Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 April, 2014 - 06:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
१) प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून चिरा द्या.
२) पालक गरम पाण्यात थोडा वाफवून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या.
३) भांड्यामध्ये तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवा.
४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून जरा परतवा.
५) आता वरील मिश्रणावर पालक घालून थोड ढवळा व त्यात गरजे नुसार मिठ, लिंबू रस व गरम मसाला घालून ढवळा.
६) ह्या मिश्रणाला थोडी उकळी आली की त्यात उकडलेली अंडी सोडून हलक्या हाताने ढवळा व झाकण देऊन थोडी वाफ येऊ द्या.
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी १ अंड हवच.
अधिक टिपा:
चिरा देताना अंड्याचे तुकडे होउ देऊ नका. बलक लागे पर्यंतच चिर द्या म्हणजे पालक मसाला आत मुरेल.
चविला अप्रतिम लागते ही डिश. माझ्या दोन्ही मुलींना प्रचंड आवडला हा प्रकार.
माहितीचा स्रोत:
मी स्वतःच बनवला हा प्रकार.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा . . मस्तच जागु..
व्वा . . मस्तच जागु..
वावा..जबरी लागतो हा प्रकार.
वावा..जबरी लागतो हा प्रकार. आमच्या मातोश्री करतात.
chhan aahe. rang paN mast..
chhan aahe. rang paN mast.. thoDee methee paN ghaalataa yeeel.
chhan aahe. rang paN mast..
chhan aahe. rang paN mast.. thoDee methee paN ghaalataa yeeel.
वा जागु मस्त डिश! बर्याच
वा जागु मस्त डिश! बर्याच दिवसांनी आलीस. मी भुर्जी करताना कधी कधी मेथी टाकते. आता अशीही करुन बघेन.
वा जागू, मस्त आणि सोपी डिश
वा जागू, मस्त आणि सोपी डिश आहे ग!
प्रकार आवडला. नेहमीची अंडा
प्रकार आवडला. नेहमीची अंडा करी करतेच पण या प्रकारात पालेभाजी असल्याने जास्त चांगले.
छान वाटतोय प्रकार. करून
छान वाटतोय प्रकार. करून बघण्यात येईल.
नेहमी प्रमाणे मस्त फोटो
नेहमी प्रमाणे मस्त फोटो जागू..
आता ह्या पद्धतीने अंडा करी करणार..
काय गं जागू....काय ़
काय गं जागू....काय ़ झालं?
एकदम पालकावर? आम्हा घासफूसवाल्या एगिटेरियन गरिबाची आठवण झाली वाट्तं!
असो...मी असंच आलू पालक करते. सेमच.
अरारारा... त्यातल्या त्यात परत अंड्याऐवजी उकड्लेला बटाटा....काय हे अधःपतन!
पण आता अंडं घालूनच करीन.
मस्त आहे. नक्की करून
मस्त आहे. नक्की करून बघणार.
तुझं नाव वाचून अंडी पालक हे चिकनच्या डिशचं नाव असेल असं वाटलं
काय जबरी फोटो ग . आणि सोप्पा
काय जबरी फोटो ग . आणि सोप्पा दिसतोय
वॉव.......जागु.......टॉप
वॉव.......जागु.......टॉप रेसिपी.... टू गुड
जागू, तू साहित्यही किती
जागू,
तू साहित्यही किती सुंदररित्या मांडलंस!
जगुदि पाककृती खरच नवीन आहे.
जगुदि पाककृती खरच नवीन आहे. अंडे आणि पालक एकत्र हा कधी मी विचारच केला न्हवता. तुझी पाककृती म्हणजे नेहमीप्रमाणेच सुंदर आणि सादरीकरण सुद्धा अगदी साजेसे.
युनिवर्सिटी मध्ये डॉर्म वर असताना मला फक्त पालक हि एकाच भाजी आवडायची आणि तिचेच काहीतरी प्रकार आम्ही करायचा प्रयत्न करायचो. पण आम्हाला कधी त्यात अंडे घालावयाची कल्पना नाही सुचली.
मस्तं पाककृती, जागू!
मस्तं पाककृती, जागू!
अंडं-पालक भुर्जी, मेथी-अंडं भूर्जी प्रकार करते. पण हा पदार्थ नव्हता माहिती.
मस्त पदार्थ. फोटो छानच.
मस्त पदार्थ. फोटो छानच.
सृष्टी, चिनुक्स, देवकी,
सृष्टी, चिनुक्स, देवकी, धनश्री, माधूरी, आर.एम.डी, राखी, सुजा, देवकी, वर्षूदी, अनन्या, मृण्मयी धन्यवाद.
दिनेशदा, विद्या पुढच्या वेळी मेथी घालून बघेन.
मानुषी उकडलेले बटाटे चांगले लागतील ग. पण अंडीच कर. मस्त लागते चव.
ह्याच पाककृतीत अंडी उकडून न
ह्याच पाककृतीत अंडी उकडून न घालता सरळ फोडून घातली तरी छान लागतात. पण अंडी फोडून घातल्यावर भाजी हलवू नये. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावी. मसाला अंड्यात चांगला मुरतो.
हंगेरीमध्ये हा प्रकार बराच
हंगेरीमध्ये हा प्रकार बराच लोकप्रिय आहे, विशेषतः दुपारी हापिसात डबे पुरवणार्या सर्विसेसवाल्यांकडे.. फक्त पालकाच्या सूप-भाजीमध्ये चटकदार काही नसते निव्वळ उकडलेला पालक असतो आणि थोडे क्रीम असते त्यात..
ही रेस्पी भारी लागेल..
मस्त ! अंड & पालक हा विचारच
मस्त ! अंड & पालक हा विचारच कधी केला नाही. आता करते
वा जागू मस्त खूप दिवसांनी
वा जागू मस्त खूप दिवसांनी तुझी रेसिपी आली
मर्दानी मी तसे कालवण करते.
मर्दानी मी तसे कालवण करते. झटपट होते.
टण्या, मृणाल, शलाका धन्यवाद.
हैद्राबादी लोकं घोंगुरा
हैद्राबादी लोकं घोंगुरा एग्ग(त्यांच्या भाषेत) करतात.
आज केली आहे. फारच छान झाली
आज केली आहे. फारच छान झाली थॅंक्स.
सुंदर फोटो! रेसीपी सोपी आहे.
सुंदर फोटो! रेसीपी सोपी आहे. करून पहाणेत येईल...
मस्त आहे हा प्रकार. पालकातच
मस्त आहे हा प्रकार. पालकातच थोडी मेथी घातली तरी चालेल.
पालक अंड कॉम्बिनेशन मस्त
पालक अंड कॉम्बिनेशन मस्त दिसतयं पण मला पालक पनीर सारख पालक अंड आवडेल कांदा वैगरे दाताखाली येण्यापेक्षा
आज केले आहे.फक्त अंड्याऐवजी
आज केले आहे.फक्त अंड्याऐवजी पनीर घातले.दिसायला मस्त दिसतेयं.
मस्त आहे रेसिपी. फोटोही
मस्त आहे रेसिपी. फोटोही तोंपासु !
अशीच पालकाची पेस्ट करुन पालक-पनीर, पालक-सोयचंक्स, पालक-आलू, पालक-फ्लॉवर, पालक-चिकन, पालक-मटण असं सगळं करुन पाहिलंय. कसं कोण जाणे अंडं घालायची कल्पना सुचलीच नव्हती
Pages