कैरीच्या फोडी १ किलो , मिठ दीड वाटी -, मोहरीची दाळ १ वाटी , लाल तिखट १ वाटी ,हळद पाव वाटी, मेथ्या २ चमचे , हिंग १ चमचा, तेल १ वाटी, कलोंजी [कांद्याच बी ]
कैरीच्या फोडी १ किलो [मोजुन] मिठ दीड वाटी थोड भाजुन घ्याव. थोड मिठ व हळद कैरीच्या फोडींना लावुन अर्धा ते १ तास ठेवाव. नंतर त्या फोडींना सुटलेल पाणी काढुन घ्याव. म्हणजे अतिरिक्त आम्लता , तेलकटपणा कमी होइल. एका थाळीत प्रथम मिठ घ्याव. त्याच आळ करुन मोहरीची दाळ नंतर हळद पाव वाटी , तिखट [अर्धी वाटी लाल +अर्धी वाटी काश्मीरी ] १ वाटी , मेथ्या भाजुन पावडर करुन घ्यावी [२ चमचे] . १ वाटी तेल गरम करुन मोहरी घालावी मोहरी तडतडली कि गॅस बंद करुन मेथ्या पावडर व हिंग घालावा [ मी खडा हिंग बारीक करुन वापरते .] व मसाल्यात ते तेल घालुन मिसळुन घ्याव . लोणच्याचा मसाला तयार . मसाला चांगला थंड झाल्यावर बरणीत थोडा घालावा नंतर फोडींना लावुन बरणीत भराव वर परत थोडा मसाला घालावा..
आवडत असल्यास कलोंजी घालावी मी घालते थोड्या लोणच्यात.
मनीमोहोरचा लेख वाचला वाचता वाचताच मी माहेरच्या आमराइत पोहोचले [मनाने ] फारच सुरेख लिहला होता. त्यावरुनच मला हे लिहावस वाटल. देवकीने विचारलहि होत झाली तर तिलाही मदत होइल. म्हणुन काल मी लोणच घातल आणि हा लेखण प्रपंच. धन्यवाद मनीमोहर..
छानच आहे. मिठ भाजुन नविन
छानच आहे. मिठ भाजुन नविन वाटले.. नक्की करुन पाहिल..
मिठ भाजुन घेतल्याने लोणच
मिठ भाजुन घेतल्याने लोणच खराब होत नाही.="IMG-20140612-00498.jpg" />
वा ! मस्त लोणचे !!
वा ! मस्त लोणचे !!
देवकीने विचारलहि होत झाली तर
देवकीने विचारलहि होत झाली तर तिलाही मदत होइल>>>>>>>>>>>> धन्यवाद प्रभाताई! यावेळेस नाही तरी पुढल्या वेळेस नक्की करून पाहेन.
तुम्हाला माझी कहाणी
तुम्हाला माझी कहाणी बेगमीच्या लोणच्याची हा लेख आवडला. धन्यवाद प्रभाताई.