माझ्या नात्यातल्या एकीचे सासरे खूप विक्षिप्त वागतात. सासूसहीत सर्वजण त्यांना टरकून असतात. घरात कुणाशी बोलायचं नाही, हसूनखेळून रहायचं नाही, दुखलं खुपलं सांगायचं नाही असा माणुसघाणा स्वभाव आहे. जेव्हा माणसात बसतात तेव्हां बारीक बारीक चुका शोधत बडबड करत बसतात. वातावरण अजिबात प्रसन्न ठेवत नाहीत. काय होतंय या प्रश्नाला सरळ उत्तर मिळत नाही. एखाद दिवशी वर गेलो तरी तुम्हाला कळायचं नाही असं काहीतरी बोलतात.
टीव्ही रिमोटने ऑफ केला तर म्हणणार ती लाईट चालू राहते, बिलं कोण भरणार. पण कुणी जर मागचं बटण बंद केलं तर मला बघायच्या वेळी मुद्दाम करतात असं म्हणतात. एकदा त्यांना कुणीतरी म्हटलंच कि तुम्हीच म्हणाला होतात.... तर महिनाभर आदळआपट. वर बीपीचा बहाणा. मी चार दिवस रहायला म्हणून गेलेले दुस-याच दिवशी परत आले. . तिच्या सासूची दयाच आली.
स्वभावाचा आणखी एक नमुना..
माझा बॉस जगावेगळा आहे. कुठल्याही गोष्टीत तो कधीच प्रसिद्ध किंवा थोरामोठ्यांची उदाहरणं देत नाही तर स्वतःचीच उदाहरणं देतो. वर पुन्हा मिटींग बिटींग असली कि बायकोपुराण सुरू करतो. खूप बोअर होतं ते ऐकायला. स्वतःच्याच तोंडाने स्वतःचीच बायको किती ग्रेट आहे हे कसं वाटतं ऐकायला ? त्याच्या घरी मूल सांभाळायला एक मुलगी होती. याची बायको साडेसहाला येते म्हणून तिचं टायमिंग साडेसहा. बॉसचं घर जवळच असल्याने तो लवकर घरी जायचा. साहजिकच तिला वाटायचं आता साहेब आलेत तर आपण निघू शकतो, म्हणून तिने एक दोनदा विचारलं तर हा म्हणाला मॅडम आली कि विचार. नंतर तर याने लवकर घरी जायचंच बंद केलं. एकदा मात्र दोघंही लवकर आले तेव्हा ती म्हणाली घरी जाऊ का ? तर दोघांनी घड्याळाकडे पाहीलं ! साडेसहापर्यंत तिला फुटकळ कामं देऊन थांबवून घेतलं. त्यांची वृत्ती लक्षात आल्यावर तिने लगेचच काम सोडलं. ही कामवाली ज्याने दिली होती त्याला याने ऑफिसात लेक्चर दिलं. आता त्याच्याकडे कामवाली, ड्रायव्हर असे लोक टिकतच नाहीत.
अशा त-हेवाईक नमुनेदार लोकांचे किस्से तुम्ही पण शेअर करा .
हे किस्से 'स्वभावाला औषध
हे किस्से 'स्वभावाला औषध नाही' किंवा 'विक्षिप्त, चक्रम, आचरट' इथे टाकू शकतो.
अंजु
अंजु
हे किस्से 'स्वभावाला औषध
हे किस्से 'स्वभावाला औषध नाही' किंवा 'विक्षिप्त, चक्रम, आचरट' इथे टाकू शकतो.
>>> अगदी...! अगदी..! अश्या व्यक्ति 'जित्या ची खोड मेल्या शिवाय जात न्हाय' या प्रकारात मोडतात.
चिक्कार आहेत माझ्या माहितीत
चिक्कार आहेत माझ्या माहितीत असे नमुने..
पहिल्याच भेटीत काही कारण नसतांना (आणि पुन्हा भेटायची शक्यता नसतांना) उगाच खवचटपणे बोलणारे हेही एक नमुनेच.
यान्ना का नाहि दिला डोक्टरकडे
यान्ना का नाहि दिला डोक्टरकडे जायचा सल्ला ? ही तर कथा नाहि ना ?
दुकान, अहो त्यांनी स्वतःबद्दल
दुकान, अहो त्यांनी स्वतःबद्दल नाही सांगितलय. अरे देवा, उठा ले रे बाबा !
कारण नसताना दुसर्याचं वर्म
कारण नसताना दुसर्याचं वर्म काढणारी अनेक माणसं मी पाहिलित. अगदी डुख धरुन ठेवणारी आणि खोचुन बोलणारी. बाकी त्यांची चिकाटी जबरदस्त असते. गप्प गुमान असतात आणी नेमका प्रसंग पाहुन बोलतात. एक प्रकारची सिद्धीच प्राप्त असते त्यांना याबाबत.
>>एक प्रकारची सिद्धीच प्राप्त
>>एक प्रकारची सिद्धीच प्राप्त असते त्यांना याबाबत.
मला भेटली आहेत अशी अनेक माणसे.
त्यातही काही जणांकडे अजुन एक स्पेशल स्कील असते ते म्हणजे सतत समोरच्याला वेड्यात काढणे, शब्दात पकडणे, पाडणे (बोलण्यात), इ. इ. आणि वर आव असा आणणे की आम्ही हे त्याच्या (बळीच्या) भल्यासाठी करत आहोत. आणि आमचे कधीच काही चुकत नाही असा आव आणतात.
उलट जर कधी त्यांचे दोष, चुका दाखवायला गेले तर अजिबात ऐकून घेणार नाहीत.