फ्रिज कुठल्या कंपनीचा घ्यावा?

Submitted by चैत्रगंधा on 2 May, 2014 - 07:28

गोदरेजचा ७ वर्षापूर्वी घेतलेला डबलडोअर फ्रिज निकालात निघाला आहे. डबलडोअर फ्रिजच्या किंमती ३०-४०,००० रेंज मध्ये असल्याने जो घेऊ तो टिकणारा हवाय. सद्ध्या सॅमसंग/ L.G. जास्त चालतात असे ऐकून आहे.
प्लिज सुचवा. Whirlpool बद्दल काय मत आहे?
असा कुठला धागा असेल तर प्लिज लिंक द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते शार्प. विजय सेल्समध्येच मिळेल फक्त. चारच वर्ष झालीत घेऊन. पण मस्त चाललाय. एकदाही सर्विसिंग किंवा काहीही लागलं नाहीये.

शार्पचा उत्तम आहे. अनेक दुकानांमध्ये मिळतो.
क्रोमाचासुद्धा. हा मात्र क्रोमातच मिळेल.

शार्प मला इतर ठिकाणी नाही मिळाला, क्रोमा, इझोन, मेट्रो, हायपरसीटी कुठेच नाही. शार्पचा एसी सुद्धा नाही. शेवटी विजय सेल्स झिंदाबाद, मुंबईत तरी. पण डील्स चांगले मिळतात. डिस्काऊंट सुद्धा मिळतो २-३०००

चैत्रगंधा, मी मध्यंतरी डबल डोअर फ्रिझच्या शोधात होतो. तेव्हा सर्व पॉप्युलर ब्रँडस चेक केले जसे L.G., Samsung, Godrej etc. पण ह्या सर्व फ्रिझना डिप-फ्रिझर कंपार्ट्मेंट वरील बाजुस आहे व व्हेजिटेबल कंटेनर सर्वात खालील बाजुस आहे. माझ्या एका मित्राने मला तेव्हा Panasonic फ्रिझ सजेस्ट केला. ज्याच्यात डिप-फ्रिझर कंपार्ट्मेंट एकदम तळाशी आहे तसेच व्हेजिटेबल कंटेनर मध्यभागी आहे. याचे लॉजिक असे - सर्वसाधारणपणे आपल्याला डिप-फ्रिझर कंपार्ट्मेंट जास्ती वेळा उघडावे लागत नाही. (मी तुम्ही सुद्धा वेजीटेरीयन आहात असे अ‍ॅस्युम केले आहे) आणी व्हेजिटेबल कंटेनर दररोज १०-१२ वेळा साधारणपणे उघडावे लागते. त्यामुळे ह्या फ्रिझमध्ये उभे राहूनच हे जमु शकते. बाकी फ्रिझमध्ये दररोज ह्यासाठी खाली वाकावे लागते त्यामुळे पाठ / कंबर यावर ताण येऊ शकतो.

मी फ्रिझ घेऊन ६/७ महिने झालेत. एकदम उत्तम चालतोय. (यापुर्वी आम्ही जुना गोदरेज १६५ लि. फ्रिझ जवळ जवळ १७-१८ वर्षे वापरला आहे.) त्यामुळे मी तुम्हाला Panasonic फ्रिझ जरुर सजेस्ट करेन.

पुण्यामध्ये टिळक रस्त्यावर महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वाजवी किमतीत इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तु मिळतात.

ज्याच्यात डिप-फ्रिझर कंपार्ट्मेंट एकदम तळाशी आहे तसेच व्हेजिटेबल कंटेनर मध्यभागी आहे. - मलापण खूप आवडला होता हा फ्रीज. पण १ फ्रीज चे ३ भाग केल्यामुळे actual usable space खूप कमी होते.. कुटुंब मोठे असेल तर मोठी पातेली मावत नाहीत.

ज्याच्यात डिप-फ्रिझर कंपार्ट्मेंट एकदम तळाशी आहे तसेच व्हेजिटेबल कंटेनर मध्यभागी आहे. - मलापण खूप आवडला होता हा फ्रीज. पण १ फ्रीज चे ३ भाग केल्यामुळे actual usable space खूप कमी होते.. कुटुंब मोठे असेल तर मोठी पातेली मावत नाहीत. >>>> नाही मॄणाल, यात ३ भाग नाहीत. दोनच आहेत. वरील भागात व्हेजिटेबल कंटेनर खाली आहे.

एलजी कस्टमर सर्विसचा पुण्यात बेकार अनुभव आलाय. फ्रीज सारखा बंद पडायचा. ते लोक मेकॅनिक पाठवतच नाहीत दहा वीस वेळा मागे लागल्याशिवाय. जो मेकॅनिक येतो त्याला रिपेअरिंग जमत नाही. किंवा तो फ्रीज चालू करुन जातो आणि पुन्हा काही दिवसांनी फ्रीज बंद पडतो. मग पुन्हा २-३ आठवडे घेणार ते लोक मेकॅनिक पाठवायला.
तात्पर्य- एलजी नका घेऊ पुण्यात असाल तर.

गोदरेज सुपर! माहेरी तो गेले २० वर्षापासुन आहे. ९३ साली घेतला होता. छोटा आहे, पण जबरी.:स्मित: सासरी सॅमसन्ग डबल डोअर ३ वर्षे झालीत.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
वेल, शार्प विजयसेल्स मध्ये आहे पण ईलेक्ट्रिसिटी कंझम्प्शन comparatively जास्त आहे . तुम्हाला लाईटबिल जास्त येते का?
अतुलनीय, Panasonic ची कंन्सेप्ट चांगली वाटतेय. नक्की बघेन. त्यांची सर्व्हिस कशी आहे ?

वेदिका२१, हो मी पुण्यातच आहे.

१५ अन १७ वर्षे चालणारा फ्रीज बदलायच्या वेळी दुसरी कंपनी आठवते तरी कशी?
>> इब्लिस वाचण्यात गडबड झालीये का? माझा गोदरेजचा फक्त ७ वर्षात बिघडला . पूर्वीचे गोदरेज टिकाऊ असायचेच म्हणून हट्टाने गोदरेज घेतला होता तर ही अवस्था. Sad आता परत गोदरेज घेण्याची हिंमत नाही.

चैत्रगंधा,
अनेकांचा अनुभव गोदरेजबद्दल चांगला आहे, मिनिमम १०+ वर्षे नीट चालतो. तुमचा ७ वर्षे हा काही वाईट कालावधी नाही, असे माझे मत. नव्या कंपन्यांचे फ्रीज वर्ष-दोन वर्षांत जीव सोडतात असा अनुभव मित्रमंडळींच्या फ्रीज खरेदीवरून आहे.
माझ्याकडचा २०+ वर्षे वापरलेला फ्रीज फारच जुना दिसतो, या सबबीवर एका कंपाऊंडरला देऊन टाकला, त्याच्याकडे तो गेली ३ वर्षे अजूनही व्यवस्थीत सुरू आहे.
नवा गोदरेजचाच घेतला आहे.

बाकी कन्झ्युमर ड्युरेबल घेताना चार ठिकाणी चौकशी करून घेताहात ही उत्तम गोष्ट आहे. तुम्हाला पसंत पडेल अशी चांगली वस्तू योग्य दरात मिळो ही शुभेच्छा!

चैत्रगंधा - पूर्वीचा गोदरेज २५० च्या आसपास लीटर आणि आत्ताचा शार्प ५६० लीटर. बिलात फारसा फरक नाही. पण तरी एकदा कम्पेअर करून पाहेन. मग इथे पोस्ट करेन.

अवांतर - आईच्या घरच्या फ्रीजचा दरवाजा निखळला. सिमेन्सचा २००१ मध्ये घेतलेला इम्पोर्टेड पीस. दोन वर्षापूर्वी गास्केट बदलले होते. आज त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे रेकॉर्डच नाहीये आमच्या फ्रीजचा.

आम्ही पण गोदरेज घेणार होतो...पण एलजी फ्रिज सिंगल बॉडी आणी इन्वटर टेक्ननॉजी आहे म्हणून घेतला.. भावाकडे ८ वर्षे एलजी सुस्थितीत आहे..

माझ्या भावाने शार्पचा फ्रिज घेतला दोन वर्षांपूर्वी. एकही तक्रार नाही, उत्तम चालतो, आणि किंमत सर्वांपेक्षा कमी.
माझ्याकडे क्रोमाचा आहे, आणि तोही उत्तम सुरू आहे. किंमत कमी आणि इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा सामान मावण्याच्या दृष्टीने अंतर्गत रचना उत्तम आहे.

मी परवा फ्रिज बघुन आले. सॅमसंगचा आणि एल.जी. चा जरा नविन टेक्नॉलॉजी वाले वाटले. आतमध्ये भाज्यांसाठी वेगळा ट्रे आणि त्याच्या वरच फळांसाठी वेगळा ट्रे ही मांडणी मला जास्त आवडली.

दोन्ही मध्ये फ्रिजरमध्ये एक कुलिंग पॅड आहे ज्याच्यामुळे लाईट गेली तरी ८ की १२ तास फ्रिज थंडच राहतो.

मला घ्यायचा आहे फ्रिज, पण वर्षातुन जवळ जवळ १० महिने बंद असणार, आणि उरलेले २ महिने हि सलग नाहि वापरला जाणार. तर कुठला फ्रिज घ्यावा? आणि काळजी कशी घ्यावी. कि फ्रिज घेवुच नये?

माझा गोदरेज चा आहे डबल डोअर चा... ७-८ वर्ष झालीत आणि आज्जी आजोबांनी कॅलिव्हेनेटर चा घेतलेला ८८ साली .. तो ही अजुन उत्तम स्थितीत चालु आहे

Pages