Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्कूलबसेस चे प्रस्थही त्या
स्कूलबसेस चे प्रस्थही त्या काळात नव्हतेच फारसे. तूमच्या शाळेच्याच पहिल्यांदा बघितल्या असे वाटतेय.
आम्ही मालाडला होतो त्यावेळी दत्तमंदिर रोड ( मालाड पूर्व ) पासून उत्कर्ष मंदिर शाळा ( मामलेदार वाडी, मालाड पश्चिम ) पर्यंत चालत जात होतो. त्यावेळी मालाडला अहमदाबाद रोड कनेक्टेड नव्हता. त्यामुळे तिथे रस्त्यावर वाहनेच नसायची. रिक्षा नव्हत्या, टांगे होते. ( स्टेशन ते दत्तमंदिर रोड. आठ आणे ) बसपण १९७४ सालीच मालाड पुर्वेला सुरू झाली.
स्कूलबसेस चे प्रस्थही त्या
स्कूलबसेस चे प्रस्थही त्या काळात नव्हतेच फारसे.
>>>>>>>>
हो शक्य आहे, शाळा जुनी असण्याबरोबर मोठी होती आमची. ईंडियन एज्युकेशनच्या कित्येक शाखा होत्या. दादरला मुख्य ऑफिस आणि मोठी शाळा होती. मध्यवर्ती भागात असल्याने लांबूनही विद्यार्थी यायचे. मी स्वता माझगावहून ज्युनिअर केजीपासून स्कूलबसने जायचो, अर्धा तासाच्या वर प्रवास. म्हणजे त्या वयाच्या मानाने लांबच्या शाळेतच घातले होते. याचा अर्थ शाळा आणि स्कूलबसची व्यवस्था विश्वासार्ह होती.
अवांतर - हि पोस्ट लिहिताना मला डेजावू फिलिंग येतेय
असो, मुंबईचे जुने फोटो सापडलेत मेल मध्ये, नंतर टाकतो इथे थोडे थोडे.
आशा करतो मेलमधले फोटो टाकताना प्रताधिकाराची भानगड नसावी, मला यातले फारसे कळत नाही, तसे असल्यास उडवता येतील.
१. चर्चगेट २. चर्चगेट
१. चर्चगेट
३. अपोलो बंदर ४. टाऊन हॉल
३. अपोलो बंदर
५. बॅलार्ड पिअर ६. बॅलार्ड
५. बॅलार्ड पिअर
इंद्रा, मस्त फोटो.. डावीकडे
इंद्रा, मस्त फोटो..
डावीकडे दिसणारा रस्ता किती रिकामा आहे. दादर मधे मोकळे रस्ते आपण असे फोटोतच बघायचे :-/
मंजू, ते R आणि S असे बोर्डस् दिसताहेत त्याच्या पलिकडे ट्रेनचे ट्रॅक असावेत.
ओह्, मस्त फोटो अभिषेक!
७. काळबादेवी ८. बुलक कार्ट्स
७. काळबादेवी
(फोटोला असेच नाव होते, आता हा एरीया नक्की कुठलाय ते बुजुर्ग लोकांनी ओळखा
9. Colaba Reclamation -
9. Colaba Reclamation - 1
10. Colaba Reclamation - 2
११. कफ परेड १२. चर्चगेट,
११. कफ परेड
१२. चर्चगेट, मैदान
१३. गोवालिया टँक १४.
१३. गोवालिया टँक
१४. क्वीन्स रोड
अभिषेक, काही फोटोंवर
अभिषेक,
काही फोटोंवर कॉपीराईटचा उल्लेख आहे.. हे फोटो तुम्ही कुठून घेतले आहेत?
१५. मरीन ड्राईव्ह १६ आणि १७
१५. मरीन ड्राईव्ह
चिनूक्स अभिषेक, काही फोटोंवर
चिनूक्स अभिषेक,
काही फोटोंवर कॉपीराईटचा उल्लेख आहे.. हे फोटो तुम्ही कुठून घेतले आहेत?
>>>>>>>>>>>>>
मेलमधून
आता ते उल्लेख असलेले काही उडवू का?
कि सर्वच उडवू?
अजूनही पाच-सहा टाकायचे बाकी होते.
श्या मेहनत गेली फुकट..
नाही..उडवू नका..फक्त ते आता
नाही..उडवू नका..फक्त ते आता प्रतधिकारमुक्त आहेत की नाही, हे कृपया बघाल का? जुन्या मुंबईच्या अनेक फोटोंवर ब्रिटिश काउंन्सिलचा अजूनही प्रताधिकार आहे.
ओके, पण मग आता ते बघायचे कसे
ओके, पण मग आता ते बघायचे कसे ते ही सांगाल
मीही शोधतोच आहे
मीही शोधतोच आहे
ओके धन्यवाद, पण शोधल्यावर
ओके धन्यवाद, पण शोधल्यावर कसे शोधले हे ही सांगाल. तेवढेच माझ्या वा माझ्यासारख्यांच्या ज्ञानात भर पडेल. वा त्यात सहाय्यकाची गरज असल्यास तसेही सांगाल, शेवटी माझेच काम करत आहात.
८वा फोटो चिराबाजारहून
८वा फोटो चिराबाजारहून मेट्रोकडे जाताना जे पारशी अग्यारी किंवा कावसजी पटेल असं काहीतरी नाव असलेली बैठी इमारत लागते तिथला असावा. अग्यारीच्या समोर अशीच बिल्डिंग आहे.
पण ते मागे मध्यभागी काहीतरी मिनारांसारखं दिसतंय त्यावरुन परत गोंधळ उडतोय. कदाचित क्रॉफर्ड मंगळदास मार्केटचा भाग असेल आणि मागची जामा मशिद दिसत असेल.
अभिषेक, जुन्या प्रचिंबद्दल
अभिषेक,
जुन्या प्रचिंबद्दल धन्यवाद!
कफ परेड (प्रचि ११) चा जुना वर्णक्रम (स्पेलिंग) Cuff Parade होतो, हे पाहून मौज वाटली. माझ्या माहीतीप्रमाणे आज तो Cuffe Parade असा आहे.
प्रचि ४ मधली गाडी पंजाब मेल आहे बहुतेक.
आ.न.,
-गा.पै.
प्रचि 5,6.. बॅलार्ड पिअर
प्रचि 5,6.. बॅलार्ड पिअर पर्यंत ट्रेन यायची?
तुमचा अभिषेक, मस्त फोटो. कफ
तुमचा अभिषेक, मस्त फोटो.
कफ परेड च्या फोटोत दिसणारी घरं अगदी आत्ता आत्ता पर्यंत तशीच होती. फार सुंदर दिसत ती घरं . घर म्हणायचं पण बंगलेच वाटायचे ते मला.
अलीकडेच ती पुनः नव्याने बांधली गेली आहेत.
काही फोटोंच्या कॉपीराईट बद्दल
काही फोटोंच्या कॉपीराईट बद्दल साशंक असल्याने उडवले आहेत.
अजून पाच-सहा फोटो बाकी आहेत ते सुद्धा नंतर कॉपीराईट चेकवून टाकतो.
ते R आणि S असे बोर्डस्
ते R आणि S असे बोर्डस् दिसताहेत त्याच्या पलिकडे ट्रेनचे ट्रॅक असावेत. >> बरोबर... त्या फोटोत समोर जी दोन दुकान दिसत आहेत त्यातील उजवीकडच बेर्डेची गादी / किराणा दुकान अजुनही आहे.
अभिषेक, सुधिर जी फोटो सहीच...
बॅलार्ड पिअर पर्यंत ट्रेन यायची? >> होय.. पुर्वीच्या जमान्यात.
चुनाभट्टी कडे जाणार्या रोड वरिल सायन तलाव मला ऑफिसातुन रोज दिसतो. मात्र अजुनही दर्शनाचा योग आलेला नाही.
दिनेशदा.. हिंदु कॉलनीच पुर्वीच रुप आता इतिहास जमा होत चाल्लयं... नविन फ्लाय ओव्हर वरुन जाताना दोन्ही बाजुला उंच टॉवर उभे रहाताना दिसतात.
डेवीड नावाच्या एका
डेवीड नावाच्या एका इतिहासाच्या प्राध्यापकाचं मुंबईवर एक पुस्तक आहे. फार सुंदर आहे. कांदंबरीसारख वाटत वाचताना. इंगजीत आहे. कोणाला मुंबईच्या इतिहासात रस असेल तर त्याने जरुर वाचावे. मुंबईच्या रस्त्याना ती ती नावं कशी पडली, मुंबईचा पाणीपुरवठा, फ्लोरा फाऊंटनचा इतिहास, तो बोटीत झालेला स्फोट, फोर्टला फोर्ट म्हणतात कारण तो एक किल्ला होता तीन गेट असलेला बझार गेट, अपोलो गेट आणि चर्च गेट इ. इ. खूप माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग आहे.
पुस्तकाच नाव काय?
पुस्तकाच नाव काय?
manee, >> प्रचि 5,6.. बॅलार्ड
manee,
>> प्रचि 5,6.. बॅलार्ड पिअर पर्यंत ट्रेन यायची?
भायखळ्याहून रेल्वेचे दोन फाटे फुटतात. उजवीकडचा मेन लाईन असून तो बोरीबंदरास येतो, तर डावीकडचा वाडीबंदरमार्गे बॅलार्ड पियरला येतो. पूर्वी दोन्ही फाटे वापरात होते. पंजाब मेल बॅलार्ड पियरवरून सुटायची. बोटीतून आलेल्या साहेबास माळवा व उत्तर भारतात जायला गाडी जवळच हवी ना.
कालमानपरत्वे बोटीचा प्रवास इतिहासजमा झाला. बॅलार्ड पियरची स्थानकाची गरज उरली नाही. मात्र डिमेलो मार्गाच्या बाजूला जुन्या रूळवाटेच्या खुणा दिसतात. आज वाडीबंदर पूर्णपणे मालवाहतुकीस वापरले जाते.
अधिक माहितीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Ballard_Pier_Mole_railway_station
आ.न.,
-गा.पै.
पुस्तक आहे माझ्याकडे. बघून
पुस्तक आहे माझ्याकडे. बघून सांगते . एक दोन दिवसात.
<< बॅलार्ड पिअर पर्यंत ट्रेन
<< बॅलार्ड पिअर पर्यंत ट्रेन यायची? >> मला तो भाग खूप आवडायचा म्हणून मीं कॉलेजच्या दिवसांत भटकायला नेहमीं बॅलार्ड पियरच्या 'मोल' स्टेशनकडे जात असे. तिथं रेल्वे येणं बंद झालं होतं तरीही रुळ व प्लॅटफॉर्म होते. धक्याला अगदीं लागूनच हें स्टेशन होतं. बहुतेक मध्यम आकाराच्या मालवाहतूक करणार्या बोटीच तेंव्हां तिथं लागत. जगप्रसिद्ध 'क्वीनस लक्झरी लायनर्स'ची बहुधा 'क्वीन एलिझाबेथ' ही प्रवासी वाहतूक करणारी बोट तिथं लागलेली सर्वात मोठी बोट मीं पाहिली आहे. धनदांडग्या पर्यटकांची वर्दळ असणार म्हणून फक्त ती बोट लागली तेंव्हां तिथं कांहींशी सुरक्षा व्यवस्था होती [मला वाटतं, 'क्वीन्स लायनर्स'ची ती एकमेव लक्झरी बोट मुंबईच्या बंदरात आली असल्याचं त्यावेळीं वर्तमानपत्रात आलं होतं]; इतर वेळीं गप्पा मारत बसलेले ड्यूटीवरचे नेहमीचे दोन-चार पोलीस सोडले तर सुरक्षेचा बाऊ नव्हता. तिथल्या प्लॅटफॉर्मवर खुशाल बसून बंदरातील वर्दळीचा कुणीही आनंद घेऊं शकत असे. [ आतां मात्र 'सिक्युरिटी'मुळे तिथल्या कमानीच्या गेटच्या आंत जाणंच मुष्कील !].
१५ मरीन ड्राईव्ह मधल्या
१५ मरीन ड्राईव्ह मधल्या बर्याच जून्या बिल्डींग्ज अजून तश्याच आहेत असे दिसतेय. वरळी सी फेस वरच्याही काही... देख कबीरा रोया चित्रपटात शुभा खोटे एका गाण्यात चालत जाताना दिसते या रस्त्यावरून त्यावरून अंदाज केला.
<<१५ मरीन ड्राईव्ह मधल्या
<<१५ मरीन ड्राईव्ह मधल्या बर्याच जून्या बिल्डींग्ज अजून तश्याच आहेत असे दिसतेय. >> अगदीं खरंय दिनेशदा. माझं बालपण, अर्धं तरूणपण गिरगांवात गेलं व इथं भटकण्यात. पण अजूनही मरीन ड्राईव्हवरून जाताना त्याला इतकीं वर्षं लोटलीं हेंच विसरायला होतं ! तिथल्या इमारतींसाठीं 'हेरिटेज'सारखे कांहीं विशेष नियम आहेत का ?
Pages