अघटीत -- १ http://www.maayboli.com/node/18721
अघटीत -- २ http://www.maayboli.com/node/49213
अनिल उत्साहाने ऐकत होता. जशी कथा संपली तशी " अस झाल तर " म्हणुन त्याने गुढकथेची समाप्ती केली.
तुला काय जातय म्ह्णायला " अस झाल तर " माझी टरकली होती. रात्रभर सारखी भिती वाटत होती. त्या सखारामला सुभाषने बाबाच्या हाताने मारुन पुरावा नष्ट करायला आमच्या कडे आला तर या भितीने जीव घाबरला होता.
पण नाही आला ना ? अनिलने महेशला खांद्यावर हाताने दाबुन धीर दिला. अरे दोन चार दिवसात ही भिती पुर्ण जाईल.
अनिल, तु कधी भुत पाहिलस किंवा असा भयानक प्रसंग पाहिला आहेस का रे ?
"पाय दुखायला लागले रे,आख्ख्य सिगारेट चा पाकिट खपल रे" अनिल म्हणाला.
"हे बघ टाळु नकोस, तु भुत पाहिलस का ? " महेश म्हणाला
हे बघ जरा ऑफिसकडे जाऊन येऊ आणि मग कथा सांगतो तुला. तिकडे दोघही नाही बोंब व्हायची.
दोघेही ऑफिसात आले आणि कामाला लागले.
महेशचा चेहरा जरा बरा दिसत होता. दोन दिवस हा प्रसंग कुणाशी न बोलल्यामुळे त्याच्या जीवाचा नुसता कोंडमारा झाला होता. मधेच स्टेलाने अनिलकडे विचारणा केली की "काय झालय.त्याला ?"
अनिल म्हणाला "सांगतो नंतर तस काही खास नाही".
चार वाजता महेशने अनिलला पकडले आणि ऑफिसच्या टेरेसवर घेऊन गेला.
"सांग बर लवकर तु काय पाह्यलस ?"
टेरेसवरच्या मोडक्या खुर्चांच्या लाइनीतुन दोन बर्या खुर्च्या शोधु दोघे जरा सावली शोधुन बसले. संघ्याकाळचा वारा जरा सुरु होईल अस वाटत होत.
"काय झाल मी आमच्या गावाला गेलो होतो. मग टुम निघाली की रात्री शेजारच्या गावात उरसाला जाऊ." अनिलने सुरवात केली. २० वर्षांपुर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेला आमच्या गावाकड रस्ते धड नव्हते. आणि मोटर सायकली पण नव्हत्या. सायकलवरच फिरायचो आम्ही.
मालवण तालुक्यातल शेवटच गाव आमच. गावाच नाव पांडे. नदी ओलांडली की लागायचा. सावंतवाडी तालुका. तिथुन दहा किलोमीटरवर शिर्सफळ गावात माझा मामा रहायचा. आमची ही दोन्ही गाव हायवे पासुन बरीच दोन चार किलोमीटर आत होती.
आमच गाव गोव्याकडे जाताना डाव्या बाजुला तर सावंतवाडी तालुक्यात एन्ट्री मारल्यावर मामाच गाव उजव्या बाजुला साधारण पाच किलोमीटर आत. निघालो झाल आम्ही सायकली घेऊन चांगली ८-१० पोर.
२० -२५ मिनीटात कच्च्या रस्त्यावरुन पोचलो की गावाला. संध्याकाळी पालखी नाचवली. रात्रीची जेवण झाली. आम्ही सायकलवर परत यायला निघालो. मामाच्या गावाहुन निघाल्यावर अर्ध्या रस्त्यात माझी सायकल पंचर झाली. रात्रीचे ११ वाजले असतील. बाकीची पोर किरकिर करायला लागली म्हणुन त्यांना पुढ जायला सांगुन माझा खास मित्र नामदेव माझ्यासोबतीला थांबला.
त्याकाळात घरघरात सायकली आणि पंचर काढायच सामान असायच. चला एखाद घर पाहुन दरवाजा वाजवु म्हणल आणि मागु पंचरच सामान. कटकट झाली तर देऊ दोन रुपये असा विचार करत आम्ही एका घरात दिवा जळतो पाहुन दार वाजावल.
दार वाजवताना जरा विचारातच होतो. घराच्या दरवाज्यात गवत साठवलेल नव्हत ना गुरांचा वाडा. अंगण निट सारवलेल नव्हत ना गडगा नीट बांधलेला. इलाज नव्हता म्हणुन वाजवाला दरवाजा.
कर कर आवाज करत दरवाजा उघडला आणि हाफ पॅट घातलेला वर उघडाबंब खास कोकणी माणुस समोर आला. "काय पायजे ? " म्हणुन कंदीलवर करत त्याने आमचे चेहरे पाहिले. बोलायला तोंड उघडला तेव्हा त्याच्या तोंडात बरेच दात नव्हते ते साफ दिसले. घराच्या आतुन कुबट वास येत होता जसा काय घरात कुणाचा वावरच नसावा. माझ्या मनात नाना शंका येत होत्या की जर घरात हा माणुस रहात असेल तर अनेक दिवस घर बंद असल्यासारखा कुबट वास का येतो आहे.
नामाने कहाणी सांगीतली तशी त्याने पटकन हवा भरायचा पंप, पंचर चिकटवायला जुनी फाटकी सायकलची ट्युब, चिकटवायच सोल्युशन, कात्री दिली. आमच्या बरोबरच तो आम्ही पंचर काढत असताना बसला. तो माणुस उकीडवा शांत बसला होता. मी टायर काढला आणी ट्युब बाहेर काढून हवा भरुन सायकल उचलुन जवळाच्या द्रोणीजवळ नेली. कंदीलाच्या उजेडात ट्युब पाण्यात बुडवुन पंचर शोधली. हवा सोडुन पंचरची जागा घासुन सोल्युशन लाऊन त्यावर ट्युब कात्रीने कापुन चकती लावली.
नामा चल बसव टायर ट्युब आणि टायर अस म्हणुन रिकामा बसलेल्या नामाला कामाला लावल आणि मी द्रोणी शेजारी असलेल्या विहीरीत डोकावले. जसे विहीरीत डोकावले तसे तो माणुस खाकरला आणि म्हणाला "अंधारात काय पाहतो ?"
आता मात्र खात्री झाली की आपण बहुतेक संकटात पडणार कारण हे घर रहात्या माणसाच म्हणाव तर रहाटावर पाणी काढायची माळ आणि डबे नव्हते. अजुबाजुला जवळ घर किंवा दुसरी विहीर नव्हती. मग या रहात्या घरात पाण्याशिवाय संसार कसा चालतो ?
"चला, आटपा लवकर. झोप येती मला. आता तो माणुस गुरकावला." त्याच्या चेहर्याकडे कंदिलाच्या उजेडात पाहिल्यावर मला काटा आला. एखाद्या प्रेतकळा असलेल्या माणसाचा चेहरा होता.
नामाने जरा वेळ थांबुन पटापट ट्युब टायर मधे सरकवली आणी टायर रिमवर बसवुन हवा भरली. व्हॉल्व चेक करायला मी जरा पाण्याचा थेंब व्हॉल्वर सोडला आणि काय झाल कुणास ठाऊक व्हॉल्वचा नट उडाला, सोबत व्हॉल्व्ह ही उडाला. कुठे उडाला काही कळेना. मग तो माणुस उठला. हाच व्हॉल्व्ह शोधायला हवा म्हणाला. दुसरा व्हॉल्व आनी त्याचा नट आपल्याकडे नाही म्हणाला.
अस करा, झोपा इथच, सकाळी पाहु त्या कोकणी माणसाने सांगीतले. रात्रीचे तोवर बारा वाजुन गेले असतील. मी नामकडे पहिल. नामाही म्हणाला काय हरकत नाय. आम्हाला गोधडी द्या, आम्ही झोपतो बाह्रेरच अंगण्यात.
नामाला माझ्या मनातल्या शंका सांगाव्या आणि तो घाबरला तर सगळच संपल. मी मनातली भिती तशीच दाबुन पुढे काय होतय त्याची वाट पहात राहिलो. मनात योजना करत राहिलो की हा माणुस सरळ नसला तर काय करायच. एक विचार पक्का झाला आणि मी शांत झालो.
त्याबाबाने आम्हाला एक गोधडी आणुन दिली आम्ही आडवे झालो, समोरच्या झाडावर काजवे चमकत होते आणि समोरच्या झाडाखाली बकुळीच्या फुलाचा सुगंध दरवळलेला आता आम्हाला जाणवला.
त्यामाणसाच्या घराकडे नामा तोंडकरुन झोपला होता आणि नामाच्या पाठीकडे पाठ करुन मी झोपलो होतो. नामाला एक पांढर्या साडीतली आकृती विहरीतुन बाहेर पडुन त्या बाबाच्या घराच्या दरवाज्यात दिसु लागली. काहीतरी भास असेल म्हणुन नामाने डोळे चोळले पण ती पाठमोरी बाई त्या बाबाच्या दरवाज्यात उभे राहुन हाका मारताना दिसु लागली.
बाबा घराच्या बाहेर आला आणि नामाने मला हलवले. माझी अर्धवट लागलेली झोप उडाली. ती बाई त्या बाबाला म्हणाली घरात काय खायला असेल तर दे. तो बाबाही थांब जरा बघतो घरात काही खायला आहे का असे म्हणुन आत गेला. आम्हाला काय चाललय कळत नव्हत.
त्याबाईने मागे वळुन पाहिले आणि तिचा भयानक चेहरा पाहुन आमची फाटली रे. आम्ही दोघही उठुन बसलो. खात्री झाली की ती बाई हडळ आहे. तोवर बाबा एक भाकरी घेऊन बाहेर आला. " अशी कोरडी भाकरी कशी खाऊ?" त्या भयानक चेहर्याच्या बाईने त्या बाबाला विचारले.
हात तिच्या, ही कोवळी पोर काय कामाची. थांब त्यांची मुंडी मुरगळतो. त्यांच्या ताज्या रक्तात कुसकरुन खाउया म्हणुन तो बाबा जो हसला तशी आम्ही ताडकन उभे राहिलो. जो बाबा आम्हाला मदत करत होता तो पण भुत आहे याची खात्री आम्हाला झाली. "नाम्या, ही भुत आहेत चल पळ मी जोरात ओरडलो. "
तो बाबा पुढे येण्यासाठी आम्हाला खुणवु लागला. काही क्षण आम्हाला भुरळ पडते का काय अशी भिती वाटायला लागली. मन पळायला पहात होत पण पाय थिजल्याचा भास होत होता.
आम्ही एकमेकांकडे पाहील आणि माझी चाक बसलेली सायकल सोडुन नामाच्या सायकलीकडे आम्ही धावलो. माझ्या मागोमाग नामा पळाला. पळताना खुप कष्ट होत होते. चिखलात पळताना पाय धसतात तसा भास कोरड्या जमिनीवर होत होता. काही क्षणात मी नाम्याच्या सायकलजवळ पोहोचलो.
मी सायकलवर उडी मारली आणि नामाने सायकल जोरात ढकलुन सायकलला वेग दिला आणि तोपण कॅरीयरवर बसला. त्या दोघांनी जाग्यावर उभे राहुनच हात लांब केले. मोठ्या बांबुइतके हात आम्हा दोघांना पकडायला पहात होते पण त्या हातांच्या पेक्षा कितीतरी लांब आम्ही पोहोचलो होतो,
सायकल स्पर्धेत चालवावी त्यापेक्षा जास्त वेग जेव्हा आम्ही डांबरी रोडला लागल्यावर आला आणि आम्ही मागे न पहाता सुसाट वेगाने गावाला आलो.
केव्हा एकदा घरात घुसतो अस झाल होत. नाम्याच घर जरा लांब होत म्हणुन तो आमच्या घरात घुसला. दाराच्या फटीत हात घालुन आम्ही आतली कडी काढली आणि लागलीच कडी घालुन हुश्य्य केल.
दोघांनीही पाणी पिउन अंथरुण पसरुन झोपलो. सकाळी सात आठ पोर आणि काठ्या घेऊन आम्ही त्या गावाला गेलो आणि पहातोतर काय माझी सायकल हवा भरलेल्या कंडीशनमधे उभी रे. त्या घरात कोणीच नव्हत.
आम्ही आजुबाजुला चवकशी केली तेव्हा कळल की काही दिवसा पुर्वी ती बाई आणि बाबा निपुत्रीक वारले. त्यांचे दिवस झाले नाहीत. शेवटचे काही दिवस दोघेही आजारी आणि उपाशी होते. लोकांनीच त्यांना अग्नी दिला पण पाणि द्यायला किंवा दहाव घालायला कोणी पुढे आले नाही. मग हे घर असेच माणसांशिवाय रिकामे पडले आणि हा अनुभव अधुन मधुन लोकांना येतो.
काय रे अनिल, मी सांगायला सुरवात केली तेव्हा तु म्हणालास की मेल की संपल मग तु अस का म्हणालास ? महेशला आठवल आणि महेश अनिलला विचारु लागला.
"अरे, त्या रात्री आम्ही दोघही घटाघटा पाणी का प्यायलो माहित आहे का ?" आमच्या दोघांची ओली होऊन खुप तहान लागली होती. ती आठवण काढायला नको म्हणुन टाळत होतो रे.
समाप्त
डरना मना है. दोन वेगवेगळ्या
डरना मना है.
दोन वेगवेगळ्या गोष्टी आल्यात पण मस्तं आहेत.
वाचुन झाली पण ? रोबोतल्या
वाचुन झाली पण ? रोबोतल्या अण्णाच्या स्पीडने वाचली की काय ? आत्ताच लिहुन संपवली. माझ्या मागे उभे राहुन तर वाचत नव्हता ना ? रात्रीचे बारा वाजत आहेत म्हणुन विचारतो. बाकी भुतकथा लिहल्या तरी मी पण घाबरतो असा अनुभव आल्यावर.
नाही कळली
नाही कळली
मस्तच .....
मस्तच .....:)
भारीच
भारीच
घाबरवणारी पण मजेशीर आहे, कथा
घाबरवणारी पण मजेशीर आहे, कथा आवडली, प्लिझ असेच पटापट पुढचे भाग टाका.
मस्त आहे.. आवडली... बाकीच्या
मस्त आहे.. आवडली... बाकीच्या अपुर्ण गोष्टी पण येउ देत
aghatit-2.. sarvjanik karal
aghatit-2.. sarvjanik karal ka plz....
मस्तच
मस्तच
पहिली दोन भाग आवडले होते हा
पहिली दोन भाग आवडले होते
हा थोडासा नाही आवडला
म्हणजे ती बाबाची गोष्ट अगदीच बाळबोध वाटली.
कदाचित मला मोठा ट्विस्ट अपेक्षित होता म्हणून निराशा झाली असावी
रीया +१
रीया +१
sarvjanik karal ka plz...
sarvjanik karal ka plz...
मला भाग २ वाचायचा आहे plzzzzzzzzzzzz
चौथा भाग झाला असता तरी चाललं
चौथा भाग झाला असता तरी चाललं असतं...थोडा मसाला आणखी किंवा तत्सम...
बाकी चांगली आहे..
पुलेशु..!!
धन्यवाद ! मी पहिला भाग अर्धा
धन्यवाद !
मी पहिला भाग अर्धा लिहुन ३ वर्षापासुन अपुर्ण ठेवला होता. याच कारण कथा मनामधे तयारच होत नव्हती. पहिला भाग पुर्ण होता होता दुसरा आणि दुसरा संपताना तिसरा भाग सुरु झाला.
आता जर चवथा आणि पाचवा सुचला तर समाप्त हा बोर्ड हटवुन कथा पुढे लिहायला आवडेल.
भुतकथांची विभागणी कुणी केली आहे का मला माहित नाही.
राखण आणि बोलका या दोन कथांना वाचकांनीच प्रेमळ भुतांच्या विभागात टाकले.
http://www.maayboli.com/node/14421 राखण
http://www.maayboli.com/node/14500 बोलका
चकवा ही कथा भुतांच्या दुसर्या विभागात जाते जिथे भुत आपले फक्त अस्तित्व दाखवण्याच्या प्रयत्नात असते. ते मानवाच्या मदतीला जात नाही किंवा बदल्याच्या किंवा घाबरवण्याच्या भानगडीत नसते. हे भुत ज्यांचा भुतयोनीवर विश्वास नाही त्यांना फक्त अस्तित्व दाखवते.
http://www.maayboli.com/node/38587 चकवा
भुत कथामधे हिंसक किंवा ज्याला बिभत्स रस म्हणता येईल असा एक कथा प्रकार म्हणता येईल ज्यात भुत आपल्या वासनापुर्तीसाठी कोणत्याही थराला जाते.
अघटीत २ आणि ३ मध्ये हेच दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय.
भुत कथामध्ये अजुन चवथा आणि पाचवा प्रकार सुचला म्हणजे आणखी काही कथा बांधता येतील.
वाढवता आली तरी चालेल असं
वाढवता आली तरी चालेल
असं काही तरी की महेश त्या बाबाकडे गेलेला असताना जे भूत बाआमध्ये आलेलं तेच अनिलमध्ये पण आलं आणि आत्ता याच्यापुढे उभा असलेला अनिल अनिल नसुन भूत आहे आणि मग त्याने महेशला मारुन टाकलं.....
म्हणजे खरं अघटित होईल ना
सर्वांच्या सूचनांच स्वागत.
सर्वांच्या सूचनांच स्वागत. माझ्या वाञनयीन जीवनात २५ वी कथा येऊ घातली आहे. अजुनही र्हस्व /दिर्घ चुका होतात. सुरवातीच्या काळात अनेकांनी बहुमोल सहकार्य केले म्हणुन हा टप्पा मला गाठता येईल असा विश्वास वाटतो आहे.
रि, किती ते स्पायसी नि३,
रि, किती ते स्पायसी
नि३, रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचलीयेत का? मी सध्या वाचतेय.. एक से एक गुढ कथा असतात..
चिमुरी, होय, काही कथा
चिमुरी,
होय, काही कथा वाचल्यात. खास करुन काही कथांच जेव्हा जुन्या कृष्ण धवल दुरदर्शनवरुन सादरीकरण झाल होत त्यातली एक कथा अजुनही लक्षात आहे.
सासुरवाशीणी, तुला छापील कथा /साहित्य वाचायला वेळ कसा मिळतो ? आणि काढत असशील तर धन्य आहे.
सासुरवाशीणी>>>>>> ही आधी मला
सासुरवाशीणी>>>>>> ही आधी मला कथेचं नाव वाटलं काढते वेळ अधुन मधुन.. त्याशिवाय डोकं ठिकाणावर राहत नाही
नि३, रत्नाकर मतकरींची पुस्तकं
नि३, रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचलीयेत का? मी सध्या वाचतेय.. एक से एक गुढ कथा असतात..>>>>>>>>. चिमुरी त्यांच्या कथेचा एक पॅटर्न आहे...तु २-३ पुस्तकं वाच त्यांची .... तुला हळुहळु पुढे काय होणार आहे त्याचा अंदाज येतो...पण मी जेव्हा ही सर्व पुस्तकं वाचली तेव्हा प्रत्येक गोष्टीला अंगावर काटा यायचा
वाचली ,,दुसरी कथा जास्त बरी
वाचली ,,दुसरी कथा जास्त बरी आहे
chima
chima
आवडली. पुलेशु
आवडली. पुलेशु
तुला हळुहळु पुढे काय होणार
तुला हळुहळु पुढे काय होणार आहे त्याचा अंदाज येतो...पण मी जेव्हा ही सर्व पुस्तकं वाचली तेव्हा प्रत्येक गोष्टीला अंगावर काटा यायचा>>>>>>>> अंदाज येतोच.. पण तरिही मस्त वाटतात वाचायला.
bhaaree jamalelee
bhaaree jamalelee
कथेचे पहिले दोन भाग आवदले
कथेचे पहिले दोन भाग आवदले होते. तिसरा भाग गुंडाळल्यासारखा वाटला. हाच भाग थोडा improve करताआला तर बघा आणी पुढचे भाग लिहिलेत तरी वाचायला मजा येईल
वेल, कथा थोडीशी सुधरवली
वेल,
कथा थोडीशी सुधरवली आहे. जरा वाचुन पहा.
नितीनचंद्र तुमच्या
नितीनचंद्र तुमच्या चंद्राबाईचा आत्मा आणि चकवा ह्या दोन्ही कथा मी वाचल्यात , ह्या कथेची सुरुवात मला हि खूप आवडली तुम्ही हि कथा पुढेहि लिहा बघा सुचेल तुम्हाला चांगल आणि आम्हाला मनापासून आवडेल वाचायला - पु .ले .शु