बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

Submitted by जागोमोहनप्यारे on 10 January, 2012 - 11:16

बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

आमच्या गावात एका डॉक्टरांकडे बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी आहे.

१. काश्यपसंहिता, भैषज्यरत्नावली यांचा आधार
२. सुवर्णभस्मयुक्त गाईचे तूप, ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, अश्वगंधा, पिप्पली व इतर औषधींचा वापर
३. हे औषध कोणत्याही महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी सुरु करावे.
४. वयोगट : जन्मजात बालक ते १२ वर्षे

कुणाला याबाबत माहिती आहे का? या औषधाचे नेमके फायदे काय आहेत?

Happy
balak.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>garbha dharana shri balaji tambe yanche pustak vaacha>>>>>

पुस्तकात यासाठी कुठली गाणी म्हणायला सांगितले आहे?

ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे..:हहगलो:

अवांतरः सुवर्णभस्मामुळे बालकाची बुद्धी तीव्र बनते असे म्हणतात, पण ते काही नवजात बाळांना देत नाहीत. आयुर्वेदात याला महत्व आहे इतर पथी मानत नाहीत.

नवजात बालकांसाठी केल्या जाणाऱ्या विधीमध्ये सुवर्णप्राशन संस्कार भारतामध्ये पूर्वापार चालत आला आहे. व्यक्तीच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर केल्या जाणारया सोळा संस्कारामध्ये या संस्काराचा समावेश होतो.
बालक परिचर्या व बालरोग चिकित्सेसाठी प्रसिद्ध कश्यप संहितेमध्ये तर म्हटले आहे,

सुवर्णप्राशनमं हि एतत मेधाग्नीबलवर्धनम ॥
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम ॥

म्हणजेच, हे जे सुवर्णप्राशन करायचे ते मेधा(धारणाशक्ती ) , अग्नि (पचनशक्ती) , बल वाढवणारे आहे तसेच ते आयुष्यदायी आहे.
सुवर्णप्राशन बालकाची प्रतिकार क्षमता वाढवते,ज्यामुळे प्रत्युर्जतेमुळे वारंवार होणारे आजार कमी होतात.
सुवर्णप्राशनामुळे अग्नि प्रदीप्त होतो ,ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
यामुळे शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होते.
सुवर्णप्राशन मेंदूच्या सुयोग्य वाढीलाही मदत करते,ज्यामुळे बाळाचा मानसिक विकास चांगला होतो व एकाग्रताही वाढते.
यामुळे त्वचेचा वर्ण , पोत सुधारतो व त्वचा तजेलदार दिसते.

नवजात बालकांपासून वय वर्षे १६ पर्यंत मुलांना सुवर्णप्राशन द्यावे. तसेच ज्या मुलांना वारंवार सर्दी-खोकला यासारखे आजार होतात , ज्या बालकांचे वजन वाढीच्या प्रमाणापेक्षा कमी असते अशा मुलांसाठी सुवर्णप्राशन विशेषत्वाने सांगितले आहे.

सुवर्णप्राशन दररोझ दिले तर अतिउत्तम तसेच दर महिन्याच्या (हिंदू कालगणनेनुसार ) पुष्य नक्षत्राच्या तिथीला द्यावे.

सुवर्णप्राशन हे शुद्ध सुवर्णभस्म, गोघृत (गायीचे तूप) , मध, आणि वचा ,शंखपुष्पी , विडंग यासारख्या आयुर्वेदिक वनौषधींचा उपयोग करून बनवले जाते.

सुवर्णप्राशन हे बिंदू स्वरुपात दिले जाते , याची मात्रा बालकाचे वय यावरून ठरवले जाते.

अधिक माहिती व घर पोच सुविधे सथि सम्पर्क : ९६१९७७७९४७ गायत्रि अयुर्वेद केन्द्र, दादर पुर्व, मुम्बै.

गायत्रि अयुर्वेद केन्द्र, दादर पुर्व, मुम्बै.

धन्यवाद !

आपल्या पारंपारिक पध्दतींचे फायदे तोटे जाणुन घ्यायची इच्छा फार कमी मंडळीत दिसली. हेच उद्या परदेशी संशोधकांनी मान्य केले की मग मात्र लाईन लाऊन घेतील.

Pages