इथे अमेरिकेत शीतपेटीमधे उंधियूची पाकिटे मिळतात त्यातले एक.
१.२५ टेबलस्पून धणे पावडर
.७५ टेबलस्पून जीरे पावडर
१ टीस्पून मिरची पावडर (किंवा कमी).
३ टेबलस्पून तेल.
१/४ टीस्पून हळद.
३/४ टेबलस्पून ओवा.
२ टेबलस्पून खोबरे
१/२ टीस्पून आले पेस्ट
१/२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टेबलस्पून साखर...
१/२ टीस्पून मीठ
एका भांड्यामधे पाकीटातल्या भाज्या टाका.. त्यात हळद, तिखट, धणेपूड, जीरेपूड, मीठ टाकून मिसळून घ्या.
पाच/दहा मिनीटानी त्यातले वांगे, आणि मुठिया वेगळ्या करा.
२ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात फक्त वांगे भाजून घ्या.. (नाहीतर वांगे शिजत नाही). Microwave मधे लावले तर वांगेही शिकते..
आता उरलेल्या भाज्या मसाल्यासकट टाका.
भांड्यावर एकादे खोलगट झाकण / ताटली उलटी टाकून त्यावर थोडे पाणी टाका. भाजी वाफेवर शिजणार आहे.
१२ मिनीटांचा Timer लावा व मध्यम आचेवर भा़जी शिजू द्या.
मधल्या वेळात ओवा+खोबरे+ २ टेबलस्पून पाणी मिक्सर्मधे वाटून घ्या.
Timer झाला की आले/लसूण आणी वाटण घालून भाजी ढवळा.
उरलेले तेल घाला. मुठिया टाका.
परत भांड्यावर एकादे खोलगट झाकण / ताटली उलटी टाकून त्यावर थोडे पाणी टाका.
४ मिनीटांचा Timer लावा व मध्यम आचेवर भा़जी शिजू द्या..
साखर टाका.. ढवळा.
(आवडत असल्यास साखर वाढवा... )
. वांगे शिकत नाही आणि मुठिया शिजलेल्याच असतात. (म्हणुन वेगळे).
. अगदी घड्याळ लावून करता येते.
. जास्त तेल घालू शकता (विकतच्या भाजीला असते तसे).
.डोके चालवावे लागत नाही.
http://www.maayboli.com/node/45519 'खडे आलू' अर्थात बाळ्-बटाटे
http://www.maayboli.com/node/46057 मालवणी भाजाणे वापरून केलेल्या पाककृती (व्हिडिओ)
http://www.maayboli.com/node/45955 पास्ता
http://www.maayboli.com/node/45519 बाळ बटाटे
http://www.maayboli.com/node/42083 कोवळा फणस
http://www.maayboli.com/node/46123 डाळ पक्वानची डाळ
सिंडे माझं दीपचं नक्कीच
सिंडे माझं दीपचं नक्कीच नव्हत् मला वाटतं काहीतरी नेचर्स (बास्केट किंवा फ्रेश) सुरण तर अजीबातच नव्हतं. मी एकदाच करते उंदियो आणि मग फ्रीजरमध्ये ठेऊन एखादी सर्विंग नंतर खाते. पुढच्याव्ेळी भाज्या वेगवेगळ्या घ्याव्या आणि वांगी वगैरे फ्रेश. मुठियाथोड्ातरी बनवाव्या लागणारच. थोडक्यात डोळे ,डोकॅ वगैरे सर्व वापरावं लागेल खाणारे खातील डोळे मिटून.
सीमा, रेसिपी छान वाटते आहे.
सीमा, रेसिपी छान वाटते आहे. मी नक्की करून बघीन.
झक्की मोड? हे कोण बुवा झक्की?
झक्की मोड? हे कोण बुवा झक्की?
बाब्बो, पळा आता काही खरे नाही
बाब्बो, पळा आता काही खरे नाही.
आज दुपारच्या जेवणात या
आज दुपारच्या जेवणात या पद्धतीनं केलेला उंधियु. करताना नाही पण नंतर लक्षात आलं, काय पण योगायोग
करताना नाही पण नंतर लक्षात
करताना नाही पण नंतर लक्षात आलं >> म्हणजे नक्की डोके न वापरता ही स्टेप फॉलो केलीस तर!
(No subject)
डोके वापरल्यास आम्ही जबाबदार
डोके वापरल्यास आम्ही जबाबदार नाही....
आज भोगी म्हणून हेच करावं
आज भोगी म्हणून हेच करावं म्हणते
अंजली, मी या सिझनमध्ये एकदा
अंजली, मी या सिझनमध्ये एकदा आयपीमध्ये उंधियू केला होता तो छान झाला होता. काहीच कष्ट नाहीत. तेल खूप पितात त्या भाज्या पण.
आणि दीप च्या पाकिटात मुठिया कमी आहेत. नुसत्या फ्रोझन मुठिया इंडियन स्टोअरमध्ये दिसल्या नाहीयेत. आता घरी मुठिया करण्याची तयारी(मनाची) चालू आहे.
दीपच्या पाकिटात २ किंवा ३ च
दीपच्या पाकिटात २ किंवा ३ च असतात..
दीपच्या पाकिटात २ किंवा ३ च
दीपच्या पाकिटात २ किंवा ३ च असतात >>> हो वांगी पण हेमट्या हातानं घालतात.
>>घरी मुठिया करण्याची तयारी
>>घरी मुठिया करण्याची तयारी
सोप्पं वाटलं होतं मला. घरातले कुण्णीच उंधियो फ्यान नाहीत ही वेगळी गोष्ट. या वर्षी तर त्या भागात केसेस जोरदार वाहात असल्याने सुपरमार्केटमधली एक एक पाकिटं सिमिलर भाज्या आणि घरचा जुना माल इ. घालून सरळ एक खिचडी करून खायचा विचार आहे. नाव पण ठरलंय "बिरभोगीची खिचडी" (खिचडीवाल्या बिरबलाची शप्पथ )
भारतात बकराचे डोके घालून
भारतात बकराचे डोके घालून करायची डिश अश्या अपेक्षेने वाचलं!
अंजली, मी या सिझनमध्ये एकदा
अंजली, मी या सिझनमध्ये एकदा आयपीमध्ये उंधियू केला होता तो छान झाला होता. काहीच कष्ट नाहीत. तेल खूप पितात त्या भाज्या पण.>>>>>>>>>> ओक्के. पुढच्या वेळी आता.
इथे मी कालच माझ्या गुज्जु कलिगसमोर विषय काढला उंधियोचा (का काढला आणी तेही गुज्जुसमोर > )तर ती म्हणाली अरे एवढं फोझन बिझन तरी कशाला. ओक ट्रीवर खुश्बू आहे रेस्टॉरंट तिथे भारी उंधीयू मिळतो. ताजा मेड टू ऑर्डर. . झालंच तर तिथला मेथी गोटा पण चांगलाय. ती तिथूनच घेणार होती. झालं आळशीपणाला सोकावलेले मी अजूनच डोकं न लावता सरळ चालू पड्णार आहे त्या दिशेला (गाडी हाकणार आहे )
https://virarandwest.com/2013
https://virarandwest.com/2013/01/17/ukad-handi/ हा प्रकार लहान असताना भरपूर खाल्ला आहे. वरचा रेसीपी उकड हंडी सारखा, कमोडो ग्रिल मधे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
एक फ्रोजन पाकीट फ्रिझर मध्ये
एक फ्रोजन पाकीट फ्रिझर मध्ये शिल्लक होते त्यामुळे आज केला परत एकदा. मस्त होतो या रेसेपीने! परदेसाईंची रेसेपी हीट आहे एकदम
Pages