Submitted by pltambe@yahoo.co.in on 16 April, 2014 - 00:27
पियूष
साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस ,दहा चमचे साखर ,छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.
कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.
लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्याच वेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ए हाताबाहेर काय? मी काय केलं
ए हाताबाहेर काय? मी काय केलं रे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
वेक्स, तू आलीस की येतेच पळत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इकाका, वादासाठी वाद घालत असाल
इकाका, वादासाठी वाद घालत असाल तर काय बोलणार! पण जनसेवा हे दुसरा काही ऑप्शन नव्हता म्हणून चालू होतं केवळ असं मला तरी वाटत नाही.
जनसेवा कच्चा चिव्डा अप्रतिम.
जनसेवा कच्चा चिव्डा अप्रतिम. मी दर पुणा ट्रिप मध्ये जरूर घेउन जात असे. सांजा खाल्ला आहे तिथेच.
हिंदुस्तान बेकरीचे पॅटिस. ?! काही गोष्टीना तोडच नाही.
बाकी नटराज टॉकिजच्या मागे घैसास शोरूम जवळ एक जण मिक्स फ्रूट मिल्क शेक विकायचा तसा खरेच परत कुठे कुठ्ठेच मिळालेला नाही. इब्लिस काय आठवण करून दिलीत. क्यांपातले एक चुंग हुवा कि काहीतरी होते तिथल्यासारखे सूप कधीच कुठे परत मिळाले नाही. मार्झो रिन चे चिकन सँड्विच पण.
पियुष मी कधीच नाही प्यायले. मला खारी लस्सी किंवा ताक आव्डते. स्वीट लस्सी नाही आव्डत. परत ह्यात फूड कलर का घातला आहे. तो ही शक्यतो वापरू नये. हेमावैम. केशराच्या दोन काड्या टाकाव्या हव्या तर.
अमा, क्यांपातल्या त्या
अमा, क्यांपातल्या त्या दुकानाचे नाव " चुंग फा"
पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं
पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं विसळून देतात असं इथे बरेच म्हणत आहेत. ते म्हणणं एक विनोद म्हणून ठीक आहे. पण लोकप्रिय हॉटेलात रोजचे किमान १०० ग्लास पियुष श्रीखंडाचं भांडं विसळून तयार होत असेल का? तसं असेल तर ते भांडं विसळून घेण्यासाठी केवढं श्रीखंड तयार करावं लागत असेल? तयार केलेलं श्रीखंड रोजच्या रोज खपत असेल का?
पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं
पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं विसळून देतात असं इथे बरेच म्हणत आहेत. ते म्हणणं एक विनोद म्हणून ठीक आहे. >>> एक्झॅक्टली, मंजूडी. पुलंच्या कोणत्यातरी पुस्तकात विनोद म्हणून केलेला उल्लेख आहे तो.
पॉईन्ट आहे. रोज तेवढे
पॉईन्ट आहे. रोज तेवढे श्रीखन्ड खपणे खरच शक्य नाही.
अहो, श्रीखंड एका भांड्यातून
अहो,
श्रीखंड एका भांड्यातून दुसर्यात काढायचे. रिकामे झालेले भांडे विसळायचे.
पियुष तयार.
ते खपले, की श्रीखंड परत पहिल्या भांड्यात काढायचे.
आता पुन्हा एक भांडे विसळायला तयार!
हाकानाका.
दरम्यानच्या काळात श्रीखंड अन पियुष दोन आयटम विक्रीसाठी तयार!
-: आमचे येथे दुकान चालविण्याचे शिकवणी वर्ग घेण्यात येतील :-
पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं
पियुष म्हणजे श्रीखंडाचं भांडं विसळून देतात असं इथे बरेच म्हणत आहेत. ते म्हणणं एक विनोद म्हणून ठीक आहे.
एक्झक्टली. जे कुठल्यातरी रस्त्यावरच्या कुठल्यातरी खोपटातले पियुष प्यायलेत ते असेच म्हणणार. ज्यांनी पणशीकराचे दाट पियुष प्यायलेय त्यांना माहिताय पियुष कशाला म्हणतात ते. पियुष आणि लस्सी यांची तुलना होऊच शकत नाही. पियुष पियुष आहे आणि लस्सी लस्सी. दोन्ही आपापल्या जागी ग्रेट आहेत पण म्हणुन पियुषला लस्सी म्हणणा-याने अस्सल पियुष कधी प्यायलेच नाही असे म्हणता येईल.
एकदा या दादरला आणि घ्या आस्वाद पणशीकराच्या पियुषचा.
आमचे येथे दुकान चालविण्याचे
आमचे येथे दुकान चालविण्याचे शिकवणी वर्ग घेण्यात येतील :->> दुकान बंद करण्याचे वर्ग आहेत हे अशा युक्त्या असतील तुमच्या तर!
पियुष आवडतं मला. मस्त लागतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गिरगावात पणशीकर, सांडू आणि
गिरगावात पणशीकर, सांडू आणि प्रकाशकडलं पियुष लहानपणापासून प्यायले आहे. पियुष म्हणजे अमृत हे खरंच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोठ्या माणसांचे विनोद कधी कधीसिरियसली घेऊ नयेत....त्यातलाच हा एक श्रीखंडाचे भांडे विसळून पियुष करण्याचा.
लस्सी वेगळी लागते आणि पियुष वेगळं लागतं. ज्यांनी पिवून पाहिलं नाही त्यांनी नक्की पिवून पहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला नाही आवडत पियुष. जाता जात
मला नाही आवडत पियुष. जाता जात नाही . मी चुकून सुद्धा पीत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
होय पियुष चांगले लागते, ते
होय पियुष चांगले लागते, ते दादरच्या पणशीकरांचे पियुष मस्तच असते. लस्सी आणि पियुषची तुलना नाही.
पियुष उन्हाळ्यातच प्रामुख्याने प्यावे असेही काही नाही पण!
पियुष म्हणजे श्रीखंडाचे
पियुष म्हणजे श्रीखंडाचे विसळलेले पातेलं म्हणजे कहर आहे. काहिहि.
पियुष म्हणजे अमृताचा प्याला त्या झळझळीत उन्हात फिरताना,
पियुष म्हणजे सुखाची धार शॉपिंगने कावले असताना...
बस्स, इतकाच माझा काहिच्या काही कवितेचा प्रयत्न.
पण पियुष मला सुद्धा आवडते.
मंजुडी तो विनोदच आहे, हे
मंजुडी तो विनोदच आहे, हे तेव्हाही कळत होतेच. पण पियुष प्यायची इच्छा नाही झाली हेही खरेच. तू का सिरिअस झालीस इतकी.. :))
पुण्यातलं प्रसिद्ध पियुष गणू
पुण्यातलं प्रसिद्ध पियुष गणू शिंदेकडलं.
स्पष्टच बोलायचं तर जनसेवा जुन्या पेठी पुणेरी चवीला 'केटर' करणारं दुकान होतं. तेव्हा पेठी पुणेरी चवी नसलेल्यांना नाही आवडलं तरी आमची काही हरकत नाही.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कुमठेकर रोडलाच प्राचीन काळी सुजाता नामक हॉटेल होतं. ते बंद झाल्यावरही असंच वाईट वाटलेलं.
ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी
ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हे बघा.
http://m.youtube.com/watch?v=S_38NUkM3w4
पणशीकरांकडचं, प्रकाशच पियुष
पणशीकरांकडचं, प्रकाशच पियुष ... वाह काय आठवण ...
प्रकाश, दत्तत्रय, आस्वाद, जिप्सी ... आठवून nostalgic
पियुष नाही प्यायले कधी... आता
पियुष नाही प्यायले कधी... आता तर खुप उत्सुकता लागलीये. दादरचे दुकान कुठेशी आहे? कधी गेलो तिथे तर नक्की जाऊ.
वरचा फोटो छान. कृतीपण छान आहे.
दादरचे दुकान कुठेशी आहे? कधी
दादरचे दुकान कुठेशी आहे? कधी गेलो तिथे तर नक्की जाऊ.>>>>सुनिधी, रानडे रोडवर आहे दुकान. या लिंकवर पहा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.panshikar.in/ContactUs.aspx
अर्थात लिंबू आणि वाचक ह्यांचा
अर्थात लिंबू आणि वाचक ह्यांचा दुसरा उपयोग काय म्हणा
>>>>:हहगलो:
पण लिंबू पिळतात हे माहीत
पण लिंबू पिळतात हे माहीत नव्हते. (अर्थात लिंबू आणि वाचक ह्यांचा दुसरा उपयोग काय म्हणा) >>> ह्याला म्हणतात कमेंट!!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
खुपच मस्त आहे. नक्की
खुपच मस्त आहे. नक्की करुन बघेन......
....
जिप्सी थँक्स, लिहुन ठेवले.
जिप्सी थँक्स, लिहुन ठेवले.
<<<पियुष पियुष आहे आणि लस्सी
<<<पियुष पियुष आहे आणि लस्सी लस्सी>>> अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<गिरगावात पणशीकर, सांडू आणि प्रकाशकडलं पियुष >>>> ह्या यादीत अजून एक नाव ठाण्यातील गोखले उपहारगृहमध्ये मिळणारे पियुषही उत्तम आहे.
प्रमोद काका धन्यवाद
रेसिपी दिल्याबद्दल.
सुनिधी पणशीकरानकडे पण चांगले
सुनिधी पणशीकरानकडे पण चांगले मिळते..पार्ल्याला ये प्यायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरं
बरं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बस्के, मी सिरीयस झाले असं
बस्के, मी सिरीयस झाले असं तुला का वाटलं?
सुनिधी, दादरला रानडे रोडवर पणशीकर, तिथूनच मोजून वीस पावलांवर प्रकाश आणि सेनाभवनसमोरचं आस्वाद यापैकी कुठल्याही ठिकाणी अत्युत्तम पियुष मिळेल.
काकांच्या रेसिपीने पियुष
काकांच्या रेसिपीने पियुष बनवुन पाहीलं का कोणी?
सुनिधी, दादरला रानडे रोडवर
सुनिधी, दादरला रानडे रोडवर पणशीकर, तिथूनच मोजून वीस पावलांवर प्रकाश आणि सेनाभवनसमोरचं आस्वाद यापैकी कुठल्याही ठिकाणी अत्युत्तम पियुष मिळेल
आणि जातेसह आहेस तर प्रकाशमधले अत्युत्तम साबुदाणावडे अजिबात चुकवु नकोस. तसे वडे आणि सोबतची बहारदार चटणी फक्त तिथेच मिळते.
Pages