१ ते दीड वाटी भिजवलेले पोहे
२ लहान बटाटे उकडून
१ ते दीड लहान चमचा तिखट, गरम मसाला प्रत्येकी किंवा आलं,लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्यांची पेस्ट १ टीस्पून
चवीपुरतं मीट आणि साखर
थोडी कोथिंबीर बारीक कापून
१ टेस्पू बेसन पीठ
२-३ टीस्पू दही
कधी नव्हे ते जरा नेहमीपेक्षा अधिक पोहे भिजवले गेल्याने १ मोठी वाटीभर उरले होते. आता त्यांचे काय करायचे? तेह्वा ही कटलेट्स करुन पाहिली.
१. आदल्या दिवशी राहिलेले पोहे फ्रीजमध्ये ठेवले असल्याने थोडा वेळ बाहेर काढून ठेवले आणि त्यांच्यावर किंचितसे पाणी शिंपडून घेतले. ताजेच पोहे असतील तर नेहमीप्रमाणे धुवून, भिजवून घ्यावेत.
२. उकडलेले बटाटे, तिखट, गरम मसाला पूड, बेसन पीठ, दही, साखर व मीठ घालून चांगले मळून घ्यावे. तिखट व गरम मसाल्याऐवजी आलं,लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्यांची १ टीस्पून पेस्ट घालता येईल.
३.कलटलेटस शॅलो फ्राय करावीत.
हाताशी जे जिन्नस होते ते वापरुन बनवलेली कटलेट्स. ह्यात हवी तशी व्हेरीएशन्स करु शकाल. ८-९ कटलेट्स बनली.
मस्त वाटतायत.पोह्यांमुळे
मस्त वाटतायत.पोह्यांमुळे क्रिस्पी झाले होते का ?
मला वाटतं ब्रेड क्रम्ब्ज
मला वाटतं ब्रेड क्रम्ब्ज वगैरे घातले तर अधिक क्रिस्पी होतील. ते हाताशी नव्हते, तेह्वा त्याशिवायच बनवले.
खरच झटपट आहेत.. छान.
खरच झटपट आहेत.. छान.
छानच.. फोटो टाका प्लीज.
छानच.. फोटो टाका प्लीज.
गाजर, बीट किसून, मोड आलेले
गाजर, बीट किसून, मोड आलेले मूग घालून पौष्टिक होईलच. पण ही बेसिक कृती मस्तच आहे.
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त झट्पट कटलेट रेसिपि .
मस्त झट्पट कटलेट रेसिपि .
ह्यात मी पालक बारीक चिरून
ह्यात मी पालक बारीक चिरून घालते. मस्त आणि झटपट होतात.
~साक्षी
ब्रेकफास्ट साठी उत्तम
ब्रेकफास्ट साठी उत्तम