सौर चूल, सूर्य चूल ,सोलार कुकर

Submitted by शेळीताई on 18 September, 2012 - 07:16

सौर चूल, सूर्य चूल, सोलार कुकर

या विषयावर चर्चेसाठी हा धागा आहे.

सोलर कुकरचे चांगले मॉडेल कोणते? कुठे मिळते?

नियमितपणे वापरणार्‍यानी आपले अनुभव द्यावेत.

सरकारी सबसिडी मिळते का? नेमकी कशी मिळते?

शिर्डीचा सोलर कुकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माहेरी दर उन्हाळ्यात , आम्ही सूर्य शेगडी मध्ये भात , वरण आणि baked बटाटे करतो. डब्ब्यांना काळा रंग लावलेला आहे. सकाळी ९ च्या सुमारास डब्बे शेगडी मध्ये ठेवायचे , १ च्या सुमारास गरम गरम भात वरण तयार!! भात मोकळा होत नाही, चिकट होतो. वास आणि चव एकदम खमंग!!!

आई कधी कधी सुके मटण देखिल बनवते.....एकदम तोंपासू!!! मटण शिजायला मात्र ८-९ तास लागतात

सध्याचे सोलर कुकर बद्दल किंवा सबसिडी बद्दल मला फरशी माहिती नाही.
पण माझ्या माहेरी देखिल आई वरण्,भात , रवा भाजणे , दाणे भाजणे इ कामे सोलर कुकर मधे करत असे. हे १० -१५ वर्शापुर्वि.

जिथे जास्त जागा आहे , गच्चिइ किंवा बाल्कनी मधे उन येते त्यांना हे सहज शक्य आहे. आंघोळीचे पाणी पण सूर्य उर्जेद्वारे तापवणे शक्य आहे. यंदा आम्ही घरच्या घरी सोलर कुकर बन्वुन त्यात अनेक दिवस भात बनवला. लेकाचा sumeer project.

Google वर किंवा youtube वर घरी solar cooker बनवण्याच्या अनेक links आहेत.

आशुचॅम्प नी (http://www.maayboli.com/node/37865?page=2 ) इथे
सांगित्ल्या प्रमाणे चव अतिशय उत्तम असते.

' त्या ' बिबी वर्च्या इतर काही लिंक्स.

http://www.youtube.com/watch?v=HR9aKuO_zxg

http://www.angelfire.com/80s/shobhapardeshi/ParvatiCooker.html

http://www.arti-india.org/index.php?option=com_content&view=article&id=4...

 कुकर xxx.jpg
मी स्वतः गेली ३५ वर्ष (सोलर) सौर कुकर वापरत आहे. जिथे गच्चीत किंवा बाल्कनीत जागा आहे व मुबलक सूर्याचे ऊन येते अशा ठिकाणी या सौर कुकरचा वापर निश्चितच फायद्याचा ठरतो. तुमच्या एल.पी.जी.चे खर्चात बचत होते हा झाला आर्थिक फायदा. पण त्याच बरोबर आपण पर्यावरणालाही हातभार लावतो याचे समाधानही मिळते॰याखेरीज हे वापरणारांना पुणे म.न.पा.मिळकत करात ५% सवलत देते हा आणखी एक आर्थिक फायदा.
.

सकाळी जर ९ व्वजता सूर्याचे ऊन पडू लागलल्यावर जर तुम्ही कुकर लावून ठेवलात तर दुपारी १ वाजता जेवणाच्या वेळी तुम्हाला गरम जेवण मिळू शकते. यात रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात. चिकन व मटणही अप्रतिम शिजते. दूध आटून बासुंदीही छान होते. भाज्या फक्त शिजवून घेता येतात,पुढचे सगळे गॅसवर करावे लागते.पोळ्यांसाठी याचा वापर नाही करता येत. वरण , भात ,बटाटे , बीट हे शिजवण्यासाठी हा कुकर एकदम बेस्ट !
पूर्वी सौर कुकरवर सबसिडी मिळायची. माझा पहिला सौर कुकर मी सबसिडीच्या किमतीत (६००/-)महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळातून घेतला होता. आता सबसिडी मिळत नाही. आत्ताचा कुकर मी २७००/- ला घेतला आहे.

आम्ही भात केला होता पण काहीतरी विचित्र वास येत होता भाताला. म्हणून पुन्हा नाही केला. वरणाला नाही आला.

रवा आणि दाणे मात्र छान भाजले जातात.

छान

Back to top