लग्न हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा. मायबोलीवर सामाजिक समस्यांवरच्या धाग्यावर लग्नाबद्दल वाचायला मिळाल आणि मग वाटल कि आपला अनुभव इथे का टाकू नये!
मी सध्या ३३ वर्षांचा विवाहित असून पुणेस्थित एका IT कंपनीत काम करतो. मी पुणेकरच ! एका सर्वसामान्य घरातून लहानाचा मोठा झालो. करियरमध्ये सुरुवातीला खूप कष्ट करून बरेच चढउतार होऊन शेवटी आयटी मधे स्थिरवलो आणि लग्नासाठी नाव नोन्दवल्यावर यथावकाश मुलींची स्थळ येऊ लागली. मुलांच्या शाळेत असल्याने आधी शाळा नि नंतर कॉलेज मधे देखील माझया ग्रूप मधे फक्त मुलेच होती. पुढे करियर ची गाडी स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात आपल्याला मुलगी कशी हवी वगैरे विचार कधीच केले नाहीत. पण जसजस चहा पोहे सुरू झले तसा मी सीरीयस झालो आणि एक अनामिक भीतीही वाटू लागली. एक-दोन भेटिंवर संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेण फार जिकीरीच वाटू लागल आणि मी उगाचच अतिसावध आणि पर्यायाने अतिचिकित्सकपणे वागू लागलो. केवळ भीतीपोटी मीअनेक चांगली स्थळ नाकारली आणि काही नकारही पाचवले. त्याजोडीला कधी मुलगी आवडली तरी पत्रिका जुळायची नाही तर कुठे गुण नाहीतर नाड. नंतर बरेच महिने लग्नाचे योग नाहीत म्हणून गेले. अस वर्ष-दीड वर्ष निघून गेल आणि हळूहळू मला frustration येऊ लागल आणि सय्यम सुटू लागला. शेवटी घरातूनही दबाव यायला लागला, मित्रदेखील टिंगल करू लागले. आता मोजून काही ठराविक मुली बघ आणि त्यातून पसंत कर अस जवळचे नातेवाईक म्हणू लागले. अशातच शेवटी मी एक मुलगी पहिली, तिला एकदाच भेटलो आणि काहीश्या घाईनेच पसंती दिली आणि इथेच चुकलो.
लग्न ठरल्यावर जेव्हा आम्ही पहिल्यांदाच बाहेर फिरायला गेलो तेव्हा मुलगी मला जास्त जाड वाटली. मुलगी दाखवायच्या कार्यक्रमाच्या वेळी साडीमुळे मुलगी जाड आहे ते समजल नव्हत आणि नंतरच्या भेटीच्यावेळी माझ्या लक्षत आल नाही. अर्थात तो माझ्यादृष्टीने फार महत्वाचा मुद्दा नव्हता. पण मी जसजसा तिच्याशी बोलत गेलो आणि आमचा संवाद होऊ लगाल तसतस माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. माझ्या लक्षात आल की हिची आणि आपली maturity लेव्हल अजिबात मॅच होत नाही. इतर अनेक लहानसहान गोष्टींमधला तिचं अज्ञान आता मला जाणवत होतो. एक लहानस उदाहरण द्यायचं झाल तर माझ्या होऊ घातलेल्या पत्नीला पु ल देशपांडे यांची पुस्तक सुद्धा माहिती नव्हती. अशा इतर अनेक लहान सहन बाबी पहिल्या 5-6 दिवसातच उअघडकीस आल्या. अशातच एक दिवस मला तिच्या चेहर्यावर आधी लक्षात न आलेले काही डाग दिसले नि मी बाबरून गेलो. मुलीचं दिसणं हा फार महत्वाचा भाग नसला तरी माझ्याही काही कमीतकमी अपेक्षा होत्या. लग्न ठरायच्या वेळचा 1-2 भेटिंमधे बराचसा भासच निर्माण केला गेला होता अस वाटू लगाल. एकूणच मुलीच्या निवडीच्या बाबतीत मी घोड चूक केली होती हे आता माझ्या ध्यानात आल होत. मी हळूहळू डिप्रेशन मधे जाऊ लागलो आणि मला कशातच रस वाटेना. तशातच काही घरगुती अडचणींमुळे लग्न ताबडतोब एका महिन्यात करायाच ठरलं आणि माझ्या काळजात धस्स झाल. इकडे माझ्या घरच्यांना ह्या सगळ्याबद्दल माहिती असण्याचा संबंधच नव्हता कारण त्याच्या मते मी आनंदात होतो. माझी उत्साही बहीण दादाच लग्न म्हणून आनंदात होती तर आई बाबा सुनेच्या स्वागतासाठी सज्ज होते. वय वर्ष ८० असलेली माझी लाडकी आजी डोळे मिटण्याआधी नातसून बघायला मिळणार म्हणून समाधानात होती. जवळच्या नातेवाईकांमधे मी खूप लाडका आणि त्यामुळे त्यांच्याही उत्साहाला उधाण आल होत. पण ह्या सगळ्यात मी मात्र कुठेही नव्हतो...मी फक्त दिसागणिक सग्यासोयर्यांच्या इच्छा अपेक्षानच्या ओझ्याखाली दबला जात होतो. पुढच्या 2 दिवसात बैठक पण झाली आणि मग प्रचंड दडपण आल. अनेक ओळखीचे लाग्नावरून माझी चेष्टा करायचे त्याच्या गुदगुल्या होण सोडाच पण अक्षर्ष: नको नको व्हायच. मला प्रचंड नैराश्य आल.
मला माझया होणार्या बायाकोबरोबर बाहेर फिरायला जाणही नकोस वाटू लगाल. शेवटी न राहवून मी माझ्या एका मित्राला हे सगळ बोललो. त्याने मला हे लग्न मोडण्याचा उचित सल्ला दिला आणि त्यात काहीही गैर नाही हेही समजावलं. पण माझ्यासारख्या conservative कुटुंबात वाढलेल्या मुलासाठी हे खूप अवघड होत. त्या रात्री मी रात्रभर मनाची तयारी केली. मला तो दिवस आजही आठवतोय. दुसर्या दिवशी companytun तब्बेतीच कारण देऊन लवकर घरी परत आलो. घरी आल्यावर सगळ्याना समोर बसवून कसबस माझया मनातल बोललो. घरच्यांना हा अनपेक्षित धक्काच होता. आज्जी डोक धरून बसली आणि आई रडू लागली, वडिलांना office मधून लवकर बोलावून घेतलं. आता घरचेही अवघडले कारण जरी लग्न ठरून फक्त १० दिवसच झाले होते तरी महिन्याभरात लग्न उरकायच असल्याने गोष्टी बर्याच पुढे गेल्या होत्या आणि लग्नाची सर्व बोलणी देखील झाली होती. त्यामुळे सगळ्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसच मुलीच्या वडिलांना BPचा त्रास आहे तेव्हा त्याना काय धक्का बसेल वगैरे भीती घातली. घरच्यानी ओळखीच्या कोण्या एका महाराजांना फोन करून रडत रडत घडला प्रसंग सांगितला. त्यानी फोनवरून समजूत काढून सर्व काही ठीक होईल काही काळजी करू नका असा सल्ला दिला. आता माझाही सुरुवातीचा जोर आपोआप थोडा कमी झाला सगळा गुंता होऊन मी गप्प बसलो मग घरच्यानी मझीच समजूत काढली आणि तो विषय तिथेच संपला. माझच लग्न मोडण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न फसला. त्या दिवसानंतर रोज अगदी आजपर्यंत मी स्वतःला त्यासाठी शिव्या शाप देतो. जर मी लावून धरल असत तर तेव्हाच माझ ठरलेलं लग्न मोडून पुढचा अनर्थ टळला असता.
हा प्रसंग घडून गेला आणि मी मात्र आतून जळत राहिलो. कुठेतरी लांब पळून जवस वाटू लागल पण तेवढीहि धमक दाखवू शकलो नाही. टिकटिक करत काटा पुढे सरकत होता आणि पुढच्या १०-१२ दिवसात मी बोहल्यावर चढलो सुद्धा. म्हणता म्हणता माझ लग्नही झाल आणि मग हळूहळू उरलेल्या आशा अपेक्षनचि शकल उडाली. माझया बायकोला साधा हिशेबही चटकन करता येत नाही आणि चार चौघात काय कस बोलाव वागाव तेही काळत नव्हत. ह्या सगळ्या मधे मे पुरता फसलो होतो आणि माझया हाती काहीही पडल नव्हत. 21 व्या शतकात स्वत:च्या मधुचंद्राला रडणारा मी एकमेव पुरूष असेंन. मी बरेचदा स्वताला सावरण्याचा आणि ह्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. त्यातल्या त्यात माझया दैवाने माझी एकाच बाबतीत आब राखली होती ती म्हणजे माझया बायकोचा स्वभाव वाईट नव्हता. पण नुसत्या चांगल्या स्वभावाने संसारात रस कसा निर्माण होईल. प्रत्येक पुरुषाची स्त्रीकडून त्यापलीकडे अपेक्षा असतात नं! सुरुवातीला तर आमच्या आवडी निवडी एकूणच विचार करायची पातळी वेगवेगळी असल्याने संवाद असा व्हायचाच नाही. नव्या लग्नाचे ते पहिले वर्ष तर जीव घेणार होत. आक्ख आयुष्य अस काढायचय ह्या विचारानेच मी डिप्रेस राहू लागलो आणि इतर जोडप्याना पाहून मला प्रचंड न्यूनगंड निर्माण व्हायचा. मी कोणाच्यात सामील होईनसा झालो आणि एकूणच ते नव्या नवलाईचे दिवस 'मोस्ट हेटेड' ठरले. भरीस भर म्हणजे इतारांकडून कधी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे हिणकस शेरेही आईकायला मिळायचे. पण आता इथून मागे फिरण नव्हत कारण आपल्या समाज मान्यतेचा एक भाग म्हणून मला हे लग्न टिकवाव लागणार होत आणि सगळ आलबेल असल्याचा सूर आळवावा लागणार होता. अशाच डिप्रेशन आणि मानसिक त्रासात मी चुका करतच गेलो आणि कदाचित मुल झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल आणि आपल्या संसाराला वेगळा अर्थ येईल या विचारने मी संततीबाबत डिसिशन घेतला. मुलगा झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस छान गेले पण हळूहळू परत जुन्या जखमा नवीन होऊन वाहू लागल्या. अर्थात ह्या सगळ्यात माझ्या सारखी माझ्या बरोबर माझी बायको देखील होरपळत होती ते मला पक्क ठाऊक होत. माझ्या एका चुकीच्या निर्णयाने त्या बिचारीच आयुष्याच पण मी नुकसान केल होत. कित्येकदा मी स्वताची समजूत काढायचा प्रयत्न केला पण ह्या संसारात मला पहिल्यापासूनच रस नव्हता आणि लग्नानंतरच हे विस्कटलेल सहजीवन हे त्याचच प्रतीक होत.
आज माझा मुलगादेखील 3 वर्षांचा आहे आणि तोच फक्त आम्हाला जोडणारा दुआ आहे. अजूनही कित्येकदा भूतकाळातील गोष्टींचा पश्चात्ताप होतो, खूप तळमळतो आणि सतत स्वताला दोष देतोआणि हे सगळा सोडून देऊन विभक्त होऊन नव्यान सुरूवात करायची तीव्र इच्छा होते. पण तेव्हढ्यपूरतच....परत एकदा उरलासुरला सदसदविवेक जागा होतो आणि विचारतो की "काय रे कुठल्या कारणासाठी विभक्त होणार तू तुझया बायको मुलापासून ?..काय दोष आहे तिचा आणि काय दोष आहे तुझया मुलाचा !!!" बस्स!! इतक्या 2 प्रश्नांनी मी भानावर येतो आणि मुकाटपणे परत आपल्या निरस संसाराकडे वळतो. मी आणि माझी बायको दोघांनीही आता हे आयुष्य accept केलय. माझया बद्दल बोलायच झाल तर जुन्या खोल जखमंवारती काळाने एक पातळसा पापुद्रा धरलाय! आनंदी प्रेमी युगुल पहिली किंवा उत्साहात फिरणारी नवविवाहित जोडपी पहिली की आपण काहीतरी कायमच गमावल्याची तीव्रतेने जाणीव होते. हे नाजूक क्षण आपल्याला कधीच अनुभवता नाही आले आणि येणारपण नाहीत ह्या विचारने मन सुन्न होत आणि शब्दश: डोळ्यात पाणी येत. लग्न हा माझ्यासाठी किती महत्वाचा आणि नाजूक विषय होता पण मझा प्रचंड भ्रमनिरास झाला आणि मनावर एक खोल जखम झाली ती कायमची...अश्वत्थाम्याच्या त्या कपाळावरच्या जखमेसारखी..सतत भळाभळा वाहणारी.
आज इतक्या वर्षांनी मी हे सगळ लिहितोय त्यामागचा एकाच उद्देश आहे की देव न करो आणि कुणी अशा अनुभवातून जावो पण जर का गेले असतील तर त्यांना हे समजावे कि ते काही एकटे नाहीत आणि जे कोणी लग्नाचे आहेत त्यानी हा critical डिसिशन घेताना अधिक सतर्क रहाव आणि जोडीदाराबद्दल नीट माहिती काढावी. सर्वात महत्वाच म्हणजे घाईघाईत किंवा संयम न दाखवता कुठलाही निर्णय घेऊ नका. होणार्या जोडीदाराला ठरवून ४-५ वेळा भेटा तर कधी सहज unplanned casually भेटा. तुमच्या मनाचा आवाज ऐका. दुर्दैवाने जर कोणी लग्नाआधी माझ्यासारख्या अनुभवातून जात असेल तर व्यवस्थित विचार करून प्रत्यक्ष कृती करताना अजिबात गडबडून जाऊ नका. घरातील मोठ्यांना नीट विश्वासात घेऊन त्यांना तुमच्या अपेक्ष मोकळेपणे सांगा. तुमच्या भावी अयुष्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा !!
बाकी माझ्याबद्दल बोलायचं झाल तर हा लेख वाचून मला हव तर मला नाव ठेवा, शिव्या शाप द्या, माझी चेष्टा करा पण फक्त शेवटी एकदा 'लढ' म्हणा ..बस बाकी काही नको
टीप: हा लेख सुशिक्षित समाजातील मुले व मुलीं दोघांसाठी आहे. ह्यामागे आपला समाज किंवा लग्नव्यवस्था ह्यातील त्रुटी दाखवायचा अजिबात उद्देश नाही. आज आपल्याच अवतीभवती पारंपारिक मार्गाने लग्न करून संसारात सुखी झालेली अनेक जोडपी आहेत तेव्हा तो प्रश्नच येत नाही. तरीसुद्धा ह्या व्यवस्थेचा एक भाग बनताना कुणाच नुकसान होऊ नये हाच एकमेव सार्थ हेतू आहे
आपण काय बोलतोय ते कळून बोललात
आपण काय बोलतोय ते कळून बोललात तर बरं होईल <<<
हे वाक्य स्वतंत्ररीत्या आवडलं! कृपया अन्विता ह्यांनी असे समजू नये की हे वाक्य त्यांना बोलले गेल्याचे मला आवडले आहे.
प्रियांका, माझ्यामते बहुधा
प्रियांका,
माझ्यामते बहुधा तुझा गैरसमज झालेला आहे. रसा हा आय डी ८ वर्षे ३६ की ३७ आठवडे जुना आहे, बहुधा तो तुला वाटत आहे तो आय डी नाही.
बेफी तुमचं लिखाण आवडलं मला या
बेफी तुमचं लिखाण आवडलं मला या बीबी वरचं

(No subject)
माझ्यापेक्षा माझं लिखाण
माझ्यापेक्षा माझं लिखाण लोकांना आवडण्याचा अगदी उबग आला आहे आता मला!
(फिनिक्स साहेब - अवांतराबद्दल क्षमस्व, तुम्ही स्वतःच आता अवांतर झाला असलात तरीही)
माझ्यापेक्षा माझं लिखाण
माझ्यापेक्षा माझं लिखाण लोकांना आवडण्याचा अगदी उबग आला आहे आता मला!
(फिनिक्स साहेब - अवांतराबद्दल क्षमस्व, तुम्ही स्वतःच आता अवांतर झाला असलात तरीही)

>>>
माझ्यापेक्षा माझं लिखाण
माझ्यापेक्षा माझं लिखाण लोकांना आवडण्याचा अगदी उबग आला आहे आता मला!
>>.
हे म्हणजे लई भारी. फेसबुक स्टेटस करा. खूप लाईक येतील.
येथील खूप प्रतिसाद निखळ हास्याचे आहेत.
तुम्हा सर्वांच्या
तुम्हा सर्वांच्या भल्या-बुर्या कॉम्मेण्ट्स मिळाल्या ..वाचल्या. हा लेख इथे टाकून कुठलीही सहानुभूती मिळवायचा उद्देश नाही. अन्यथा खूप आधीच हे केल असत. बर्याच लोकांनी अत्यंत कळकळीने मला सल्ले सूचना दिल्या आहेत त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मी तुम्हा सर्व मायबोलीकरांचा मनापासून ऋणी आहे.
बेफी स्वतः केलेला पदार्थ
बेफी स्वतः केलेला पदार्थ स्वतःला जसा आवडत नाही तसंच तुमचंही झालंय. पण याचा अर्थ ते इतरांना आवडू नये असं नाही ना ? असो, पण आता थोडी विश्रांती घ्या मग लिखाणापासून.
आपण काय बोलतोय ते कळून बोललात
आपण काय बोलतोय ते कळून बोललात तर बरं होईल/// तुमच्या प्रतीसादातील वाक्ये तुम्हालाच परत करता येतात हे एक बरे आहे. हे तुम्हालाच जास्त लागू होते .
विषय वेगळा म्हणजे ' जोडीदार निवडण्याबाबत ' आहे दोन्ही कडे . बर इकडे त्यांनी लग्न झाल्यावरचा त्यांचा अनुभव लिहिला आहे. सल्ला सुद्धा मागितला नाहीये . तरी तुमची प्रश्नाची यादी का बरे?
तुम्हाला जसे जोडीदार निवडण्याबाबत कोणाचा सल्ला नको आहे तसाच त्यांनी लेखात लग्न का टिकत नाही किंवा टिकावे या साठी काय करावे वगेरे ह्याबाबत सल्ला हवा आहे असे कुठे लिहिले नाहीये . त्यांचा जोडीदार निवडीबद्दल निर्णय चुकला एवढेच लिहिले आहे म्हणजे त्यांची त्यांच्यामते चूक झाली हे त्यांनी मान्य केले आहे. ह्याचाच अर्थ त्यांचे त्यांना कळले आहे ना. मग कशाला प्रश्न विचारताय ?
तरी बरे सगळ्यांचे सल्ले वाचून त्यांनी धन्यवाद दिले आहेत . निदान सल्ला ऐकून घेण्याचा त्यांच्याकडे पेशन्स आहे म्हणायचं . अमलात आणायचं का नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
दक्षिणा
दक्षिणा
शेवटी काय ठरले ???????????
शेवटी काय ठरले ???????????
बेफिकीर, >> माझ्यापेक्षा माझं
बेफिकीर,
>> माझ्यापेक्षा माझं लिखाण लोकांना आवडण्याचा अगदी उबग आला आहे आता मला!
हे विधान गांभीर्यानं केलेलं आहे असं गृहीत धरतोय. तुमचं स्वत:च्या लेखनापेक्षा स्वत:वर अधिक प्रेम आहे (कृगैन). मात्र लोकांवर हे असं आवडवून घ्यायचं बंधन नाही.
आ.न.,
-गा.पै.
फिनिक्स२०१४, तुमची कहाणी
फिनिक्स२०१४, तुमची कहाणी दुदैवी आहे. तुमचा झालेला अपेक्षाभंग आणि त्यामुळे आलेले नैराश्य समजू शकतो. पण लक्षात घ्या की तुमच्या जोडीदारात असे काही गुण असतील जे उजळून जाण्याची वेळ अजून आलेली नसेल. आपल्या आयुष्याची खुप वर्षे सरायची असतात. सहवासाने घट्ट बंध तयार होतात व प्रचंड संकटाच्या वेळी जोडीदाराच्या त्यागाची कसोटी असते. कितीही विसंगती असल्यातरीही असे आधार फार महत्वाचे असतात. तुम्ही या फेज मधून लवकरच बाहेर येण्यासाठी सदिच्छा !
एवढ रामायण सांगितल पण दोन
एवढ रामायण सांगितल पण दोन गोष्टी सांगितल्याच नाहीत : १. लग्न पत्रिका बघून केल? २. सध्या बायकोचे वजन किती?
बाकी बायकोच गणित कच्चे हे चारचौघात सांगायला वेळ घालवला त्याऐवजी ... "अक्षरशः" मध्ये कुठला "श" वापरतात ते शोधायचं. श म्हणताना आणि ष म्हणताना टाळूला जीभ कुठे कुठे लावतात?
तुमच्यापेक्षा जास्त वाईट
तुमच्यापेक्षा जास्त वाईट तुमच्या बायकोबद्दल वाटतंय:अरेरे:
काय वाटत आसेल तिच्या मनाला... आणि तुम्ही लग्नाच्या आधी भेटलात तर तेव्हाच तुम्ही तिच्याशी ह्या विषयावर बोलाय्चे होते....... प्रत्येका मध्ये काही कामी जास्त गुण असतात्च तुम्ही तिच्यातले गुण पहा दोषांकडे दुर्लक्ष करा नि आयुष्य मजेत घालवा. आता फक्त तिन्च वर्षे झालीत लग्नाला अजुन बरेच वर्षे काढायचे आहे ..असे दुखःत राहुन
कसे होणार ?
सहानभुती धागाकार्त्यास नव्हे
सहानभुती धागाकार्त्यास नव्हे प्रतिसाद देणाऱ्यांसाठी
का?
का?:अओ:
अन्विता
अन्विता
अवांतरः हा धागा पाहून
अवांतरः
हा धागा पाहून 'मुंबईचा फौजदार' हा 'रंजना' आणि 'रवींद्र महाजन' यांचा चित्रपट आठवला.
त्यात रंजना या गावाकडच्या असतात आणि रविंद्र मुंबईचे.
त्यांनाही असंच दबावाखाली लग्न करावं लागतं.
रंजना यांच्या गावंढळपणामुळे ती त्यांना आवडत नसते आणि ते दुसर्या मुलीकडे आकर्षित होतात.
रंजना यांना घराबाहेर काढतात कि स्वतःच जातात असे काहीतरी..
पण मग त्यांची एक मैत्रीण रंजना यांचा मेकओव्हर करते आणि ती त्यांना आवडू लागते.
एक फुकट सल्ला:
बायकोच्या लुक्सचाच प्रश्न असेल तर तिला एखादा छानसा मेकओव्हर गिफ्ट करता का?
VLCC किंवा अजुन एखादे पार्लर?
कदाचित सुंदर दिसायला लागल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हालाही छान वाटेल.
इतर गोष्टी हळूहळू इंप्रुव्ह करता येतील.
तुम्हीही त्यांना आवडतील अश्या काही गोष्टी आवर्जुन करत जा.
दोघांनाही छान वाटेल.
- एक भाबडी प्रतिसादक.
पियू - सिक्सर
पियू - सिक्सर
अरेरे मित्रा काय हे …. आम्ही
अरेरे मित्रा काय हे …. आम्ही टीव्ही सिरियल उगाच बनवत्यो का …।
जुळून येती रेशीमगाठी बघ झी मराठी वर ……. पुढील तीन वर्षे कशी (फुकट) गेली ते कळणार नाही …
. .
आणि तुझ्या बायकोबद्दल>>>> तुला पहिल्या भेटीत न दिसलेले इतरांना पण दिसणार नाही, (कोणी मुळात लक्ष देत नाही). उगाच मनात न्यूनगंड वगैरे ठेऊन जगू नकोस.
तुला कमी धक्के मिळाले आहेत वाटते लहानपणापासून , म्हणून असल्या विचारांनी विचलित होतोस.
गेट वेल सून
.
आणि एखाद्या गोष्टीकडे उगाच लक्ष दिले कि असेच होते. (तुमचे टेन्शन अजून वाढवण्यासाठी) >>> एक आठवडा जेवताना इतरांच्या (किंवा तुमच्या बायकोच्या ) तोंडचे आवाज ऐकण्याचे प्रयत्न करा (आणि पुढील महिन्भर मला शिव्या द्या).
खर तर मी मायबोलीवर नवीन आहे
खर तर मी मायबोलीवर नवीन आहे आणि लग्नाच्या अनुभवाने पण.मला आतापर्यंत नेहमीच वाटत आले आहे की सर्वसामान्य मानसाला स्वतःच्या दुखा:पेक्षा दुसर्याच्या सुखाचे जास्त दुखः होते.आणि सगळ्यांना सगळयाच गोष्टी मिळत नाही...तुमच्या बायकोला हिशोब येत नाही हे बर आहे तुंम्हाला हिशोब विचारणारी कोणी नाही..(नवर्यांना आवड्त नाही ना) आणि पु.ल्.माहीत नसने ही काही मोटी गोष्ट नाहीये.तूम्हाला उलट कीती स्वातंत्र्य मिळतय ते एन्जॉय करा (बाकीचे नवरे रड्तात ना संर्दभ : मेन इज मेन ची जाहिरात)
मला माहीतय शेवटी ज्याचे जळते त्यालाच कळते प्रत्येकाला होणारा त्रास वेगळाच असतो तुमच्या नजरेतुन मी नाही पाहु शकत,पण तुंम्ही खुप आशावादी आहात थोड्याच दिवसात बायको सुधारेल्.
एवढयाशा आयुष्यात खुप काहि पाहिजे असत,
पण पाहीजे ते मिळत नसत..
पाहीजे ते मिळाले तरीही त्यातही काहीतरी कमीच असत,
चांदण्यांनी भरुनसुद्धा आपलं आभाळ रिकामच असत....
अन्यत्र पुर्वप्रकशित.
फार त्रास होत असेल तर थोड्या
फार त्रास होत असेल तर थोड्या मनोरंजनाकरता माबोवरच 'आजचे पती-पत्नीचे नाते' नावाचा धागा आहे अवांतर..थोडं हलकं वाटेल.
त्यांना अगदी तुम्हाला हवी
त्यांना अगदी तुम्हाला हवी होती तशी व्यवहारचतुर बायको मिळाली आहे.
एकदा भेटाच त्यांना.
Pages