प्रिय उद्योजकांनो,
आपण सगळे वेगवेगळे उद्योग करणारे, करु इच्छिणारे..
काय विकायचे? कसे विकायचे? मार्केटिंग कसे करायचे? पण विकत कोण घेणार? किंमत काय ठरवायची? अश्या प्रश्नांवर चिकार चर्चा आणि विचारमंथन केले आहे. या विचारमंथनातुन जो तो आपल्या आवडीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे उद्योग सुरु करतो. हळूहळू उद्योग वाढू लागतो. आणि आपल्यापुढे एक नवीन प्रश्न ऐरणीवर येतो. तो म्हणजे केलेल्या कामाचे, दिलेल्या सेवेचे किंवा उत्पाद्नचे पैसे वसुल करणे.
स्वानुभवातुन सांगते कि आपण देत असलेले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आणि त्यांचे मार्केटिंग यांच्याइतकाच ती दिल्यानंतर त्याचे पैसे रिकव्हर करणे हा एक महत्वाचा (बरेचदा तापदायक) अनुभव असू शकतो. लहान/ नवीन उद्योजकांसाठी तर अधिकच.
यासंदर्भात माझी काही निरीक्षणे:
१. भारतात तरी प्रत्येक कामाचे/ सर्व्हिसचे काम सुरु करण्याआधी काँट्रॅ़क्ट होतेच असे नाही. त्यामुळे क्लाएंट पेमेंट कधी देईल हे निश्चित नसते.
२. उद्योग नवीन असतांना अॅडव्हान्स रकमेचा आग्रह धरता येतोच असे नाही. (इन फॅक्ट बहुतेक वेळा धरता येत नाही).
३. काही वेळेला क्लाएंट पैसे बुडवणारा असतोच असे नाही. तो पैसे देणार याची खात्री आपल्यालाही असते. पण "कधी?" या प्रश्नाचे उत्तर आपल्यापाशी नसते. अश्या वेळी गोड बोलुन त्यांना वरचेवर रिमांईंड करणे याउप्पर आपल्या हातात फार काही नसते.
४. काही (वर सांगितले आहेत तसे) क्लाएंट्स पैसे देतातही. पण ते इतक्या उशीरा देतात कि उशीरा मिळालेल्या न्यायाप्रमाणे त्याचा उपयोग होत नाही. उलट हे पैसे वेळीच मिळाले असते आणि गुंतवले असते तर नुसत्या एफ्डीवर किती इंटरेस्ट मिळाला असता या कल्पनेने डोक्याची मंडई होते.
५. रेप्युटेड क्लाएंट्सच्या बाबतीत रिमांईंड करतांनाही खुप कठोर भाषा वापरुन चालत नाही.
६. प्रोफेशनल कंसल्टंसीच्या क्षेत्रात घरच्या अडचणी क्लाएंटला सांगता येत नाहीत. काही वेळेला "यापेक्षा आपली कामवाली सुखी. घरचे प्रॉब्लेम्स सांगुन आपल्याकडून अॅडव्हान्स पैसे नेते" असे वाटून जाते.
७. बहुतेक वेळा बहुतेक जण किमान आपल्या रॉ मटेरीअलचे (टॅक्स कन्सल्टंट, सीए किंवा सीएसच्या केसमध्ये आपण क्लाएंटच्या वतीने जेवढे पैसे सरकारी फी भरणार असू तेवढेतरी) अॅडव्हान्स घेतो. पण शेवटी आपल्या कामाचा मोबदला (बिलातला प्रोफेशनल फी वाला हिस्सा) अडकुन राहातोच ना.
८. वर सांगितल्याप्रमाणे आपण क्लाएंटच्या वतीने जेवढे पैसे सरकारी फी भरणार असू तेवढेतरी अॅडव्हान्स घेतोच. पण बरेच वेळेला मोठे क्लाएंट्स सगळे बील एकदम देऊ म्हणतात.
९. काही वेळेला क्लाएंटची डेडलाईन असते. म्हणजे आपण अॅडव्हान्स पैश्यासाठी थांबलो तर डेडलाईन गेल्याने क्लाएंटला हेवी पेनल्टी लागु शकते. अश्या वेळेला प्रोफेशनल स्वतःचे पैसे भरुन ती पेनल्टी टाळण्याचा नक्की प्रयत्न करतो.
१०.कोणावर येऊ नये अशी वेळ म्हणजे क्लाएंट सरळ टाळाटाळ करतो किंवा काखा वर करतो. अश्या लोकांना वठणीवर आणायला बेकायदेशीर मार्ग वापरावे अशी बरेचदा इच्छा होते पण आपल्याकडून तो मार्ग अवलंबला जात नाही हे आपल्यालाही मनात ठाऊक असते.
या धाग्यावर काय चर्चा होणे अपेक्षित आहे?
- तुमची बिल रिकव्हरीच्या संदर्भात काय निरिक्षणे आहेत?
- बिल रिकव्हरी योग्यप्रकारे होण्यासाठी तुम्ही काय करता?
- बिझनेस/ कंसल्टंसी नवी असतांना तुम्ही काय केले होते?
- आज तुम्ही जे उपाय करत आहात तेच तुम्ही सुरुवातीला करु शकत होतात का?
- भारतातला कायदा यासंदर्भात काय सांगतो?
- कायदा जे सांगतो त्याची मदत घेणे प्रॅक्टिकली कितपत शक्य असते? आणि कशी?
- भारताव्यतिरीक्त अन्य देशातही अशी परीस्थिती उद्भवते का?
- भारताबाहेर आधी संपूर्ण पैसे घेणे किंवा नंतर "स्यु" करणे (कोर्टात खेचणे) याव्यतिरीक्त काय करता येते?
- या विषयावर तुमच्याकडे लिहिण्यासारखे काहीही असले तर आवर्जुन शेअर करावे.
कृपया या धाग्यावर वैयक्तीक देणी-घेणी आणि त्यांची वसुली याबाबत चर्चा करू नये. शक्यतो फक्त उद्योग क्षेत्रातील/ प्रोफेशन क्षेत्रातील बिल रिकव्हरीशी संबंधित चर्चा अपेक्षित आहे.
पियू, काँट्रॅक्ट करताना
पियू, काँट्रॅक्ट करताना 'टर्म्स ऑफ पेमेंट' हा क्लॉज अतिमहत्त्वाचा बनवणे. अॅडव्हान्स नाही घेतला तरी कामाचे टप्पे आणि त्यानुसार पैसे द्यायला हवेत हे कामाची बोलणी करताना आणि काँट्रॅक्ट करताना क्लायंटला ठसवून सांगणे गरजेचे आहे. काँट्रॅक्टच नाही केले तर पैसे वसूल करणे हे पूर्णपणे तुमचे कौशल्य ठरते. अर्थात्, काँट्रॅक्ट न करण्याचे तोटेही जास्त आहेत, त्यामुळे काँट्रॅक्ट म्हणजे कामाची लिखापढी तरी करणे अतिआवश्यक आहे. तोंडी बोलणी नकोत, किमान ईमेलवर तरी मुख्य आणि महत्त्वाचे मुद्दे असावेत.
देणी/ बिले/ टॅक्स जर वेळेवर
देणी/ बिले/ टॅक्स जर वेळेवर दिले नाही तर मला चैन पडत नाही. कधी एकदा देणी देउन टाकतोय अस होत.होम लोन फेडल्यावर मला सुखाची झोप लागली होती.
अॅडव्हान्स नाही घेतला तरी
अॅडव्हान्स नाही घेतला तरी कामाचे टप्पे आणि त्यानुसार पैसे द्यायला हवेत हे कामाची बोलणी करताना आणि काँट्रॅक्ट करताना क्लायंटला ठसवून सांगणे गरजेचे आहे.
>> मंजुडी, चांगला मुद्दा..
पण समजा एखादे काम असे ट्प्प्या-ट्प्प्यात करण्यासारखे नसले तर?
त्यामुळे काँट्रॅक्ट म्हणजे कामाची लिखापढी तरी करणे अतिआवश्यक आहे. तोंडी बोलणी नकोत, किमान ईमेलवर तरी मुख्य आणि महत्त्वाचे मुद्दे असावेत.
>> हाही एक चांगला मुद्दा. पण लिखापढी (इमेलवर) केलेली असली तरी बिल रिकव्हर होईलच असे नाही.
पण लिखापढी (इमेलवर) केलेली
पण लिखापढी (इमेलवर) केलेली असली तरी बिल रिकव्हर होईलच असे नाही. >>> त्यासाठी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावावे लागते.
न थकता न कंटाळता रिमाईंडर पाठवत राहणे
एका ठराविक कालावधीनंतर 'आऊटस्टँडींग स्टेटमेंट' पाठवणे
पुन्हा एका ठराविक कालावधीनंतर सौम्यपणे शब्द जपून वापरत कान उघाडणी करणे
ह्याचा उपयोग नाही झाला तर व्याज लावून वाढलेल्या रकमेचे स्टेटमेंट पाठवणे (किती % व्याज लावणार याचा उल्लेख काँट्रॅक्टमधे मधाचं बोट लावून करावा.)
अगदी शेवटची पायरी म्हणजे केस करणे. शिवाय इन्स्टिट्युटमधे रेकमेंड करणार नाही अशी धमकी देणे.
मला सुरवातीला एक वाईट अनुभव
मला सुरवातीला एक वाईट अनुभव आला होता. एका 'ओळख नसलेल्या' क्लायंट्ने चार-पाच वर्षाचे डॉक्यूमेन्ट्स तयार करून घेतले आणि परत तोंड दाखवले नाही.
सध्या मी ५० टक्के अॅड्व्हान्स घेतो आणि बाकीचे नंतर घेतो. कामाच्या दरम्यान त्याच्या मानसिकतेचा अंदाज येतो. पण तरी पुण्यात परिस्थिती खूप चांगली आहे. असे मी ऐकले आहे की कोल्हापुरात तर केलेल्या कामाचे पैसे देणे म्हणजे उपकार केले असे समजतात

माझा मोठा क्लायंट वर्ग आर्मीचा असल्याने तशी मला काळजी नाही. ते सहसा पैसे चुकवत नाहीत. पण जर काही कारणाने एखादा चेक बाउन्स झाला तर पैसे यायला सहा महिने जातात.
सध्या मी ५० टक्के
सध्या मी ५० टक्के अॅड्व्हान्स घेतो आणि बाकीचे नंतर घेतो.
>> आम्ही सरकारी फी संपूर्ण घेतो. आता बहुतेक प्रोफेशनल फी सुद्धा ५०% तरी घ्यायला हवी असं वाटायला लागलं आहे.
तर पैसे यायला सहा महिने जातात.
>> सहा महिने काहीच नाही. आमच्याकडे वर्षभर तुंबलेलं सुद्धा प्रकरण आहे.
पियू, आपल्या व्यवसायासंबंधात
पियू,
आपल्या व्यवसायासंबंधात विचारले आहे का ?
आपल्याला क्लायंटच्या कागदपत्रांवर लिएन ( हक्क ) असतो. पैसे दिल्याशिवाय सही केलेली मूळ कागदपत्रे देऊ नयेत. तसेच एखादा नवा क्लायंट घेताना त्याचे रेफरन्सेस अवश्य बघावेत. ज्या कुणाच्या ओळखीने तो आला
असेल त्यालाही आठवण करून देत रहावी. थोडक्यात एखादा हमीदार असावा.
आधीचे पैसे दिले नसतील तर पुढचे काम करण्यास रस दाखवू नये / विलंब करावा. आपल्या रिमांईडर्सना जी वागणूक दिली असेल तीच वागणूक त्याच्या फोनना द्यावी. अर्थात हे सगळे लेखी, किमान ईमेल्स ने करावे.
पहिल्यांदा व्यवसायात जम बसवताना असे अनुभव येतातच. पण एकदा जम बसला कि नवीन माणसे सहज जोखता येतात.
पियू, आपल्या व्यवसायासंबंधात
पियू,
आपल्या व्यवसायासंबंधात विचारले आहे का ?
>> हि समस्या इथल्या अनेकांना भेडसावत असेल असे समजुन जनरल धागा काढला आहे. अर्थात माझ्या व्यवसायासंबंधी स्पेसिफिक सल्ले मिळाले तर मला हवेच आहेत.
पहिल्यांदा व्यवसायात जम बसवताना असे अनुभव येतातच. पण एकदा जम बसला कि नवीन माणसे सहज जोखता येतात.
>> होप सो. थँक्स.
एक क्लेशकारक गोष्ट म्हणजे
एक क्लेशकारक गोष्ट म्हणजे आता स्पर्धा वाढल्याने एका व्यावसायिकाने नाकारलेला क्लायंट, दुसरा सहज स्वीकारतो. व्यावसायिक नीतीमत्तेला आवश्यक असलेली संमती घेतली जातेच असे नाही. त्यामूळे उत्तम प्रकारे सेवा देणे एवढेच आपल्या हातात राहते. पैसा नाही मिळाला तरी अनुभव मिळतोच.
आणखी एक उपाय करण्याजोगा आहे. त्या क्लायंटच्या फाईलवरच अगदी वर बाकी असलेल्या रकमेचा तपशील लिहावा. जर तो क्लायंट ऑफिसात येणार असेल तर फाईल उघडल्या उघडल्या तो दिसला पाहिजे. मदतनीस फाईल घेऊन जाणार असेल तरी तसेच करावे. आणि इतर कुठलेही बोलणे सुरु करण्यापुर्वी त्याकडे निर्देश करावा. ( हि पद्धत जुनी झाली पण आमच्या ऑफिसात, म्हणजे मी ज्यावेळी आर्टिकलशिप करत होतो त्या काळात, अशी लिस्ट भिंतीवरच लावलेली असायची. )
बॅलन्स कन्फर्मेशन्स अवश्य पाठवावीत.
पैश्याची रिकव्हरी हा आमच्या
पैश्याची रिकव्हरी हा आमच्या बिझनेस मधे एक मोठा प्रॉब्लेम आहे.. जुन्या क्लायेंटस बाबतीत फार काही करता येत नाही... शांतपणे वारंवार फोन करुन त्यांना आठवण करुन देणे. मेल वरुन स्टेटमेंट पाठवणे, प्रत्यक्षात स्टेटमेंट देणे, हे सरळ साधे उपाय झाले..
नवीन कस्टमरच्या बाबतीत ५०% अॅडव्हान्स.. बाकीचे पैसे डिलिव्हरी घेऊन जाताना.. पैसे न दिल्यास डिलिव्हरी मिळणार नाही.. असा सरळ नियम चालू केला आहे..
आमच्याकडे दोन प्रकारचे कस्टमर असतात.. १. माल आणि सेवा दोन्ही हवे असणारे.. २. फक्त सेवा हवे असणारे.
पहिल्या प्रकारातील लोकांसाठी वर लिहिलेला नियम स्ट्री़टली लावलाच जातो. कारण त्यात त्यांच्याकडून अॅडव्हान्स आल्याशिवाय माल मागवला जात नाही परिणामी त्यांच्या वेळेत त्यांना माल मिळत नाही.. त्यामुळे ते पैसे मिळतातच..
दुसर्या प्रकारातील लोकांसाठी वरचा नियम थोडासा शिथील असतो.. कारण त्यांनी त्यांचा माल त्यावर पुढचे काम करण्यासाठी आमच्याकडे दिलेला असतो.. त्यामुळे त्यांच्या कडून सगळे पेमेंट माल घेऊन जातानाच घेतो.
काही अतरंगी कस्टमर असतातच जे लवकर पैसे देत नाहीत.. त्यांच्यासाठी.. आधीचे पेमेंट केलेत तरच पुढचे काम होईल असाच पवित्रा घ्यावा लागतो..
समोरचे व्यक्ती कशी आहे कोणाच्या ओळखीने आलेली आहे.. त्यांचे बाजारातले नाव कितपत आहे.. त्यावर पण बर्याचदा पेमेंट टर्म्स ठरवल्या जातात...
आमच्या व्यवसायात पुण्यात काम करणारे तसे कमी जण आहेत. त्यामुळे एखादा जर जास्तच डिफॉल्टर असेल तर त्याची कर्णोपकर्णी बदनामी होतच असते आणि तसे झाले की मग त्याला कुठूनच वेळेवर काम मिळणे बंद होऊ शकते.. त्यामुळे शक्यतो तशी रिस्क अजून तरी कोणी घेतलेला कस्टमर सापडलेला नाही..
दुसरे म्हणजे आपले काम
दुसरे म्हणजे आपले काम झाल्यावर क्लायंटकडून लेखी पोचपावती घेणे तसेच त्याचवेळी बिलाच्या एका कॉपीवरदेखील सही करुन घेणे. पुढे ही कागदपत्रे फार उपयोगी पडतात.
एक क्लेशकारक गोष्ट म्हणजे आता
एक क्लेशकारक गोष्ट म्हणजे आता स्पर्धा वाढल्याने एका व्यावसायिकाने नाकारलेला क्लायंट, दुसरा सहज स्वीकारतो. व्यावसायिक नीतीमत्तेला आवश्यक असलेली संमती घेतली जातेच असे नाही. त्यामूळे उत्तम प्रकारे सेवा देणे एवढेच आपल्या हातात राहते. पैसा नाही मिळाला तरी अनुभव मिळतोच.
>> खरंय दिनेशदा.
आमच्या ऑफिसात, म्हणजे मी ज्यावेळी आर्टिकलशिप करत होतो त्या काळात, अशी लिस्ट भिंतीवरच लावलेली असायची.
>> आमच्याकडे वॉक-इन क्लाएंट कमी आहे. त्यामुळे अगदी दर्शनी भिंतीवर नावे आणि थकबाकी लिहिली तरी काही उपयोग नाही.
पैश्याची रिकव्हरी हा आमच्या बिझनेस मधे एक मोठा प्रॉब्लेम आहे.
>> हिम्सकूल.. चला म्हणजे या धाग्यावर आलेल्या सल्ल्यांचा तुम्हालाही उपयोग होईल.
त्यामुळे शक्यतो तशी रिस्क अजून तरी कोणी घेतलेला कस्टमर सापडलेला नाही.
>> भाग्यवान आहात. आमच्याकडे एक चीप सीए आला होता. त्याच्या क्लाएंटची कंपनी सुरु करुन घेतली. आणि नंतर प्रोफेशनल फी अगदी नगण्य दिली. काय तर म्हणे त्याने क्लाएंट आणला त्यामुळे त्याचा शेअर. बरे शेअर घेण्याविषयीही काही नाही. आजकाल 'रेफरल्स' हि कंसेप्ट आली आहेच. पण त्याने याची काहीच पुर्वकल्पना दिली नव्हती. त्याला तसे सांगितल्यावर म्हणाला कि "माझा शेअर असतोच. त्यात काय सांगायचे?" आधीच त्याच्याकडून पुढील कामे येण्याच्या दृष्टीने आम्ही आधीच कमी कोट केले होते. त्यामुळे खुपच मनस्ताप झाला. अजुनही आम्ही त्याला फोन करतो. तो सरळ उडवाउडवीची उत्तरे देतो जसे काही एखाद्या भिकार्याने भिक मागायला फोन केला आहे.
(१) ५०% advance fee चेक
(१) ५०% advance fee चेक वठल्याशिवाय आम्ही काम सुरुच करत नाही;
(२) OPE कधीच स्वतः करत नाही त्याची पूर्ण रक्कम जमा करायला सांगतो. Client च्या govt fees, stamp duties etc तर कधीच भरू नयेत ;
(३) जर कोणी फी देत नसेल तर बरेचदा एखादी लिगल नोटीस दिली की पैसे जमा होतात.
व्यवसाय अगदीच नवीन असेल तर (१) शक्य होत नाही पण (२) आणि (३) करता येऊ शकते. वर म्हणल्याप्रमाणे payment terms खूप व्यवस्थित document कराव्यात. Advisory / opinion related काम असेल तर बरेचदा क्लायंटला सही केलेले ओपिनिअन हवे असते. ओपिनिअन फायनल झाले की सहीवाली प्रत देण्याआधी पैसे घ्यायचे.
दवाखाना, डोक्टर ह्यानी लिवले
दवाखाना, डोक्टर ह्यानी लिवले तर चालेल का?
मी ओपीडीत रेट लिस्ट लावली होती, त्यानुसार पैसे घेउन सर्विस दिली जात होती
तुम्ही रेट लिस्ट लावलीत
तुम्ही रेट लिस्ट लावलीत म्हणजे काय?
रेट लिस्ट लावणं कंपल्सरीच आहे दवाखान्यात.
हो. पण तशी परंपरा आमच्या
हो. पण तशी परंपरा आमच्या इलाक्यात नव्हती
हो. आमच्या इथे आय एम ए ठरवतं
हो.
आमच्या इथे आय एम ए ठरवतं कुठल्या गोष्टीला किती पैसे ते.
आणि त्याप्रमाणे अॅक्रिलीक प्लेटस बनवून देतं.
तरिही लोक पैशासाठी किरकिर करतच असतात.
त्यातही गोरगरीब चूपचाप पैसे देतात , पैसेवालेच ताणत बसतात असा अनुभव आहे.
हो. म्हणुनच तर मी रेट
हो. म्हणुनच तर मी रेट डिस्प्ले केले होते.
अगदी सेम याच फेजमधुन गेलो
अगदी सेम याच फेजमधुन गेलो आहे, जात आहे आणि इथुन पुढेदेखिल जात राहिन याबद्दल प्रचंड खात्री आहे. कारण पैसे मागायला जमत नाही.
अगदी शेवटची नोकरी सोडली तेथे २५-३० हजार असेच राहुन गेलेत. अगदी १.५ वर्षापुर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहित. पण काम करताना खिशातले गेले नाहित. त्यामुळे तसे नुकसान झाले असे समजत नाही. आणि कामासाठी जो वेळ जातो त्याबद्दल नविन काहितरी शिकायला मिळाले येवढेच समाधान. परत तसेच काम मिळाले तर झाल्या कामाचा काहितरी फायदा होइल. आणि आमच्या धंद्यात क्लायंट देखिल आम्हाला शिकवतच असतो. त्यामुळे एखादे काम फुकटच केले गेले असे वाटत नाही. (आजकाल कॉलेजच्या फियाच लाखात असतात
)
अजुन एक. त्या क्लायंटला पुढचे काम असेल तरच अगोदरच्या कामाचे बर्यापैकि पैसे मिळतात.
आणि तसेही नविन डॉ. केसपेपरचे (अॅडव्हान्स) पैसे कमी घेतो / किंवा घेतच नाही. सध्यातरी आम्ही दुसर्या कॅटेगरीतले.
उपायः
पैसे मिळायचे चान्सेस कमी आहे हे लक्षात आले कि प्रायोरटी / प्रेफरन्स चेंज करुन टाकतो, कि समोरच्याला लक्षात येइल.
इथले उपाय वाचुन मला तरी खुपच फायदा होइल. धन्यवाद.
सीए वैगेरेंकडे येणार्या
सीए वैगेरेंकडे येणार्या लोकांना मार्केटमध्ये आपले नाव खराब होणे या गोष्टीची जाम भिती असते.
जर आपला जनसंपर्क दांडगा असेल आणि क्लाएंटच्या चांगल्या ओळखिच्या लोकांची नावे आपण बोलता बोलता संभाषाणात पेरू शकलो तर लाजेकाजेस्तव का होईना लोक बील देतील.
आमच्यासारख्या छोट्या शहरात हे सहज शक्य आहे कारण एवरीबडी नोज एवरीबडी.
पुण्यामुंबईचं माहिती नाही.
आत्तापर्यंत सीए चा मला आणि आमचा सीएला अनुभव चांगला आहे.

एका सुविचाराचे स्वैर मराठी
एका सुविचाराचे स्वैर मराठी भाषांतर...
तूम्ही ऊधार मागता, मी देतो.... मग मी वेडा होतो.
तूम्ही ऊधार मागता, मी देत नाही... मग तूम्ही वेडे होता.
तूम्ही वेडे झालात तर माझे काही बिघडत नाही...
अगदी बेशक माझ्या नावाने लावा हा सुविचार
( त्या गांधीबाबाचा पण लावा, ग्राहक म्हणजे टिंब टींब असतो,,, ब्ला ब्ला पण स्वत:च्या जबाबदारीवर )
तुम्ही वेडे झालात तर माझे
तुम्ही वेडे झालात तर माझे काही बिघडत नाही..

सही आहे.
>>हो. म्हणुनच तर मी रेट
>>हो. म्हणुनच तर मी रेट डिस्प्ले केले होते. <<
रीयली? वाणी, हजाम, उडीपीच्या दुकानांसारख?
हो राज. मेडिकल प्रॅक्टीस
हो राज.
मेडिकल प्रॅक्टीस एस्टॅब्लिशमेंट अॅक्टनुसार हे कंपल्सरी आहे.
रेट डिस्प्ले करावाच लागतो. इतकेच नाही तर त्याची एक प्रत ऑथरायजिंग ऑफिसला सबमिट करावी लागते.
धीस इज बुशी. अरे काय
धीस इज बुशी. अरे काय प्रोफेशनल डिग्नीटी आहे कि नाहि?
अहो, एवढं काही नाही
अहो, एवढं काही नाही त्यात.
उलट आम्हाला बरंच आहे.
सरकारी कायदा आहे तो. डिग्निटी
सरकारी कायदा आहे तो. डिग्निटी गेली गण्याच्या गावाला.
त्यामुळे साधी दाढी. क्रीम दाढी. अशी पाटी लावावी लागते त्यांच्या गावाला.
मी पत्रकार, पोलिस अन गावगुंड पुढारी यांना फुकट तपासतो. हे लोक पुढे रिकव्हरी एजंट म्हणून कामी येतात. बाकी चार्जेस मधे तपासणी फी बरोबर वसूल करता येते.
र् रेट चार्ट लिवला तर
र् रेट चार्ट लिवला तर डिग्निटी कशी काय कम होrt ए बुवा
हाय फाय हाटेलीत किम्मत
हाय फाय हाटेलीत किम्मत लिवल्याली नसते बा
(No subject)
Pages