Submitted by विदेश on 9 May, 2014 - 07:53
.
"" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -""
(चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी)
मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी
अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ...
नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा
माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा "
का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी ..... अर्ध्यावरती .....
भार्या वदली बघत एकएक यादीमधला फोटो
"उद्या पहाते दुसऱ्या आपुल्या प्रभागात मी फोटो "
पण नवऱ्याला नव्हती खात्री दूर बसे जाऊनी .......अर्ध्यावरती....
तिला विचारी नवरा- 'का हे नाव असे खोडावे ?
आयोगाने पुसण्याआधी आम्हास का न पुसावे !'
भार्येला ना उत्तर सुचले, झाली केविलवाणी........अर्ध्यावरती ..
का नवऱ्याने मिटले डोळे 'शाईखूण' दिसताना
का नवऱ्याला त्रास वाटला मतदान ते बघताना
बोटावरती नजर टाकितो अपुल्या उदासवाणी .......अर्ध्यावरती ....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
:-) मी ही एक पुणेकर
मी ही एक पुणेकर
मोरोपंत, प्रतिसादाबद्दल आभारी
मोरोपंत, प्रतिसादाबद्दल आभारी आहे .