तुमचे नाव मतदार यादीत शोधा

Submitted by नितीनचंद्र on 15 April, 2014 - 23:08

खरोखरी आपले सरकारे धन्य आहेत. जेव्हढा प्रचार मतदान करा हा प्रचार करण्यासाठी करतात त्याच्या १ टक्का सुध्दा प्रचार तुमचे नाव मतदार यादीत कसे शोधा यावर केला जात नाही.

किती जणांना माहित आहे आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे ?

महाराष्ट्रात तरी ही सुवीधा देणार्‍या लिंक घ्या.

https://ceo.maharashtra.gov.in/

ह्या मुख्य पानावर गेल्यानंतर Search your Name in Final Electoral Roll 2014 New यावर क्लिक करा आणि एक तर आपल्या आयडेंटीटी कार्ड नुसारच्या नंबरा नुसार किंवा नावा नुसार आपले नाव शोधण्याचा पर्याय उपलब्ध्द आहे.

आपण या सर्च इंजिनवर सरळ जाऊ शकता http://103.23.150.139/marathi/

कृपया लक्षात ठेवा आपल्याला किमान खालील गोष्टी माहित असल्याशिवाय इथे जाण्याचा काही फायदा नाही.

१) आपला जिल्हा'

२) आपले व्होटर आयडेंटीटीवरील आपला युनीक नंबर ( विधानसभा मतदार संघ माहीत नसल्यास )

३) आपला विधानसभा मतदार संघ ( आपले व्होटर आयडेंटीटी कार्ड त्या क्षणी उपलब्ध नसल्यास )

लक्षात ठेवा की मागल्या वेळी इथे मतदान झाले अस समजुन जर आपण नाव शोधायला गेलात तर बर्‍याच वेळा तिथे नाव शोधायला खुप उशार लागतो. कधी कधी मतदान केंद्र तेच राहिलेले नसते. त्यात बदल झालेला असतो आणि आता शासनाने नेमणुक करुनही मतदानाच्या स्लीप देणारे कर्मचारी तुमच्या पर्यंत पोहोचलेले नसतात.

हा मनस्ताप टाळुन आपल्या पसंतीचे सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळवा.

ही माहिती कॉपी पेस्ट करुन इतरांना कळवा आणि मतदानासाठी उद्युक्त करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे नाव गायब झाले आहे.
तसेच व्होटीन्ग स्लिपाही केवळ लिम्बी अन आईकरता आल्या आहेत.
ओक्के, काढले शोधुन.
जुने शेषन कार्डचे नम्बर बदलले आहेत. त्यामुळे घोल्ळ झालाय.

यावेळी मतदारयादीत नुसतं नाव असून उपयोग नाही, सोबत छायाचित्रही हवं असं गेले ३-४ महिने सांगितलं जातंय. ते पाहता येतंय का वरच्या लिंकेत? (९९% वेळेला ती लिंक ओपनच होत नाही :खोखो:)

लिंबुजी,

वर लिहीलेल्या लिंक शोधुनही गायब झाले आहे का ? असे असेल तर तुम्ही खात्रीने भाजप व मित्र्पक्षांना मत देणार म्हणुन तुमचे नाव गायब करण्यात आले आहे.

हा काय झोल आहे? <<<

तुम्ही भारताचे ओरिजिनल नागरीक वगैरे असाल! एकदा तपासून घ्या नागरिकत्व!

हा काय झोल आहे? >>>>> लिंबुभाउ हे कटकारस्थान आहे ब्रिगेडी लोकांचे ... Wink

माझे नाव गायब झाले आहे.
तसेच व्होटीन्ग स्लिपाही केवळ लिम्बी अन आईकरता आल्या आहेत.
ओक्के, काढले शोधुन.
जुने शेषन कार्डचे नम्बर बदलले आहेत. त्यामुळे घोल्ळ झालाय.

(नावे गायब होणे/करणे आम्हाला नवे नाही, असे प्रकार अनेकवेळा बघितलेत पूर्वीच्या इलेक्शनचा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन. इथे प्रश्न इतकाच होता की "लिम्ब्याचे नाव गायब करण्याचे धाडस कोण करु शकलय? Wink )

नाव निट तपासुन टाका अन्यथा तुम्ही तुमचे फक्त नाव टाकुन सर्च करा.. नंतर पिडीएफ फाईल आल्यावर त्यात सर्च करा.....

माझे नाव उदयदीपक दीपक इनामदार ......असे करण्यात आले आहे.. उदय इनामदार शोधल्यास सापडत नाही...

इनामदार अथवा उदय लिहिल्यास सर्च मधे दाखवण्यात येते

विधानसभा मतदार संघ चुकल्यास किंवा मतदान ओळखपत्रावरचा नंबर चुकिचा टाकल्यास आपले नाव मतदान यादीत असताना चुकिचा निष्कर्ष निघु शकेल.

मी वेगवेगळ्या प्रकारे माझे नाव शोधले...मराठीत, इंग्रजीत, मूळ मतदार संघ आणि आजूबाजूच्या मतदारसंघातही शोध घेतला...पण कुठेच नाव नाहीये...तुमचे नाव मतदार यादीत नाही...६ नंबरचा फॉर्म भरा..हे एकच उत्तर येतंय.
मतदार यादीची एकही पीडीएफ फाईल उघडत नाहीये...

प्रमोद जी............ फक्त नाव लिहा... आणि खाली आलेल्या माहिती मधे बाजुला एक पीडीएफ फाईल आलेली असेल मतदारसंघात असलेल्या सर्व नावांची...ती ओपन करा आणि मग त्या पीडीएफ लिस्ट मधे सर्च करा... नाव असेल

गंमतच आहे...पीडीएफ यादीत तर नाव दिसतंय....पण केवळ नाव शोधलं तर नाहीये असं उत्तर येतंय....म्हणजे संकेतस्थळाच्या आखणीत काही तरी दोष नक्कीच असावा.

पीडीएफ मधे मिळाले ना .. त्याची प्रिंट काढुन ज्यात तुमचे नाव असेल. . ती मतदान केंद्रावर घेउन गेलात तरी चालेल.. पण पहिल्या दोन पानांची प्रिंट देखील काढुन घ्या...

पण इतक्या उशीरा कसे लोक जागे होतात? वर्तमानपत्रात आलं होतं की कधीच.
मी फेब्रुवारीच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यात पुण्यात असताना मराठी वर्तमानपत्रातली बातमी वाचून माझ्या सगळ्या सासरमाहेरच्या लोकांची नावं मतदारयादीत आहेत की नाहीत खात्री करून घेतली होती आणि संबंधित पीडीएफ डाउनलोड करून ठेवल्या आहेत. नुसत्या आडनावावरून आणि मतदारसंघावरून पुण्यातली नावं शोधता आली. एकदाही कुठल्याही लिंकला प्रॉब्लेम आला नाही. कलकत्त्याच्या लिन्क्सवर तर पीडीएफच टाकल्या आहेत मतदारयादीच्या.

आपलं नाव मतदारयादीत आहे की नाही हे वेळेवर शोधायची जबाबदारी मतदारांचीही नाही का?

नितीनचंद्र. मी आमच्या घरातल्या सगळ्यांची नावे शोधली..माझे आणि वडिलांचे सापडले पण आईचे आणि आजोबांचे सापडलेच नाही.. पीडीएफ परत एकदा नीट बघायला पाहिजे..

>>>>. आपलं नाव मतदारयादीत आहे की नाही हे वेळेवर शोधायची जबाबदारी मतदारांचीही नाही का? <<<<<<
या प्रश्नामागे असाही एक गृहित अर्थ आहे की सार्वभौम भारत सरकारच्या त्याहुन जास्त स्वतंत्र अन सार्वभौम निवडणूक आयोगास वर्षानुवर्षे चालत आलेला डाटाबेस ह्यान्डल करता येत नाहीये. दरवेळेस नव्याने मतदार यादीत नाव का शोधावे लागावे?

दुसरे असे की तुम्ही जी इन्टरनेटची "सुविधा" वापरता ती किती नागरीकान्ना सहज उपलब्ध आहे? त्याव्यतिरिक्त ज्यान्ना इन्टरनेटबद्दल माहितीनाही/वापरता येत नाही अशांकरता सरकार काय सोय उपलब्ध करुन देते नावाच्या खात्री पटविण्याकरता? उपलब्ध करुन दिलेल्या सोयीचि माहिती लोकांपर्यंत पोचविण्याकरता काय प्रयत्न करते? की कुठल्यातरी म्हमईतल्या सचिवालयात काढलेला जीआर सगळ्या महाराष्ट्रीयान्पर्यन्त "अन्तर्ज्ञानाने " पोहोचतो असे सरकार (अन काही सुविद्य नागरिक) समजते काय? असो.

तिसरा मुद्दा असा की;
मी जिथे आत्ता रहातो तिथे १९८४ पासुन रहातो आहे अन शेषन कार्डापासुन माझे नाव मतदार म्हणून नोन्दले आहे.
शेषनकार्ड आयमीन निवडणूक ओळखपत्र मला मिळालेले आहे, मी माझ्या पत्यात गेल्या तिस वर्षात बदल सान्गितलेला नाहीये, अन तरी दरवेळेस मतदारान्नि "यादीत नाव आहे वा नाही" याची खात्री करुन घेणे भाग पडावे हे कसल्या भिकार सिस्टिमचे द्योतक आहे? (ज्यान्ची बदलीची नोकरी वा तत्सम कारणाने वा बीसीसीआयच्या निवडणू़कीत भाग घेण्यास बारामती मतदारसन्घ बदलुन मुम्बै वगैरे करायचा असेल त्यान्नी मतदारयादीत नाव बघुन ठेवणे ठीके, पण वर्षानुवर्षेच नव्हे तर पिढ्यादरपिढ्या जी लोक एकाच जागी रहात आहेत त्यान्ना देखिल यादीत नावे आहेत वा नाहीत हे बघणे आवश्यक का व्हावे?

बर नाव नाही असे कळले तरी सरकारी घोडेछाप व्यवस्था नाव घालण्याची तत्काळ व्यवस्था करते का?

प्यान कार्डची व्यवस्था करता येते (कारण त्यायोगे पैका/महसुल मिळतो) पण निवडणू़ककार्ड/याद्यान्ची व्यवस्था करता येत नाही असा विरोधाभास का?

माझे नाव सापडले, चिठ्ठी आली नाही. (माझ्या अल्पमतीनुसार कारण असे की "काही शेषनकार्डान्चे मूळचे नम्बर बदलुन नविन क्रमांक दिले आहेत त्यामुळे असे झाले असावे, मात्र मतदारांची खात्री करुन घेण्याचे फॉर्म्स मागे भरुन घेतले होते त्यावेळेस आख्खी फ्यामिली वगैरे माहिती घेतली होती, तर मग यादीत एकत्र नाव का येत नाही? लिम्बीचे नाव सापडले, तिथे "फ्यामिली" म्हणून बटनावर क्लिक केले तर मात्र आमचे तिघांची नावे एकत्र दिसली, ती यादी छापुन ठेवली.
विशेष म्हणजे एखाच कुटुंबातील एकाच पत्यावर रहात असलेल्या लिम्बोटल्याचे नाव भिन्न मतदान केन्द्रावर भिन्न यादीत आले आहे.

Pages