Submitted by स्वप्ना_राज on 26 October, 2013 - 03:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
४ अंडी, १०० ग्रेम बटाटा वेफर्स, १ कांदा बारीक चिरून, अर्धा टीस्पून जिरं, १ हिरवी मिरची बारीक चिरून, १ टोमेटो बारीक चिरून, १ टेबलस्पून तेल, मीठ, कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
pan मध्ये तेल गरम करा. त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत परता.
त्यात जिरं, मिरची, टोमेटो, कोथिंबीर घाला. टोमेटो मऊ होईपर्यंत शिजवा.
मग बटाटा वेफर्स, मीठ, थोडं पाणी घाला.
झाकण ठेवून १-२ मिनिटं शिजवा.
वेफर्स मऊ झाल्या की मिश्रण pan मध्ये सारखं पसरून घ्या.
प्रत्येक अंडं मिश्रणावर वेगळं फोडा.
सर्व मिश्रणावर नीट पसरा.झाकण ठेवून वर गरम पाणी घाला.
मंद आचेवर अंडी सेट होईपर्यंत शिजवा
माहितीचा स्रोत:
ही एक पारसी डीश आहे. माझ्या रेसिपीबुकमध्ये लिहिलेली आहे. स्त्रोत बहुतेक टीव्हीवरचा एखादा कुकरी शो असावा.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
chhaan disatay !
chhaan disatay !
व्वा .. म. स्त...
व्वा .. म. स्त...
मस्त प्रकार, स्वप्ना. मी
मस्त प्रकार, स्वप्ना.
मी कांदा टोमॅटो मध्ये थोडापावभाजी मसाला घालून करते. हे व्हेरीएशन करून बघेन. धन्स.
वाव.. वाचतानाच तो़पासु
वाव.. वाचतानाच तो़पासु झाले..
जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच करुन खाईन.
छान दिसतय यालाच 'wafer per
छान दिसतय
यालाच 'wafer per ida' असेही नाव आहे
वेफर्सची कल्पना वेगळीच आहे.
वेफर्सची कल्पना वेगळीच आहे. करुन बघेन नक्की
कच्चे वेफर्स की तळलेले ?
कच्चे वेफर्स की तळलेले ?
याला इड्डू वेफर्स असेही
याला इड्डू वेफर्स असेही म्हणतात, पारसी लोकांचे आवडते खाणे .
अवांतरः मागे एकदा विष्णु
अवांतरः मागे एकदा विष्णु मनोहर ने ग्रेव्ही ला दाटपणा येण्यासाठी वेफर्स मिक्सर वर फिरवून त्यात घातले होते. त्याची आठवण झाली.
हि रेसिपी मस्त वाटतीये. करून बघेन.
डुप्लिकेट धाग्यावरून इथे आले
डुप्लिकेट धाग्यावरून इथे आले तर इथे पण कच्चे कि तळलेले की बाजारचे (लेज इ इ बेक्ड) चालू आहे. सगळे नुसते 'वेफर्स वेफर्स' म्हणताय कुठले? बहुतेक कच्चे अस वाटतय..
>>यालाच 'wafer per ida' असेही
>>यालाच 'wafer per ida' असेही नाव आहे
अगदी बरोबर.
प्राप्ती, सिमंतिनी, हे तळलेले बटाटा वेफर्स घेतलेत - लेज वगैरेचे नाहीत. उद्या त्याचा पण फोटो टाकेन इथे म्हणजे कन्प्युजन नको.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/13853
यासारखीच वाटत आहे ही रेसिपी.
बटाटाच्या जागी वेफर्स वापरायची आयडिया मस्त आहे पण.
हा घ्या बटाटा वेफर्सचा फोटो
हा घ्या बटाटा वेफर्सचा फोटो
आमच्या विद्यार्थी दशेमधली
आमच्या विद्यार्थी दशेमधली नेहेमीची डिश!! धन्यवाद!
मी हे वेफर्स असेच खाऊन टाकीन
मी हे वेफर्स असेच खाऊन टाकीन
लेज पेक्षा हेच खरे वेफर्स असे
लेज पेक्षा हेच खरे वेफर्स असे स्प. प्रा म. आ.
हे वेफर्स आणि हातात पुस्तक.... किलो किलोचा वेफर्स आरामात संपायचा सुट्टीत...
दुसरे जाळी वेफर्स...
असो... विषयांतर झाले.
ब्रिटाटा झाले आता हा प्रकार
ब्रिटाटा झाले आता हा प्रकार पण लवकरच चाखणार..
झंपी, मी तर पुस्तक आणि हे
झंपी, मी तर पुस्तक आणि हे असले कच्चे वेफर्स किलो किलो ने संपवते
(आणखी अवांतर झाले.. सॉरी)
आज केले आहे. छान लागते. मस्त.
आज केले आहे. छान लागते. मस्त. सकाळच्या नाश्त्याला ब्रेडबरोबर सँडविचसारखे ठेऊन खाल्ले. ब्रेडला थोडे चवीपुरतीच केचप लावले होते. पुढच्या वेळी पिवळा भाग काढुन करणार आहे. त्याची चव विशेष आवडत नाही.
माझ्या पारसी मित्राने 'वेफर
माझ्या पारसी मित्राने 'वेफर पर इड्डु' अशा नावाची ही स्पेशिअॅलिटी डिश म्हणुन खास माझ्यासाठी डब्यात आणली होती. इतकी बंडल लागली. मला असले गुंई गुंई पदार्थ आवडत नाहीत. मला वेफर्स आवडतात. एगही आवडतं पण ही डिश ठीक ठीकच.
मस्त कुरकुरीत वेफर्सची वाट
मस्त कुरकुरीत वेफर्सची वाट ... बिचारे रडत असतील भ्याभ्या करून आमचा जन्म कशासाठी आणि कसा आणि कसे वापरताय तुम्ही आम्हाला भ्या भ्या. कुरकुरीत वेफर्सवर वरच्या पदार्थाचं (विदाऊट वेफर्स) टॉपिंग ठेवून पट्कन खायचं. जास्त मज्जा... असं मला तरी वाट्टं बुआ
वेफर्सची 'तौहीन', मी पण वेल
वेफर्सची 'तौहीन', मी पण वेल दी सारखं खाणार
वेल, वेफर्स मऊ होतात पण ह्यात
वेल, वेफर्स मऊ होतात पण ह्यात त्याची जी मुळची खमंग चव असते ना ती चव अंड्याबरोबर व कांदा-टोमॅटोच्या छान परतलेल्या मसाल्याबरोबर बरोब्बर जमुन जाते. अंडापोळी दिल्यावर तक्रार करणार्या लेकीने काल ते सगळे संपवले व आवडले असेही म्हणाली. नशिब आमचे.
वेफर्सवर टोपिंग म्हणुन खाणे ह्याची मजा वेगळीच असते.
मलाही वेफर्स असे खाण आवडणार
मलाही वेफर्स असे खाण आवडणार नाही. टॉपींग म्हणुन चालेल