अंडी पालक

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 April, 2014 - 06:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६-७ अंडी
एक जूडी पालक
दोन छोटे किंवा एक मोठा कांदा चिरून
१ चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
अर्धा चमचा हळद
१ चमचा मसाला
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा गरम मसाला
चवी नुसार मिठ
अर्धा किंवा पाव लिंबू
फोडणी पुरते तेल.

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून चिरा द्या.
२) पालक गरम पाण्यात थोडा वाफवून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या.

३) भांड्यामध्ये तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवा.

४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून जरा परतवा.

५) आता वरील मिश्रणावर पालक घालून थोड ढवळा व त्यात गरजे नुसार मिठ, लिंबू रस व गरम मसाला घालून ढवळा.

६) ह्या मिश्रणाला थोडी उकळी आली की त्यात उकडलेली अंडी सोडून हलक्या हाताने ढवळा व झाकण देऊन थोडी वाफ येऊ द्या.

तयार आहे अंडी पालक.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ अंड हवच.
अधिक टिपा: 

चिरा देताना अंड्याचे तुकडे होउ देऊ नका. बलक लागे पर्यंतच चिर द्या म्हणजे पालक मसाला आत मुरेल.

चविला अप्रतिम लागते ही डिश. माझ्या दोन्ही मुलींना प्रचंड आवडला हा प्रकार.

माहितीचा स्रोत: 
मी स्वतःच बनवला हा प्रकार.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जागु मस्त डिश! बर्‍याच दिवसांनी आलीस. मी भुर्जी करताना कधी कधी मेथी टाकते. आता अशीही करुन बघेन.

काय गं जागू....काय ़ झालं?
एकदम पालकावर? Wink आम्हा घासफूसवाल्या एगिटेरियन गरिबाची आठवण झाली वाट्तं! Proud
असो...मी असंच आलू पालक करते. सेमच.
अरारारा... त्यातल्या त्यात परत अंड्याऐवजी उकड्लेला बटाटा....काय हे अधःपतन! Light 1
पण आता अंडं घालूनच करीन.

मस्त आहे. नक्की करून बघणार.
तुझं नाव वाचून अंडी पालक हे चिकनच्या डिशचं नाव असेल असं वाटलं Proud

जगुदि पाककृती खरच नवीन आहे. अंडे आणि पालक एकत्र हा कधी मी विचारच केला न्हवता. तुझी पाककृती म्हणजे नेहमीप्रमाणेच सुंदर आणि सादरीकरण सुद्धा अगदी साजेसे.
युनिवर्सिटी मध्ये डॉर्म वर असताना मला फक्त पालक हि एकाच भाजी आवडायची आणि तिचेच काहीतरी प्रकार आम्ही करायचा प्रयत्न करायचो. पण आम्हाला कधी त्यात अंडे घालावयाची कल्पना नाही सुचली.

मस्तं पाककृती, जागू!

अंडं-पालक भुर्जी, मेथी-अंडं भूर्जी प्रकार करते. पण हा पदार्थ नव्हता माहिती.

सृष्टी, चिनुक्स, देवकी, धनश्री, माधूरी, आर.एम.डी, राखी, सुजा, देवकी, वर्षूदी, अनन्या, मृण्मयी धन्यवाद.

दिनेशदा, विद्या पुढच्या वेळी मेथी घालून बघेन. Happy

मानुषी उकडलेले बटाटे चांगले लागतील ग. पण अंडीच कर. मस्त लागते चव.

ह्याच पाककृतीत अंडी उकडून न घालता सरळ फोडून घातली तरी छान लागतात. पण अंडी फोडून घातल्यावर भाजी हलवू नये. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावी. मसाला अंड्यात चांगला मुरतो.

हंगेरीमध्ये हा प्रकार बराच लोकप्रिय आहे, विशेषतः दुपारी हापिसात डबे पुरवणार्‍या सर्विसेसवाल्यांकडे.. फक्त पालकाच्या सूप-भाजीमध्ये चटकदार काही नसते Sad निव्वळ उकडलेला पालक असतो आणि थोडे क्रीम असते त्यात..
ही रेस्पी भारी लागेल..

पालक अंड कॉम्बिनेशन मस्त दिसतयं पण मला पालक पनीर सारख पालक अंड आवडेल कांदा वैगरे दाताखाली येण्यापेक्षा

मस्त आहे रेसिपी. फोटोही तोंपासु !
अशीच पालकाची पेस्ट करुन पालक-पनीर, पालक-सोयचंक्स, पालक-आलू, पालक-फ्लॉवर, पालक-चिकन, पालक-मटण असं सगळं करुन पाहिलंय. कसं कोण जाणे अंडं घालायची कल्पना सुचलीच नव्हती Happy

Pages