इथे अमेरिकेत शीतपेटीमधे उंधियूची पाकिटे मिळतात त्यातले एक.
१.२५ टेबलस्पून धणे पावडर
.७५ टेबलस्पून जीरे पावडर
१ टीस्पून मिरची पावडर (किंवा कमी).
३ टेबलस्पून तेल.
१/४ टीस्पून हळद.
३/४ टेबलस्पून ओवा.
२ टेबलस्पून खोबरे
१/२ टीस्पून आले पेस्ट
१/२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टेबलस्पून साखर...
१/२ टीस्पून मीठ
एका भांड्यामधे पाकीटातल्या भाज्या टाका.. त्यात हळद, तिखट, धणेपूड, जीरेपूड, मीठ टाकून मिसळून घ्या.
पाच/दहा मिनीटानी त्यातले वांगे, आणि मुठिया वेगळ्या करा.
२ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात फक्त वांगे भाजून घ्या.. (नाहीतर वांगे शिजत नाही). Microwave मधे लावले तर वांगेही शिकते..
आता उरलेल्या भाज्या मसाल्यासकट टाका.
भांड्यावर एकादे खोलगट झाकण / ताटली उलटी टाकून त्यावर थोडे पाणी टाका. भाजी वाफेवर शिजणार आहे.
१२ मिनीटांचा Timer लावा व मध्यम आचेवर भा़जी शिजू द्या.
मधल्या वेळात ओवा+खोबरे+ २ टेबलस्पून पाणी मिक्सर्मधे वाटून घ्या.
Timer झाला की आले/लसूण आणी वाटण घालून भाजी ढवळा.
उरलेले तेल घाला. मुठिया टाका.
परत भांड्यावर एकादे खोलगट झाकण / ताटली उलटी टाकून त्यावर थोडे पाणी टाका.
४ मिनीटांचा Timer लावा व मध्यम आचेवर भा़जी शिजू द्या..
साखर टाका.. ढवळा.
(आवडत असल्यास साखर वाढवा... )
. वांगे शिकत नाही आणि मुठिया शिजलेल्याच असतात. (म्हणुन वेगळे).
. अगदी घड्याळ लावून करता येते.
. जास्त तेल घालू शकता (विकतच्या भाजीला असते तसे).
.डोके चालवावे लागत नाही.
http://www.maayboli.com/node/45519 'खडे आलू' अर्थात बाळ्-बटाटे
http://www.maayboli.com/node/46057 मालवणी भाजाणे वापरून केलेल्या पाककृती (व्हिडिओ)
http://www.maayboli.com/node/45955 पास्ता
http://www.maayboli.com/node/45519 बाळ बटाटे
http://www.maayboli.com/node/42083 कोवळा फणस
http://www.maayboli.com/node/46123 डाळ पक्वानची डाळ
सोप्पीयं! कधी करणार मी ..
सोप्पीयं! कधी करणार मी ..
भा़ई शिजू द्या.>> भाजी ना? का अनिलभाईंना बोलवाय्चं
हुश्शार आहेत देसाई...
हुश्शार आहेत देसाई... "अमेरिकेत डोकं न वापरता .. " एवढ्या मटेरियल वर १०० प्रतिसाद येतील तुम्हाला आता
यात डोकं वापरलं नाही म्हणजे
यात डोकं वापरलं नाही म्हणजे शाकाहारी आहे.
आमच्याकडून पास!
(स्वगत -एक दोन सुरमय नायतर पापलेटाची टकली टाकून बघू काय?)
अधिक टिपांमधले वांगे शिकत का
अधिक टिपांमधले वांगे शिकत का नाही म्हणे?
बाकी, रेसिपी छान..
वांगे शिकत का नाही म्हणे?
वांगे शिकत का नाही म्हणे? <<<< ते कुडकूडल्यामुळे वातड होऊन बसते.....
मै +१ .. लिहणारच होते मी ..
मै +१ .. लिहणारच होते मी .. मग म्हटलं जावां दे!
>>हुश्शार आहेत देसाई...
>>हुश्शार आहेत देसाई... "अमेरिकेत डोकं न वापरता .. " एवढ्या मटेरियल वर १०० प्रतिसाद येतील तुम्हाला आता
अजून झक्की आले नाहीत.
रेस्पी आवडली. पुढल्या बाजारी भाज्यांचं पुडकं आणून करून बघणार.
देसाई.. फ्रोजन वांगे काढून
देसाई.. फ्रोजन वांगे काढून टाका आणि ताजे वांग घाला.. अजून मस्त लागेल. आणि न शिजलेले वांगे मधे मधे येणार नाही..
हिम्सभाऊ, खरं सांगा, तुम्ही
हिम्सभाऊ, खरं सांगा, तुम्ही डोकं वापरलंत ना?
फ्रोजन वांगे काढून टाका आणि
फ्रोजन वांगे काढून टाका आणि ताजे वांग घाला. <<< पण मग पाकीटातले Content बदलले.. म्हणजे डोके वापरायला हवे...
पापलेटाची टकली टाकून बघू काय? <<< सोडे कुठेही वापरावे...
बिन्डोकपणा करून वांगी काढूनच
बिन्डोकपणा करून वांगी काढूनच टाकली तर?
फक्त अमेरिकेत असताना डोकं
फक्त अमेरिकेत असताना डोकं नाही वापरायचं का कसं?
फक्त अमेरिकेत असताना डोकं
फक्त अमेरिकेत असताना डोकं नाही वापरायचं का कसं? << भारतातले लोक हुशार असतात.... ते कशाला पाकिटातली भा़जी करतील..
बिन्डोकपणा करून वांगी काढूनच टाकली तर? <<< परत तेच.. डोकं वापरलं नाही तर वांग म्हणजे काय्? कसं कळणार?:आं ? आं?
फक्त अमेरिकेत असताना डोकं
फक्त अमेरिकेत असताना डोकं नाही वापरायचं का कसं? >>>+११ भारतात वापरायचे का?
सातीने माझी फाको चोरली.
सातीने माझी फाको चोरली.
अगदीच डोकं न वापरता करायचा असेल तर हसूबेनला फोन करावा. पुढच्या वेळच्या ऑर्डरी आत्ताच द्याव्यात.
हुश्शार आहेत देसाई...
हुश्शार आहेत देसाई... "अमेरिकेत डोकं न वापरता .. " एवढ्या मटेरियल वर १०० प्रतिसाद येतील तुम्हाला आता >>++११११
ईथे बर्फ बनवायला कित्ती किती कष्ट पडतात आनि तुमी म्हणता "डोकं न वापरता उंधियू"?
अमेरिकेत डोकं न वापरता उंधियू
अमेरिकेत डोकं न वापरता उंधियू >>> भारतात उंधियात डोकं घालतात की काय ?
हे दगडं घालुन भाजी केल्यासारखं वाटतयं .
हुश्शार आहेत देसाई...
हुश्शार आहेत देसाई... "अमेरिकेत डोकं न वापरता .. " एवढ्या मटेरियल वर १०० प्रतिसाद येतील तुम्हाला आता << १००० म्हणालीस तरी चालेल :))
वांग्यांच शिकल नाही तर दगड होणारच!
ते अशोका की वाडीलाल चं
ते अशोका की वाडीलाल चं उंधीयूँ चं पाकीट वापरून मी करायचा प्रयत्न केला होता कोणे एके काळी (बहुतेक जुन्या मायबोलीत रेसिपी वगैरेही टाकेली होती :फिदी:) मग त्यानंतर अचानक मला फ्रोझन भाज्यांचा, तेही इंडियन स्टोअरमधल्या वीट आला आणि मी ते आणणंच बंद केलं; उंधीयुँ खाणंही ..
डोक्यातले बटाटे पण नाही
डोक्यातले बटाटे पण नाही वापरायचे का?
आले का बटाटे? अता पनीर पण
आले का बटाटे? अता पनीर पण येईल.
आता केळ घालुन भरीत करा (आता
आता केळ घालुन भरीत करा
(आता बास नाहीतर परदेसाई काठी घेऊन येतील.)
दगड आला, वीट आला, बटाटे,
दगड आला, वीट आला, बटाटे, पनीर, काठ्या - माठ्या काय काय आहे या पाककृतीत...
कुणाला वेळ नसला तर पटकन करायची भाजी म्हणून मी बर्याच वेळा करतो (डोकं न वापरता)...
देसाई, ह्यापेक्षा रेडीमेड
देसाई, ह्यापेक्षा रेडीमेड पात्राची भाजी करा. त्यात ह्या इतकंही डोकं लागत नाही.
मी आणखी बिनडोक पणे अनेक वेळा
मी आणखी बिनडोक पणे अनेक वेळा केलेय, पण त्यात वांग कच्चं रहातं आणि मुठिया असतात वर सम्राट अशोका पण विश्वास ठेवत नाही.
तेव्हा आता ही तुमची डोकं नसलेली रेसिपी, डोकं वापरून वांग वेगळं काढून करीन.
धन्यवाद.
>> ह्यापेक्षा रेडीमेड
>> ह्यापेक्षा रेडीमेड पात्राची भाजी करा
पण ही होत असेल चांगली, इतकं काय मोडीत काढतेस!
(खरंतर माझ्याकडे याहून बिनडोक आणि विनाकटकट रेसिपी आहे झक्कींनी दिलेली.
मी नेहमी करते. पण सगळ्यांना
मी नेहमी करते. पण सगळ्यांना सांगत होते कि मी डोक वापरते म्हणुन. लोक कौतूकाने बघायची. माझ्याकडे आणि भाजीकडे.
असो. विनय नी माझ गुपित फोडल्यामूळ त्यांचा निषेध.
अहो उंधियुच काय, अमेरिकेत
अहो उंधियुच काय, अमेरिकेत सगळ्याच गोष्टी डोके न वापरता केल्या तर चांगल्या होतात!
फ्रोजन वांगे काढून टाका आणि ताजे वांग घाला.
खरे तर फ्रोजन पा़कीटातले सगळेच फेकून द्या, पाकीटासकट नि सगळे ताजे पदार्थ विकत आणा, मुठियाच्या कृतीसाठी मायबोलीवर कृति सापडेलच. दतेम नि बोगातु घातल्यास आणखी छान लागेल.
नाहीतर सरळ फ्रोजन पाकीटातले सगळे एक मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात ओतून पाकीटावर लिहीलेल्या सूचनांप्रमाणे गरम करा!
>>अहो उंधियुच काय, अमेरिकेत
>>अहो उंधियुच काय, अमेरिकेत सगळ्याच गोष्टी डोके न वापरता केल्या तर चांगल्या होतात! >> झक्की, टू द पॉईंट.
>>खरे तर फ्रोजन पा़कीटातले सगळेच फेकून द्या, पाकीटासकट नि सगळे ताजे पदार्थ विकत आणा >> परदेसाई - आलेलसूण पेस्ट, ओवा, इ. इ. उस्तवार करताय तर चार ताज्या भाज्या वापरून करा की उंधियु. हाकानाका.
युरोपात कसं करायचं?
युरोपात कसं करायचं?
Pages