साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,
वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.
वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.
टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.
ओके तेजस्विनी... खस सरबत आणि
ओके तेजस्विनी... खस सरबत आणि इसेन्स वेगळ असत का?
हो.. हो जाई मी फ़ळाच्या
हो.. हो जाई मी फ़ळाच्या गराऐवजी vanilaa इसेन्स वापरला....
आज केलेल्या प्रयोगाचे टाकेल... आज जरा वेगळा प्रकार करणार आहे..
हो मुग्धा इसेन्स वेगळे
हो मुग्धा इसेन्स वेगळे मिळते..
थँक्स तेजस्विनी
थँक्स तेजस्विनी
तेजस्विनी१९ तुम्ही साय नाही
तेजस्विनी१९
तुम्ही साय नाही वापरली का?????
हो वापरलेना.. बाकी रेसपी
हो वापरलेना.. बाकी रेसपी नेहमी प्रमाणेचं ठेवायची कनन
तुम्ही वैगरे नको म्हणुस.. तु पण चालेल
मुग्धा काल आंबा वापरुन करुन
मुग्धा काल आंबा वापरुन करुन बघितले, खरंच अप्रतिम झाले होते आईसक्रिम. आईला पण फोन करुन सांगितले आहे करुन बघायला. आता नॅचरल्स चा धंदा थोडा बसेल वाटते तुझी रेसिपी इतकी प्रसिद्ध झाली आहे. पुढच्या वेळेस क्रिम थोडे कमी वापरुन बघिन.
अश्विनी..
अश्विनी..
नविन फ्लेवर - परपल प्लम
नविन फ्लेवर - परपल प्लम
अर्थात जांभुळ आईस्क्रिम ( जांभळाला ब्लॅक प्लम असेही म्हणतात असे ऐकले आहे)
जांभळाचा अतिशय सुरेख रंग आणि तितकीच सुरेख चव आली आहे.
१५/१६ जांभळं वापरली. सुरी वापरुन बियांच्या बाजुचा गर काढुन घेतला. बाकी रेसिपी वरच्यासारखीच.
आधी लिहील्याप्रमाणे ६/७ तास ठेवल्यावर दगड झालाच. पण खायच्या आधी अर्धातास फ्रिजमधे काढुन ठेवल्यास पुन्हा क्रिमी होते.
वा सावली छान दिसतय आइसक्रीम
वा सावली
छान दिसतय आइसक्रीम
वॉव सावली, खूप छान कलरफुल
वॉव सावली, खूप छान कलरफुल दिसतंय.
वॉव काय भारी रंग आलाय!
वॉव काय भारी रंग आलाय!
वाह! मस्त दिसतंय आईसक्रिम
वाह! मस्त दिसतंय आईसक्रिम
नविन फ्लेवर - परपल प्लम >>>
नविन फ्लेवर - परपल प्लम >>> वॉव लैभारी!
सावली, अप्रतिम फोटो!
सावली, अप्रतिम फोटो!
सावली अमेझींग फोटो.
सावली अमेझींग फोटो.
आहाहा.... काय अफलातुन दिसतय
आहाहा.... काय अफलातुन दिसतय जांभुळायस्क्रिम!!!
ही पॉप्युलर रेसिपी नक्की करुन बघण्यात येइल आमच्या उन्हाळ्यात
जांभूळ आईसक्रीम फोटो सुरेखच.
जांभूळ आईसक्रीम फोटो सुरेखच. ब्लॅक करंटपेक्षाही फ्रेश कलर दिसतोय.
सुर्रेख फोटो सावली!
सुर्रेख फोटो सावली!
मुग्धटली, मी मँगो फ्लेवरचे
मुग्धटली,
मी मँगो फ्लेवरचे आईसक्रीम करून पाहिले पण क्रिस्टल्स झाले त्यात.
(अर्थात, या आधी नुसतेच केले होते तेव्हा खूपच झाले होते, त्यामानाने कमी झाले)
पण ज्या फळाचा गर आपण घेतो तो थोडासा आटवून/ शिजवून घ्यावा लागेल काय, जेणेकरून क्रिस्टल्स होणार नाहीत?
जे दूध वापरलं ते गारच (पिशवीतलं डायरेक्ट तसंच).. तेही एकदा उकळून गार करून घ्यायला हवं होतं का?
इथे बर्याच जणांनी
इथे बर्याच जणांनी क्रिस्टलाईज होतंय ते लिहिलेलं वाचलं. दुसर्यांदा केलं हे. पण असा प्रॉब्लेम आला नाही.
पूर्वा, डिस्पोजेबल कप्समध्ये सेट करण्याची आयडिया भारी आहे. काल ट्राय केलं.
जांभळाचा कलर मस्तच.. एकदम
जांभळाचा कलर मस्तच.. एकदम फ्रेश
मी पण केले आईसक्रिम या
मी पण केले आईसक्रिम या रेसिपीने... पण वेगळ्या धाग्यावर लिहिते. या धाग्यावर प्रतिसादांमध्ये फ्लेवर हरवून जाईल.
सावली, तू पण तुझं हे पर्पल प्लम नव्या धाग्यावर लिही प्लिज.अ
मला मिल्कपावडची टेस्ट जाणवते.
मला मिल्कपावडची टेस्ट जाणवते. नाही आवडत ती टेस्ट. काही करता येइल का ?
मी स्ट्रॉबेरी केलेलं. थोडे
मी स्ट्रॉबेरी केलेलं. थोडे क्रीस्टल्स झाले खरं. मग परत ब्लेंडर मध्ये भरपूर ब्लेंड केल. बर्यापैकी क्रीस्टल्स सेट झालेले.
मीही नेहमी डिस्प्झेबल कप मधे ( कागदी अगदी छोटे (5 oz Dixie cup) मिळतात) त्यात कुल्फी किंवा आईसक्रीम सेट करते. काड्या डॉलर ट्री मधे मिळतात त्या वापरते किंवा बांबु स्क्युअर कट करून. २ फ्लेव्हरचे आईसक्रीम एकत्र सेट करून द्यायचे असेल तर अगोदर कप मधे पहिला फ्लेव्हर घालून सेट करते. मग दुसरा फ्लेव्हर त्यावर ओतून परत सेट करते. मस्त दिसते .
पिस्ता कोकोनट करून पहाते कस होतय.
पिस्ता कोकोनट करून पहाते कस
पिस्ता कोकोनट करून पहाते कस होतय.>>>> पिस्ते कसे घालणार तुम्ही सीमा
प्लीज सांगता का
चैतन्य फळाचा गर शिजवुन आटवुन
चैतन्य फळाचा गर शिजवुन आटवुन घेतला तर क्रिस्टल होणार नाहीत याची शाश्वती मी तरी देउ शकत नाही... एक सजेस्ट करेन की फळाचा गर हा ताजा घ्यावा बाजारात मिळणारे रेडीमेड पल्प घेउ नये.. दुध मी शक्यतो उकळुन थंड केलेल घेते.. मी रेडीमेड क्रीमऐवजी दुधावरची साय वापरत असल्याने दुध आपोआपच उकळवुन थंड केलेले वापरले जाते, त्यामुळे आजपर्यंत क्रिस्टल्स होण्याचा अनुभव मला तरी आला नाही..
जाई , मी भरड वाटून घेईन किंवा
जाई , मी भरड वाटून घेईन किंवा सगळेच मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवेन.
वरती मी जे ब्लेंडर लिहिलय तो हँड ब्लेंडर नसून मिक्सर आहे. ज्यांना क्रिस्टलचा प्रॉब्लेम येतोय त्यांनी मिक्सर मध्ये पल्प बरोबर फिरवू न घ्या. आणि नंतर परत थोडे फळांचे बारीक तुकडे वरून मिक्स करा.
मुग्धटली, फळाचा गर ताजाच
मुग्धटली,
फळाचा गर ताजाच घेतला होता.
त्यातल्या पाण्याच्या अंशाने क्रिस्टल्स झाले (इति मोठी बहीण)
म्हणून विचारलं की गर आटवला तर होणार नाहीत का...
असो, आज पुन्हा एकदा करून बघतो आणि कळवतो.
ओके चैतन्य.. दुधाचही लक्षात
ओके चैतन्य.. दुधाचही लक्षात ठेवा.
Pages