एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली दोघांनी काम सोडुन दिले आहे. कोर्टाला मे महीन्यात सुट्टी असते का/ना? दोघांचे बोअर बॉस पण गायब आहेत त्यामुळे. Happy

<< हल्ली दोघांनी काम सोडुन दिले आहे.>> दोघांचं जें चाललं आहे ,तो अनुभव त्याना त्यांच्या 'फॅमिली कोर्टा'तल्या प्रॅक्टीसमधे मौल्यवान ठरणार आहे; म्हणून, अगदींच 'काम सोडून दिले आहे' असं नाही म्हणतां येणार !!

<< तुम्हाला स्पृहा आवडते पण तीही माझ्या मात्र अजूनही डोक्यात जाते.>> अहो, सगळेच माझ्या डोक्यात जातात म्हटलं मीं, तर तुम्हीच म्हणाल, " तुमचं डोकं आहे का खोकं ! " Wink

त्यात काय हे समदे शिरेलीवाले आपलं डोकं, खोकंच करायला बसलेत. कधी कधी वाटतं बरं आहे निदान रिमोटचं बटण तरी आपल्या हातात असतं.

umesh kamat on twitter yesterday, ' अजुन फक्त ५० एपिसोड्स बाकी. आम्ही शेवटच्या टप्प्यावर आहोत.'

अजुन फक्त ५० एपिसोड्स बाकी. आम्ही शेवटच्या टप्प्यावर आहोत>> वाचून चांगलंही वाटलं- फार ताणत नाहीयेत म्हणून आणि वाईटही- ओम्या दिसणार नाही म्हणून Happy

जुयुरेगा आणि होसुमियाघ च्या निर्माते/लेखक/दिग्दर्शक यांना
बाबाजी, लक्ष असु द्या / काहिही हं श्री यांना

बघा, मालिकेत पाणी न घालता मालिका योग्य वेळी कशी आणि कधी संपवायची ते शिका जरा तुमच्या मित्रांकडुन!
यावेळी सुधारण्याची वेळ तुमच्या हातातुन कधीच गेली आहे. तेव्हा पुढल्या वेळी तुम्ही सुधाराल इतकीच माफक अपेक्षा आहे. Sad
तेव्हा पाणी घालणे चालु राहु द्या. एकदा पावसाळा सुरु झाल्यावर तर पाण्याची अजिबात चिंता नाही आहे.

ए. ल. ति. गो. वाले तरी सध्या पाणी घालण्याशिवाय वेगळं काय करतायेत? अजून ५० एपिसोड्स…?!?!?

पाण्यात घातली दिग्दर्शकाने मालिका! Angry

रच्याकने, एलतिगोच्या च वेळेत डीडी भारती वर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असतो. मधू किंवा कामतांचा म्हातारा किंवा ओम-ईशा च्या गोग्गोड गप्पांच्या सीन च्या वेळात रसिक श्रोत्यांनी आनंद घ्यावा. त्याच वेळेत natgeo वर the brain games/the number games हे भारी tv shows असतात.

यांच्याकडची कथा संपली की काय? Sad
कालचा अख्खा भाग त्या मधू आणि त्या सागरवर घालवला? तिचा ड्रेस किती भयानक होता आणि? फक्त क्युट उ.का साठी कशी सहन करायची ही मालिका?

ओमचे खरे आई बाबा पुन्हा एकत्र येतात इथपर्यंत ठिक होते. पण खोटे मृत्यूपत्र प्रकरण मालिका वाढवण्यासाठी ऊगाच घुसवल्यासारखे वाटते. त्याची खरंच काही गरज नव्हती.

आजकाल मी बगह्तंच नाहीये.
कुनाचं खोटं मृत्यूपत्र????? Uhoh

मी कालचं विचारणार होते इथे काय चालूये म्हनून

रिया, ओमच्या आजीला ३ मुल असतात. ओमचे बाबा अजित, त्याच्याबरोबर सध्या रहात असलेला काका रणजीत आणि आणखी कोकणात रहात असलेला काका (मला नाव माहित नाही). तिन्ही मुलांनी आपल्या आईची काळजी न घेता ओमने तिची काळजी घेतल्यामुळे ती तिच्या मृत्यूपत्रात सगळी प्रोपर्टी ओमच्या नावावर करते. तिच्या पश्यात मृत्यूपत्र वाचनाच्या वेळी कोकणात रहात असलेला काका ते मान्य न करता ते मृत्यूपत्र खोटे आहे अशी कोर्टात केस दाखल करतो.

ye to june updates hai Happy

magech mhanala hota na to ki mi kes karanar ahe dakhal Happy

काकाचं नाव सत्यजित (यमक जुळवलं आहे!)
चिपळूणला केस दाखल तर केलेलीच आहे, पण तो आणि त्याचा मुलगा ओमकडे हक्कानं येऊन राहिले आहेत. केस दाखल केलेली असल्यामुळे सध्यातरी घरावर त्याचाही हक्क आहे, ओमचा हक्क शाबित व्हायचा आहे. तो अचानक येऊन थडकल्यामुळे सगळे अचंबित झाले आहेत. आणि वेगवेगळ्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट करत आहेत.

आणि वेगवेगळ्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट करत आहेत.
>>>>>>>>
एका एपिसोडचे चार एपिसोड या वेगवेगळ्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट केल्यानेच तर होतात, डेली सोपमध्ये ग्रूप रिअ‍ॅक्शन अशी नसतेच काही, प्रत्येकावर सेपरेट फोकस आणि प्रत्येकाला शाहरुख बनायचा मौका यात देतात.

असो, पाणी तर पोटापाण्यासाठी घालावे लागतेच, पण मालिका चांगली आहे/होती..

सुरुवातीला माझा चहाचा टाईम त्या मालिकेनुसार अ‍ॅडजस्ट करून ती एक बघितली जायची. हिरो हिरोईनींचे गैरसमज संपून जुळले आणि माझ्यासाठी कथा तिथेच संपली. त्यानंतर देखील त्याच्या वडिलांची कथा शिल्लक होती मात्र ती डेलीसोप पॅटर्नमध्ये ताणून ड्रामा स्टाईलमध्ये बघण्यात मला रस नव्हता. आधीचा रोमँटीक भाग म्हणून थोडेफार ताणल्याचे काही वाटायचे नाही.

पण काल कित्येक दिवसांनी एक भाग पाहिला, दूरचा काका-मामा प्रॉपर्टीचा झोल, वाढलेले दोनेक कॅरेक्टर, मां का श्राद्ध आणि आज हा धागा पहिला म्हणून बोल्लो जरा काहीतरी टंकून जाऊया आणि हलके होऊया Happy

तो अचानक येऊन थडकल्यामुळे सगळे अचंबित झाले आहेत. आणि वेगवेगळ्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट करत आहेत.<<<< आईशप्पथ!!! खोटं नाय... आमच्याकडे सेम असा किस्सा घडला होता. आम्ही सुट्टीसाठी धारवाडला गेलो होतो तेव्हा एक चुलतकाका धारवाडला आमच्याकडे बायकामुलांसोबत रहायला आला. (घर मोठं असल्याने पाहुणे येणे हे काही फार मोठं आक्रित नव्हतं) चारेक दिवसांनी कोर्टाकडून वडलांना आणि काकाला नोटिस आली या भावाने सर्वच वारसाहकाविरोधात कोर्टात केस दाखल केल्याची. आज्जीचा तेव्हाचा चेहरा आठवून पण मजा वाट्ते. ती कोर्ट केस सुमारे बावीस वर्षं झाली चालू आहे. आजोबा गेले, आज्जी गेली. तो काकादेखील गेला. गाव ऑलरेडी पाण्याखाली गेल. पप्पा आणि काकांनी प्रॉपर्टीवरचा हक्क सोडला. आता इतर चुलत भावंडे मिळून कोर्ट कोर्ट खेळत आहेत.अद्यापही धारवाडमध्ये केस असली काकाच्या मुलांच मुक्काम काकाकडेच.

परवाचा एप्सिसोड बघताना आम्हा भावंडांचा जो ग्रूप आहे तिथेएकमेकाट्यांव ट्यांव मेसेज टाकायला लागले होते!!!!

<< आता इतर चुलत भावंडे मिळून कोर्ट कोर्ट खेळत आहेत.अद्यापही धारवाडमध्ये केस असली....>> ह्या सिरियलवर इथं आतां नाय लिवणार असं आधीच सांगितलंय. पन 'कोर्ट' कोर्ट' खेळात धारवाडच काय , जगात कुनीबी कोकणाला चॅलेंज करायचं काम नाय ! कोकणाच्या अस्मितेलाच हात घालताय, म्हणून मला तोंड खुपसायला भाग पाडताय !!! Wink

न 'कोर्ट' कोर्ट' खेळात धारवाडच काय , जगात कुनीबी कोकणाला चॅलेंज करायचं काम नाय>>> हे मात्र मी बिनशर्त मान्य करते. अतिशयोक्ती नाही, पण कित्येक केसेस पाहिल्या आहेत. Happy

भाऊ Proud

Pages