एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<पहिले ही गोष्ट त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलेली नाहीये .त्या प्रसंगात फक्त ओमचा काका म्हणजे वडिलांचा सख्खा भाऊच होता आणि ते कुत्सित पणे पण हसलेले नाहीयेत. ते फक्त स्वताच्या भावाशी आठवणी आठवणीत बोलताना दाखवले आहेत कि तुला आठवत का ? वगैरे वगैरे >> अहो, ज्या स्वतःच्या मुलाला बेवारशी असल्यासारखं लहानपणींच सोडून दिलं, त्याला १५-२० वर्षानी प्रथमच भेटल्यावर ज्याची स्वतःला लाज वाटली पाहिजे व ज्याची मुलाला आत्यंतिक घृणा असणार अशीच आठवण नेमकी मोठ्या कौतुकाने हंसत व त्याबद्दल कांहींच खंत नसल्यासारखी काढली ना ओमच्या वडीलानी ? अहो, याला कुत्सितपणाचा अर्कच नाही म्हणायचं तर काय ? आणि कॅमेरात नसले तरी अख्खं घर होतंच ना कान लावून या स्फोटक भेटीत काय होणार याकडे ?
मीं कांही ओमचं वकीलपत्र नाही घेतलेलं किंवा त्याच्या वडीलानीही कांहीं माझं घोडं नाही मारलेलं; पण जें मालिकेत दाखवलं आहे त्यावरून मी माझं मत मांडलं; पटलं तर घ्या नाही तर द्या ना सोडून. पण कृपया उगीचच मला खोटं मात्र नका पाडूं !!

भाऊ तुम्ही वैयक्तिक का घेताय ? तस मीही वकीलपत्र नाही घेतलं हो ओमच्या आई वडिलांचं Happy
आपण त्या मालिकेवर चर्चा करतोय. काय दाखवलाय /काय दाखवल नाहीये /काय पटतंय /काय पटत नाहीये इतकीच चर्चा किव्वा मत प्रदर्शन आहे हे Happy

सुजा, दक्षुतै दोघींच्याही पोस्टी पटलेल्या नाहीत Happy
आणि मी केवळ तो वडिलांशी कसा वागतोय त्यावरुन बोलतेय. आईशी कसा वागतोय ते बघुयात आता Happy

पण 'असे' आई वडील असतील तर मुलांनी असचं वागायला हवं हे नक्की. बाकी ते टिनेजर्मुलं हेच शिकतील वगैरे काहीही पटलेलं नाहीये Happy
त्यातला मुलगा टीनेजर नाहीये. प्रत्येक जण आपल्या वयाचे नायक रिलेट करतं Happy

ओमची आई ओमला गेस्ट असं म्हणते दुस-यासमोर ते खटकले. तिने माझा मुलगा आलाय, मी थोड्या वेळाने येते असं म्हटलं असतं तर ओमच्या मनात आईबद्द्ल थोडा रिस्पेक्ट निर्माण झाला असता. आता अजून अढी बसणार.

<< आजचा भाग चक्क चांगला आहे. मोहन जोशी अफलातून.>> +१ ! नकळत उभा राहून मी सलामच ठोकला माझ्या या आवडत्या अभिनेत्याला !

मोहन जोशी खरंच अफलातून!!

मला ओमचं सगळं बरोबर वाटतं. आई वडिल कर्तव्य विसरल्यानंतर ओमवर कशाबद्दल जबाबदारी? जे चालू आहे ते मस्तच आहे. मला अजून कोणीतरी लिहिलेलंही पटलं- जुनी जखम आहे ती. आत्ता कुठे भळभळायला लागलेली आहे. सगळं बाहेर पडेपर्यंत वेळ लागणारच.
टीआरपीसाठी मुलगा आई-वडिलांशी असं कसं वागू शकतो वगैरे म्हणून नंतर तो वागताना दिसेल तुमच्या मनासारखा कदाचित Wink सगळ्यांना माफ करेल, प्रेम करेल, आनंदाने त्यांच्याबरोबर राहील वगैरे वगैरे वगैरे.

आईबरोबरच्या भेटीत कडवटपणा ठीबकत असला तरीही बापासारखं तिलाही ओरबाडून रक्तबंबाळ करण्याची मानसिकता नव्हती ओमची. छान संवाद व चित्रीकरण होतं या भेटीचं !
मधु आणि सागर यांचं प्रकरण फारच फास्ट ट्रॅकवर जातंय असं नाहीं वाटत ? मालिकांमधल्या असल्या प्रकरणांसाठी वेगमर्यादा किती कमी आहे व वाटेत कमीत कमी किती स्पीड ब्रेकर्स असावेच लागतात, याचं भान ठेवा म्हणावं !! Wink

मला ही मालिका आवडते. चक्क एक वेल डिफाइन्ड स्क्रिप्ट आहे मालिकेला, प्लॉट वेगळा आहे. आणि सर्वात महत्वाचं अभिनय सर्वांनीच खूप छान, समजून केला आहे. काही ओव्हर अ‍ॅक्टींग ठोकणारे आहेत, पण तेही ठीक.
दिग्दर्शकही त्याचं काम मनापासून करताना जाणवतं.

ओमची व्यक्तिरेखा व्यवस्थित, खरी मांडली आहे. मनातल्या कडवटपणाचा, आपल्यावर अन्याय केला गेला आहे, तेही आईवडिल दोघांकडूनही, जर निचराच झाला नाही तर असं वागलं जाणं नैसर्गिक आहे. आणि हा निचरा केवळ आईवडिलांसमोरच होऊ शकतो. तथाकथित आदर्शवादी, खोट्या भावनांनी ओथंबलेली कॅरेक्टर्स बघायची सवय झाल्यामुळे बघणार्‍यांना हे खटकू शकते. पण तरीही नायकाला अशा ग्रे शेडमधे दाखवण्याचं धाडस मालिकेत केलं गेलं आहे हेच कौतुकाचं.

मलाही आवडते आहे सिरिअल. मस्त स्टोरीलाईन आहे. स्वतःचे कुटुंब नसलेला एक मुलगा, कर्मधर्मसंयोगाने , त्याच्या कुटुंबात असावीत अश्या प्रकारची माणसे त्याच्या आश्रयाला येतात व त्याचे स्व्तःचे मानलेले कुटुंब तयार होते. त्याची व त्याच्या बायकोची अशी कंन्सल्टन्सी काढायची इच्छा आहे की ज्यात मोडणारी लग्ने ते वाचवतील. आता बहुतेक पहिली केस म्हणून तो आईबाबांनाच एकत्र आणणार.
ओम आईबाबांशी वागतो ते खूप खरे वाटते. तो हे सगळे त्यांच्याशी नाही बोलणार तर कोणाशी?
तो वकील असल्यामुळे, आईशी बोलतानाही, तिचे वाक्य पूर्ण झाले की लगेच एक पॉझ घेऊन मग पुढचे वाक्य बोलतो हे पण फार मस्त होते.
इशा आणि त्याचे भांडण झाले तेव्हा त्याने दाखवलेली बॉडी लॅन्ग्वेज अशी स्वतःला आक्रसून घेतलेली होती पण जेव्हा घर त्याच्या नावावर होते, तेव्हा वडिलांसमोर तो हात असे बाजूला मोकळेढाकळे पसरून चालतो तेव्हा तो घराचा राजा असल्यासारखे वाटते. आणि त्या वेळेस वडिल शारीरिक व मानसिक आक्रसलेले दाखवले आहेत.

ते चिंचेचे बुटुक व तो कामत आजोबा मात्र डोक्यात जातो. तो कामत आजोबा इतर कुठल्याही सिरीअलमधे असला तरी डोक्यातच जातो. मधू ही बिनअकलेची आणि उगीचच टिवटिव करणारी लाडोबा वाटते. आश्रित वाटतच नाही.

कालच्या एपिसोडात, लहान मुलं आजुबाजुला वावरणार्‍या "शारदा आश्रमा"च्या आवारात, मुंबईसारख्या शहरात, कुंपण वगैरे नसलेली विहीर? केवळ त्या जीव देण्याच्या डायलॉगकरता? अशा पब्लिक प्लेस मधे उघड्या विहीरी नसणं बंधनकारक आहे. ही दिग्दर्शकाची मोठी डुलकीच म्हणायची!

Om che vadil je kahi vagale te ka vagale yach spashtikaran kathanakatun milatay. pan aai ne je kel te ka te ajunahi spasht hot nahiye.

vadil swarthi hote mhanun bayako, porala sodun nighun gele.
aai na swarthi dakhavaliye na agatik. nemak kai zaal ani tine Om la sodayacha nirnay ghetala te spasht hotch nahi

<< pan aai ne je kel te ka te ajunahi spasht hot nahiye.>> " मीं नाहेर पडलें तेंव्हा कांहीच नव्हतं माझ्याकडे.. ना घर, ना नोकरी.. " असं म्हणत कालच्या भेटीत तिने ओमला याचं स्पष्टीकरण [ किंवा समर्थन ] देण्याचा प्रयत्न सुरूं केला होता पण त्याचा एकंदर मूड पाहून मला वाटतं ती सर्वच नाहीं सांगू शकली. [ अर्थात, तें स्पष्टीकरण योग्य किंवा ओमला स्विकारार्ह असेल कीं नाहीं , हा मुद्दा वेगळा ]

bhau kaka , yep! te aikatana mala watalel ki uttar milel. pan jenvha Om vicharato ki aji gelyawar tu ka gheun geli nahis mala, Hostel la ka thevalas tar tyach uttar navhatch ki tichyakade.

baki' tuzyajaval aji hoti. tu tithe sukhat rahila asatas, mazyakade kahich navhat' ithaparyant uttar malahi patalelach. pan again then aji gelyawar hostel ka tyach uttar nahi milal.
ani punha aaichi baju/ karan kalanyashivay rahil

<< punha aaichi baju/ karan kalanyashivay rahil>> अहो, अशीं एका फटक्यात कशीं मिळतील सगळीं उत्तरं ? उत्कंठा वाढवत राहिलं तरच बघत रहाणार ना आपण अशा लांबलचक मालिका !! Wink

जन्मदात्याला एक वागणूक आणि जन्मदात्रीला दुसरी वागणूक हे ओमचे वागणे नाही पटले. त्याच्या बाबतीत दोघांचाही तितकाच दोष असताना जन्मदात्रीला मात्र बरी वागणूक देतो तो. लॉजीकली जास्त राग जन्मदात्रीचा यायला हवा होता - आई न झाल्याबद्दल. पण एवढी चूक माफ दिग्दर्शकाला.

मोहन जोशींचा अभिनय अफाट होता.

त्याच्या आधीच्या भागात स्पृहाने - बाबा मी तुम्हाला सांगते आहे - यातल्या सांगते आहे वर दिलेला जरासा जोर अप्रतिम होता. प्रेमळ धमकीचा उत्तम नमूना. आता स्पृहा अधून मधून दिसू लागली आहे पण अजूनही मालिकेवर सत्ता उमेश कामतचीच आहे Happy

सगळी कामे बाजूला ठेऊन नीट लक्ष देऊन बघावी अशी मालिका आहे. इतर मालिकांसारखी वरवर बघितली तर लहान लहान जागा निसटून जातात. आणि त्या लहान लहान जागा 'मालिके'त सहसा पहायला नाही मिळत.

<< जन्मदात्याला एक वागणूक आणि जन्मदात्रीला दुसरी वागणूक हे ओमचे वागणे नाही पटले. >> दोघानीही ओमला बालपणात सोडलं याबद्दल ओमचा त्यांच्यावरचा राग समान असला तरी जन्मदात्याने स्वतःबद्दल ओमच्या मनात जो प्रचंड धाक व दहशत निर्माण केली होती, त्याबद्दलची घृणा हा त्या दोघाना वेगळी वागणूक मिळण्याचं स्वाभाविक समर्थन असावं.

आता स्पृहा अधून मधून दिसू लागली आहे पण अजूनही मालिकेवर सत्ता उमेश कामतचीच आहे
>>>>
हजार मोदक.

भाऊकाकांनाही अनुमोदन Happy

<< आता स्पृहा अधून मधून दिसू लागली आहे पण अजूनही मालिकेवर सत्ता उमेश कामतचीच आहे
>>>> स्पृहाही आपली भूमिका प्रथमपासूनच चांगली समजून निभावते आहे, हें आपलं माझं आधींच मांडलेलं मत. किंबहुना, स्पृहा व उमेश एकमेकाच्या तोडीचे आहेत म्हणूनच उमेशचा अभिनयही एक वेगळी उंची गाठतोय, असं म्हणणंही वावगं होणार नाही. अर्थात, हे सारं व्यक्तीसापेक्षच.

आणखी एक. या मालिकेतील उमेशच्या अभिनयातील उंचींचं श्रेय लेखकाकडेही कांहीं अंशीं जातं, असंही मला वाटतं. रंगमंच, सिनेमा व टीव्ही यांत हल्लीं ज्या अनेक "लग्नाच्या गोष्टीं"चं पेंव फुटलंय त्यांतल्यासारखं ओमचं पात्र 'निव्वळ गुडी ,गुडी' गोडुलं न ठेवतां, ओमच्या व्यक्तीरेखेला एक कडवट, गहिरी झालर लावण्यात आली आहे. त्या अव्हानामुळे, उमेशचा अभिनय अधिक खुलण्यास मदत झाली आहे.

सुजा, दक्षुतै दोघींच्याही पोस्टी पटलेल्या नाहीत स्मित
आणि मी केवळ तो वडिलांशी कसा वागतोय त्यावरुन बोलतेय. आईशी कसा वागतोय ते बघुयात आता स्मित
पण 'असे' आई वडील असतील तर मुलांनी असचं वागायला हवं हे नक्की. बाकी ते टिनेजर्मुलं हेच शिकतील वगैरे काहीही पटलेलं नाहीये स्मित त्यातला मुलगा टीनेजर नाहीये. प्रत्येक जण आपल्या वयाचे नायक रिलेट करतं >> अनुमोदन.
स्पृहा पण क्लास काम करत आहे. दोघांचाही अभिनय उत्तम आहे.

चक्क एक वेल डिफाइन्ड स्क्रिप्ट आहे मालिकेला, प्लॉट वेगळा आहे. आणि सर्वात महत्वाचं अभिनय सर्वांनीच खूप छान, समजून केला आहे. काही ओव्हर अ‍ॅक्टींग ठोकणारे आहेत, पण तेही ठीक.
दिग्दर्शकही त्याचं काम मनापासून करताना जाणवतं. >>

सगळी कामे बाजूला ठेऊन नीट लक्ष देऊन बघावी अशी मालिका आहे. इतर मालिकांसारखी वरवर बघितली तर लहान लहान जागा निसटून जातात. आणि त्या लहान लहान जागा 'मालिके'त सहसा पहायला नाही मिळत. >>

अजूनही मालिकेवर सत्ता उमेश कामतचीच आहे >>

ओमच्या व्यक्तीरेखेला एक कडवट, गहिरी झालर लावण्यात आली आहे. त्या अव्हानामुळे, उमेशचा अभिनय अधिक खुलण्यास मदत झाली आहे. >>

ह्या सगळ्याला प्रचंड अनुमोदन. एवढेच काय, मध्ये ह्या मालिकेमध्ये काफ्काचे नाव घेतलेले ऐकूनसुद्धा मला भरून आले होते. Proud संदेश कुलकर्णी चतुर लेखक आहे फार.

ही ईशा डोक्यात जाते. आधी वाट्टेल ते बोलून ("पुन्हा बेड च्या खाली झोपायचंय का" वगैरे) त्या बिचाऱ्या ओमचं डोकं फिरवते आधी आणि मग रडते. मग दुनियेच्या दस्तुरानुसार सॉरी म्हणून नमतं घेण्याची वेळ ओम्यावर!

आजच्या भागात तर कहरच केलाय -- ओमच्या बाबाच्या डिवोर्स प्रोसिजर साठी स्वतः पैसे दिलेत आणि 'हे ओम तर्फे' असं सांगितलंय बहुतेक. प्रीविव्ह वरून तरी तसंच वाटतंय. Uhoh

आज पुन्हा राडे होणार! Rofl

आजकाल जाम आवडायला लागल्येय ही मालिका मला! परवा जेव्हा सागर शास्त्रीय संशोधनामधली अनिश्चितता यावर बोलत होता तेव्हा भरूनच आलं! मराठी मालिकेत हे असे संवाद! या विषयावर! आणि आज आईनस्टाईनची गोष्ट! जियो संदेश कुलकर्णी! आता सगळी पात्रं/व्यक्तिरेखा खऱ्याच्या जवळ जात आहेत. सगळ्यांना सूर सापडलाय!
इशाच्या आईचं काम मस्त! जेव्हा तिला खरं कळेल तेव्हा काय वाटेल तिला!

सागर रविवारच्या भागात, सासवडला गेल्यावर खरं खरं सांगून टाका, असं म्हणतो ते पटले मला. त्या सागरने काम चांगलं केलंय.

घरातल्या मुलीच्या होणार्‍या सासरच्या सर्वाना घरीं बोलवलंय हें घरातल्यांपासूनच लपवून ठेवणं, हें पचायला कठीणच !

Pages

Back to top