आश्रमातील कुरापती

Submitted by शेषराव on 20 April, 2014 - 03:35

माझ्या ताईचे गाव नागपुर जिल्हयातील हिंगणा तालुक्या पासुन जवळपास 40 किमी अतरावर आहे. गावाचे नाव आगरगाव तांडा. आमच्या बंजारा समाजाची गावे तांडा म्हणुनच ओळखली जातात. माझे गाव सुद्धा तांडाच. मी सातविची परिक्षा पास झाल्यावर ताईच्या गावाला गेलो. त्या गावात माझे काही नवीन मित्र जमले. ते सर्व चारेक किमी अंतरावर असलेल्या आश्रम शाळेत शीकत होते. माझी त्यांच्या सोबत इतकी गट्टी जमली की मी परत येवुन बाबांकडे त्या आश्रम शाळेत शीकन्या साठी हट्टचं धरला व बाबांनी माझे नाव त्या शाळेत टाकले एकदाचे आणि मी 20 जुन 1997 ला एरणगावातील आश्रम शाळेत पहिला पाउल टाकला...

एका हातात पेटी आणि दुसर्या हातात पीशवी अशा थाटात मी शाळेच्या गेटवर गेलो तोच मागुन आवाज आला, ए पोरा.. मी दचकुन मागे वळलो, एका हातात चहाची केटली तर दुसर्यात काचेचे ग्लास, डोळे माझ्यावर रोखलेले, नवीन अँडमिशन का? मी मानेनेच होकार दिला. माझ्या माग ये असे बोलुन तो पुढे निघाला व मी माझी पेटी सांभाळत त्याच्या मागे मागे शाळेच्या वरांड्यात प्रवेश केला, तिथेच एक दरवाज्यावर लिहले होते, वर्ग 9 वा, थोडे पुढे गेल्यावर वर्ग 10वा, नंतर एक खोली, पुढे प्रयोग शाळा आणि शेवटी कार्यालय.आता माज्या उत्साहाची जागा भितिने घेतली होती. कार्यालयात मला सरानी माझे नाव, गाव विचारुन तसेच मला आठविची पुस्तक, वह्या आणि चादरी दील्या व दिलेल्या माहिती नुसार आगरगावच्या मित्राला बोलावले व मला त्याच्या सोबत पाठविले. तो थेट मला वर्ग नऊ मध्ये घेउन गेला आणि त्याच्या पेटी जवळ माझी पेटी ठेवायला लावली आणि मला खेळायला शाळेच्या मैदानावर गेला. अशा प्रकारे माझ्या आश्रम शाळेतील जीवनाला प्रारंभ झाला. हा तर ट्रेलर झाला, सिनेमा पुर्ण बाकी आहे....... क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीपण असाच आश्रमशाळेत शिकुन mpsc पास झालोय....
तुमच्या लिखानाची प्रतिक्षा आहे.... लवकर लवकर भाग टाका अन् मी पण बंजारा समाजाचाच आहे.