नमस्कार
नुकतेच माझे काही सहकारी नोकरीनिमित्त ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालेत. तसेच सध्या ऑस्ट्रेलिया मधील नोकरीच्या संधीबाबतीत काही इमेल्स येत आहेत. माझा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, त्यानुसार IELTS ची तयारी सुरू केलीय. तसेच Immigration process आणि नोकरीच्या उपलब्ध संधी यावर पण गूगलींग सुरू आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडलेत, इथे ते विचारतोय.
नोकरी
१) सध्या ऑस्ट्रेलियात नोकर्यांच वातावरण कसं आहे? रिसेशनचा प्रभाव आहे अथवा कॉस्ट कटिंगचा?
२) मी सध्या IT मध्ये (Unix/SQL Support/ Oracle ) काम करतोय. तिथे IT च्या संधी कितपत उपलब्ध आहेत?
आणि जॉब मार्केट/परिस्थिती कशी आहे? म्हणजे दबाव/रॅट रेस सदृश काही..
सर्वसाधारण आयुष्य
३) तिथे सर्वसाधारण आयुष्य कसं आहे? अधून मधून "रेसिजम" बद्दल ऐकतो त्यामुळे थोडी काळजी वाटतेय.
सुरक्षितता कशी आहे, रात्री / मुख्य शहरापासून थोड दूर राहत असताना?
४) स्थानिक ऑसीज समाज कसा आहे? स्वभावाने मोकळे की राखीव?
५) लाइफस्टाइल खर्चिक आहे का? म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग आहेत अशा अर्थाने.
PR प्रक्रिया
६) PR प्रक्रिये दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे. मी एका कन्सल्टंसी मार्फत अर्ज करणार आहे.
अंदाजे किती महीने लागतात आणी साधारण खर्च कितपत येतो.. मला वेगवेगळे आकडे ऐकायल मिळतायत.
७) तिथे नोकरी करण्यासाठी IELTS पात्रं असावं लागतच का?
अर्थात मी काही गुलाबी चित्र रंगवून नोकरी साठी शोध घेत नाहीये. सगळं एकदम सोपं असेल आणी ऑस्ट्रेलिया माझ्या स्वागताला तयारच आहे असं नाही
भरपूरशी माहिती ऐकीव आहे म्हणून तिथे प्रत्यक्ष राहत असलेल्या माबोकरांकडून उत्तरं मिळाली, अनुभवाचे बोल कळाले तर मदतच होईल.
धन्यवाद
seek.com.au वर जॉब बघा.
seek.com.au वर जॉब बघा. कुठल्या स्टेटसाठी प्रोसेस करता आहात?
पेरू, +१ रेसिझम>>>>> गेली ११
पेरू, +१
रेसिझम>>>>> गेली ११ वर्षे इथे आहोत. अगदी खुले आम कधी जाणवले नाही. आता तर भारतीय लोक इतके आहेत की काही भागातून फिरताना आपण ऑस्ट्रलिया मध्ये आहोत की पंजाब/गुजरात मध्ये हा प्रश्न पडतो.सर्व मुख्य शहरातून भारतीय लोकांचे प्रमाण खुप आहे.
सुरक्षितता चांगली आहे. तरी वाईट वेळ कधीच सांगुन येत नाही हे लक्षात ठेवावे!
ऑस्सी लोक>>>> अगदी मोकळे किंवा राखीव दोन्ही प्रकारचे! अर्थात मोक्ळ्ळे म्हणजे आपल्याकडे कसे आपण रात्री आठ वाजता कुणाकडे गेल्यास चालते तसे इथे कधी घडताना पाहिले नाही. तुम्ही इथल्या समाजात कसे ब्लेंड होता यावरही बरेच अवलंबून असते. उदा. मी ज्या गावात रहाते तिथे मोजके भारतीय आहेत. पैकी १ ते दोन अपवाद वगळता इतर भा. लोक इथल्या समाजात अजिबात मिसळत नाहीत. त्यामुळे ते रेसिझमच्या नावाने खड़े फोडतात.
लाइफस्टाइल>>>> सामान्य मनुष्य
लाइफस्टाइल>>>> सामान्य मनुष्य सुखात राहू शकतो. अर्थात हे परत व्यक्तिसापेक्ष आहे. घरभाडे महाग आहे. पण लहान घर/शहरापासून लांब घर असे options असतातच. (मेलबर्न बद्दलचा अनुभव. इतर शहरांबद्दल कल्पना नाही.)
pr खर्च>>>>> immi.gov.au ही वेब साईट बघा.११ वर्षांपूर्वी पाच हजार$ ( दोन ह फी आणि तीन ह वकिलाची फी) खर्च होता. आत्ताचा अंदाज नाही.
IELTS>>>>> नोकरीसाठी नाही पण PR साठी नक्कीच with required score!
धन्यवाद मी बघतो ती
धन्यवाद
मी बघतो ती वेबसाइट
मी मुख्यतः मेलबर्नसाठीच पाहतोय. सध्या IELTS ची तयारी सुरु आहे.