रताळ्याची पुरणपोळी [फोटो सहीत]

Submitted by प्रभा on 13 May, 2014 - 13:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ रताळे, साखर, कणिक, तेल, जायफळ, विलायची, तुप.

क्रमवार पाककृती: 

रताळे उकडुन साल काढुन किसुन घ्यावेत. कढईत २ चमचे तुप टाकुन त्यात रताळ्याचा किस घालुन गॅसवर परतवुन घ्यावा. नंतर त्यात किसापेक्षा थोडी कमी साखर घालुन परतावे. साखरेचा पाक बनल्यावर पुरणाप्रमाणे गोळा तयार होइल.

त्यात आवडीप्रमाणे जायफळ, विलायची, केशर घालुन पोळीत भरण्यासाठी योग्य आकाराचे गोळे तयार करुन घ्यावेत.

आता आपण पुरणाच्या पोळीसाठी भिजवतो तशी कणिक भिजवुन तेल घालुन मळुन घ्यावी. व आपण पुरणाच्या पोळ्या करतो त्याप्रमाणे रताळ्याच पुरण भरुन पोळी लाटावी व तव्यावर भाजुन थोडे तुप सोडुन खरपुस भाजुन घ्यावी.
याप्रमाणे बटाट्याच्या पुरणाच्याहि पोळ्या करता येतात. किंवा रताळ्यातहि एखाद-दुसरा बटाटा घालुन
पोळ्या करु शकतो

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती ने ही पाकक्रुती कधीचीच मागितली होती. पण प्रक्रुती ठीक नसल्यामुळे २-३ महिने काहीच लिखाण करु शकली नाही. क्षमस्व आरती.

छान प्रकार. मला वाटतं चिनूक्सने पण लिहीला होता.
अशीच राजेळी केळ्याची करता येते.