बेस साठी:
१ वाटी कणिक, १ वाटी मक्याचे पीठ, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा मीठ, २ टेबलस्पून ऑलिव ऑइल, भिजवायला पाणी.
टॉपिंग साठी:
[ऐच्छिक आणि आवडी प्रमाणे]
चीज, ऑलिव ऑईल,मिरेपूड, लाल सुकलेली मिरची (क्रश्ड),मीठ, टोमॅटो केचप.
सिमला मिरची, टोमॅटो च्या चकत्या, कांदा, लसणाचे काप, पनीर, मश्रूम, इ.इ.
बेस साठी लागणारे सगळे साहित्य एकत्र करावे. साधारणपणे आलू पराठयाची कणिक भिजवतो तसे भिजवून घ्यावे. आता टॉपिंगची तयारी करावी. टॉपिंगसाठी घेतलेल्या भाजीचे आपल्याला हव्या त्या आकाराचे / प्रकारचे तुकडे करून घ्यावे. तो पर्यंत पीठ भिजू द्यावे. हाताला थोडी कोरडे पिठ लावून कणकेचे, छोटे हवे असल्यास ४, मोठे हवे असल्यास २ गोळे करावे. हलक्या हाताने गोल आकारात लाटावे. या आकराला तयार पराठ्या इतका थिकनेस असावा. सुरीने वरून ४-५ टोके द्यावेत म्हणजे अवनमधे फुगणार नाही. गोलाला वरुन थोडेसे ऑलीव ऑइल चमच्याने लावावे आणि टेम्परेचर २५० ला सेट करुन अवन मधे ३ ते ४ मिनिट ठेवावे.
४ मिनिटांनी बाहेर काढून बेसला टोमॅटो केचप, ऑलिव ऑइल, लावुन घ्यावे. आपल्या आवडी प्रमाणे टॉपिंग सजवून वरून मीठ, मिरेपूड, मिरची पूड टाकावी. हवे असल्यास पुन्हा थोडे ऑलिव ऑइल टाकावे. चीज किसावे. १५-२० मिनिट बेक करावे. चीज वितळले आणि बेस क्रिस्पी झाला, हे चेक करुन बाहेर काढावे.
हा पिझा मुळ इटालियन पिझा सारखा क्रिस्पी आणि पातळ होतो.
मैदा चालत असेल तर मैदा वापरा.
मैदा चालत असेल तर मैदा वापरा.
छान
छान
छान
छान
काल ह्या रेसिपीने पिझा केला.
काल ह्या रेसिपीने पिझा केला. कॉर्न् फ्लॉअर थोडेच होते म्हणून थोडा मैदा घातला. कडेनी ब्राऊन झाल्यावर काढला. पण मधला भाग थोडा चिवट झाला. माझे काय चुकले? परत प्रयत्न करीन आता.
Ovan naiye tar tya aivaji
Ovan naiye tar tya aivaji coating cha tawa chalto ka ?
मावेमधे किती टेम्परेचर
मावेमधे किती टेम्परेचर ठेवावे?
काल ही पाकृ वापरून पिझ्झा
काल ही पाकृ वापरून पिझ्झा केला होता.
मी २ वाट्या कणीक, २ वाट्या मैदा घेतला कारण कॉर्नफ्लोअर नव्हतं. तीन टीस्पून बे. पा. ऑलिव्ह ऑईल नव्हतं म्हणून साधं तेल घातलं. बटर नाही म्हणून तूप लावलं. सांगायचा मुद्दा म्हणजे तरीही मस्त झाला पिझ्झा बेस.
पिझा सॉसची पाकृ वर दोनतीन वेळा विचारली गेली आहे म्हणून इथे लिहिते. (माझ्याकडे असलेल्या कांचन बापट यांच्या पुस्तकातली आहे.)
चार टॉमेटो, तीन लसूण पाकळ्या gas वर जाळी ठेवून वांगं भाजतो तशा प्रकारे भाजून घ्यायच्या. गार झालं की टॉमेटोची सालं काढून बारीक चिरायचे. लसूण पाकळ्या बारीक चिरायच्या. दोन कांदे बारीक चिरायचे. हे सगळं थोड्या तेलावर परतून घ्यायचं. (इथेही मी ऑलिव्ह ऑईलऐवजी साधं तेल वापरलं) त्यात बेसिल, oregano वगैरे वगैरे घालायचं. (माझ्याकडे यातलं काहीही नव्हतं म्हणून मी चक्क ओवा घातला. छान लागला) थोडं टॉमेटो केचप. थोडं मीठ.
गार झालं की मिक्सरमध्ये अर्धवट बारीक करून घ्यायचं की झाला सॉस तयार. मस्त झाला होता.
Pages