एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< भाऊ, इतके दिवस निळा होता, आज हिरवा >> माझा टीव्ही जुना झालाय किंवा माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन ओव्हरड्यू झालं असावं ! असो, आतां ५०,००० रुपये खिशात आहेत तेंव्हा सायंटीस्टबाबा घेतीलच म्हणा नवीन कपडे !! Wink
<< मला आपली त्यांच्या स्वयंपाकाची काळजी >> काळजीच नको ! ओमचे आई-वडील एकत्र येणार आहेत, सागर-मधूचंही जुळतंय, ओमच्या खोट्या आईचा नवरा व्यसनमुक्त होतोय, काके नोकरीवर खूष आहे, दत्ताभाऊ मूडमधे आहेत, कामतकाका आजीबरोबर आहेत..... अशा सार्‍या जल्लोषात जेवणाचं सुचतंयच कोणाला !!!! : डोमा:

पुण्यातल्या मतदानावर एक-दोन एपिसोड करायची आयती चालून आलेली संधी कशी काय दवडली निर्मात्यानी !! "ओम, हें बघ, तूं आतां हुकूमशहा असल्यासारखाच वागतोयस; म्हणूनच नाही गेलास का मतदानाला ? ", एवढं तरी वाक्य टाकायचं ना ईशाच्या तोंडीं !!! Wink

ओमच्या बाबांचे टी-शर्ट, एकाच टाईपचे पण वेगळ्या रंगाचे असं माझा नवरापण म्हणत होता, मी ही मालिका चालू असताना किचनमध्ये कामं करत असते आता नीट बघेन, एकच टी-शर्ट आहे की एकाच स्टाईलचे आणि वेगवेगळ्या रंगांचे.

ओमचा कपडेपटही असाच आहे. हिरव्याला लाल, गुलाबी ला ऑरेंज, निळ्याला पिवळा..वगैरे वगैरे....रंग भडक आहेत, पण ओम्याला शोभतात म्हणा.

पण ओम्याला शोभतात म्हणा.>> तेचकी. ओम्या गोऽऽड आहे Proud

सार्‍या जल्लोषात जेवणाचं सुचतंयच कोणाला !!!! : डोमा:>> पॉईन्ट आहे! Happy

भाऊ, अन्जू नीट बघा- हिरवा आणि गडद निळा आणि अजून एक रंग आहे, बहुतेक लाल- सेम प्रकार, बाहीवर १०, खांद्यावर सिंह. पॅक ऑफ थ्री नाही का मिळत, तोच उचललाय Wink

<< पॅक ऑफ थ्री नाही का मिळत, तोच उचललाय >> असेल बुवा ! मीं तर पडलो जेमतम एक घेवून 'पॅक करा' म्हणणारा !! एका लग्नाची तिसरी गोष्ट आहे, तेंव्हा असेलही त्या टायटलला मॅचीग म्हणून 'पॅक ऑफ थ्री ' !!! Wink

इथे ईशा सगळ्यांना एकत्र आणतेय होसुमी मध्ये जानव्ही . होसुमी मध्ये काकाची आणि काकाच्या आईची भेट इथे ओमच्या आईची आणि ओमची भेट. किती ते सारख सारख Happy

त्या ओमच्या बाबाला तो कोणीसा वकील १००० डॉलर्स पर सेशन सांगतो. मग ५०००० रुपयांनी त्याची काय मदत होणार? निदान पाच एक लाख तरी दाखवायचे. वरुन इशा आणि दत्ताभाऊ एकदम त्यांची अडचण दुर केल्यासारखे वागतात! Uhoh

<< किती ते सारख सारख >> सुविद्य, हुशार, सुसंस्कृत व अत्यंत मनस्वी अशा तरुण- तरूणीचं प्रेम, मतभेद, भांडणं, समेट हें सारं ज्या तडफेने पण सहजसुंदरपणे उमेश व स्पृहा यानी साकार केलंय, त्यातच मला वाटतं या मालिकांमधलं वेगळेपणही स्पष्ट होतं .

आज ओमच्या बाबांनी चक्क शर्ट घातला होता नाहीतर आज मी लक्ष ठेऊन होते की ओमच्या बाबांनी कुठला टी शर्ट घातलाय.

<< आज ओमच्या बाबांनी चक्क शर्ट घातला होता >> 'पॅक ऑफ थ्री' घेतला तर वर एक शर्ट फ्री , असं कांहीं नसतं ना !! Wink

मालिका किती म्हणून विस्कळित असावी? Uhoh
द्वेष असला तरीही एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून ओम आपल्या वडलांना चारचौघांसमोर असं अपमानित कसं करू शकतो? Uhoh

<< द्वेष असला तरीही एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून ओम आपल्या वडलांना चारचौघांसमोर असं अपमानित कसं करू शकतो? >>दक्षिणा +१

"अगदी समजतंय तरी घराबाहेर जात नाहीये ". अशा पद्धतीची अपमानकारक विधान शोभत नाहीत नायकाच्या तोंडी. तुझ्या आजीने तुझ्या नावाने प्रॉपर्टी केली म्हणजे तुझे हात स्वर्गाला लागले कि काय. Sad
फार चुकीच्या पद्धतीने दाखवताहेत .मला त्याची व्यक्तिरेखा कायमच पटत नाहीये. एक नायक दाखवलाय तुम्ही . तरुण मुल पण मालिका बघतात. त्यांना यातून काय संदेश मिळतो. आई-वडिलांशी अशा पद्धतीने वागायचं ?

तुमच्या दृष्टीने कितीही आई-वडिलांची चूक असली तरी त्याचं पण म्हणन ऐकून घ्याल कि नाही तुम्ही Happy मोकळेपणाने बोला त्यांच्याशी डिस्कशन करा. मला तुमच वागण अशा अशा पातळीवर पटल नाहीये म्हणून सांगा. त्याचं म्हणन ऐकून घ्या .पण इथे हा मुळी ऐकूनच घेत नाही बोलायचीच तयारी दाखवत नाही .पटत नाहीये Happy

खोट्या आईच्या नवर्याने तिला त्रास दिला (मानसिक आणि शारीरिक ) तो तु समजून घेतोस ना ? मग खर्या आईला पण तिच्या नवर्याने त्रास दिलाय तो तुला का नाही समजून घेता येत ?

व्यक्तिरेखा खूप अप्रगल्भ रीतीने मांडलेय Happy

सुजा, नॉट अ‍ॅग्री!
एकतर ती माणसं 'इतर' कोणी नसुन ओमची 'स्वतःची' माणसं आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षाही ही नाती अशी जोडलेली खरी नातीच महत्वाची असतात. त्याच्या बाबा त्याच्यासाठी परका आहे. इथे केवळ तो वडिल आहे म्हणून ज्याने याला कधीच साथ दिली नाही ती व्यक्ती ज्यांनी कठिण परिस्थीत साथ दिलीये त्यांच्यापेक्षा महत्वाची कशी वाटू शकतील?

असे आई वडील असतील तर त्यांच्याशी का म्हणून चांगलं वागायचं? त्याच्या वडिलांना स्वतःचं करिअर महत्वाचं वाटलं म्हणून ते सोडुन गेले ना याला? आता सगळं वाटोळं झालंय म्हणून आलाय याच्याकडे आणि म्हणून ओमने त्याच्याशी नीट वागायचं?
ही एक मालिका आहे म्हणून ठिक आहे पण रिअल लाईफ मध्ये कोणाचे वडील इतके बेजबाबदार वागले असतील तर त्याने त्यांच्याशी नीट वागणुकीची शिकवण कोणी देऊच नये त्याला.

तरुण मुल पण मालिका बघतात. त्यांना यातून काय संदेश मिळतो. आई-वडिलांशी अशा पद्धतीने वागायचं ?
>>>
होय ! वडील असे असतील तर मुलांनी असचं वागायला हवंच!

राहिला प्रश्न संवादाचा तर ज्या वयात याला आपल्या माणसांच्या संवादाची गरज होती तेंव्हा हे निघुन गेले. मग आता त्याच्याकडुन संवादाची आपेक्षा का? फक्त तुमच्यावर 'वेळ' आलीये म्हणून? आणि आजीने घर नावावर करण्याच्या आधीपासुनही तो असाच वागत होताच.

ओमची व्यक्तीरेखा अशा कुटुंबत वाढलेला एखादा मुलगा कसा असु शकतो याचा विचार केला तर परफेक्ट पटते.

बाकी मालिका फार , समर्थन करावी अशी कधीच आवडली नव्हती. पण हे तरुण पिढीला संदेश वगैरे वाचुन अगदीच राहववलं नाही.(हे बोलणं दुसर्‍या कुठल्याही , मला न आवडणार्‍या मालिके संदर्भात झालं असतं तरी माझं हेच मत असलं असतं )

यालाच मी काळं पांढरंम्हणते ओळखणं किंवा समजणं म्हणते. बाप असा वागला म्हणून मुलगा असाच वागला पाहिजे हे अयोग्य आहे. ओमच्या शिक्षणाचा (ओव्हरलॉल सिव्हिक सेन्सचा) काही उपयोग नाही? सिरियल्स पाहून लोक घडत असतात. असे संवाद फक्त वाईट आईवडिलांच्याच पदरी येतील असं कशावरून? आणि खरंतर मग असे संवाद सगळ्याच आई वडिलांच्या वाट्याला येतील. कारण टिन एज मध्ये सगळेच पेरेंट्स पोरांना शत्रू वाटत असतात. आणि मूळात ओमचे आई वडील वाईट वागलेत हे ओमने ठरवलंय.. पण आई वडील आपापल्या जागी योग्यच असतील की. व्हाय आर वी बिईंग जजमेंटल? आणि तो टिन एज मध्ये असा वागला तर ठिक, चांगला घोडनवरा व्हायला आला तरी इतकी इमॅच्युरिटी?

इथे फक्त सभ्यतेने बोलणं वागणं आणि एखाद्याच्या आत्मविश्वासाचं खच्चिकरण न करणं या बाबत अपेक्षा धरली आहे. सिरियल्स ह्या समोज प्रबोधन करू शकल्या नाहीत तर हरकत नाही पण त्यांनी उद्बोधन करू नये इतकंच. ओमचे वडील हे त्याचे स्वतःचे वडील आहेत हा विचार न करता तो एक माणूस आहे हा विचार करून न्यूट्रल ट्रिटमेंट ओमला त्या माणसाला देता येऊ नये? नवल आहे. बाकी इतकी अननोन जत्रा गोळा केली आहे की घरी.. त्यातच एक...

ओम चुकतो आहे की बरोबर हा मुद्दा गौण आहे माझ्या मते. कारण त्याने भोगलय मग त्याला ठरवू द्या त्याला कसं वागायचं आहे.(म्हणजे लेखकाला.) पण इशा डोक्यात जातेय. तिच्या घरच्यांना हवं म्हणून ओमने त्याच्या आईवडिलांशी नीट वागायचं किंवा त्याच्याशी समेट घडवून आणयचा. काय ग भवाने तू आणी तुझे घरचे कोण मोठे टिकोजीराव लागून गेले की त्याकरता ओमच्या आईवडिलांनी एकत्र यायचं. ह्याला सुशिक्षित पणा आणि सुसंस्कृतपणा म्हणत नाही. इशाला सगळ्ं स्वतःच्या मनासारखं झालेलं हवय. का? कशासाठी? तुझ्य घरच्यांना हवी असलेली गोष्ट ओमला नकोय असं असताना तू ओमला पाठिंबा दे आणी घरच्यांना सांग तुम्हाला ततो पटत नसला तरी मला त्याच्याशीच लग्न करायचय नाही तर त्याला सोडून दे.

मी म्हणते एक वेळ मोठ्या बाबांना तिची परिक्षा घ्यायची असेल की तिचं खरंच ओमवर किती प्रेम आहे म्हणजे ति त्याच्याशी लग्न व्हावं म्हणून काय करू शकेल? यातून ह्युमन हँडलिंगही कळेल इ. असं सगळं पॉझिटिव्ह अ‍ॅप्रोच धरून चालला तरी ओम्याला हे न सांगणं अगदीच बालिश. की हे बघ बाबा आपलं लग्न व्हावं असं वाटत असेल तर दोघं गनिमी काव्याने किल्ला लढवू... आई बाबांना एकत्र आणल्यासारखं करू नंतर पाहू की त्यांचं काय करायचं आहे ते. Proud

इशाला इतकं सुचत नसेल तर कसली डोंबल्याची वकिल आहे ती? Uhoh

ओमच्या व्यक्तीरेखेचं इतकं सखोल विश्लेषण होतंय म्हणूनच -
ओमच्या मनातल राग वाजवी आहे याबाबत दुमत नसावं. तरीही तो वडीलांशी आतां जें वागतो आहे तें एक नायक म्हणूनच नव्हे तर एक सुसंस्कृत माणूस म्हणूनही योग्य नाही असा आक्षेप असूं शकतो. त्याची दुसरी बाजू अशीही असूं शकते कीं पूर्वीं आपल्याकडून ओमच्याबाबतींत अक्षम्य चूक झाली आहे याची जाणीव आपल्याला आहे, असं जर त्याच्या वडीलानी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ओमपर्यंत पोचवलं असतं, तर ओमला त्यांच्याशीं जुळवून घेणं सोपं होवूं शकलं असतं. पण , तें बाजूलाच राहिलं; इथं आल्या आल्या ओमच्या पहिल्या भेटीतच त्यानी आपण ओरडल्यावर हा लहानपणीं पँट कशी ओली करायचा हें सगळ्यांसमोर सांगून जे कुत्सित हास्य केलं, त्याने ओमच्या मनाची ती खोल जखम पुन्हा भळाभळा न वाहिली तरच नवल. घोर अन्याय होण्यापेक्षाही तो अन्याय करणार्‍याला त्याचं सोयर-सुतकही नसणं, ही गोष्ट कुणाच्याही मनाच तोल घालवूं शकते. आतां कोंडीत सांपडल्यावर ओमच्या वडीलाना झालेली याची जाणीव खरीही असली तरी ओमने ती तशी आहे हें स्विकारणं ओमला यामुळेच सहजशक्य नाहीं. ओमच्या व्यक्तीरेखेचा खटकणारा हा एकमेव पैलू या पार्श्वभूमिवर पहाणं व समजून घेणं योग्य होईल.

भाऊ तुमची पोस्ट पटली. सिरेलीत तर बाप ही इमॅच्युअर दिसतोय पार. Lol माझा तो भाग चुकला. नाहीतर माझी पोस्ट थोडी वेगळी असती.

<< आल्या आल्या ओमच्या पहिल्या भेटीतच त्यानी आपण ओरडल्यावर हा लहानपणीं पँट कशी ओली करायचा हें सगळ्यांसमोर सांगून जे कुत्सित हास्य केलं>> पहिले ही गोष्ट त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलेली नाहीये .त्या प्रसंगात फक्त ओमचा काका म्हणजे वडिलांचा सख्खा भाऊच होता आणि ते कुत्सित पणे पण हसलेले नाहीयेत. ते फक्त स्वताच्या भावाशी आठवणी आठवणीत बोलताना दाखवले आहेत कि तुला आठवत का ? वगैरे वगैरे
आणि शेवटी दक्षिणा ने लिहिलंय तेच << बाप असा वागला म्हणून मुलांनी पण तसच वागाव अस आहे का ?मग ओमच्या शिक्षणाचा (ओव्हरलॉल सिव्हिक सेन्सचा) उपयोग काय ? आणि बापामध्ये आणि त्याच्या मध्ये फरक तो काय राहिला हा प्रश्न उरतोच Happy

उलट मी तर म्हणीन त्याने जर वडिलांना समजून घेतले असे दाखवले असते तर त्याची व्यक्तिरेखा एका उंचीला पोचली असती. जशास तसे काय सगळेच वागतील पण वडिलांनी अन्याय करूनही तो त्यांच्याशी चांगला वागलेलं दाखवलं असत तर जास्त योग्य ठरलं असत

<<ओमचे वडील हे त्याचे स्वतःचे वडील आहेत हा विचार न करता तो एक माणूस आहे हा विचार करून न्यूट्रल ट्रिटमेंट ओमला त्या माणसाला देता येऊ नये? नवल आहे. बाकी इतकी अननोन जत्रा गोळा केली आहे की घरी.. त्यातच एक...>> या दक्षि च्या वाक्याला तर करोडो मोदक. एक माणूस म्हणून /फक्त एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने पण तुम्हाला वागता येऊ नये Happy

एक माणूस म्हणून /फक्त एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने पण तुम्हाला वागता येऊ नये >>> अनेक वर्ष ठुसठुसणारी जखम आहे ती. बरी व्हायची असेल तर दूषीत रक्त, पू अशा नको वाटणार्‍या गोष्टींचा निचरा तर होऊ द्यावा लागणारच ना? त्या नंतरच खपली धरू शकेल ना? स्वाभाविकच आहे ते.

ओमच्या अशा वागण्याने त्यांना आपण केलेल्या चूकांची जाणीव आताशा होताना दाखवली आहे. ओम चांगला वागला असता तर त्यांना ती जाणीव नक्कीच झाली नसती.

ठीक आहे वडिलांचं एक वेळ ठीक आहे . ठीकच आहे पण आईच काय ? नायक तर तिच्याशी पण वाईट वागताना दाखवला आहे. अन्याय काय फक्त नायकांवर च होतो का ? इतरांवर नाही अन्याय होत ? तिला कोण समजून घेणार ? तिचा नवरा तिला सोडून दुसरीकडे गेलाच आहे. पण मग मुलाच काय ? त्याने नको समजून घ्यायला ?

आईशी पण त्याने फटकून वागलेलं दाखवणे म्हणजे पूर्ण पणे अप्रगल्भ तेची कमालच. इतका कृतघ्नपणा ?

बर आणि ही अपेक्षा का? तर इतक्या कठिण परिस्थितीतून जाऊनही चांगलं शिक्षण घेऊन वकिल झाला. एक परोपकारी माणूस झाला (घरी इतकी परकी जत्रा आणली आहे त्यावरून परोपकारी म्हणाले हो :फिदी:) इतकं सगळं चांगलं असल्यावर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतातच ना...
अगदीच वायफळ झाला असता तर आम्ही कशाला काही बोललो असतो असं? उलट याच्याकडून हेच अपेक्षित आहे किंवा इतकंच बोलला का? मला वाटलं अजून २-४ अर्वाच्या शिव्या घालेल असं वाटलं होतं.. असं म्हणलं असतं आम्ही. Lol Rofl

Pages