जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...!
आज ५ जून.जागतिक पर्यावरण दिवस.दरवर्षी साजरा केला जातो.त्या-त्या दिवसाची दरवर्षी एक 'थीम' जाहीर होते."युनाटेड नेशन्स ऑफ एनव्हायरोंमेंट प्रोग्रॅम"ने यावेळी घेतलेला विषय आहे 'छोट्या बेटाच्या स्वरूपातील विकशीनशील देश'(Small Island Developong States) तर थीम-टॅगलाईन आहे,'Raise Your Voice,Not The Sea Level'
आपण सगळे पर्यावरणाविषयी सजग आहोत.त्याविषय सर्व जाणीवा जागृत झालेल्या असताना एका बाजूला त्याचा र्हास हा होतोच आहे.जरी तो झाला तरी पर्यावरण बांधणीचा विचार गती पकडताना दिसत नाही.पर्यावरण संरक्षण सामाजीक असले तरी समाज हा वैयक्तीक-एका व्यक्ती पासून तयार होतो.म्हणजे समाजाचं 'युनिट' हे एक व्यक्ती असंच आहे.त्यामुळे आधी जबाबदारी वैयक्तीक असते.ऊर्जा ही नाशीवंत असते असा जो सिध्दांत मांडलेला आहे त्यातच तिचं पुनर्रुज्जीवन करता येतं हेही सांगीतलं आहे.जे करायला मला अनेक मार्ग आहेत् व संधी आहेत.फक्त त्या संधींचा वापर करण्यासाठी मी जसं पाऊल उचललं तसेच करायला इतर निदान एका व्यक्तीला तरी भाग पाडणे याचीही आवश्यकता आहे,हेच म्हणायचे आहे.
हिमनग कोसळला की आपल्याला बातमी मिळते.चौपाटीजवळ पातळी गेल्या पनास वर्षात कुठे आली याची खबर असते.जगात किती बेटे दरवर्षी पाण्याखाली लुप्त होतात याची आकडेवारी उपलब्ध असते,हिमालयातल्या हिमनद्या वितळू लागल्या की कळते.पण काय या बातम्यांची आपल्याला सवय झाली आहे?त्याबद्दल आपल्याला असलेला 'कन्सर्न' आपण शेजार्याच्या मनात उतरवू शकतो का? याविषयीच माझ्यासारख्यांना भिती वाटत असते.
पुण्याची मुठा-मुळा असो,किंवा मुंबापुरीची मिठी,करवीरची पंचगंगा असो वा सातारा-सांगलीची कृष्णा,चांदोलीच्या निबीड जंगलातून उगवणारी वारणा असो किंवा संतांच्या भूमीवरून मार्गक्रमणा करणारी गोदावरी...आणि या सगळ्या नद्यांचं प्रतिनिधित्व करणारी गंगा...सगळ्यांच्या पाण्याचं दु:ख एकच आहे का?सगळ्यांची भाषा एकच झाली आहे असे का ? आधी एकच रासायनिक सुत्र असणार्या आमच्या नद्या विविध रसायने घेऊन केव्हा वाहू लागल्या?त्यातल्या संपत्तीवर आलेल वादळ आणि त्याच संपत्तीवर चालणारे संसार दुसरीकडे का वळले?
पुण्यात बाहेर पडावं आणि घरी परत येताना चेन स्मोकर नसताना देखील छाताडात धूर,काजळी भरून यावं लागावं?हीच अवस्था इतरही ठिकाणी.सांगली-कोल्हापूर किंवा कोल्हापूर-पूणे काय किंवा पुणे सोलापूर हायवे काय्?झाडांची बेछूट तोड झाली तर डोक्यावरचं छप्पर उडावं आणि मन सैरभैर त्या छताचा शोध घेत राहावं... इतकंच असावं हे? जाता येता या उजाड रस्त्यांवर उन्हाच्या झळांचे श्वास घ्यावे लागावेत, हेही विटाळलेले वास्तवच.
उडवले जाणारे फटाके किंवा गेल्या वर्षी हिरवे असणारे डोंगर यावर्षी त्यावरची मातीची जखम पाहून हळहळणारे लोक्,जंगलात जाताना हुल्लडबाजी करणारे आणि प्लॅस्टी़कची देण देणारे आमचे याच जन्मीचे सोयरे,हौस म्हणून ट्रेक च्या नावाखाली हैदोस घालणारे टोळके,गुगल मॅपवर पटपट पलटत जाणारा 'हिरवा ते मातकट-तपकिरी' असा रंग...
दरवर्षी पर्यावरण दिवस येतो.त्या संध्याकाळी कार्यक्रम घेतले जातात.प्रेक्षक तिथे येतात बघतात आणि मागे बरच काही सोडून जातात जे दुसर्या दिवशी सकाळी आपल्याला दिसतं आणि दरवर्षी परत परत दिसत राहतं.
अर्थात,तुम्ही म्हणाल तू नवं काय सांगतोयस!हे माहीत्ये आम्हाला.मित्रांनो मी इतकंच सांगतोय आपल्याला सगळ्यांना हे माहित आहे,आपण या-त्या प्रकारे पर्यावरण जपत असतो.पण काय ते खरच ते पुरेसं आहे? आपण प्रयत्न करतो म्हणून पण जे दुर्लक्ष्य करतात त्यांना कोण सांगणार्?काय खरच प्रत्येक गोष्टीचा जीवघेणा डेमो द्यावा लागतो आपल्याला आणि मग आपण उपाय योजायचे असतात?
मी एकदा 'ऑरगॅनिक'वर पोसलेली भाजी खाल्ली,मी एकदा सीएनजी बसने प्रवास केला,मी कापडी पिशव्या घेऊन बाजार केला,मी दूध्,भाजी,भट्टीचे कपडे आणायला पायी गेलो,मी पावसाळ्यात वर्षभर गोळा केलेल्या बीया ठकठिकाणी पसरवल्या,मी दुधाची पिशवी फोडल्यावर निघणारा छोटा प्लॅस्टीकचा तुकडा परत पिशवीत टाकून त्या पिशव्या 'रिसायकल'ला दिल्या,भोवतालचा कचरा गोळा करून मी त्याला काडी न लावता जमीनीत कुजू दिला,मी ओला कचरा माझ्या बायोगॅस प्लँटमध्ये टाकला आणि सुका कचरा प्रोसेसला घंटगाडीला,सार्वजनिक कचरा कुंडीला भेट देण्याची वेळ आलीच तर मी तो कचरा कुंडी कितीही भरली असेल तर त्यातच टाकला,निर्माल्ये नदीत न सोडता बायोगॅसला टाकले,मी कागदी वापर कमी करून ऑनलाईन कस्टमर बनलो,मी वाढदिवसाला-घरी आलेल्या पाहुण्यांना झाड भेट दिलं,लावायला लावलं,मी वॉटर हार्वेस्टींग करायला सोसायटीला भाग पाडलं,माझ्या जमीनीखालच्या 'वॉटर टेबल'ची मी काळजी घेतली आणि त्या-त्या दिवशी मला खूप समाधान वाटलं,असं सांगणारे,अनुभवणारे लोक साक्षात आहेत.
अजून सार्वजनिक पर्यावरण आरोग्यात आपल्याला मजल मारायची आहे.हात भरपूर आहेत.जागाही पुष्कळ आहे.वेळ मात्र कमी आहे.आज ना उद्या पृथ्वी नाश पावणारच आहे.पण म्हणून येणारे दिवस नाक्,तोंड बंद करून जगावे लागणार असतील असं आयूष्य येणार्या पिढीच्या हातात ठेवून जायचं का?
तेव्हा जेवढे जमेल तितके जास्त या पृथ्वीला परत देऊयात.काय जाणो ती प्रसन्न होईल आणि आणखी लाख वर्ष सुखनैव तिचा वापर करण्यासाठीचं जैविक वरदान आपल्याला देईल.फक्त कृतीची आवश्यकता आहे,इतकंच.
आज या पर्यावरण दिवसापासून मी एक नवीन उपक्रम हाती घेतो आहे.'पर्यावरण वार्ता'.दर आठवड्याला त्या आठवड्याची जागतिक पर्यावरणाशी आणि/किंवा भारतीय पर्यावरणाशी संबधीत एक बातमी इथे या धाग्यावर प्रतिसादात टाकली जाईल.ती फक्त बातमी म्हणूनच टाकली जाईल,त्यावर पुढे चर्चा,विवेचने आपणास करता येतील.वैज्ञानिक आढावे,तापमान वाढ्,उपाय,परीषदा यावेगवेगळ्या विषयांबाबत दर आठवडी नवीन ऐकावयाला मिळणारा हा उपक्रम आपल्याला आवडेल्,सगळ्यांना प्रेरणादायी ठेरेल अशी अपेक्षा नक्कीच ठेवतो.
आपली बेटे ही जशी नैसर्गीक,सांस्कृतीक वारसा आहेत तसेच ही पृथ्वीसुध्दा या विश्वाच्या पसार्यात या अवकाशात स्थिर छोट्सं बेटच समजून त्याची निगा राखूयात.त्याला जपूयात.जोपासूयात.
धन्यवाद!
जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त
जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त शुभेच्छा!
दासमहाराज, मस्तच लेख! आणि
दासमहाराज, मस्तच लेख!
आणि आपल्या उपक्रमाला शुभेच्छा.
पर्यावरणवार्ता वाचायला उत्सुक आहे.
हर्पेन्,शुभेच्छा!आपला प्रथम
हर्पेन्,शुभेच्छा!आपला प्रथम प्रतिसाद...
सातीताई, धन्स!पाठबळासाठी...
लवकरच न्युज अवतरतील...
सर्वांना सप्रेम आमंत्रण आहे. _/\_
(संकोच- मला गुरुजी,महाराज न संबोधाल तर बरे होईल.ह.भचे झाड मी पटकन चढू शकतो... तेव्हा कृपया त्या झाडापासून दूर ठेवण्यात मला मदत करा...)
दर आठवड्याला त्या आठवड्याची
दर आठवड्याला त्या आठवड्याची जागतिक पर्यावरणाशी आणि/किंवा भारतीय पर्यावरणाशी संबधीत एक बातमी इथे या धाग्यावर प्रतिसादात टाकली जाईल.
या आठवड्याची बातमी कोठे आहे? ती टंका, माबोकर देखिल अवतरतील
हर्पेन्,सुरूवातीच्या दोन-तीन
हर्पेन्,सुरूवातीच्या दोन-तीन ओळीत ऑलरेडी बातमी आहे.सगळ्यात महत्वाची...
पुढील्या न्यूज कंपाईल करून टाकतो लवक्कर....
ध.
छान समयोचित लेख.. पुढच्या
छान समयोचित लेख.. पुढच्या महिन्यात अश्याच एका बेटावर आठवडाभर राहणार आहे.
छान लेख आणि विचार...
छान लेख आणि विचार...
उदय सर्,दिनेश सर, आभार...
उदय सर्,दिनेश सर,
आभार...
स्वच्छ,शाश्वत पर्यावरणाकडे
स्वच्छ,शाश्वत पर्यावरणाकडे नेण्यासाठी महिलांचे नेतृत्व एकमेव पर्याय!!
डॉ.राजेंद्र के. पचौरी.(The Energy And Resource Institute) यांचे भाषणः-
वातावरण बदलाचा(Climate Change) विचार करण्याची वेळ येते तेव्हा,कुणीही त्यापासून मूक्त नाही. जगाच्या प्रत्येक काना-कोपर्यात हा 'बदल' प्रत्येकाच्या आयुष्यावर निश्चित असा परिणाम करतो.
परिणाम काहीही असेल परंतु तो असेल मात्र एकमेव.एकसारखा.वैश्विक स्तरातील देशांनी हरीतगृह वायूंचे ऊत्सर्जन, जे वातावरण बदलास कारण आहेत,कमी करण्याचे कबूल केल्याशिवाय,गरीब व कमकुवत देश सहज आणि मूक्तपणे जगणे कठीण आहे.या सगळ्यातच विशेषत: ग्राम भागातील स्त्रिया आणि लहान मुले ,हा एक हानी होणारा वर्ग आहे.IPCCचा(Intergovermental Panel For Climate Chnage-Seconf Group) रिपोर्टनुसार:-
वातावरण बदलामुळे निर्माण झालेला प्रमुख भाग म्हणजे वाढलेल्या किंमती आणि दर.ज्याचा विरोधात्मक परिणाम या खेड्यातल्या जनतेवर होतो आहे.उदा.स्त्री-सत्ताक ग्रामिण घरे,आधुनिक शेतीबद्दल ज्यांना समजणे दुश्प्राप्य आहे, योग्य साधनांचा अभाव आणि शिक्षणापासून वंचित भाग.
वातावरण आणि समुद्र उष्ण झालेले आहेत.असलेला बर्फ आणि हिमाशी सबंधित भुरुपे नष्ट होण्यास सुरूवात झालेली आहे.समुद्रपातळी बर्यापैकी वाढत आहे.तसेच हरीत -गृह वायूंचे प्रमाण लक्ष्यात घेण्याजोगे वाढलेले आहे.हे सगळे जे घडते आहे तो वातावरण उष्णतेच्या वाढीचा निदेशक आहे.
तथापि, वेगाने मिळणारे हवामान बदलाचे पुरावे आणि आपल्या ग्रहाच्या भविष्यावर त्याचे खोलवर वाईट परीणाम, जगातील प्रमुख नेत्यांना सूचक असा निर्णयात्मक बदल करण्याची प्रेरणा देतील,की ज्यामुळे वैश्विक अर्थकारणाला स्वच्छ,परवडण्याजोग्या आणि अक्षय ऊर्जेची ताकद सांभाळून घेईल,याची मला खात्री आहे.
स्त्रिया या बदलामध्ये महत्वाची भूमिका साकारतील.खरोखर त्या छान नेतृत्व ठरू शकतील यात शंका नाही.रॅचेल कार्सन हीसुध्द्दा एक स्त्रीच होती,जिने आधुनिक पर्यावरण चळवळ केवळ पुस्तकाने उभी केली.तिचे The Silent Springहे पुस्तक याच विचारांचे द्योतक आहे.'आणि',जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार महिला नैसर्गीक स्त्रोताचे व्यवस्थापन करण्यात कुशल असतात तसेच,माझ्या अनुभवानुसार,निसर्गाशी त्या सतत संपर्कात राहू शकतात.निसर्गाला व्यवस्थित समजावून घेतात.त्यांचा आवाजच आमच्या धोरणांना पाठींबा देईल आणि सार्वत्रिकरीत्या तो आवाज त्यांच्या मुलांच्या सुरक्षित भविष्य निर्माणासाठी व्यापक ठरेल.
जगभरात,१३०० करोड लोकांकडे आज वीज जात नाही.त्यांना क्रूड ऑईलवर चालणारे किंवा लाकडावर चालणरे विषारी वायू उत्सर्जन करणारे स्टोव्ह वापरावे लगतात.अभ्यासासाठी चिमण्या,कंदील आणि मेण्बत्त्या.
आमच्या TERI तर्फे चालणारे, Lighting Billion Lives सारके कार्यक्रम...त्यात मी पाहीलंय की सौरऊर्जेच्या मदतीने ग्राम स्त्रिचं घर कसे उजळले.आयुष्यात प्रथमच वीज दारी अवतरल्यावर काय वाटत असेल ते मी जाणतो.तिथे आता तिची मुले रात्री अभ्यास करू शकतात,त्यांहे व्यवसाय वीजेवर चालू शकतात.रॉकेलचे दिवे आणि स्टोव्ह-चूली याला त्यांनी केव्हाच मूठ माती देऊन टाकली आहे.
एका गावासाठी ऊर्जा स्त्रोतांचे व्यवस्थापन करणार्या महिला आमच्या कार्यक्रमांतर्गत भेटू शकतात.एका महिलेपासून ते स्त्रियांच्या गटापर्यंत सुधारलेली उतरंड मला आश्चर्यचकित करणारी ठरते.सामाजार्थिक उत्क्रांतीसाठी स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा हा मुख्य घटक आहे.याच शाश्वत ऊर्जेचा वापर गरीबी आणि भूक,प्राथमिक शिक्षण, स्त्री- पुरूष समानता,स्त्री-उदात्तीकरण,माता-आरोग्य विकास यात महत्वाची भूमिका बजाववेल,हेच सत्य.
स्वच्छ, ऊर्जेनेच वातावरण बदलास समर्थपणे तोंड देता येऊ शकते हेच खरे.आणि त्यासाठी स्त्री हीच एकमेव योग्यता-पात्र गोष्ट ठरू शकते.
तेव्हा आपल्याकडे पर्याय आहेत दोनच:- आहे असाच व्यापार चालू ठेवणे.आहे हा विकास चालू ठेवणे किंवा आरोग्यदायी,हरीत,एकात्मिक जगाकडे पाऊल उचलणे.
पर्याय लख्ख आहेत,आपल्या धरेला सदाचाराने हाताळा,ती फळ देईलच.
(डॉ.पचौरी हे आंतरशासकीय हवामान बदल समितीचे(IPCC) अध्यक्ष आहेत,तसेच हवामान बदल परीवेक्षणाचे प्रमुख आहेत.)
०४-जून-२०१४
संदर्भ-www.unwomen.org (बिजींग +२०)
(भाषांतर काही ठिकाणी मूळ बातमीला तसेच ठेवून परीवर्तीत केलेले आहे.)
आभार!