सुंदर दिसण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग

Submitted by अजय on 6 June, 2014 - 01:27

1024px-Lemon.jpg
फोटो: André Karwath Wikimedia

बहुगुणी लिंंबाचा रस तुमच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खुप उपयुक्त आहे

१. चेहर्‍यावरचे काळपट डाग घालण्यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर थोडा लिंबाचा रस घेऊन त्या भागावर लावा. साधारण ३० मिनिटे तसेच ठेवा आणि उन्हात बाहेर पडू नका. फक्त चेहर्‍यावरच नाही तर शरिराच्या इतर काळपट पडलेल्या भागावर ही युक्ती वापरता येईल. रस डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.

२. मुरुम (पिंपल्स) वाढू नयेत म्हणून लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण त्यावर चोळा. मुरुम गेल्यावर राहिलेले व्रण कमी करण्यासाठी नुसता लिंबाचा रस त्यावर लावा. हळूहळू व्रण निघून जातील.

३. उन्हामुळे चेहरा खूप रापला असेल तर बेसन, दही आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि वाळू द्या. नंतर गार पाण्याने पण हळूवार धुऊन काढा. साध्या कापडाने हळूवार पाणी टिपा(जोरात नको) आठवड्यात एकदा हा उपाय काही आठवडे केल्यावर चेहरा परत पूर्वीसारखा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त ३ उपयोगासाठी धागा ??? अ ओ, आता काय करायचं<<<

मायबोलीवर कसलाही धागा काढता येतो अशी त्यांची समजूत झालेली असावी. Light 1

मस्त

मस्त उपाय. करून पाहणार. रोज रोज स्कूटरवर ३५ किमी जाऊन ऊन आणी प्रदूषणामुळे त्वचा काळवंडली आहे

लेखाचे नाव सुंदर दिसण्यासाठी असे असण्याऐवजी त्वचा उजळण्यासाठी असते तर जास्त सयुक्तिक ठरले असते ना?

हे उजळ कांती (धागा)वर सुद्धा लिहु शकला असतात की, दुसरा वेगळा धागा कशाला तो? आणि नेटवरचीच युक्ती इथे चिकटवलीत , ह्यात काय नवीन? Proud

मि अस एकलय की लींबु कापुन जास्त वेळ टेवले की खराब होते <<<

लिंबू सुंदर राहण्यासाठी ते न कापणे हा एक उपाय आहे

अंकु, सीमा
माझ्या कुटुंबात्/मित्रपरिवारात प्रत्यक्ष अनुभवावरून कळालेल्या ३ टीपा माहिती होत्या. तुम्हाला अजून माहिती असाल तर जरूर लिहा.

दिनेश
धन्यवाद. बदल केला आहे.

वेल
टीप क्र १ आणि ३ बद्दल तुम्ही सुचवलेला विषय चालू शकेल. पण क्र २ वेगळी आहे.

झंपी
हे पारंपारिक उपाय आहेत. ते नवीन आहेत किंवा मलाच फक्त माहिती आहेत असे अजिबात नाही.

>>हे पारंपारिक उपाय आहेत. ते नवीन आहेत किंवा मलाच फक्त माहिती आहेत असे अजिबात नाही.>> अहो वेमा, ह्यात तुमची अ‍ॅडिशन काय असं तिला (सवयीनुसार) विचारायचं असणार Proud

४. एखाद्या मादक पेयात किंवा पेयांच्या मिश्रणात (कॉकटेल) मध्ये थोडे लिंबू पिळून घाला. पिळलेल्या लिंबाची फोड ग्लासशेजारीच ठेवा. मग ते मिश्रण प्या. जोवर एकाच्या जागी दोन फोडी दिसत नाहीत तोवर मिश्रण पीत रहा. दोन फोडी दिसल्या की मग आजूबाजूला बघा. तुम्हाला कित्येक गोष्टी 'सुंदर' (ज्या आजवर सुंदर भासल्या नव्हत्या) दिसू लागतील. Happy

मि अस एकलय की लींबु कापुन जास्त वेळ टेवले की खराब होते <<<

लिंबू सुंदर राहण्यासाठी ते न कापणे हा एक उपाय आहे
>>>>
बेफिकीर लिंबु नाही टेवायचेय्...कापल्यावर जास्तीत जास्त कीति वेळ टेवावचे?मी सुंदर होण्यासाटी हो....

बेफिकीर लिंबु नाही टेवायचेय्...कापल्यावर जास्तीत जास्त कीति वेळ टेवावचे?मी सुंदर होण्यासाटी हो....<<<

तुम्ही सुंदरच आहात हो. Happy

हल्लीच्या जगात मनाने साधे असणे हेच सौंदर्य आहे. Happy

तुम्ही सुंदरच आहात हो.

हल्लीच्या जगात मनाने साधे असणे हेच सौंदर्य आहे. <<<

धन्यवाद बेफीकीर....
पण माझे अजुनहि शंकानिरसन नाही झाले...

४. एखाद्या मादक पेयात किंवा पेयांच्या मिश्रणात (कॉकटेल) मध्ये थोडे लिंबू पिळून घाला. पिळलेल्या लिंबाची फोड ग्लासशेजारीच ठेवा. मग ते मिश्रण प्या. जोवर एकाच्या जागी दोन फोडी दिसत नाहीत तोवर मिश्रण पीत रहा. दोन फोडी दिसल्या की मग आजूबाजूला बघा. तुम्हाला कित्येक गोष्टी 'सुंदर' (ज्या आजवर सुंदर भासल्या नव्हत्या) दिसू लागतील. Happy

Submitted by टवणे सर on 7 June, 2014 - 00:29 >>>>>

और ये लगा सिक्सर sssssssss
याचे प्रत्यंतर Engg. College च्या वर्गबंधूच्या वागण्यात खूप वेळा आले आहे Happy

Pages

Back to top