Submitted by झक्की on 10 April, 2009 - 12:19
हा बातमी फलक उघडण्याचे कारण असे की, जे मायबोलीकर बृहन्महाराष्ट्राच्या फिलाडेल्फिया येथे जुलै २, ३, ४, ५ - २००९ या दिवशी भरणार्या अधिवेशनाला येणार असतील त्यांनी आपली नावे, आपल्याबरोबर कोण कोण असतील, तसेच कुठल्या गावाहून किंवा राज्यातून येणार आहोत, ते इथे लिहावे.
जमल्यास सगळे जण थोड्या वेळासाठी तरी एकत्र येऊन एकमेकांना भेटू अशी माझी इच्छा आहे.
पहिले नाव माझे. आनंद म्हसकर (झक्की) व सौ. हेमा (ही बहुधा माझ्याबरोबर सार्वजनिक जागी नसते, तेंव्हा मायबोली च्या लोकांना भेटणार नाही)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असे ई-पत्र
असे ई-पत्र आल्याचं पाठवणारीने ही सांगितले....
त्यावर बायका साड्या खरेदी करायला गेलेल्या आणि क्रेडीटकार्डे झिजलेली सुध्दा पाहीली.
विनय
फोटो पोस्ट
फोटो पोस्ट करा नन्तर. नटून थटून सुन्दर दिस्नार सर्वेजनी.
मामी दोन
मामी दोन हजार बायकाना 'कोल्हापुरी साज' हवे आहेत. पाठवता का?
(हा कोल्हापुरी साज मी फक्त एका लावणीत ऐकला होता..)
मी आधीच लिहिल्याप्रमाणे, 'एका सुसंकृत कुटुम्बाची सोय होऊ शकेल अधिवेशनाच्या वेळी'....
कुणाला हवे असल्यास सांगा मला... (ताबडतोब, त्वरीत, तात्काळ)...
विनय
विनय, सोय
विनय, सोय चकटमफू होणार आहे की कसे? ते सांगा, म्हणजे लोक उत्तरे देतील.
प्राजक्ता
होय .. ही
होय .. ही सोय चकटफूच आहे.... ट्रेनने जायचे यायचे तिकीट काढावे लागेल. पार्किंगची कटकट नाही. मी स्वतःच रहायला गेलो असतो पण आमच्या प्लॅन मधे बसत नाही आहे...
विनय
आधि नाय का
आधि नाय का सान्गायचे? मी एजंटच आहे. रोज अत्तर विकिते एखाद्दिवशी साज? तेवढे कमीशन चे बघा
अश्विनी,
अश्विनी, मैत्रिणीला आलेली मेल सहीच आहे. बीएमएम इतक्या आधी पासून ठरलेलं असतं मग ड्रेस कोडचं आधीच डिक्लेअर करावं की. म्हणजे बायका एकदम तयारीनिशी जातील.
हा घ्या
हा घ्या
>>>> Fri July 3rd: Lunch
>>>> Fri July 3rd:
Lunch (Peshwaai): Paithani saadi with nath and all (or nauwari will also be fine!!)
Dinner (Kolhapuri): Green saadi (with kaath-padar, similar to "irkali) wtih kolhapuri "saaj" and all
Sat July 4th:
Lunch (Nagpuri): Shaalu (lagnaacha shalu waparla jaat naahi na...mhanun: -))
अरे पण पुरुषान्ना ड्रेस कोड का नाही ? त्यान्नी तसच यायच???? हा अन्याव आहे
) समजुन त्यान्चे हारतुरे घालून स्वागत करत आहेत....... बघा बघा विचारतर करुन बघा......
अस व्हायला काय हरकत आहे?
अरे कल्पना करा की झक्की मस्त दुटान्गी धोतर नेसुन वर झब्बा/कुडता/सदरा घालुन गळ्यात मफलरसारख उपरण गुन्डाळून, डोक्यावर पुणेरी पगडी, अन ती पुणेरी नको असेल तर काहीतरी नागपुरी घालुन, नटुन थटुन हसतमुखाने आलेत, अन सन्योजकान्ची स्वागतसमिती त्यान्ना "पुण्याहून आलेले पाहुणे" (पौडाहून नव्हे हो, पुण्याहूनच
ववि२००९ ची
ववि२००९ ची माहिती या बीबी वर एक पोस्ट टाकली, सन्दर्भ अर्थातच तुमच्या या बीबीचा


तर तुमच्या बाबत "कौतुकास्पद" म्हणुन लिहिलेला हा मजकुर कात्रीच्या तावडीत सापडला तर काय म्हणुन इथेही चिकटवतो आहे
आशा आहे, आपण माझी चान्गल्या अर्थाची मनोभावना समजुन घ्याल आणि काही मार्गदर्शनदेखिल कराल
*******
Limbutimbu | 1 जुलै, 2009 - 14:14
सहजच सुचल, म्हणून इथे मान्डतो
http://www.maayboli.com/node/7123?page=1
ही लिन्क आहे बृहन्महाराष्ट्र अधिवेशन २००९ सम्बन्धी
उघडणारे zakki
उघडल्याची तारीख 10 एप्रिल, 2009
इव्हेण्ट डेट आहेत जुलै २, ३, ४, ५ - २००९
एकूण डोकी येणार २१, प्रत्यक्ष मायबोली आयडी १५ च्या आसपास
अन एकूण पोस्ट पडल्यात ६९
कोण कोण कुठून येणार याची आयडीनिशी माहिती दिलेली आहे
जवळपास तिन-साडेतिन महिने आधीच बीबी उघडून, या ना त्या निमित्ताने तिथे पोस्टत राहून, काही शे वा हजार किलोमीटर वरुन येणार्या वा न येणार्यान्चा "उद्धार" करत, केवळ प्रत्यक्षात येऊ शकणार्या पन्धरा आयडीज साठी साठ सत्तर पोस्ट्स्चा रतिब घालून त्या इव्हेण्टचा टीआरपी (महत्व या अर्थाने) वाढविण्याचे या परदेशस्थान्चे कसब वाखाणण्यासारखे नाही का? अनुकरणीय नाही का?
लिंबू चांग
लिंबू
चांगली 'मनोभावना' जरा स्पष्ट करुन सांगा पाहू ? उगाच खुसपटे काढण्यासाठी पोस्ट लिहिलंय असं मला तरी वाटतंय.
तीन चार दिवसांकरता माणशी दोन अडिचशे डॉलर तिकिटाचे अन जेवणाखाणाचे खर्च होतील. वर्षाकाठी १० किंवा पंधरा दिवस सुट्या मिळतात त्यातल्या एक-दोन इथे काढाव्या लागतील. येण्या जाण्याचा, हॉटेलात रहाण्याचा, बेबी सिटींगचा खर्च वेगळा. शिवाय मंडळी शेकडो - हजारो मैलांवरून येणार. पडल्या १००-२०० पोस्टी तर कोणाच्या पोटात का दुखावं ?
माझी
माझी चान्गल्या अर्थाची मनोभावना >>>

ठीके. असेलही. फक्त हे पोस्ट त्या ववि बीबीवर कशासाठी, ते नाही कळलं. ते सांगितल्यास आगाऊ आभार..!
ववि माहिती वर पोस्ट बघितलं, तेव्हा हसू आवरलं. आता राहवलं नाही, सॉरी मंडळी. तुमचं चालू द्या.
---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!
<<त्यान्नी
<<त्यान्नी तसच यायच???? >>
तसंच म्हणजे? कपडे घालायचे हो! अगदीच लंगोटि नि खांद्यावर कांबळं असे नाही यायचे.
मी मात्र या वेळी पार्ल्याहून आणलेला झब्बा पायजमा घालून जाणार आहे.
मंडळी, व. वि. वाल्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका! काहीहि करू दे त्यांना. पण वाचून एक किडा डोक्यात आला. उद्या बीएम एम वाले म्हणले की अहो, आम्ही दोन वर्षे खपून एव्हढी सगळी व्यवस्था केली, अगदी जेवणासकट, नि तुम्ही फुकट तुम्हा मायबोलीकरांचे संमेलन त्यातच उरकून घेतले? आता द्या आम्हाला २५००० डॉ.
मग विनय नि समीर यांच्या प्रयोगाचे ५०,००० डॉ. चे बिल पाठवू आपण त्यांना!
कॅमेरा आणा. आपल्या सर्वांचा फोटो झालाच पाहिजे.
>>>> पडल्या
>>>> पडल्या १००-२०० पोस्टी तर कोणाच्या पोटात का दुखावं ?
तेच मी मान्डले
कुणाच्या पोटातही दुखत नाही की विषय "डोक्यातही जात" नाही हेच तर मूळ दुखणे आहे ना!
माझ्या पोस्टीचा अर्थ साफ आहे, वर उल्लेखिलेली आकडेवारी (यात मेलामेली अर्थातच धरलि नाहिये) हेच दाखविते की "घाऊक/बहुसन्ख्य सहभागासाठी वातावरण निर्मीती" व सहभागिन्साठी उपयुक्त माहिती देण्यासाठी किती किती काय काय कुणाकुणाला करावे लागते, केले जाते! अर्थातच मायबोलीवरील हे बीबी हेच प्रत्यक्ष दृष्य रुप असल्याने तुमच्या बीबीचा उल्लेख केला
शेवटी मी "द्विस्वभाव राशीचा आहे" 

बाकी काही नाही
प्रकाशित बाबिन्व्यतिरिक्तचे असन्ख्यप्रकारचे कामकाज पडद्या आड चालत असते अन दुर्दैवाने ते गुप्ततेच्या की अजुन कशाच्या नावाखाली पडद्या आडच रहाते, हे माझे दुखणे आहे. यामुळे केवळ याच नव्हे तर अशा उपक्रमान्साठी नविन कार्यकर्त्यान्ना प्रेरणा मिळाली, मार्गदर्शन मिळाले असे होत नाही.
अर्थात हे माझे मत! ते मी आधी नेमक्या वविच्याच बीबी वर सन्यत भाषेत मान्डले, तेथुन ते उडवले गेले, येथिल वाहून जाईल!
मे बी, इट्स जस्ट लाईक "अरण्यरूदन"
माझ्या पोस्टीतून (मोस्टली पूर्वग्रहामुळे) वाईटच अर्थ काढायचे झाले तर वाट्टेल तितके निघतील! हवे तर मीच देतो काढून..... !
माझ्या वविच्या बीबीवरील वरच्या पोस्टीचा अर्थ साफ सुथरा आहे की, ते (म्हणजे तुम्ही) जर येवढे येवढे करू शकतात तर आपण काय करतोय????
पण असा प्रश्ण तिथे स्पष्टपणे विचारला नाही कारण फाटे फोडणारे लगेच उसळून येणार नी म्हणणार की "लिम्ब्या, तू काय करतोहेस? वविला तरी येणारेस का? अजुन नोन्दणी केलीस का? कस्ल्या कामात सहभागी झालास का? नुस्त्या उन्टावरुन बसून शेळ्या हाकायची कामे करु नकोस! " अन अर्थातच, अधीक विषयान्तर नको, सूज्ञास मोजक्या शब्दात बरेच काही समजू शकते असे गृहित धरुन, स्वतःकडे "वाईटपणा" घेऊन, मी तिथे ते पोस्टलो!
उदाहरणादाखल तुमचा हा बीबी रेडीमेड अन ताजा ताजा सापडला, म्हणून या बीबी चा उल्लेख!
तुम्हा
तुम्हा सर्वांच्या प्रवासाला शुभेच्छा. नन्तर व्रुतान्त लिहायचा हं
मला तर वाटते प्लॅनिन्ग मधे जास्त वेळ व विचार दिला तर execution मधे कमी problems येतात.
BMM ला
BMM ला येणार्या सर्वाना जाहीर आमंत्रण....
BMM चे Schedule आजच प्रसिध्द झालंय.
आमचा 'उभ्या उभ्या विनोद' हा कार्यक्रम तिसर्या दिवशी सकाळी ९ वाजता आहे.
कॄपया सकाळीच उठा आणि हसायला या...
http://www.bmm2009philadelphia.org/bmm2009/ProgramSchedule.htm
---------------------------------------------
* आलात तरच हसाल... आलात तर हसालच... *
सर्वांना
सर्वांना शुभेच्छा ! वृत्तांत लवकर येवु द्या
आज
आज संध्याकाळी कोणी येणार आहे का आशा च्या कार्यक्रमाला? मी अन आई जाणार आहोत.
रविवारी दुपारी कार्यक्रम संपतील त्यानंतर सर्व मायबोलीकरांना माझ्या घरी आग्रहाचे आमंत्रण आहे.
चहा पासून डिनर पर्यंत . इथे कळवलंत तर मी पत्ता, डिरेक्शन्स मेल करीन .
कार्यक्रम
कार्यक्रमाचं वेळापत्रक गडबड आहे...वेळ दिसत नाहीये आणी १०३अब नंतरचे कार्यक्रमही दिसत नाहियेत...असो! तिथे गेल्यावरच बघु...
मी सगळे
मी सगळे कार्यक्रम आणि वेळा पत्रिकेत बघु शकतोय.
Print मात्र करता येत नाहीय...
आणि जाहीरातीतले कार्यक्रम आणि वेळापत्रिकेतले कार्यक्रम यांच्या जोड्या जुळता जुळत नाही आहेत.
समीरची 'माय सरोसती' दिसत नाही यादीत...
वेळ असेल तर भेटायला ये समीर आणि कार्यक्रमालासुध्दा...
विनय
काय गडबड
काय गडबड आहे काही कळत नाही...परवापर्यंत एक्सेल फॉर्मॅटमधे चांगलं दिसत होतं. आज काहीतरी बदललंय...त्यामुळे कुठले कार्यक्रम बघायचे (खरं तर सगळेच बघायचे आहेत) ते काही ठरवता येत नाहिये अजुन. तिथे गेल्यावर वेळापत्रक मिळालं तर बरं होईल...
विनय...कार्यक्रमाच्या शुभेच्छा!
विनय,
विनय, कार्यक्रमासाठी शुभेच्छा. भेटूच तिथे.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
अरेच्चा!
अरेच्चा! मी तर मंगळवारी पीडीएफ पाहिल्या होत्या अन प्रिंट पण केल्या होत्या .
इथे आहेत की
http://www.bmm2009philadelphia.org/bmm2009/pdf/scheduleJuly2.pdf
तारीख बदलून पहा , सगळ्या दिवसांच्या आहेत.
ह्म्म. मी
ह्म्म. मी प्रिन्ट केलं होतं त्यापेक्षा वेगळ्या दिसतायत फाइल्स सगळ्या. फक्त २ तारखेची बदललेली नाहीय. माझ्याकडच्या प्रतीमधे विनय अन समीरचे कार्यक्रम ओव्हरलॅपिंग होते...
त्या PDF आज
त्या PDF आज सकाळपर्यंत Valid होत्या..आता परत बदलाबदली झालेली आहे.
आता 'माय सरोसती' दिसत नाही. अजून बरेच कार्यक्रम नाहीसे झाले आहेत, किंवा वेळा बदलल्यात...
विनय
विनय समीर -
विनय समीर - गुडलक !
चित्रेबुवा - लोंबकळत रहा [हँग ईन देअर]
~~
उस डोंगा परी रस नाही डोंगा , काय भुललासि वरलिया रंगा.
सर्वांना
सर्वांना शुभेच्छा! वृत्तांत जरूर लिहा.
सर्वांना
सर्वांना शुभेच्छा !!! हसवणारे उभे राहुन हसवत असले तरी तुम्ही बसूनच हसा, उगीच रिस्क नको
आमच्यासारख्यांसाठी वृत्तांत लिहालच 
विनय, समीर
विनय, समीर तुमच्या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा!!
सुप्रिया, तु कबुल केल्याप्रमाणे वृत्तांत लिहिशीलच; पैठणी, डीझायनर साड्या, दागिने, मेनु ई. सगळ्या डीटेल्ससह
विनय, समीर
विनय, समीर कार्यक्रमासाठि शुभेछ्छा! बाकि सगळेझण मस्त मजा करुन या. सुप्रिया वृत्तांत एकदम फर्मास पाहिजे :).
********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!
Pages