Submitted by अदिति on 14 April, 2014 - 14:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
३ कप बदामाचे पिठ
३ अंडी (फक्त पांढरा भाग )
३/४ कप मध
वॅनिला ईसेन्स
बेकिंग पावडर चिमुट भर
२ चमचे ऑलीव्ह ऑईल
मिठ चिमुट भर
क्रमवार पाककृती:
१. ओवन ३५० डि, फे. ला प्री-हिट करा.
२. अंडी, मध, वॅनिला ईसेन्स आणि तेल एका बाउल मधे फेटुन घ्या
३. बदाम पिठ, मिठ, बेकिंग पावडर निट मिक्स करुन त्यात वरील मिश्रण टाकुन एकजीव होईपर्यंत मिक्स करा
४. हे बॅटर मफ्फिन कप मधे टाकुन २०/२५ मिन बेक करा
५. गरम गरम मफिन्स तयार
वाढणी/प्रमाण:
१२ छोटे मफ्फिन्स होतात
माहितीचा स्रोत:
मैत्रीण
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी!
भारी!
सही! मस्तं पाककृती. फोटोपण
सही! मस्तं पाककृती. फोटोपण आवडला.
कॉस्टकोमधे बदामपिठावर भव्य सूट आहे. लवकर विकत घ्या.
त्या एवढ्या मोठ्या पिशवीचं
त्या एवढ्या मोठ्या पिशवीचं करायचं काय?
ह्यात एगला काही रिप्लेसमेंट किंवा ३ ऐवजी १ वगैरे चालेल का?
>> त्या एवढ्या मोठ्या पिशवीचं
>> त्या एवढ्या मोठ्या पिशवीचं करायचं काय?
एवेएठिला वाटून घेऊ.
(करून आण म्हणायला जीभ धजावली नाही. :P)
सायो, ३ एगव्हाइट्स म्हटलंय. म्हणजे पूर्ण दोन (दीडच) अंडी पुरावीत. मोठं असेल तर एकही पुरावं.
का बरं? माझ्या बेकिंग
का बरं? माझ्या बेकिंग कौशल्यावर तुमचा विश्वास दिसत नाही
तुझ्या बेकिंग कौशल्यावर मी
तुझ्या बेकिंग कौशल्यावर मी शंका घेणार? मला मब अजून जमलेली नाही.

आयजीच्या जिवावर टाइप वाटलं. पण तुझा आग्रहच असेल तर आण, खाईन बापडी!
शक्य झाल्यास आणेन. मला
शक्य झाल्यास आणेन. मला स्क्रॅचपेक्षा रेडी मिक्सचं बेकिंग करायची सवय आहे.
कॉस्ट्को मधे मिळणारे पिठ साल
कॉस्ट्को मधे मिळणारे पिठ साल काढुन केलेले असते. पण ट्रेडर जो'स मधे कमी प्रमाणात आणि विथ साल मिळते. मला वाटत ते स्वस्तः ही पडते.
अरे वा बदामपीठ वापरुन? छान
अरे वा बदामपीठ वापरुन? छान आहेत.
नावावरून वाटले बदाम इसेन्स
नावावरून वाटले बदाम इसेन्स आणि वर बदामाचे काप लावलेले आपले साधेच मफिन्स. बदामाचे पीठ कसे किलो मिळते?
अमा, आपल्याइथे मिळत नाही हे
अमा, आपल्याइथे मिळत नाही हे पिठ.. आणि तसेही बदाम ९००-२००० रुपये किलो च्या रेण्जमध्ये आहेत. त्यावरुन आल्मंड मिलचा अंदाज मारा.
बाकी रेसिपी मस्तच.
जबरी रेसिपी आहे, मैदा आणि
जबरी रेसिपी आहे, मैदा आणि साखर नसल्याने खूप आवडली आहे. नक्कीच करणार. थँक्स.
ट्रेजो मधलं जरा खरबरीत असतं तेच वापरायचं का ? की एकदम पीठी टाईप हवंय ?
भारी!!!
भारी!!!
निजामाच्या घरात वगैरे करत
निजामाच्या घरात वगैरे करत असतील का हा पदार्थ? मैदा मिळत नसेल तर बदामाचे पिठ वापरावे का?
का थटटा करून राहिलेत गरिबाची?
रेसिपी मस्तच.
रेसिपी मस्तच.
भारी आहे रेसिपी!
भारी आहे रेसिपी!
<<<<<>> कॉस्टकोमधे बदामपिठावर
<<<<<>>
कॉस्टकोमधे बदामपिठावर भव्य सूट आहे. लवकर विकत घ्या. >>>>> खरंच घ्यायला पाहिजे.
पण रेसिपी मस्तच!
मस्त.
मस्त.
छानेत. w/e केलेत तर वीकमधे
छानेत. w/e केलेत तर वीकमधे मस्त नाश्ता!
या प्रमाणात किती मफिन्स
या प्रमाणात किती मफिन्स होतील?
मवाला पडलेला प्रश्न मलाही पडलाय.
खाली लिहिलंय ना १२ छोटे
खाली लिहिलंय ना १२ छोटे मफिन्स होतात म्हणून.
मस्तच पाककृती सानीने मागे एक
मस्तच पाककृती
सानीने मागे एक चॉकलेट केक लिहिला होता बदाम पावडर + चॉकलेट वापरुन. त्यात साखर होती. अर्थात तो चॉकलेट केक फक्त खास प्रसंगासाठीच राखून ठेवायला हवा. कॅलरीजचा बॉम्ब आहे तो. हे मफिन्स एरवीही ( प्रमाणात ) खायला मस्त वाटतायंत.
ट्रेजो मधलं जरा खरबरीत असतं
ट्रेजो मधलं जरा खरबरीत असतं तेच वापरायचं का ? की एकदम पीठी टाईप हवंय ?<< हो खरखरीतच असतं.
घरी मिक्सर मधे ही बनवता येईल. चांगला हेल्दी टु-गो नास्ता होतो.
कोस्टको मधे १७ ला मिळणार्या बॅगमधे ४ बॅचेस होतात. ४८ मफिन्स. साधारण ४० सेन्टला १. आपाआपल्या हिशोबाने करावेत आणि खावेत
अगो म्हणते तसं खास प्रसंगासाठी राखुन ठेवायलाही हरकत नाही.
परवा ट्राय केले, ट्रे जो चं
परवा ट्राय केले, ट्रे जो चं पीठ वापरलं, चांगले झाले होते. फोटो काढून ठेवलाय, नंतर टाकेन.
मला जरा गोडीला कमी वाटले, तसंच २० मिनीटातंच झाले होते, नंतर २ मिनीट ठेवले तर खरपूस झाले किंचीत.
पुढ्च्या वेळी नेहेमीच्या केक मधे मैद्याऐवजी अर्धं बदाम पीठ व साखरेऐवजी मध असं सबस्टिट्यूट करुन बघेन.
उरलेल्या बदाम पिठाचे लाजोच्या
उरलेल्या बदाम पिठाचे लाजोच्या रेसिपीने मोदक करा. मस्त होतात ते पण. ही रेसिपी पण खासच.