आंतरजालाची तटस्थता : ०३ आठवडे राहिलेत

Submitted by गामा_पैलवान on 27 April, 2014 - 15:07

नमस्कार लोकहो!

अमेरिकेच्या संघीय संपर्क महामंडळाने (फेडेरल कम्युनिकेशन कमिशन अर्थात FCC) १५ मे पासून नवी नियमावली राबवायची ठरवली आहे. त्यानुसार गुगल, अमेझॉन, अॅपल, इत्यादि बड्या कंपन्या त्यांच्या संकेतस्थळावर जाण्याचा मार्ग अधिक सुकर करू शकतात. ही तुमच्याआमच्यासारख्या सामान्य जालवासीयांची गळचेपी आहे.

थोडं विस्कटून सांगतो.

आजपावेतो आंतरजाल हे एक तटस्थ माध्यम आहे. आपण मायबोलीवर येऊन लेख वाचतो का यूट्यूबवर जाऊन चलचित्र पाहतो, का पेढीच्या (बँकेच्या) स्थळावर जाऊन व्यवहार करतो याच्याशी आपल्या जालवितरकास (आयेसपी = ISP = internet services provider) देणंघेणं नसे. किंबहुना जालसुविधेचा पुरवठा करतांना वितरक केवळ राशी (डेटा) किती गेली तेव्हढेच पहात असे. ही राशी दरमहा १ वा २ वा ४ जीबी अशी मोजली जाते. याचबरोबर वितरक आपल्याला जालवेग नेमून देतो. तो ५ वा १ वा २० एमबीपीएस असा मोजला जातो. या व्यतिरिक्त वितरकाचा इतर काही हस्तक्षेप नसतो.

मात्र नव्या नियमांनुसार जालवितरक हस्तक्षेप करू शकेल. यानुसार बडी आस्थापने (कंपन्या) जालवितरकास पैसे देऊन त्यांच्या संकेतस्थळास प्राधान्यक्रम मिळवून देऊ शकतात. एक उदाहरण पाहूया. तुमचा जालवितरक टाटा आहे. समजा तुम्ही पंचांग पहात आहात. तुम्हाला निर्णयसागर पहायचे आहे. तुम्ही गुगलवर जाऊन त्यावर शोध घेतलात. जरी गुगलचे कालनिर्णयशी (कथित) लागेबांधे असले तरी निर्णयसागर हे स्थळ गूगलला दाखवलेच पाहिजे. तसे त्यांनी दाखवले नाही तर आपण बिंग वा दुसरे शोधस्थळ वापरू शकतो. आता कल्पना करा की तुमचा जालवितरक टाटा आहे. त्यांचे दाते पंचांगाशी व्यावसायिक लागेबांधे आहेत. दात्यांनी टाटाकडून संपर्कप्राधान्य खरेदी केलेय. अशा वेळी तुम्ही निर्णयसागरच्या संकेतस्थळी गेलात तर तुम्हाला दाते पंचांगाच्या तुलनेने कमी राशीपातगती (डेटा ट्रान्स्फर स्पीड) मिळेल. ही तुमच्या अधिकारांची गळचेपी आहे. तुम्ही राशीबोधासाठी (डेटा काँटेंट = data content) पैसे भरलेले नाहीत. राशीतून काय माहिती आतबाहेर जाते हे पाहणे वितरकाचे काम नाही. दुसरे शोधयंत्र वापरायचे स्वातंत्र्य आपल्याला आहे तसे जालवितरक बदलण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही (जरी तत्त्वत: असले तरी ती प्रक्रिया किचकट व दीर्घकालीन आहे). अर्थात देशविरोधी माहिती असेल तर सरकारी कायदे पाळावे लागतात ही बाब वेगळी.

अधिक परिपूर्ण माहितीसाठी (इंग्रजी दुवा) : http://www.savetheinternet.com/net-neutrality-resources

तर सांगायचा मुद्दा काय आहे की, अमेरिकेत ही पद्धती सुरू होणार आहे. लवकरच ती भारतात येईल. तेव्हा जागं होण्यापेक्षा आतापासून तयारी केलेली बरी. तर सर्वांनी या ठिकाणी जाऊन आपला पाठींबा द्यावा. स्वत:चे मत नोंदवले तर उत्तमच! Happy

आपला नम्र,
-गामा पैलवान

तळटीप : लेख घाईघाईत लिहिलेला आहे. त्यामुळे काही चुका जाणवल्या तर क्षमा असावी. त्रुटी दाखवल्या तर लगेच दुरुस्त करेन. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोड्क्यात आयएसपीज टियर्ड सर्व्हिस आणणार आहेत; त्यात गैर काय? नेट-न्युट्रलिटी अंतर्गत नेटफ्लिक्सवरचा तुमचा आवडता चित्रपट कण्हत-कुढत चाललेला बघायला आवडेल?

राज,

नेटफ्लिक्स वापरायचे झाले तर त्यासाठी अधिक पातगती विकत घेऊ शकतो. राशीबोध कसाही असला तरी जालतटस्थतेमुळे राशीपातावर ग्राहकाचे नियंत्रण आहे. (Due to the net neutrality principal the consumer controls the data transfer speed irrespective of its content.)

मात्र वितरकाने आपणहून नेटफ्लिक्सला प्राधान्य द्यायचे ठरवले तर ग्राहकाची गोची होणार. हे नियंत्रण ग्राहकाच्या हातून सुटणार. यात पारदर्शकतेचा अभाव आहे. जरी पारदर्शकता आणायची झाली तरी ते खूप किचकट काम होईल.

आ.न.,
-गा.पै.

साधना :D..

मला थोडे कमीच समजले.
स्पीड कमी होईल का शोधण्याचा?
कुठलाही नेता भारतात निवडून आला तरी महागाई काही कमी होत नाही, असाच काहीसा इफेक्ट तर नाही?
कारण मुळात नेटला स्पीडच नसेल तर जे सर्च दिसतील ते आपले योग्य असाच भारतीयाचा दृष्टीकोन असतो.

की काही ठराविक शोधच दिसतील?

>>हे नियंत्रण ग्राहकाच्या हातून सुटणार <<
एक गोष्ट लक्षात घ्या. कंझ्युमर इज वे डाउन इन फूड चेन; तो काहि कंट्रोल करत नाहि - व्ह्युअर्शिप व्यतिरिक्त.

अमेरिकेतील कॉमकास्ट्-नेटफ्लिक्स डिलमध्ये कॉमकास्ट नेटफ्लिक्सला फि आकारणार आहे - त्या मोबदल्यात कॉमकास्ट त्यांना वाढीव बँडविड्थ आणि कॉमकास्टच्या डेटासेंटर मध्ये अ‍ॅडिशनल सर्वर्स वगैरे देणार आहेत. हे सगळं व्हायचं कारण कि ग्राहकांनी नेटफ्लिक्सकडे तक्रार केली - प्राईम टाइम स्ट्रीमींग रेट सक्स. (यात नेट स्पीडचा संबंध नाहि. नेटवर्क हाप्स अँड बॅडविड्थ प्ले ए बिगर रोल हियर) अर्थात युजर एंक्स्पिरियंसचा दर्जा सुधारण्यासाठी नेटफ्लिक्सला कॉमकास्टकडे (कारण ते गेटकिपर आहेत) साकडं घालणं भाग आहे कि बाबांनो आमच्याकडुन पैसे घ्या पण आम्हाला प्रेफंरेशियल ट्रीटमेंट ध्या. साहजीक आहे कि हि कॉस्ट कंझ्युमर्स क्डे पासऑन केली जाणार - बट दे आस्क्ड फॉर इट!

माझ्यामते - दिज कंपनीज आर जस्ट रीअ‍ॅक्टींग टु मार्केट कंडिशन्स; नथिंग राँग इन इट.

गापै, तुमची तळ्मळ समजु शकलो नाहि. इंटरनेट मध्ये तुम्हाला सोशलिझम आणायचा आहे कि काय?? Happy

राज,

आंतरजालावरून जरी चलचित्र पाहता येत असले तरी आंतरजाल म्हणजे दूरदर्शन नव्हे. Happy चित्रपट बघण्यासाठी वेगळी माध्यमे उपलब्ध आहेत.

१.
>> कंझ्युमर इज वे डाउन इन फूड चेन; तो काहि कंट्रोल करत नाहि - व्ह्युअर्शिप व्यतिरिक्त.

ग्राहक पैसे मोजतोय. आणि आंतरजाल सेवा ही प्रेक्षासुविधा नाही. त्यामुळे अन्नसाखळीचं उदाहरण अप्रस्तुत आहे. ग्राहकाला हवं असलेलं स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. जालतटस्थता नसल्यास जालवितरक त्याला नको असलेली स्थळे झाकोळू (=ब्लॉक करू) शकतो.

२.
>> अर्थात युजर एंक्स्पिरियंसचा दर्जा सुधारण्यासाठी नेटफ्लिक्सला कॉमकास्टकडे (कारण ते गेटकिपर आहेत)
>> साकडं घालणं भाग आहे कि बाबांनो आमच्याकडुन पैसे घ्या पण आम्हाला प्रेफंरेशियल ट्रीटमेंट ध्या.

अगदी बरोबर. मग त्यासाठी वेगळं जाळं निर्माण करा. आंतरजाल (=इंटरनेट) वापरू नका. आंतरजालावर http वापरला जातो. तसेच इतर पायाभूत सुविधा (=इन्फ्रास्ट्रक्चर) वापरल्या जातात. या सुविधा एका विशिष्ट राशीसाठी म्हणजे नेटफ्लिक्स चित्रपटांसाठी प्राधान्याने वापरणं कितपत बरोबर?

३.
>> थोड्क्यात आयएसपीज टियर्ड सर्व्हिस आणणार आहेत; त्यात गैर काय?

या स्तरित सुविधांसाठी जी यंत्रणा निर्माण होणार आहे तिचा दुरूपयोग होऊ शकतो. तिच्यावर नियंत्रण ठेवणं कर्मकटकटीचं आहे. ही यंत्रणा ग्राहकांसाठी पूर्णपणे अपारदर्शक आहे.

४.
>> माझ्यामते - दिज कंपनीज आर जस्ट रीअ‍ॅक्टींग टु मार्केट कंडिशन्स; नथिंग राँग इन इट.

I too don't mind them reacting to the market conditions. Let them respond to the market the way they feel suitable. But not at the cost of consumers' freedom and privacy.

५.
>> इंटरनेट मध्ये तुम्हाला सोशलिझम आणायचा आहे कि काय?? स्मित

समाजवादात शासनाचे सर्वांगीण नियंत्रण असते. इथे तर शासन काहीच करत नाहीये!

तसंही पाहता आज आंतरजाल तटस्थ आहेच. जालवितरकाचे नियंत्रण आणल्यास जालतटस्थता नाहीशी होईल.
आणि मी तर हे नियंत्रण नको म्हणतोय. Happy मग मी समाजवादी कसाकाय? Uhoh

असो.

जालतटस्थतेच्या बाजूने मत देणाऱ्यांत व्हिंटन सर्फ, टिम बर्नर्स-ली असे दिग्गज आहेत. विकीवरील वाक्य :

>> Vinton Cerf, considered a "father of the Internet" and co-inventor of the Internet Protocol,
>> as well as Tim Berners-Lee, creator of the Web, and many others have spoken out in favor
>> of net neutrality.

व्हिंट सर्फच्या शब्दांत :

>> The Internet was designed with no gatekeepers over new content or services. The Internet is
>> based on a layered, end-to-end model that allows people at each level of the network to
>> innovate free of any central control.

जालावर केंद्रीय नियंत्रण नसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

महत्त्वाचा विषय आहे व लेखही आवडला. मराठी शब्द क्लिष्ट आहेत पण बाजूला इंग्रजी शब्दही दिले असल्याने हरकत नाही.

या मुद्द्यावर कोणती एक बाजू पूर्णपणे बरोबर आहे हे ठरवणे अवघड आहे. वरती सर्च इंजिन व प्रॉडक्ट्स याचे उदाहरण जे दिले आहे त्यात तटस्थता महत्त्वाची आहे. पण काही हजार लोक नेटफ्लिक्स वरून एकाच वेळी व्हिडीओ पाहू लागले तर इतर लोकांच्या स्पीड वर त्याचा परिणाम होईल. म्हणजे काही लोक नेट बळकावून बसतील तेव्हापुरते. त्यामुळे नेटफ्लिक्सने अशावेळी प्रोव्हायडर कडून जास्त दराने बॅण्डविड्थ घ्यावी. बहुधा हाउस ऑफ कार्ड्स चा दुसरा सीझन आला तेव्हा दोन तीन दिवस असे झाले होते.

याला अचूक उदाहरण शोधत होतो. हे असू शकेल काय - समजा उद्या पिझा हट ने अमेरिकेत व्हॉनेज व भारतात बीएसएनएल ला पैसे दिले व त्यामुळे इतर पिझा वाल्यांना लोकांनी केलेल्या कॉल्स मधे नॉइज, अडथळे येउ लागले तर ते बेकायदेशीर होईल काय? (येथे मी आवर्जून निर्माण केलेले अडथळे म्हणत नाहीये - फोन लाईनची आवश्यक बॅण्डविड्थ पूर्णपणे न वापरल्याने होणारे अडथळे).

मामा.. उत्तम विषय.

फारएण्ड - उद्या मी माझी नविन "नेट्फ्लिक्स" सेवा चालू केली तर "comcast" माझी सेवा कमी जाल-वेग देवून तिचा दर्जा खराब करू शकेल... उद्या "comcast" स्वत:ची "नेट्फ्लिक्स" सेवा चालु करून सद्ध्याच्या "नेट्फ्लिक्स" चा दर्जा कमी करू शकेल.

पण हेच नियम वापरून "नेट्फ्लिक्स/युट्युब" मुळे इतर सेवांची होणारी दर्जा घसरण ही थांबवता येईल. पण मला तसा चांगला उपयोग होईल असे वाटत नाही.

google पूर्वी जाल-तटस्थतेच्या बाजूचे होते आता मात्र विरूद्ध आहे असे वाटते...

>>आंतरजाल सेवा ही प्रेक्षासुविधा नाही. <<
चुकीची समजुत आहे हि. प्रेक्षासुविधा नाहि मग हायस्पीड नेटवर्कसाठी जास्त पैसे लोकं का देतात?

इंटरनेटचं स्वरूप खुप बदललेलं आहे, गेल्या १०-१५ वर्षात. आज घराची सिक्युरिटी, क्लायमेट कंट्रोल, इरिगेशन कंट्रोल मला इंटरनेट्च्या माध्यमातुन करता येतात. अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी प्रचंड बँडविड्थची गरज आहे आणि ती पुरवण्याची जबाबदारी आयएसपींवर आहे. मग त्यांनी कंटेंट प्रोव्हायडर्संना पैशाच्या मोबदल्यात अधिक सुविधा दिल्या तर त्यात काय बिघडले? याचा अर्थ असा होत नाहि कि बाकिच्या स्मॉल टायमर्सना सापत्न भावाची वागणुक मिळेल. शेवटी - यु गेट व्हॉट यु पेड फॉर...

बायदवे, विन सर्फ सध्या गुगलमध्येच नोकरी करतात. गुगल अमेरिकेत मोठ्ठा फाय्बर ऑप्टीक्स प्रकल्प राबवत आहे - १जीबी स्पीडचा. याचा अर्थ, गुगल इज ट्रांझिशनींग फ्रॉम कंटेंट प्रोव्हायडर टु कंटेंट प्रोव्हायडर दॅट हॅ़ज इट्स ओन आयएसपी. तर या परिस्थितीत विनसाहेब गप्प का? Happy

बॉटम लाइन, नेट न्युट्रलिटी आहे फक्त त्याची व्याख्या बदललेली आहे...

राज,

>> अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी प्रचंड बँडविड्थची गरज आहे आणि ती पुरवण्याची जबाबदारी आयएसपींवर आहे.

नेमक्या याच मुद्द्यावर मतभेद आहेत. जालवितरक (आयेसपी) केवळ जोडणी देतात. त्यांनी राशीबोधाद्वारे (डेटा काँटेंट) अतिरिक्त दाखल घेणे अभिप्रेत नाही. जर अतिरिक्त वहनक्षमता (बँडविड्थ) देता येत नसेल तर दुकान बंद करावे. Happy बाकीचे बघून घेतील.

असो.

इथले इंग्लंडमधले एक उदाहरण देतो. इथे व्हर्जिन मीडिया हे आस्थापन आंतरजाल (स्थापितजोड = ब्रॉडबँड), दूरचित्रवाणी व दूरध्वनी तिन्ही सेवा देते. दूरचित्रवाणीसाठी टिव्हो खोका आहे. त्याला आंतरजाल जोडणी लागते. ही जोडणी घरी दिलेल्या मार्गदामधून (रूटर) मिळवता येते. त्याचा जालपत्ता १९२.१६८.०.### असा आहे. मात्र टिव्हो खोक्यात व्हर्जिन मीडियाकडून येऊन बसणारे कार्यक्रम या जोडणीवरून येत नाहीत. त्यासाठी टिव्हो खोक्यास दुसरा जालग्राहक (नेट अॅडॅप्टर) बसवला आहे. त्याचा जालपत्ता १०.###.###.### असा आहे. व्हर्जिन मीडिया जालग्राहकाच्या जालजोडणीवरून दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रसारित करू शकत नाही. असा नियम इथल्या नियामक मंडळाने केला आहे. दूरदर्शनसाठी १०.###.###.### हे स्वतंत्र उपजाल (सबनेट) वापरावे लागते. या उपजालाकरिता व्हर्जिन मीडियाने पैसे मोजले आहेत.

अशा तऱ्हेचे नियमन व्हावे हा हेतू आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

गापैंनी लिहिल्याप्रमाणे अमेरिकेत आधी नेटन्युट्रालिटीच्या विरोधात प्रयत्न केले गेले. पण शेवटी FCC ने नेटन्युट्रालिटी अबाधित ठेवली जाईल असा निर्णय घेतला.
हा प्रश्न भारतापर्यंत पोहोचला नव्हला तोपर्यंत अर्थातच त्याच्याकडे डोळेझाक केली गेली. पण आता TRAI ने भारतातही OTT (over-the-top applications and services) साठी वेगळे दर लागू करण्याची तयारी चालवल्याचं दिसतंय.
म्हणजे ठराविक रक्कम मोजून इंटरनेट पॅक घेतलेलं असलं तरी युट्युब, फेसबुक, व्हॉटसॅप, ट्विटर, फ्लिपकार्ट इत्यादी सुविधा वापरायच्या असतील तर प्रत्येक सुविधेसाठी वेगळे दर मोजून वेगळे पॅक्स घ्यावे लागणार !
ह्याविषयी अनेक दिवसांपासून तुटक-तुटक वाचण्यात येत होतं. पण सगळी भाषा आकलनक्षेत्राच्या बाहेरची वाटल्याने दूर्लक्ष केलं. काल All India Bakchod (तेच ते--सुप्रसिद्ध रोस्टवाले) च्या टीमने बनवलेला एक व्हिडिओ पाहण्यात आला. एकदम सोप्या भाषेत समजावलं आहे. त्यातून जेवढं कळलं तेवढ्यावरून मी TRAI च्या निर्णयाच्या विरोधात आहे.
१. हा व्हिडिओ
आणि ही काही आर्टिकल्स -
२. Everything you need to know about Net Neutrality in India
३. Big fight over net neutrality: How Airtel, Voda and Trai are trying to screw internet users

व्हिडिओ जरूर पहा आणि पटला तर सेव्ह द इंटरनेट च्या संस्थळावर जाऊन आपलं मत नोंदवा. मी निर्णयाच्या विरोधात मेल पाठवून आले.

धन्यवाद मिर्ची हा धागा वरतीआणल्याबद्दल.

गा पै कृपया मिर्चीताईंनी दिलेल्या लिंक्स आपण वरती धाग्यात अपडेट करा आणि थोडा भारतासंबंधी बदल करा म्हणजे सगळ्यांना आपापल्या सोईचे इमेल ट्रायला पाठवता येईल.

http://www.savetheinternet.in/ ही लिंक वरती दिलीच आहे. त्या लिंक वर Edit Answers मध्ये गेलात तर तुम्हाला सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरे वाचता येतील.

मी सुद्धा या निर्णया विरोधात मेल पाठवतो आहे.

धनि,

>> गा पै कृपया मिर्चीताईंनी दिलेल्या लिंक्स आपण वरती धाग्यात अपडेट करा

क्षमस्व. माझा तो अवतार धारातीर्थी पडला आहे.

आ.न.,
-गा.पै.

अरे ते माझ्या लक्षातच आले नाही. असो!

वेमा किंवा अ‍ॅडमिन वरती बदल करू शकतील का? नाहीतर नविन धागा काढायला.

धनि,
प्लीज वेगळाच धागा काढाल का? म्हणजे इतरांची मते, भारत सरकारचे पुढचे निर्णय सगळं एका जागी वाचता येईल.

गापैंच्या बोटावर मराठी शब्दकोशाचे मऊ आच्छादन बसवून घेतलय का ?>> Happy Happy
स्तुत्य अभिनिवेश ! ( तसल्याच मराठीत कौतुक.) कोणत्याही किचकट तांत्रिक / सामाजिक आशय-विषयावर परभाषेच्या कुबड्या न घेता भाष्य करण्यासाठी.

सेव्ह द इंटरनेट च्या संस्थळावर जाऊन आपलं मत नोंदवा. मी निर्णयाच्या विरोधात मेल पाठवून आले.

>> +१