.... जो जे वांछिल तो ते लाहो.....

Submitted by सुनिल परचुरे on 25 April, 2014 - 05:51

.... जो जे वांछिल तो ते लाहो.....
भाग १
आपल्या मनात एखाद्या देवदर्शनाला जायचे असते. पण काहिनाकाहि कारणाने ते राहुन जाते. अन एखाद्या वेळि .. बुलावा आया है ... असे होऊन ते देवदर्शन कधि होऊन जाते कळतहि नाहि. तसेच माझे.. दांडेलि... ह्या ठिकाणाबद्दल झाले. खरे तर बेळगाव पासुन हे साधारण ११० कि.मि. अंतरावर.पण तिथे जायचा काहि योग येत नव्हता. तो नुकताच जुळुन आला.

खरेतर हे ठिकाण धारवाड,हुबळि,लोंडा, बेळगाव, कारवार व गोव्याहुनहि जवळ आहे.. हे जंगल समुद्रसपाटि पासुन १५५० फुट ऊंच आहे .ईथल्या जंगलात जास्त करुन बांबु, टिक ह्यांचि दाटि आहे. त्यामुळेच इथे कागदाचि इंडस्ट्रि खुप मोठि आहे. ह्या इथे बरिच रिसॉर्ट हि आहेत. दोन दिवस धमाल करायला हे ठिकाण मस्त आहे .ईथे काय नाहि.... जंगल सफारि, पक्षि निरिक्षण, ट्रेकिंग्,नेचर वॉकिंग्,रॅपलिंग, कायकिंग,केनॉईंग, व्हाईट वॉटर राफ्टींग.....वेळ कसा जातो कळत नाहि. ह्यावेळिहि नेहमिप्रमाणे फोटोंचि जबाबदारि सुषमाने उचललि आहे.

इथे मि फक्त जंगलाचे फोटो टाकत आहे. बाकि सगळे दुसर्‍या भागात टाकिन.

आमच्या रिसॉर्ट समोरिल नजारा...
IMG_0047.jpg
जंगल सफारि मधिल रस्ता...
IMG_0101.jpg
मध्येच अचानक ढग खालि आले...
IMG_0118.jpg
तसे ईथे वाघ थोडेच आहेत. ब्लॅक पँथर्,हत्ति,अस्वल, वेगवेगळ्या प्रकारचि हरणे, मोर...मोर तर भरपुर आहेत .हे महाशय बघा. रस्त्यात न्रुत्यात दंग होते...
IMG_0125.jpgIMG_0126.jpg
हे ईथल्या बर्‍याच तळ्यांमधि एक....
IMG_0089.jpgIMG_0091.jpg
सिंथेरि रॉक म्हणुन एक ठि काण आहे...तेथिल फोटो...
IMG_0176.jpgIMG_0178.jpg
जंगलि कोंबडा...ह्याचि बांग आपल्याइथल्या कोंबड्यासारखि नव्हति...
IMG_0106.jpg
झाडावरिल घर... टु बेडरुम ,हॉल व किचन...वुडपिकरचे
IMG_0120.jpg
ह्यांचि ए॓ट काहि न्यारिच..
IMG_0130.jpgIMG_0144.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनीलजि,

मी काहि हि न वाचता आधि फोटो पाहते आणि मगच सविस्तर वाचत बसते Happy
त्यामुळे,फोटोचा वर जे तुम्हि लिहिलय ते हि मी वाचले नव्हते.पण तो दगड पाहताच मि पटकन अंदाज लावला,हा तर सिंथेरि रॉक.....
मि बेळगावचिच आहे.आम्हि इथे गेलो होतो.मे सातवीत होते तेव्हा.सिंथेरि रॉक ला जाताना जंगलातून जाताना,भारि थ्रिल्लिंग वाटत.
दांडेली,सूपा डॅम (काळि नदि) आणि हे सिंथेरी रॉक्स...असा आमचा प्रवास होता

तुमच्या फोटो मुळे पुन्हा आठवणि जाग्या झाल्या...फोटो भारिच आहेत

छान फोटोज Happy दांडेली विशलिस्ट मध्ये आहे. Happy
2BHK मस्तच Happy

उत्तर कर्नाटक भटकंतीत आम्ही सिरसीहुन येल्लापुर मार्गे खानापुरला आलो तेंव्हा दांडेली अणशी अभयारण्य लागले होते. Happy काळ्या बिबटयासाठी प्रख्यात अनशी अभयारण्य भारतातील एकमेव आहे.

गोपिका,वर्षू,अन्जु ,जिप्सि,प्रविण्,सृष्टी,मित्,स्नेहनिल सर्वांना धन्यवाद.