![guacamole](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/11/23/guacamole.jpg)
अव्हाकाडो - १
कांदा - २ चमचे बारीक चिरलेला
टोमॅटो - २ चमचे बारीक चिरलेला
लसुण - १-२ पाकळ्या किसुन
हालापिनिओज मिरच्या - १-२ बारीक चिरुन (ह्या मिरच्या brine मधे marinate केलेल्या वापरल्या तर मस्त चव येते)
लिंबु - १/२ किंवा १/२ चमचा लिंबाचा रस
काळि मिरी पावडर - १/४ चमचा
ऑलिव्ह ऑईल - १ चमचा
मिठ चवीनुसार
१. अव्हाकाडो मधोमध कापुन, मधली बी काढुन गर काढुन घ्यावा.
२. हा गर एका भांड्यामधे घेउन, काटे चमच्याने तो mash करुन घ्यावा. एकदम पेस्ट करु नये.
३. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेला लसुण, हालापिनिओज मिरची, मिठ, काळि मिरी पावडर व ऑलिव्ह ऑईल टाकुन मिक्स करावे.
४. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस टाकुन मिक्स करावे.
५. ग्वॉकोमोली खायला तयार आहे.
हे ग्वॉकोमोली तयार करुन जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही. ते काळे पडते. त्यामुळे जेव्हा खायचे असेल तेव्हा लगेच गर काढुन सर्व मिक्स करुन serve करावे.
यम्म दिसतय
यम्म दिसतय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतयं. माझं आवडत.
मस्त दिसतयं. माझं आवडत. ह्यात कांद्याची पात जास्त छान लागते. आणि अॅवाकाडोची बी जर त्यात ठेवली तर ते काळं पडत नाही असं नेट वर वाचलयं. मी करुन नाही ठेवत. आयत्या वेळेसच करते.
मृणाल, मस्तच जमली आहे पाककृती
मृणाल, मस्तच जमली आहे पाककृती तुला. फोटोज पण छान आले आहेत. गूड!!!
ह्यात टोमॅटो सुद्धा घालतात. मी हा पदार्थ वाशिंगटन डीसीमधे खूपदा खाल्ला आहे पण एकट्या व्यक्तिला हे त्रिकोणी टॉर्टिला-चिप्स खूप जास्त होतात. ग्वॉकोमोली (डीप) हे नाव मला तुझ्यामुळे कळले
मला वाटल ह्याला साल्सा म्हणतात :). धन्स. तो दगडी खलबत्ता वगैरे बघून मला काहीतरी भारतीय चवीचे खायला मिळणार असे वाटले. अव्हाकाडो पिकलेले असेल तर ग्वॉकोमोली आणखी छान होते असे माझे अमे. कलीग्स म्हणाली होती मला.
धन्स सर्वांना. हो बी, मी
धन्स सर्वांना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हो बी, मी सुद्धा ह्यात टोमॅटो घातला आहे. अगं मिक्स्कन लोक हे ग्वॉकोमोली अश्या दगडी खलबत्त्यातच करतात. इथे तर एक मेक्सिकन रेस्टॉरंट आहे, तिथे ते लोक आपल्या समोर सगळ एकत्र करुन, खलबत्त्यात थोडे मिक्स करुन आपल्याला serve करतात. म्हणुन मी पण असा खलबत्त्यात फोटो काढला.
मृणाल, मी ज्या रेस्तॉ मधे
मृणाल, मी ज्या रेस्तॉ मधे गेलो होतो तिथे सुद्धा त्यांनी हे डीप माझ्या टेबलासमोर उभे राहूनच केले होते. मला बघायला मजा आली होती.
अरे हो.. तू टोमॅटो घातले आहेत पण माझ्या नजरेला दिसलेच नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.. आमच्याकडे यात घालायला
मस्त.. आमच्याकडे यात घालायला तयार मिक्स मिळतो.. त्यात नुसते अवाकाडो घातले कि झाले.
सही दिसतंय. मला ग्वॉकोमोली
सही दिसतंय. मला ग्वॉकोमोली डिप म्हणून खाण्यापेक्षा Chipotle style Burrito bowl (lemon corriandar rice + corn + beans + veggies etc) करुन त्याच्यावर घालुन खायला प्रचंड आवडतं.
मस्त फोटो आलेत.
मस्त फोटो आलेत.
भारी फोटो
भारी फोटो
फोटो मस्त आहे ..
फोटो मस्त आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी. मस्त फोटो. हलपिनो फ्रेश
भारी. मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हलपिनो फ्रेश जास्त आवडते मला. क्रंची दाताखाली येते म्हणजे.
मस्त फोटो
मस्त फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो मस्त
फोटो मस्त
फोटो आवडले.
फोटो आवडले.
वॉव.. कधीच खाल्ले नाहीये पण
वॉव.. कधीच खाल्ले नाहीये पण आता करून पाहिन...
crushed pineapple and chopped
crushed pineapple and chopped pablano pepper हे कॉम्बो पण भन्नाट लागत ग्वाकामोलीत.
मस्त फोटो.
मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही आहे फोटो.
सही आहे फोटो.
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
सगळ्यांचे धन्यवाद!
सगळ्यांचे धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी लसूण घालत नव्हते आता घालून
मी लसूण घालत नव्हते आता घालून बघेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी फोटू एकदम मस्त
.
.