Submitted by स्वाती२ on 27 January, 2014 - 08:42
मंडळी , बघता बघता जानेवारीचा शेवट आला. या वर्षीचा हिवाळाही अगदी हाडे गोठवणारा. मात्र बाहेरचे उणे -१० तापमान आणि स्नो काही कायम रहाणार नाहीये. लवकरच स्प्रिंग येइल. तेव्हा २०१४ च्या बागकामासाठी नवा धागा. तुमचे गार्डन प्लॅन्स, रोपं- बियाणे यासाठीचे खात्रीचे सोर्सेस, यावर्षी बागेत काही नवीन प्रयोग करुन बघणार असाल तर त्याबद्दल इथे जरूर लिहा. बागकामाची आवड असलेल्या सर्व नव्या-जुन्या मायबोलीकरांचे धाग्यावर स्वागत!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक प्रश्न लोक्स. मी मागच्या
एक प्रश्न लोक्स.
मी मागच्या वर्षी जमिनीत लावलेलं लॅवेंडर आणि कुंडीत लावलेली रोझमेरी आता एप्रिल आला तरी परत हिरवे व्हायला तयार नाहीत.मारले म्हणायचे का मी? शेजारीण समरमध्ये म्हणाली होती की लॅवेंडर खूप पसरेल वगैरे.इ का हुई गवा
त्या पिंक जॅस्मिनची दृष्ट काढ
त्या पिंक जॅस्मिनची दृष्ट काढ मीपु
मी बहुतेक सगळं मारलं आहे गेल्या वेळचं.
वॉव मीपु आपण तर त्या पिंक
वॉव मीपु आपण तर त्या पिंक जस्मिनवर फिदा.
मीपु भारी आहेत फुलं! इथं अजुन
मीपु भारी आहेत फुलं! इथं अजुन स्नोच होतोय
त्या पिंक जॅस्मिनची दृष्ट काढ
त्या पिंक जॅस्मिनची दृष्ट काढ मीपु
>>> अगदी अगदी!
मी काल दोन सक्युलंट्सची रोपं
मी काल दोन सक्युलंट्सची रोपं आणली आहेत. आता ती ट्रान्सफर करून जगवणं ही मोठीच जबाबदारी आहे.
कसल्या भारी कुंड्या आहेत
कसल्या भारी कुंड्या आहेत
http://www.potteryproject.com/ma-ce-ta.html
होम डिपोत अनंताची रोपं आली
होम डिपोत अनंताची रोपं आली आहेत. तिथे इनडोअर रोपांमध्ये ठेवलेली दिसला अनंत. त्यामुळे मी यंदा घरातच ठेवणार आहे. बाहेर ठेवून दोन रोपं मारलीत
बाकी जुई, चिनी गुलाब दिसले नाहीत.
यावर्षी पहिल्यांदाच स्नो
यावर्षी पहिल्यांदाच स्नो सोइंगचा प्रयोग केला. त्यातले पिंक कोनफ्लावर, पिंक्स, कोरीऑप्सीस, हिसप, बेल फ्लॉवरची छोटी रोपं तयार होत आहेत. कोलंबाईन काही रुजले नाही.
विंटर सोइंग गूगल केल्यावर ही
विंटर सोइंग गूगल केल्यावर ही लिंक मिळाली- http://www.gardendesign.com/seed-sowing-snow?pnid=122085#gallery-content
इंटरेस्टिंग आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीनं केलंत?
http://www.agardenforthehouse
http://www.agardenforthehouse.com/category/gardening/winter-sowing/
यात दाखवल्याप्रमाणे केले. तसेच wintersown.org नी फ्री सीड्स प्रोग्रॅम मधून बीया पाठवल्या होत्या.
मीपुणेकर, डॅफोडिल्स आणि पिंक
मीपुणेकर,
डॅफोडिल्स आणि पिंक जस्मिस खूप सही दिसतायत !!!
गेली पाच सहा वर्षे ह्या
गेली पाच सहा वर्षे ह्या गुलाबाला केशरी फुल लागत होती यावर्षी अचानक लाल फुल आली आहेत.

सीमा, रुट स्टॉकच्या फांद्या
सीमा, रुट स्टॉकच्या फांद्या वाढल्या का?
गेल्या वर्षीच्या कोलंबाईन आणि स्पीड्वेलला छान पालवी फुटलेय. त्यामुळे काल दुसर्या रंगाचे स्पीद्वेल आणि कोलंबाईन खरेदी केलेले. जोडीला बॅरन स्ट्रॉबेरी घेतली. सावली असलेल्या भागात ग्राउंड कव्हर+ बॉर्डर म्हणून.
भाज्यांच्या बीया लावल्यात रोपं तयार करायला.
काल होल फुड्समध्ये चिनी गुलाब
काल होल फुड्समध्ये चिनी गुलाब दिसले. होम डिपोमध्ये आले नसतील तर आज होल फुडातून घेऊन येणार.
आपल्या इथे बटन गुलाब म्हणतात ती गुलाबाची जात इथे मिळते का? काय नावाने?
सकाळी २-३ तासच ऊन असेल अशा कोपर्यात काय लावावे? फुलझाड किंवा रंगीत पानं असलेलं काही तरी सुचवा.
सिंडरेला, जॅपनिज पेंटेड फर्न,
सिंडरेला,
जॅपनिज पेंटेड फर्न, ब्लिडिंग हर्ट, होस्टा, टोड लिली, अस्टिल्बी, फोम फ्लॉवर , कोलंबाईन वगैरे बरेच पर्याय आहेत.
माझ्याकडे कोलंबाईन आणि होस्टा असे एकत्र लावलेत. यावर्षी त्यात लिली ऑफ द वॅली लावलेय. पण ते विषारी आहे त्यामुळे लहान मुलं, कुत्रा-मांजर वगैरे असेल तर शक्यतो नको.
स्वाती, धन्यवाद. यातले बरेच
स्वाती, धन्यवाद. यातले बरेच खाली जमिनीत लावले आहे. मला काही तरी कुंडीत लावायला हवे आहे. असॉर्टेड फुलं-पानं असलेली लावावी काय.
बटरफ्लाय ऑक्झॅलिस बेस्ट.
बटरफ्लाय ऑक्झॅलिस बेस्ट. रेडिश ब्राउन ते जांभळट शेड आहेत. फिकी जांभळी नाजूक फुले येतात स्प्रिंग समर मधे.
http://en.wikipedia.org/wiki/Oxalis_triangularis
युफोर्बिया मिली च्या व्हरायटीज पण कुंडीमधे मस्त वाढतात. अन जवळपास वर्षभर फुलत असतात.
http://en.wikipedia.org/wiki/Euphorbia_milii .
Dracaena ; pepperomia; calathea ; maranta; अळूच्या फॅमिलीतली झाडे Araceae ; ही पण कंसिडर करु शकतेस
बघते. धन्यवाद
बघते. धन्यवाद
फोटो आवडल्याचे आवर्जून
फोटो आवडल्याचे आवर्जून सांगील्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद

त्या पिंक जॅस्मिनची दृष्ट काढ मीपु >> ते कस करायचं हे विचारण्यासाठी मला नवीन बीबी काढायला हवा
सीमा, केवढे गुलाब आलेत, फोटो छान आहे.
गार्डनिंग बद्दल नाही पण
गार्डनिंग बद्दल नाही पण रिलेटेड प्रश्न. आमच्या बॅकयार्ड मधे एक ससा येऊ लागला आहे. त्याने त्याचे घरच केले आहे आमचे बॅकयार्ड म्हणजे. तो आलेला आम्हाला फार आवडतोय पण माझा चार्ड तो खातोय असं लक्शात आलं. अजुन बाकीची भाज्यांची रोपं डोकं वर काढत आहेत. तो ते सगळं खाणार की काय? याला ऊपाय काय? त्याला खायला काही ठेऊ का जेणेकरुन तो मझ्या भाज्या नाही खाणार?
आवडत्या गोष्टीसाठीच भाज्या
आवडत्या गोष्टीसाठीच भाज्या लावलेल्या समजा किंवा आवड बदला आणि हुसकावून लावा.
ता. क. खऱ्या सशाला गाजरे जास्त प्रमाणात चांगलीही नाहीत. आपल्या पोरांनी गाजरं खावी म्हणून आपला सशाचा घास.
पेस्ट कंट्रोलच्या DYI दुकानात
पेस्ट कंट्रोलच्या DYI दुकानात हरणं, ससे, अर्माडिलो हुसकवून लावायला यातलं एखादं प्रॉडक्ट वापरायला सांगितलं होतं.
सीमा, रुट स्टॉकच्या फांद्या
सीमा, रुट स्टॉकच्या फांद्या वाढल्या का?>>>>
स्वाती हे जरा विस्तार करून सांगशील का? मी कलर का चेंज झाला असेल ते नेटवर शोधल असता मला फर्टीलायझर,माती, पाणी इत्यादी कारण मिळाली.
ससा...%$#@!*&.... रागाने खाऊ का गिळू होत. पण शाकाहारी असल्याने तेही करता येत नाही. सगळे प्रयत्न करून शेवटी होम डिपो वाल्यांने सांगितलेला उपाय "गन" हाच अशा नित्कर्षापर्यंत आली आहे मी. पण तेवढही धाडस नाही. कोल्ह्याची शु(होम डिपोत पेस्टीसाईड म्हणुन मिळते), केस, लाल तिखट, बनीला खावू म्हणुन गाजर, सगळ्या प्रकारचे बनी हुस्कवण्याचे पेस्टीसाईड, झेंडूची फुले, साबण सर्व उपाय केलेत आम्ही.
तर सानुली कुंपण, फेन्स बंदिस्त करून घेण, लोखंडी किंवा कापडी नेट या व्यतिरिक्त कोणताही उपाय बनीला नाही.
ताज्या भाज्या उगवून आल्या असतील तर अगोदर फेन्स पॅक करून घ्या. फेन्स नसेल तर काटेरी गुलाबाची झाडे लावून नॅचरल फेन्सिंग भाज्यांच्या भोवती करा. हो, आलेल्या कोवळ्या भाज्या २ मिनिटात खावून टाकणार तो.
आमच्याकडे आम्ही बॅक यार्ड पुर्ण पॅक केलय. फ्रंट यार्डला फेन्स नसल्यामुळ काहीही करता येत नाही. लास्ट इअर पासून आय लॉस्ट दी बॅटल. नविन आणलेल्या पेरिनिअलचा फन्ना उडविला आणि प्रचंद नुकसाना केलयं.
बनी क्युट नाहीत. #$@!%^$$# :रागः अजिब्बात आवडून घेवू नका त्याला.
बनी क्युट नाहीत. #$@!%^$$#
बनी क्युट नाहीत. #$@!%^$$# >> एकदम अनुमोदन .
हरीण पण त्याच कॅटेगरीत. कितीही डिअर रेझिस्टंट म्हटले तरी एकदा ऑगस्टचा उन्हाळा सुरु झाला की काय वाट्टेल ते खातात ... शिवाय इकडे तिकडे खुर नाचवून रोपांचा विध्वंस करतात तो वेगळाच ...
सीमा, कलम करताना एका
सीमा, कलम करताना एका प्रकारच्या रुट स्टॉकवर- मूळ झाड- दुसर्या प्रकारचे कलम बांधलेले असते. काही कारणाने ते कलम मेले तर मूळ झाडाच्या फांद्या वाढतात आणि कलमी गुलाबापेक्षा वेगळ्या प्रकारची फुले येतात.
धन्यवाद सीमा आणि मृण्मयी!!
धन्यवाद सीमा आणि मृण्मयी!! सध्या माझ्यापेक्षा नवर्यालाच क्युट वाटतोय ससा!!
माझं बॅकयार्ड पूर्ण फेन्स्ड आहे. त्याला जे दार आहे तिथे खाली थोडी गॅप आहे, त्यातुन येतोय. काहीतरी करून ती बंद केली तरी काम होईल असं वाटतय एकुण तुमच्या बोलण्यावरून. सांगते काय झलं ते इथे
बापरे! असे हरिण, ससे
बापरे! असे हरिण, ससे घरापर्यंत येतात? अगदी बॅकयार्डमधे पण का?
बरं मला कोणी सांगाल का, कि पपईच्या बिया लावल्यावर पपईचे रोप येइल का? किती दिवर लागतील तरी?
पेरु, बीया कोमट पाण्यात
पेरु, बीया कोमट पाण्यात रात्रभर भिजत घालून मग लाव. जमीन उबदार हवी. साधारण महिना लागेल. इथे हरीण, ससे, राकून, आणि कधी कधी कायोटी पण चक्कर मारतात.
या वर्षी आमच्या इथल्या हर्ब
या वर्षी आमच्या इथल्या हर्ब सोसायटीचा सेल मिस केला मी
सुदैवाने पार्स्ले, मिंट, सेज, ओरेगानो, रोझमेरी, लॉरेल, अन टॅरगॉन हे मागच्या वर्षीचे परत आलेत / टिकलेत.
जेनोवीझ बेझिल, थाय बेझिल, थाइम , लेमन थाइम ही रोपं गार्डन सेंटरमधे मिळावीत सहज. पण लेमन ग्रास मात्र कुठे मिळेल शोधावे लागेल
Pages