Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
" मला आई व्हायचंय " हा
" मला आई व्हायचंय " हा समृद्धी पोरे यांचा चित्रपट पाहिला. वेगळा विषय, उत्तम चित्रीकरण, उत्तम अभिनय
यासाठी आवडला. अमेरिकन बाल कलाकार फार गोड दिसलाय आणि त्याने अभिनयही उत्तम केलाय.
अमेरिकन जोडपे सरोगेट मदर म्हणून एका भारतीय बाईची निवड करते. पण सोनोग्राफी करताना डॉक्टरांना तो गर्भ अबनॉर्मल वाटतो म्हणून ती अमेरिकन बाई त्या मूलाची जबाबदारी घ्यायला नकार देते. पण ते मूल नॉर्मलच निपजते. पुढे ती बाई त्याला न्यायला येते, घेऊनही जाते... पुढे काय ?
कथेतली अनेक वळणे पटणारी नाहीत. कुठलिही तज्ञ व्यक्ती केवळ सोनोग्राफी करून गर्भ अॅबनॉर्मल आहे असे थेट आईसमोर सांगणार नाही. तो प्रसंग चांगलाच खटकतो आणि पुढच्या सर्वच घटना त्यानुसार असल्याने...
शेवटही केवळ मेलोड्रामा करावा तसा केलाय. दोन्ही आया प्रॅक्टीकल विचाराचा पुरस्कार करणार्या असताना, यापेक्षा वेगळा शेवट करता आला असता.
अमेरिकन मुलाने मराठी संवाद नीटच म्हंटलेत पण जो मुलगा जन्मापासून मराठी घरातच वाढलाय तो असे मराठी का बोलेल ?
अमेरिकन बाई ( जी मूलासाठी आसुसलेली आहे ) म्हणजे सिगारेट ओढणारी, कुठल्याही पुरुषाच्या मागे लागणारी अशीच दाखवायला पाहिजे होती का ?
आयटम साँग (
) चा मोह टाळता आलेला नाही.
इंग्लिश विंग्लिश सिनेमात डॉ.
इंग्लिश विंग्लिश सिनेमात डॉ. मीना नेरुरकर होत्या का? त्यांच्या वेबसाईटवर तसं दिलं आहे.>> कोण या?
टू स्टेट्स ओके ओके. अमृता मात्र खूप्पच आवडली आणि आलियाचे ड्रेसेस तर ऑस्समेस्ट!!!
अर्जून खूप ग्लूमी ठोंब्या वाटतोय.... औरंगजेब ने उंचावलेली अपेक्षा नंतर अगदीच फुस्स!!
पांगिरा आणि शाहीद पाहायचे आहेत.
सैल पाहीला. मोहन जोशी आणि रिमा लागू दोघेही ग्रेट अभिनेते आहेत. एका रात्रीतला सिनेमा... वेगळ्या झालेल्या आणि बर्याच वर्षांनंतर केवळ योगायोगाने भेटून आपापल्या व्यथा मन एकमेकांसमोर मोकळं होताना... आणि त्या बॅकग्राऊंडला भरून आलेलं मग कथानकासोबत रितं रितं होत जाणारं आभाळ, सैलावणारे वातावरण मस्त घेतलंय. आवडला. गजेंद्र अहिरेंचे चित्रपट साध्या कथानकाचे तरीही वेगळ्या आशयाचे असतात. पटकन रिलेट होतात.
नवीन आलेले पोस्टकार्ड आणि एक हजाराची नोट पाहायचे आहेत.
पोस्ट कार्ड अजून आहे का
पोस्ट कार्ड अजून आहे का मुंबईत? हजाराची नोट बघायला पाहिजे
<इंग्लिश विंग्लिश सिनेमात डॉ.
<इंग्लिश विंग्लिश सिनेमात डॉ. मीना नेरुरकर होत्या का? त्यांच्या वेबसाईटवर तसं दिलं आहे.>> कोण या?>
'सुंदरा मनामधी भरली' या लावणीनृत्यांच्या कार्यक्रमाने बृहन्महाराष्ट्रातील अभिजनांना लावण्यांच्या कार्यक्रमाकडे खेचून आणणार्या अमेरिकास्थित कलाकार.
'अवघा रंग एकचि झाला' हे अलीकडचे नाटक त्यांचेच
"दुसरी गोष्ट "बघितला. आवडला
"दुसरी गोष्ट "बघितला. आवडला .सुशील कुमार शिंदे यांची लाईफ स्टोरी आहे. पण सिनेमा सुरु होताला डिस्क्लेमर मात्र टाकलाय की सगळी पात्र काल्पनिक आहेत आणि कोणाशी सम्बध आढळल्यास योगायोग समजावा इत्यादी इत्यादी.
सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे . कुठेही कंटाळा येत नाही. पात्र योजना चांगली आहे पण प्रेक्षक संख्या कमी .जास्ती जाहिरात दिसत नाहीये
अफलातुन कोळीमानव २
अफलातुन कोळीमानव २ बघितला.
जास्त खलनायकांमुळे चित्रपट गुंतागुंतिचा वाटतो त्यात भर पडते त्याच्या वडिलांच्या माहीतीची अश्याने आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था होते. एक खलनायक नष्ट होतो .. दुसरा खलनायक उभा राहतो .. त्याला नष्ट करतो ३ रा उभा राहतो.. गीव मी अ ब्रेक यार
सगळे खलनायक एकाच चित्रपटात संपवणार का ? त्यात त्याचे प्रेमप्रकरण .. च्यामारी त्याचा सुध्दा बट्ट्याबोळ केला आहे.. या हॉलिवुड दिग्दर्शकांना काय कळतच नाही . अरे कोणीतरी त्यांना कोई मिल गया, क्रिश, क्रिश २ दाखवा रे... हिरो ला सुपरपॉवर मिळते ..तो लग्न करतो त्याला मुल होतात .. जेनेटिक पध्दतीने त्या मुलाला वडिलांचे सुपरपॉवर मिळतात .. चित्रपटाचे पुढचे भाग तयार करण्यासाठी कथानक मिळते ......:)
पण असे काहीच घडत नाही .. आता पुढचा चित्रपट कसा काढणार किती वेळ तोच तोच हिरो लढाया करत बसणार ?? ?
हवाहवाई बघितला. खूप खूप
हवाहवाई बघितला. खूप खूप आवडला. मुलांना घेऊन पाहाण्यासारख्या चित्रपटातला हा एक.
अमोल गुप्ते रॉक्स. पार्थो गुप्तेचा अभिनय खूप खूप सुंदर. नेहा जोशीचा अभिनय देखील चांगला आहे. मकरंद देशपांडे छोट्याशा सीनमध्ये देखील त्याच सशक्त अभिनय दाखवून देतो. रेखा कामत आजी नेहमीसारख्याच प्रेमळ गोड. पार्थोचे सर आणि त्यांचा भाऊ आणि नवी मैत्रिण सीन्स चांगले आहेत. पार्थो गुप्तेचे चारही मित्र अफलातून. एक दो तीन चार (आणि इथे पाच) चारो मिलकर साथ चले तो करदे चमत्कार.. त्या पोरांनी भंगारातून जे काही बनवलेत ना **** ... काय ते इथे नाही सांगणार चित्रपटात बघा..
काही गोष्टी खटकल्या पण तसं प्रत्येक चित्रपटात काही ना काही खटकत असतच आपल्याला, काय करणार, चुका शोधायची सवयच आहे आपल्याला.
अर्जुन आणि आलिया
अर्जुन आणि आलिया .........दोघे ही प्रचंड जाडे होते आधी............ दोघांनी ही मेहनतीने स्वतःचे वजन कमी केले" - >>>>>>>>>>>>> हल्ली लायपोसक्शन ने सर्व बारीक होउ लागलेत.....सोनम कपूर, सोनाक्षी , ही दोघेही.... ( कुठलाही सेलिब्रीटी मी लायपोसक्शन ने बारीक झालोय असं सांगणार नाही......
पोस्ट कार्ड अजून आहे का
पोस्ट कार्ड अजून आहे का मुंबईत? >> नाही. बहुदा डिव्हीडी किंवा मग टिव्ही वर लागल्यावरच पाहता येईल.
'सुंदरा मनामधी भरली' या लावणीनृत्यांच्या कार्यक्रमाने बृहन्महाराष्ट्रातील अभिजनांना लावण्यांच्या कार्यक्रमाकडे खेचून आणणार्या अमेरिकास्थित कलाकार.>> अच्छा पण मला इंग्लिश विंग्लिश मध्ये पाहील्यासारख्या आठवत नाहीयेत.
हवाहवाई पण पाहायचाय... तसंही स्पोर्ट्स वाले मुव्हीज खूप आवडतात.
टूरिंग टॉकीज पाहीला काल... तृप्ती भोईर ही अभिनेत्री फार्फार आवडते. खूप जिवंत अभिनय केलाय तिनं चांदीचा.
) मला तरी आवडला. काही डायलॉग्ज आवडले. गजेंद्र अहिरेंचे चित्रपट भाव भावना नातेसंबंध मस्त अधोरेखीत करतात.
मला तरी आर्ट मूव्हीज आवडत असल्याने (आणि विशेष समीक्षक पाडायला आवडत नसल्याने
१००
१००
हवाहवाई आजच मुलाबरोबर
हवाहवाई आजच मुलाबरोबर पाहिला.
नक्की दाखवा मुलांना. सुरेख आहे चित्रपट. सगळ्यांची कामं मस्त झाली आहेत. चित्रपट ह्रद्य आहे !
संपन्न घरातील मुलं आणि हलाखीच्या परिस्थितीत जगणारी मुलं ह्यांच्याभोवती एकत्र गुंफलेले प्रसंग खूप सकारात्मक पद्धतीने दाखवले आहेत हे फार आवडलं.
एकुणच अमोल गुप्ते बालमानसशास्त्र कोळून प्यायले आहेत हे जाणवतं.
चित्रपटाचा प्रवास आणि शेवट अगदीच अपेक्षित आहे पण ते तसंच बघण्यात गंमत आहे
ऊदयन पुढच्या भागात नवी
ऊदयन
पुढच्या भागात नवी हिरोइन येइल.
>>अच्छा पण मला इंग्लिश
>>अच्छा पण मला इंग्लिश विंग्लिश मध्ये पाहील्यासारख्या आठवत नाहीयेत.
Malapan. Mhanunach vicharla hota. Dr. Nerurkarancha 'dhanya ti gynac kala' he pustak changla ahe.
वेल, अगो, नक्की बघू हवाहवाई.
वेल, अगो, नक्की बघू हवाहवाई. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
मी पण बघीन हवाहवाई,आजोबा आणि
मी पण बघीन हवाहवाई,आजोबा आणि एक हजारची गोष्ट
ड्रिमी मला पण तृप्ती भोईर जाम
ड्रिमी मला पण तृप्ती भोईर जाम आवडते.
डॉ. मीना नेरुरकर बहुतेक शेवटी
डॉ. मीना नेरुरकर बहुतेक शेवटी लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये आहेत. त्यानी कुठेतरी लिहिल्याचे आठवते.
>>खूप जिवंत अभिनय केलाय तिनं
>>खूप जिवंत अभिनय केलाय तिनं चांदीचा.
अभिनय चांगला आहे पण मला खटकलेली गोष्ट म्हणजे ती मधुनच ग्रामीण बोलत होती आणि मधुनच एकदम शुद्ध मराठी! (अर्थात हा प्रॉब्लेम ग्रामीण भुमिका करणार्या बर्याच कलाकारांचा होतो)
किशोर कदम मात्र एकदम भावुन गेला.... काय जबरदस्त रेंज आहे या माणसाची!
डॉ. मीना नेरुरकर, त्या
डॉ. मीना नेरुरकर, त्या गाण्यामधे बॅकग्राउंडला आहेत.
त्या इथे उसगावात नाटकं बसवतात. मी त्यांच्या बर्याच नाटकानमधे काम केल आहे. ह्यावर्षी त्यानी पंडीत हृदयनाथ मंगेशकर ह्याच्या गाण्यांवर आधारीत एक नृत्यनाटिका बसवली आहे. मागच्या बीयमयम ला त्याचा पहीला प्रयोग केला होता. त्यानंतर बरेच प्रयोग केलेत. शेवटचे दोन प्रयोग २९ व ३० मार्च ला न्युजर्सीत होते. ह्या दोन्ही प्रोग्रामाना पं, हृदयनाथ मंगेशकर त्याच्या पत्नी व मुलगी राधा मंगेशकर उपस्थीत होत्या. ह्याचे आणखी प्रयोग होणार आहेत. कुठे ते कळवीनच.
ह्या कार्यक्रमाचे फोटो माझ्या फेसबुक वर बघायला मिळतील.
खटकलेली गोष्ट म्हणजे ती मधुनच
खटकलेली गोष्ट म्हणजे ती मधुनच ग्रामीण बोलत होती आणि मधुनच एकदम शुद्ध मराठी! >> हो हे बर्याच व्यक्तींबाबत / अभिनेत्यांबाबत होतं
याबाब्त विशेष सांगण्यासारखं (या धाग्यावर अवांतर तरी) आवर्जून सांगावसं वाटतंय नीना कुलकर्णी यांनी स्टार प्लस वर एक भूमिका साकारलीये ये है मोहब्बते नावाच्या सिरीयल मधील तमिळ स्त्री ची.... फक्त एखादा एपिसोड तिच्यासाठी बघा... वाटणारही नाही की ही बाई मराठी आहे. ती त्या शब्दांचे उच्चार बरोबर येतात का ते सेटवरील तमिळ लाईटमन्सनाही विचारायला कचरत नाही. डेडीकेशन असावं तर असं!
आणखी 'एक हजाराची नोट' बद्दल वाचलंय की यात विदर्भीय भाषेचा लहेजा वापरलाय आणि तो उषा नाईक आणि संदीप फाटक या गुणी कलाकारांनी सही सही उचललाय तो लहेजा. नक्की पाहणार हा मूव्ही.
किशोर कदम मात्र एकदम भावुन गेला.... काय जबरदस्त रेंज आहे या माणसाची!>> हा माणूस पाण्यासारखा प्रवाही आहे, कशातही मिसळा, कशातही ओता... इतका एकरूप होतो नं...
प्रेमातच पडलीये मी त्याच्या लेखनाच्या आणि अभिनयाच्या...
एक सलाम नावाचा मराठी चित्रपट आहे, तोही पाहायचाय. रिव्ह्यू चांगला आलाय त्याचा. पाहीलाय का कोणी?
ड्रीमगर्ल : मी पहिलाय सलाम
ड्रीमगर्ल : मी पहिलाय सलाम आणि लिहिलय इथे मागच्या पानावर. मला आणि आईला खूप आवडला.
>>डॉ. मीना नेरुरकर, त्या
>>डॉ. मीना नेरुरकर, त्या गाण्यामधे बॅकग्राउंडला आहेत.
अच्छा. बघायला पाहीजे परत.
टूटॉ मध्ये किशोर कदम सोडल्यास
टूटॉ मध्ये किशोर कदम सोडल्यास काही बघण्यासारखे नाही. पटकथा चांगली चांगली वाटतानाच पाणचट होऊन जाते.
हिरोपंती: हा मूवी फुकट जरी
हिरोपंती:
हा मूवी फुकट जरी दिसला तरी चुकून बघु नका. ...... कोणी विनंती केली बघायला तरी नको.
इतका फालतु मूवी गेल्या दहा वर्षात मी पाहिला नसेल. मी ट्रेलर सुद्धा दहा मिनिटं बघु शकले नाही.
एक तर तो जॅकी श्रॉफचा मुलगा , अर्धा नेपाळी, अर्धा लडाखी, अर्धा चीनी असा काहीसा दिसतो.
त्यात बुटका, आणि संवाद तर भारीच विचित्र बोलतो.
बाफ तरी जरा बरा होता तरुणपणी... असे आहे हे टायगर प्रकरण
हिरोपंती २३ तारखेला प्रदर्शित
हिरोपंती २३ तारखेला प्रदर्शित होणार आहे ना?
हो, मूवी रेलीज नाही झाला. मी
हो, मूवी रेलीज नाही झाला. मी वरती ट्रेलर सुद्धा दहा मिनिटं बघु शकले नाही ते आता लिहिले आहे (गोंधळ उडाला असेल). त्याचा ट्रेलर थेटरात दाखवत होते.
----------
त्यात एक कुठलस गाणं आणि त्याचे सीन्स होते. हवेत बासरी उडते मग तो उड्या मारतो. त्याच्या बापाचं हिरोचं सारखं ते गाणं वाजतं मधूनच. ते बघूनच वाटतेय की मूवी फालतु असेल.(अ. मा. म.)
एक तर तो जॅकी श्रॉफचा मुलगा ,
एक तर तो जॅकी श्रॉफचा मुलगा , अर्धा नेपाळी, अर्धा लडाखी, अर्धा चीनी असा काहीसा दिसतो.>>>
मला तो नेहमी जॅकीपेक्शा डॅनीचा मुलगा वाटतो
कधीपासून पाहायचा मुहूर्त लागत
कधीपासून पाहायचा मुहूर्त लागत नव्हता तो 'यलो' मुलाबरोबर पाहिला. आशय तर सुरेख आहेच पण त्याचबरोबर नेत्रसुखद आहे चित्रपट !
संवाद अगदी मस्त आहेत. डाऊन्स सिन्ड्रोमग्रस्त मुलांसकट सगळ्या कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. मृणाल कुलकर्णीचं हिंदी उच्चारांची झाक असलेलं मराठी एरवी खटकतं पण ह्या चित्रपटात अजिबात जाणवलं नाही तसं.
अजूनही मुंबई-पुण्यात एखाददुसर्या चित्रपटगृहात हा चित्रपट आहे. ज्यांचा बघायचा राहिलाय त्यांनी ह्या आठवड्यात बघायचं जमवा
मंजुनाथ पाहिला. सुरुवातीला
मंजुनाथ पाहिला. सुरुवातीला थोडा गंडल्यासारखा वाटतो. पण तरी खूप व्यवस्थित बनवलाय. मंजुनाथ षण्मुगम ह्या रियल हिरो वर आधारित आहे. जमल्यास बघा.
एक तर तो जॅकी श्रॉफचा मुलगा ,
एक तर तो जॅकी श्रॉफचा मुलगा , अर्धा नेपाळी, अर्धा लडाखी, अर्धा चीनी असा काहीसा दिसतो.>>>
मला तो नेहमी जॅकीपेक्शा डॅनीचा मुलगा वाटतो अरेरे
Pages