एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या एपिसोडमधली एक विसंगति मला खूप खटकली -
ईशाच्या आईने घरात कुणालाही विश्वासात न घेतां ओमच्या घरच्यांचा मानपान केला, याबद्दल 'मोठ्या बाबा'नी
ईशाकडे तीव्र नापसंति व्यक्त करणं ठीक होतं; पण त्यापुढचं त्यांचं 'आपल्या घरात केलेल्या असल्या मानपानामुळे आपण २५ वर्षं मागे गेलों', हें नाहीं पचलं ! एवढी जर खरंच आधुनिकतेची कांस धरलीय, तर ज्याचे आई-वडील घटस्फोटीत आहेत त्या मुलाला केवळ त्या कारणावरूनच कां नाकारलं जातंय ? ईशा मोठ्या कुटूंबातली असूनही आतां फक्त एका मैत्रीणीबरोबर मजेत रहाते आहेच ना; तशीच राहिली असती कीं लग्न झाल्यावर ओमबरोबर ! आणि, अमेरिकेतला मुलगा बघताहेत तिथं काय मोठ्या संयुक्त कुटूंबाबरोबर रहाणार आहे का ती लग्नानंतर ? एवढा मोठा घोळ केवळ ज्या मानसिकतेने झाला आहे, निदान त्या मानसिकतेशीं सुसंगत हवीत ना सर्व विधानं !
कीं माझाच कांहीं गोंधळ होतोय ?

Bhaukaka +111111111111
mi agadihech bolale (tenvha 'tula kai kalatay' wale tuccha kataksh milale mala pan tumach hi hech mat ahe pahun bar vatal ani mhanun ata mi tya katakshankade durlaksh karat ahe)

<<.... tya katakshankade durlaksh karat ahe)>> सांगा त्याना माझंही हेंच मत आहे म्हणून ... जावूंदे फुकट त्यांचे अदृश्य असलेल्या माझ्यावर टाकलेले तुच्छ कटाक्ष ! Wink

सांगा त्याना माझंही हेंच मत आहे म्हणून ... जावूंदे फुकट त्यांचे अदृश्य असलेल्या माझ्यावर टाकलेले तुच्छ कटाक्ष
>>
Lol

भाउकाका +१
मोठे बाबा अमेरिकेला का जाणार आहेत? ओमच्या बाबांची केस सोडवायला?

मंगळवारच्या भागात मला शुभा खोटे आणि तुषार दळवी ह्यांच्यातले संवाद आवडले. ईशा मला सो सो वाटली. त्यापेक्षा काका, सागर आणि काही प्रमाणात मधु ह्यांची कामे चांगली झाली.

ते कामत आजोबा आणि ती मधु डोक्यात जातायेत. आणि ईशा, आपल्याच घरच्यांशी इतके कसं कायं खोट्म बोलू शकते?

सायंटीस्ट बाबाना आणखी किती वेळां बॅग भरून पुन्हा ती रिकामी करायला लावणार आहेत !
मधु ही व्यक्तिरेखा अजिबात पटत नाही. माझी सहानुभूति तर आतां तिच्या आई-वडीलांकडे व त्या सागरकडेच झुकायला लागली आहे ! अभिनयाच्या बाबतींतही नाटकीपणाच जास्त वाटतो !!
'अति झालं ,हंसू आलं' याचा अभिनय स्पृहा छान करते पण तो आतां अति होतोय व रडूं आणतोय !

तात्पर्य : सिग्नल्सकडे लक्ष नाही ठेवलं, तर ही चांगली मालिका भलत्याच रुळावर जाण्याची किंवा रुळावरून घसरण्याचीही शक्यता आहे !

मधु फारच आततायी दाखवली आहे.... मानलेला जिवाभावाचा भाऊ वगैरे सगळ्ळं ठीक आहे....त्याच्या 'बायोलॉजिकल' बापाशी असलेल्या त्याच्या भांडणात ही 'तिखट ठेंगणी' ओमच्या बाजूने असणे ( तिच्या घरच्यांच्या वागण्यामुळे) पण ठीक....पण ही महामाया ओमच्या वडिलांबद्दल त्यांच्या सो कॉल्ड अनुपस्थितीत असले काहीतरी बोलतेच कशी? हे तर ईशाच्या भोचकपणाच्याही दोन पावलं पुढे आहे कुछ भी....गंडली इथे पुन्हा ही गोष्ट....

मधूसकट बरीच पात्रं बेंबीच्या देठापासून ओरडत असतात, साधे संवादही खूप मोठ्याने बोलतात ( पण टु बी फेअर, हा प्रकार हिंदी मराठी सगळ्या मालिकांमध्ये आढळतो)....त्यातल्या त्यात मधूचा आवाज जास्त इरिटेटिन्ग आहे....ती जे काय राजस्थानी माणसांच्या धोतरासारखी सलवार घालते तेही तिला शोभत नाही....

आणि त्या ईशाने जरा ओमला श्वास घ्यायची फुरसत द्यावी, वाळवीसारखी चिकटलेली असते....कधीही बघा ही ठमाकाकू ओमच्याच घरी....वर सगळ्यांना शहाणपण शिकवत हिंडते....एखादा माणूस संन्यास घेऊन कुठेतरी निघून जाईल....

<<मधूसकट बरीच पात्रं बेंबीच्या देठापासून ओरडत असतात >> अपवाद- रणजीतकाका, सायंटीस्टबाबा. मोठ्या भावाचं मन वळवण्याकरतानाचा त्या दोघांमधला परवांच्या एपिसोडमधल संवाद अगदीं खालच्या पट्टींत असूनही खूप परिणामकारक व औचित्यपूर्ण होता !

येस्स. हे अपवाद आहेत म्हणूनच थोडी सुसह्य होते मालिका....
पण ओमसुद्धा कधी कधी शिरा ताणून ताणून बोलतो नॉर्मल संवाद ( चिडल्यावरचे नव्हे)....कदाचित नाटकांमध्ये काम केल्यावर मोठ्याने बोलण्याची सवय होत असेल....तुषार दळवींना मात्र जमलंय....

शिल्पा व तुषारची जोडी मस्त दिसेल. ओम इशा पेक्षा टीआरपी जास्त असेल त्यांचा.
म्हातारा व मधु यांचे करा काय्तरी. फार छळतायत. एकदा तर आक्खा एपिसोड त्या दोघांमधे होता..महाबोअर.

भाऊ Happy

<< शिल्पा व तुषारची जोडी मस्त दिसेल. ओम इशा पेक्षा टीआरपी जास्त असेल त्यांचा.>> अहो, प्लीज, नका अशा आयडीया सुचवूं इथं; पुढचे १३ एपिसोड त्यांच्याच प्रेमाचे, लग्नाचे व घटस्फोटाचे 'फ्लॅशबॅक्स' बघायचा अजून स्टॅमिना आहे का तुमचा !!! Wink

परवाच्या भागात ती ईशा त्या मैत्रिणीला रडत रडत सांगत होती 'की आमच्या घरी खोटं बोललेलं बिलकूल चालत नाही.. ते कधीच तयार होणार नाहीत आणि so on...' हे जर ईशाला आधीपासून माहीत होतं तर मग इतक मोठ्ठं आणि इतके दिवस ती खोटं का बोलत होती? मोठ्या बाबांना ( irritating नाव आहे.. सरळ आजोबा म्हणता येत नाही का? नातवंडांनी म्हणणे ठीक आहे कधीतरी पण सूनसुद्धा सास-यांना मोठे बाबा म्हणते???? कठीण आहे..!!! अवांतराबद्दल क्षमस्व. ) सगळं माहीत्ये हे जेव्हा ईशाला कळलं तेव्हाच तिने सर्वांना खरं सांगायला हव होतं आणि सर्वांच्या मदतीने ओमचं कुटुंब एकत्र आणायला हवं होतं.. एवढ साधं कळत नाही का या सीरियलवाल्यांना Angry

<< एवढ साधं कळत नाही का या सीरियलवाल्यांना >> त्याना तें कळतं हो पण इतरानाही तें कळतं याची त्याना पर्वा नसते !! Wink

कामत आजोबा, मधु आणि ईशा तिघेही माझ्या डोक्यात जातात.

यस तुषार-शिल्पा जोडी मस्त आहे.

<<....आणि त्या ईशाने जरा ओमला श्वास घ्यायची फुरसत द्यावी...>> सध्या ईशा-ओमने जर दुसर्‍या सिरीयल्स किंवा नाटक/सिनेमाना "डेटस" दिल्या नसतील तर हें होणं कसं शक्य आहे ! Wink

काय पकाऊ पणा सुरु आहे!!!
मालिकेत आता पटण्यासारखे काहीच उरलेले नाही.
ईशाने सरळ-सरळ सांगायला हवे होते तिच्या 'मोठ्ठ्या'-बाबांना कि ओम जसा आहे तसाच्या-तसाच ईशा त्याला स्विकारायला तयार आहे. ईशा त्याच्याशीच लग्न करेल, मग तो परिवार-वत्सल असेल किव्हा अनाथ असेल नाहीतर डिव्होर्सी आई-बापाचा मुलगा असेल!!!

एखादा माणूस संन्यास घेऊन कुठेतरी निघून जाईल....>> चालला ओम मनालीला. संन्यास घेऊ नये म्हणजे मिळवली Wink

मुख्य पात्र सुट्टीवर गेल्यामुळे आता होल वावर आजोबा, आजी, मधू, सागर,गुरुजी आणि धनाकडे Sad काही भाग अत्यंत रटाळ असणर आता!

मला खरंच माहित नव्हतं इथले कॉमेंटस इतक्या गंभीरपणे व तत्परतेने घेतात सिरीयलवाले; << आणि त्या ईशाने जरा ओमला श्वास घ्यायची फुरसत द्यावी...>> ही कॉमेंट आली नाही इथं तर ताबडतोब << चालला ओम मनालीला >> !!! Wink

पतंत आता मनालीच्या हवेला लागला आहे. Happy द्या ढिल.

तिकडे महाभारातात इपिसोड वाढ्वुन मिळाल्यामुळे अचानक श्रीकृष्णपुराण चालु केले आहे ते पण देत आहेत ढील. आपण सांभाळुया आसार्‍या. Proud

हे हे आज ईशा सगळ्यांना " कुणाकुणाचं तुषार दळवींना आपल्यात सामील करून घ्यायला 'अनुमोदन' आहे असं म्हणाली" 'अनुमोदन' हा मायबोलीकरांचा खास शब्द आहे. बहुतेक लेखक मंडळ मा.बो. वाचतात हे मा.बो.करांपर्यंत पोहोचवण्याचा प्रकार दिसतोय.... Wink

sakhi as kahi nahi g

mi mabo join karanyachya khup adhi pasun 'anumodan' shabdaikat ani mhanat aley

हो, वापरलाय पण लिखाणात जास्त आणि बोली भाषेत थोडा कमी....तेही मराठी माध्यमात शिकल्यामुळे....पण आत्ताच्या ' तुम्ही काय बोलतात, करतात' च्या जगात 'अनुमोदन' चा वापर क्वचितच असावा, असा आपला माझा देशाबाहेरून लावलेला अंदाज, जो चुकीचा असू शकतो....चू.भू.द्या.घ्या.

अरे बापरे, म्हणजे बहुमत विरोधात आहे म्हणून सायंटीस्ट बाबाना पुन्हा बॅग भरायची पाळी... मग ईशा तीला मूळातच नसलेली 'व्हेटो पॉवर ' वापरून त्याना पुन्हा थांबवणार ! यापेक्षां, सासवडला जावून ' ओम जसा आहे तसा त्याला स्विकारणं' ,यावर तिथं मतदान घेणं व त्याबाबतींतली तिची हक्काची 'व्हेटो पॉवर' वापरणं
किती तरी अधिक औचित्यपूर्ण नाही का ? Wink

कालचे अपडेटः Happy
ओम मनालीला जायला निघाला एकटाच. (योग्य निर्णय)
मधु, सागर, कामत आजोबा यासगळ्यंची ३/४ एपिसोड फाल्तू बडबड. Angry
शेवटच्या सिनमधे ईशा सगळ्यांना विचारते कि ओमचे बाबा आणि ओममधे पॅचअप व्हायला हवे याला किती जणांचे अनुमोदन? फक्त आज्जी आणि ईशा यांचाच हात वर.

Pages

Back to top