इथे अमेरिकेत शीतपेटीमधे उंधियूची पाकिटे मिळतात त्यातले एक.
१.२५ टेबलस्पून धणे पावडर
.७५ टेबलस्पून जीरे पावडर
१ टीस्पून मिरची पावडर (किंवा कमी).
३ टेबलस्पून तेल.
१/४ टीस्पून हळद.
३/४ टेबलस्पून ओवा.
२ टेबलस्पून खोबरे
१/२ टीस्पून आले पेस्ट
१/२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टेबलस्पून साखर...
१/२ टीस्पून मीठ
एका भांड्यामधे पाकीटातल्या भाज्या टाका.. त्यात हळद, तिखट, धणेपूड, जीरेपूड, मीठ टाकून मिसळून घ्या.
पाच/दहा मिनीटानी त्यातले वांगे, आणि मुठिया वेगळ्या करा.
२ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात फक्त वांगे भाजून घ्या.. (नाहीतर वांगे शिजत नाही). Microwave मधे लावले तर वांगेही शिकते..
आता उरलेल्या भाज्या मसाल्यासकट टाका.
भांड्यावर एकादे खोलगट झाकण / ताटली उलटी टाकून त्यावर थोडे पाणी टाका. भाजी वाफेवर शिजणार आहे.
१२ मिनीटांचा Timer लावा व मध्यम आचेवर भा़जी शिजू द्या.
मधल्या वेळात ओवा+खोबरे+ २ टेबलस्पून पाणी मिक्सर्मधे वाटून घ्या.
Timer झाला की आले/लसूण आणी वाटण घालून भाजी ढवळा.
उरलेले तेल घाला. मुठिया टाका.
परत भांड्यावर एकादे खोलगट झाकण / ताटली उलटी टाकून त्यावर थोडे पाणी टाका.
४ मिनीटांचा Timer लावा व मध्यम आचेवर भा़जी शिजू द्या..
साखर टाका.. ढवळा.
(आवडत असल्यास साखर वाढवा... )
. वांगे शिकत नाही आणि मुठिया शिजलेल्याच असतात. (म्हणुन वेगळे).
. अगदी घड्याळ लावून करता येते.
. जास्त तेल घालू शकता (विकतच्या भाजीला असते तसे).
.डोके चालवावे लागत नाही.
http://www.maayboli.com/node/45519 'खडे आलू' अर्थात बाळ्-बटाटे
http://www.maayboli.com/node/46057 मालवणी भाजाणे वापरून केलेल्या पाककृती (व्हिडिओ)
http://www.maayboli.com/node/45955 पास्ता
http://www.maayboli.com/node/45519 बाळ बटाटे
http://www.maayboli.com/node/42083 कोवळा फणस
http://www.maayboli.com/node/46123 डाळ पक्वानची डाळ
आमच्या नशीबाने एक गुज्जु
आमच्या नशीबाने एक गुज्जु मैत्रीण बरीच वर्षे करून खायला घालत होती. आता दूर गेली पण आम्ही या डीशपासून थोडा ब्रेक घेतलाय पुन्हा वाटल्यास डोकं न चालवता इकडेच येऊ
साती," पापलेटाची टकली " टाकच. यंदा पापलेट्ची तहान आपलं भूक टकलाच्या रेस्पिवर भागते का ट्राय करूया
आधी सांगायचं ना, उग्गाच डोकं
आधी सांगायचं ना, उग्गाच डोकं वापरलं
रेस्पी मस्त! टायमर टीपांबद्दल धन्यवाद! इथे मात्र पाकीट नसल्यामुळे काय फेकून काय वापरावं याबद्दल अनिश्चितता आहे!
फ्रोजन भाजीएवजी मटणाचा खीमा
फ्रोजन भाजीएवजी मटणाचा खीमा चालतो का? फ्रीजरमधल्या दक्षिणेच्या कोपर्यात पडून आहे कधीचा... हा सुद्धा फ्रोजनच आहे. संपवायचा आहे म्हणून विचारतेय.
------------------------------------------------------------------------------------------
मायबोलीची परंपरा राखूनच हा प्रश्ण विचारलाय ल्क्षात घ्या.
बरं, प्रयोग कोण हा? माहितीचा
बरं, प्रयोग कोण हा? माहितीचा स्त्रोत मध्ये साबा व प्रयोग लिहिलय... ह्या दोघांनी शिकवलं का?
'प्रयोग केल्याशिवाय प्रगती
'प्रयोग केल्याशिवाय प्रगती होणार कशी? (कोचरेकर मास्तर)" तोच प्रयोग. साबांबरोबर आला होता एकदा..
युरोपात कसं करायचं? <<< तिकडे
युरोपात कसं करायचं? <<< तिकडे साखर गोडच असते का हो?
देसाई, काल ह्या डोकं न चालवता
देसाई, काल ह्या डोकं न चालवता पद्धतीने उंधियु केला. प्रमाण अगदी मोजून मापून घेतलं नसलं तरी मला फार ड्राय, फडफडीत वाटला. बाहेरचा जो असतो त्यात भाज्या पोहतील इतकं तेल असतं. तेव्हा तेलात कंजूषी चालणार नाही असं दिसतंय.
अगदी बरोबर.. नंतर पोहायला तेल
अगदी बरोबर.. नंतर पोहायला तेल टाकायलाच हवं... (अधिक टिपा)....
पण मला फार तेलकट गोष्टी आवडत नाहीत...
तेल तरी हवं किंवा पाणी तरी.
तेल तरी हवं किंवा पाणी तरी. नुसती वाफेवर शिजवून भागणार नाही.
तेलच हवं (पोहायला) ... भाजी
तेलच हवं (पोहायला) ... भाजी मधे पाणी असून चालणार नाही...
तेलच हवं. पाण्याने गिचगिचित
तेलच हवं. पाण्याने गिचगिचित होईल.
देसाई, या पद्धतीनं उंधियो
देसाई, या पद्धतीनं उंधियो करून बघितला. मस्त झाला आहे. डोकं वापरू नका सांगितलं आहे तरी वापरलं आणि २ बदल केले. बा.ब., वांगी आणि मुटके तेलात परतून घेतले छान खरपूस आणि त्या ह्यांच्या रेसिपीमध्ये राजवाडी गरम मसाला घालायला सांगितला आहे म्हणून एक टी स्पून मसाला घातला. भाजी जरा कोरडी झाली. पुढल्यावेळी थोडं आधण आलेलं पाणी घालणार आहे. मुटके अगदीच २-३ आहेत. फ्रोझन मुटके वेगळे आणून ते पण थोडे जास्त घालेन. बाकी चव मस्तच आली आहे. एकुणात जास्तीची मंडळी जेवायला असतील तर करायला झटपट आणि वाढायला भारी आयटम होइल हा.
तेलच हवं. पाण्याने गिचगिचित
तेलच हवं. पाण्याने गिचगिचित होईल. >>> सायो, हे माझी पोस्ट टाकल्यावर वाचलं. मी थोडा वेगळा काढून त्यात अगदी थोडं पाणी घालून मावेमध्ये गरम केला तर अजिबात गिचगिचीत वाटला नाही. वाढताना १-१ चमचा तूप पण घातलं. सढळ हातानं तेल घालूनही भाजी जरा कोरडीच वाटली मला.
अमेरिकेत डोकं न वापरता म्हणजे
अमेरिकेत डोकं न वापरता म्हणजे इतरत्र कुठेतरी डोकं वापरून उंधियु ?
रेसिपी छान आहे. सिंडरेलाची
रेसिपी छान आहे. सिंडरेलाची वांगी-मुटके परतून घेण्याची आयडियाही आवडली.
इन्स्टन्ट पॉट उंधियूच्यापण रेसिपीज आहेत नेटवर.
परवाच प्रयोग केलेला म्हणुन
परवाच प्रयोग केलेला म्हणुन लिहिते.
हिरवी मिरची,ओल खोबर,कोथिंबीर, ओवा,जिरे + धने पावडर, आल पेस्ट (कॉस्ट्कोची तयार्),लसून (ऑप्शनल) ( कडीपत्ता : खुप होता म्हणुन घातला),लिंबु रस सगळ एकत्र करुन मिक्सर मध्ये वाटून घेतल.
इन्स्टंट पॉट सॉते मोडवर ऑन केला. तेल घातल. जिरे घातले. वाटण १.५ मिनिट परतल. गरम मसाला एक मिनिट परतला.
फ्रोजन उंधियो भाज्यांची दोन पाकिट घातली. (फ्रोजनच. डिफ्रॉस्ट केल नाही. टाईम चेंज होईल नाहीतर. )एक कप पाणी घातलं.( जस्ट भिजतील निम्म्या भाज्या एवढच) .
झाकण लावून प्रेशर कुकर मोड हाय. सिल्ड. २मिनिट.
२ मिनिट झाल्यावर क्विक रिलिज. वरून थोड तेल सोडा हव तर.
अतिशय उत्तम भाज्या शिजल्या. अज्जिब्बात गिचका झाला नाही. वांगी चिवट झाली नाहीत. अगदी ताज्या भाज्यांप्रमाणे उंधियु लागत होता.
मी दोन मिनीट ठेवून बघितल कारण प्रयोग करत होते. आवडिप्रमाणे अजुन एक मिनिट वाढवू शकता.
मी यावेळी फ्रोजन पाकिट आणून
मी यावेळी फ्रोजन पाकिट आणून उंदियो केला पण माझा फुकट सल्ला त्यापेक्षा त्याच भाज्या फ्रोजन पाकिटं आणून केल्या तर बरं. दोनच मुठिया आणि सर्व प्रकारचे दाणे नाहीत, हमखास न शिजणारी दोन वांगी, दीड बटाटा आणि इतर कंद नाहीत त्यामुळे मजा नाही आली. आता कुठल्या कंपनीचं पाकिट होतं तेही आठवत नाही. असो. कदाचित एकाच माणसाला एक-दोन वेळेसाठी फ्रोजन पाकिट चालावं पण मी तर नको म्हणेन.
वॉव सीमा भारी आहे इंपॉ रेसिपी
वॉव सीमा भारी आहे इंपॉ रेसिपी.
पूर्वी एक दोन वेळा आणलेलं
पूर्वी एक दोन वेळा आणलेलं तेव्हा वांगी अजिबात शिजली न्हवती. आता सीमाच्या रेसिपीनी इंपॉ वर्जन बघू एकदा करुन.
कालच माझ्या फ्रीजरमधे हे
कालच माझ्या फ्रीजरमधे हे पाकिट दिसलं कधी आणून ठेवलं होतं कोण जाणे?
मला वाटलं यातच मसाला दिलाय आणी मला फक्त तो टाकून भाजी शिजवायची आहे.
हिरवी मिरची,ओल खोबर,कोथिंबीर, ओवा,जिरे + धने पावडर , कडीपत्ता,लिंबु रस सगळ एकत्र करुन मिक्सर मध्ये वाटून घेतल.>>>>>>>>>>>>> कधी मूड आला तर करेन एवढं सगळं!
फ्रोजन उंधियो भाज्यांची दोन
फ्रोजन उंधियो भाज्यांची दोन पाकिट घातली>> कुठला ब्रॅण्ड सीमा? क्रुती छान वाटतेय
दीपचा असावा. स्टोअर मध्ये
दीपचा असावा. स्टोअर मध्ये गेले कि बघून सांगते. बहीण येणार आहे थँक्स गिव्हिंगला . तेव्हा परत करेन. तेव्हा जरा डिटेलमध्ये लिहायचा प्रयत्न करते.
अंजली, मसाला हवा तो घाल. बाईंनी इथे कृती लिहिली आहे तो मसाला पण मस्त होतो एकदम.
मेन थिंग इज, इन्स्टंट पॉट मध्ये करन सोप आहे . आणि भाज्या अज्जिब्बात न मोडता , गिचका न होता, चिवट न होता शिजतात.
मसाला तुम्हाला हवा तो घाला.
पाच वर्षानी जाग आली? उत्तम..
पाच वर्षानी जाग आली? उत्तम..
...
आता नविन रेसिप्या टाकल्या पाहिजेत..
पाच वर्षानी जाग आली? >>> बघा
पाच वर्षानी जाग आली? >>> बघा की, त्यापेक्षा आमचा शिट्टी बाफ बरा. टाका, टाका नवीन रेस्प्या टाका.
वेका, कुठल्या ब्रॅन्डचं पॅक होतं? मी जे वापरलं त्यात मुटके वगळता बाकी सगळे बीन्स, बटाटे, सुरण व्यवस्थित प्रमाणात आहेत.
अंजली, देसाईंनी दिलेलं प्रमाण वापरून डोळे झाकून भाजी कर, मस्त होते.
मेन थिंग इज, इन्स्टंट पॉट
मेन थिंग इज, इन्स्टंट पॉट मध्ये करन सोप आहे . आणि भाज्या अज्जिब्बात न मोडता , गिचका न होता, चिवट न होता शिजतात.
मसाला तुम्हाला हवा तो घाला.>>>>>>>>>>>>>>>
अंजली, देसाईंनी दिलेलं प्रमाण वापरून डोळे झाकून भाजी कर, मस्त होते.>>>>>>>>>>>> ओके...
माझ्याकडे दीप ब्रँडचं पाकिट आहे.
डोकं न वापरता मध्ये डोळे
डोकं न वापरता मध्ये डोळे झाकून ही अॅडिशन झाली. ती डोकं वापरुन का न वापरता फॉलो करायची?
हात बांधून उंधियू, पालथ्या
हात बांधून उंधियू, पालथ्या भांड्यातला उंधियू वगैरे संभाव्य रेसिपीज डोळ्यासमोर येत आहेत!!
(No subject)
आता कात्री पाव नंतर इथे मजा
आता कात्री पाव नंतर इथे मजा येणार बहुतेक
झक्की मोड:
झक्की मोड:
अहो हे तर काहीच नाही. मी नुस्त्या तोंडाचा वापर करून दहा लोकांसाठी उंधियू करू शकतो. नुसते तोंड उघडून म्हणायचे "अग ए, आज उंधियू कर बरं का" झालं! तासाभरात उंधियू ताटात येतो!
Pages