४-५ रताळे, साखर, कणिक, तेल, जायफळ, विलायची, तुप.
रताळे उकडुन साल काढुन किसुन घ्यावेत. कढईत २ चमचे तुप टाकुन त्यात रताळ्याचा किस घालुन गॅसवर परतवुन घ्यावा. नंतर त्यात किसापेक्षा थोडी कमी साखर घालुन परतावे. साखरेचा पाक बनल्यावर पुरणाप्रमाणे गोळा तयार होइल.
त्यात आवडीप्रमाणे जायफळ, विलायची, केशर घालुन पोळीत भरण्यासाठी योग्य आकाराचे गोळे तयार करुन घ्यावेत.
आता आपण पुरणाच्या पोळीसाठी भिजवतो तशी कणिक भिजवुन तेल घालुन मळुन घ्यावी. व आपण पुरणाच्या पोळ्या करतो त्याप्रमाणे रताळ्याच पुरण भरुन पोळी लाटावी व तव्यावर भाजुन थोडे तुप सोडुन खरपुस भाजुन घ्यावी.
याप्रमाणे बटाट्याच्या पुरणाच्याहि पोळ्या करता येतात. किंवा रताळ्यातहि एखाद-दुसरा बटाटा घालुन
पोळ्या करु शकतो
आरती ने ही पाकक्रुती
आरती ने ही पाकक्रुती कधीचीच मागितली होती. पण प्रक्रुती ठीक नसल्यामुळे २-३ महिने काहीच लिखाण करु शकली नाही. क्षमस्व आरती.
मस्त! आई फार मस्त करते, आता
मस्त! आई फार मस्त करते, आता स्वतः करुन बघावी लागेल.
रताळे उकडल्यावर किसुन का
रताळे उकडल्यावर किसुन का घ्यायचे? फक्त लगदा केला तर नाही का चालणार?
लगद्यामध्ये गुठळ्या राहतात.
लगद्यामध्ये गुठळ्या राहतात. किसून केले तर मिश्रण एकजीव होते व लाटायला सोपे होते.
प्रभा, धन्यवाद रेसिपीसाठी.
प्रभा, धन्यवाद रेसिपीसाठी. नक्की ट्राय करेन.
क्षमस्व नको तुमची तब्येत महत्वाची.
छान प्रकार. मला वाटतं
छान प्रकार. मला वाटतं चिनूक्सने पण लिहीला होता.
अशीच राजेळी केळ्याची करता येते.
सगळयांच्या आग्रहाप्रमाणे
सगळयांच्या आग्रहाप्रमाणे फोटो टाकले आहेत.
मस्त फोटो, आजच कराव्या लागणार
मस्त फोटो, आजच कराव्या लागणार
मस्त.नक्की ट्राय करेन.
मस्त.नक्की ट्राय करेन.
करुन खाल्यावर जीव भांड्यात
करुन खाल्यावर जीव भांड्यात पडला
तुमची कॉपी केलीए
पुन्हा एकदा धन्यवाद!
छानच... प्रितीचा फोटो पण छान
छानच... प्रितीचा फोटो पण छान आलाय!
छानच झाल्यात प्रिती. आता
छानच झाल्यात प्रिती. आता गुलाबजाम पण करुन बघ. छान होतात.