बारीक रवा-१ वाटी, साखर- २ वाट्या, दूध- १ वाटी (गायीचे,म्हशीचे कोणतेही), पातळ केलेले साजूक तूप- अर्धी वाटी, नेस्टले एव्हरीडे मिल्क पावडर- २ टेबलस्पून, खायचा रंग आणि इसेन्स जोडीने (म्हणजे गुलाबी खायचा रंग= रोझ इसेन्स, हिरवा रंग = पिस्ता इसेन्स, ह्याप्रमाणे), १०-१५ काजूंची पूड (दाण्याच्या कुटासारखी जाडसर)
रवा+साखर+दूध+तूप पातेल्यात एकत्र करून दीड तास ठेवावे. नंतर कढईत एकत्र करून गॅस वर मंद आचेवर सतत ढवळत राहावे. सुरुवातीला खूप तूप कडेने दिसेल
पण साधारण १५ मिनिटांनी तूप एकत्र होऊन मिश्रण घट्टसर' व्हायला सुरुवात होते .
जसजसे मिश्रण घट्ट होईल तसतसे बाजूने साखर दिसायला लागेल. समजा साखर दिसली नाही तरी साधारण २०-२५ मिनिटांनी मिश्रण घट्टसर होईल पण गोळा नाही होणार. नंतर गॅस वरून खाली काढून घट्ट मिश्रणात मिल्क पावडर,रंग आणि इसेन्स घालून पुन्हा नीट एकत्र करावे.
ताटाला तूप लावून गोळा थापावा.
हा गोळा गरम असतानाच थापावा लागतो त्यामुळे हातात प्लास्टिक ची पिशवी घालून थापावा,त्यावर लगेच काजूची पूड पसरवावी आणि परत थापावे म्हणजे पूड थोडी आत जाईल आणि मिश्रण आळून येईल. थोडे गार झाल्यावर वाटीच्या तळाने लेव्हलिंग करून घ्यावे आणि अर्ध्या-एक तासाने वड्या पाडाव्यात!
मी लाल रंग पावडर फॉर्म मध्ये आणि रोझ इसेन्स वापरला. पण त्यामुळे त्यांना केशरी रंग आला. खायचे रंग शक्यतो लिक्विड च वापरा, जास्त छान दिसतात.
मिल्क पावडर आणि काजू पूड ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. काजू पूड नसेल तर मिश्रण आळत नाही आणि वड्या पडत नाहीत. अनुभवावरून सांगते.
ह्या वड्या जरा वेळखाऊ आहेत पण मस्त लागतात आणि आठवडाभर बाहेरही मस्त टिकतात.
समजा काही कारणाने भट्टी बिघडली, मिश्रण आळलेच नाही आणि वड्या पडल्या नाहीत तर सगळे मिश्रण पुन्हा कढईत थोडे तूप सोडून गरम करा, खाली उतरवून मिल्क पावडर आणि काजू पूड एकत्र घाला आणि थापा, सुटून येतील पण मऊ पडतील, तेंव्हा डब्यात घालून, वर टिशू पेपर नि झाकून फ्रीज मध्ये ठेवा आणि खायच्या वेळेस काढून परत डबा फ्रीज मध्ये ठेवा.
एवढ्या टीपा का दिल्यात ते कळलं असेलंच
छान वाटताहेत. एक शंका आहे रवा
छान वाटताहेत. एक शंका आहे रवा न भाजता घेतल्याने कचकच लागत नाही का वड्यांमधे?
धन्यवाद शुभांगी. कचकच नाही
धन्यवाद शुभांगी. कचकच नाही लागत कारण आपण १-दीड तास रवा दूध-तुपात भिजवून ठेवतो आणि नंतर अर्धा तास शिजवतो!
ओके. करुन बघते. फोटो सुरेखच.
ओके. करुन बघते. फोटो सुरेखच.
व्वा, मस्तच गं!!! खाल्ल्या
व्वा, मस्तच गं!!! खाल्ल्या पाहिजेत एकदा तुझ्या हातच्याच
मस्तं वड्या. सुंदर
मस्तं वड्या. सुंदर दिसतायत.

टीपा का दिल्यात ते कळ्ळं बरं!
मस्त दिसत आहेत . पण अर्धा तास
मस्त दिसत आहेत .
पण अर्धा तास शिजवायचे . माझा पत्ता कटाप.
रवा मला मुळातच आवडत नाही.
रवा मला मुळातच आवडत नाही.
त्या ऐवजी दुसरं काही वापरता येईल का?
दक्षिणा - रवा सोडून दुसरं
दक्षिणा - रवा सोडून दुसरं काहीतरी रव्याच्या वडीत कसं वापरता येईल? मग ती दुसर्या कशाची तरी वडी होईल ना.
सुरेख.........करुन बघते. फोटो
सुरेख.........करुन बघते.
फोटो मस्त......
वडी यम्मी दिसतेय दक्षिणा,
वडी यम्मी दिसतेय

दक्षिणा, बेसन वापरून पहा
हर्षा नक्की.
हर्षा नक्की.
मस्त रेसीपी आहे! नक्की करणार!
मस्त रेसीपी आहे! नक्की करणार! दक्षिणा, रव्या ऐवजी तांदळाची पीठी पण चालू शकेल बहुतेक!
साती धन्यवाद! ३-४ वेळा
साती धन्यवाद!
३-४ वेळा केल्या म्हणून वाटलं कि आता जमलं आपल्याला म्हणून दुप्पट प्रमाणात केल्या आणि 
मृणाल, सुटीच्या दिवशी साईड
मृणाल, सुटीच्या दिवशी साईड बाय साईड स्वयपाकघरात काम करताना होऊ शकतील
वेल- अगदी खरय दक्षिणा- ह्या
वेल- अगदी खरय
दक्षिणा- ह्या वड्या खाल्ल्या तर वाटणारच नाही कि त्यात रवा आहे. ऑलमोस्ट काजूकतली सारख्याच लागतात. आवड असेल तर नक्की करून पहा.
morap, तन्मयी आणि कुसुमिता
morap, तन्मयी आणि कुसुमिता धन्यवाद.
करून पहा आणि फोटो शेअर करा.
वड्या सुंदरच दिसतायत. रंग
वड्या सुंदरच दिसतायत. रंग आकार, मुलायमता छान
गायू तू दिलिस करून तर खाऊन
गायू तू दिलिस करून तर खाऊन पाहिन
मग करिन. चालेल का?
छान दिसताहेत वड्या. फक्त तो
छान दिसताहेत वड्या. फक्त तो लाल रंग नाही आवडला. पांढर्या छान वाटल्या असत्या.
मस्तच आहे रेसिपी. लगेच करुन
मस्तच आहे रेसिपी. लगेच करुन बघाव्या असं वाटतं आहे.
फक्त सीमासारखाच मलाही वड्यांचा रंग नाही आवडला. नुसत्या पांढर्या नाहीतर मग थोडेसे केशर दुधात खलून घातल्यास सुंदर रंग येईल.
मस्त मुलायम वड्या!
मस्त मुलायम वड्या!
छान आहे रेसेपी. रंगाऐवजी
छान आहे रेसेपी.
रंगाऐवजी रूहाआफजा घातल एक टोपण तर ? मस्त फिका गुलाबी रंग येईल की मिश्रण खराब होईल?
छान आहे .फक्त साखर. जास्त
छान आहे .फक्त साखर. जास्त वाटते.काजुकंदासारखी चव लागत आसावी
पांढर्या खरच जास्ती छान
पांढर्या खरच जास्ती छान दिसल्या असत्या. इथे एक ७ कप स्वीट्ची रेसिपी आहे तशीच कृती वाटते साधारण.
मी पण करते रव्याच्या वड्या पण रव्या-खोबर्याच्या आता काजू पण घालून बघीन पेढच्या वेळेस.
मनीमोहोर धन्यवाद! दक्षिणा-
मनीमोहोर धन्यवाद!
दक्षिणा- नक्की!!
धन्यवाद सीमा आणि अगो.. त्या
धन्यवाद सीमा आणि अगो..
त्या लाल रंगासाठीच मी वर लिहिलंय कि लिक्विड रंग वापरा, पावडर नका वापरू. आणि पांढऱ्या नाही छान वाटत,कदाचित व्हनीला इसेन्स घातला तर चांगला वाटेल.
धन्यवाद देवकी , अनघा,
धन्यवाद देवकी , अनघा, सुभाषिणी, शूम्पी!
अनघा- रूह अफझा चा काही अंदाज नाही! थोडं मिश्रण बाजूला काढून ट्राय करून बघायला पाहिजे
सुभाषिणी- अर्धी वाटी कमी वापरून बघा..पण खूप गोडट्ट नाही लागत..
शूम्पी- पांढरा रंग खूप डल वाटतो कारण शुभ्र पांढरा नाही येत! नारळाच्या वडीला मळी काढतात तसं काही करता येतं का बघायला पाहिजे!
का नाही होणार शुभ्र
का नाही होणार शुभ्र पांढर्या? काजूमुळे का? मी रव्या-खोबर्याच्या केल्या त्या झाल्या शुभ्र (माझ्यामते
)

शूम्पी, मस्तच.
शूम्पी,
मस्तच.
येस्स. हाच तो पांढरा कलर
येस्स. हाच तो पांढरा कलर अपेक्षित होता मला.
कित्ती देखण्या वड्या केल्या आहेस शुम्पे.
Pages