम आकाराचे कांदे -मोठ्या फोडी चिरुन घ्याव्या.,
२ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून भाजलेले जिरे,
१/२ लिंबाचा रस
पराठा वाढताना सजावटीसाठी--किसलेले चीज
बटाटे सोलुन किसणीवर किसुन घ्या.एका नॉन-स्टीक पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल गरम करुन त्यावर हा बटाट्याचा किस मऊ होईपर्यंत परतुन घ्या.
आता एका मोठ्या बाऊल मध्ये कणिक चिरलेला पालक,कोथिंबीर,पुदीना पाने हाताने तोडुन टाका.
जाडसर वाटलेली हिरवी मिरची - आले ,साय्,एक चीज क्युब किसुन घाला. मीरेपूड, चाट मसाला.टोमॅटो केचप आणि चवीपुरते मीठ घाला.
सर्व साहित्य छान एकत्र करुन घट्ट गोळा भिजवा.परतलेल्या बटाट्याच्या किसाला ओलसरपणा असतो व पालकाला थोडे पाणी सुटते त्यामुळे .पिठ भिजवताना शक्यतो वेगळे पाणी वापरायचे नाही १० मिनिटांनी भिजवलेला गोळा मऊ होतो.
आता मोठ्या पुरीच्या आकाराची जाडसर पोळी लाटा व गॅसवर मध्यम आचेवर तवा तापवुन दोन्हीकडे अगदी कमी तेल सोडुन खरपूस रंगावर भाजा.
असे दोन पराठे केले कि ते गरम असताना त्यापैकी एकावर किसलेले चीज पसरा लगेच त्यावर दुसरा पराठा ठेवा व चारी बाजुने दाबा.या चीज सँडविच पराठ्याला पिझ्झा कटर किंवा सुरीने कापा.असे सर्व पराठे करुन घ्या.
पुदीना चटणी --
पुदीना पाने,हिरवी मिरची,कांदे,जिरे मिक्सरच्या भांडयात एकत्र करुन वाटा.आता त्यात लिंबाचा रस व चवीप्रमाणे मीठ घाला व पुन्हा एकदा वाटुन घ्या.पुदीना चटणी तयार आहे. या चटणी फ्रीज मध्ये टिकते व चटणीचा रंग हिरवागार रहातो .
सँडविच पालक पराठ्याबरोबर पुदीना चटणी वाढुन सर्व्ह करा.
तों.पा.सु. , मी फक्त फोटोच
तों.पा.सु. , मी फक्त फोटोच पाहु शकते डाएटमुळे खाउ शकत नाही.
अप्रतिम! मस्त दिसतायत. !!
अप्रतिम! मस्त दिसतायत. !!
फोटो खायाला अलाऊड नसलेली अशी
फोटो खायाला अलाऊड नसलेली अशी कोणती डायेट आहे?
मस्त दिसतंय पराठा
मस्त दिसतंय पराठा सँडविच-चटणी!
खुप मस्त रेसिपि दिसतेय!
खुप मस्त रेसिपि दिसतेय!
फोटो छान आहे. नक्की करणार.
फोटो छान आहे. नक्की करणार.
मस्त !
मस्त !
मस्त रेसिपी आहे. लेकीचा
मस्त रेसिपी आहे. लेकीचा अत्यंत आवडता पदार्थ आहे. मी पालक प्युरी करून कणकेत घालून भिजवते. नेक्स्ट टाईम फ्रेश पालक मिळाला की यापद्धतीने करून बघेन.
छान रेसेपी आहे. नक्कीच करणार.
छान रेसेपी आहे. नक्कीच करणार.
छान प्रकार.
छान प्रकार.
मस्त रेसेपी.
मस्त रेसेपी.
छान रेसिपी, डब्ब्यात द्यायला
छान रेसिपी, डब्ब्यात द्यायला एकदम मस्त आणि आवडेल अशी !!
तुमच्या सगळ्याच रेसिपीज मस्त असतात
तोंपासु. फोटोतले ताट पुढ्यात
तोंपासु. फोटोतले ताट पुढ्यात ओढून खायला घ्यावेसे वाटतायंत
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी आहे.............तोंपासु. ..
तोपासु...
तोपासु...
छानच रेसिपी आहे. एक शंका आहे
छानच रेसिपी आहे.
एक शंका आहे चटणीत कच्चा कांदा घालायचा का?
मस्तच!
मस्तच!
जबरी दिसताहेत पराठे.
जबरी दिसताहेत पराठे.
फोटो कातिल!!
फोटो कातिल!!
मस्त दिसत आहे .. नक्कीच ट्राय
मस्त दिसत आहे .. नक्कीच ट्राय करून बघेन ..
एक शंका, पुदिन्याच्या चटणीत नुसताह कच्चा कांदा वाटून आहे तर वास येत नाही का आणि चवही कडवट लागत नाही का?
भन्नाट. नक्कीच करून पाहणार.
भन्नाट. नक्कीच करून पाहणार.
khupach mast watate ahe ...me
khupach mast watate ahe ...me nakki karun pahin..
अंजली_१२ , सशल ह्या चटणीत
अंजली_१२ , सशल
ह्या चटणीत कांदा कच्चा च घालायचा आहे.तयार चटणीत एकुण कांदा प्रमाण जास्त असले तरी पुदिन्याचाच वास जास्त येतो.आणि जिरे कमी असुनही, चव जाणवते.ही पंजाबी पद्धतीची चटणी आहे.त्यांच्याकडे ही चटणी फ्रीज मधे कायम असते..टोमॅटो सॉस सारखीच ही चटणी मुक्त हस्ताने [ब्रेड-पराठा-रोटी-भात-पुलाव-भजी-कटलेट] खातात. ,
डाएट करणार्यांनी बटाटा ऐवजी
डाएट करणार्यांनी बटाटा ऐवजी भोपळा तसेच रताळे वापरता येईल.मल्टी ग्रेन कणिक घेता येईल .साय -चीज न घालता पराठा करुन त्यावर एकुण अर्धा टी स्पून तेल वापरुन छान चवीचा डाएट पराठा तयार होतो.
खुपच छान दिसतोय.नक्की करुन
खुपच छान दिसतोय.नक्की करुन बघेन ....
छान रेसिपी...
छान रेसिपी...
ओके
ओके
काल केले होते हे पराठे. एक
काल केले होते हे पराठे. एक नंबर.
आज पोरीच्या डब्यातही दिले. आभारी आहे सुलेखाताई.
सशल- कडवट नाही लागत. मी नेहमी करते कैरी, कच्चा कांदा, पुदिना, आणि शेंगदाणे- यांची चटणी.