एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्याही माणसाने मृत्युपत्र करताना सगळ्या मुलांचा/नातवंडांचा विचार करावा म्हणजे अशी पुढची भांडण टळतील Happy माझ्या मते ओम ज्या घरात राहतोय ते आजीच घर आहे. त्यामुळे तुम्ही ज्या माणसांच्या घरात राहता ( आई-वडिलांच्या/ आजी-आजोबांच्या) त्या माणसाला म्हातारपणी तुम्ही सांभाळणे स्वाभाविकच आहे . खर तर सांभाळायलाच पाहिजे . समीरच तस नाहीये .तो त्याच्या वडिलांबरोबर राहतोय. आजीच्या घरात आजीबरोबर नव्हे .त्यामुळे पटले नाही पण ठीक आहे त्यांना स्टोरी तर पुढे बरेच भाग चालवायची आहे त्यामुळे त्यांचा पण नाविलाज आहे Happy
दुसर म्हणजे रणजीत काकांनी काय आजींच घोड मारलाय? त्यांनी लग्न हि केल नाहीये. त्याला स्वताला म्हातारपणी सांभाळायला मुलबाळ नाही . त्यामुळे त्याला पण काही देण गरजेच आहे. Happy

कालचा भाग आवडला , प्रेडीक्टेबल असला तरी. श्री-जान्हवी च्या जोडीपेक्षा, ओम-इशा ची जोडी खूप नॅचरल वाटते. नाटकीपणा अजिबात जाणवत नाही म्हणून लहान सहान चूका माफ. इशा पण नायिका न वाटता, आपल्यातलीच वाटते. जान्हवी सारखी डोक्यात जात नाही. सुरवातीला न आवडणारे इशा चे कॅरॅक्टर आता आवडायला लागले आहे.

समीरचं पात्र गंडलं. ना धड तो पूर्ण मवाली, ऐदी दाखवता आला ना सामोपचारानं, विचारानं घेणारा. काका मात्र अस्सल होता Proud
ओमला सगळं देणं हे खूप सिम्पल केलं. काहीतरी ट्विस्ट द्यायला हवा होता असं वाटलं Happy

मला वाटले, विल कंडिशनल असेल. की ओम चे आइ-वडिल एकत्र राहाणार असतील तर अजित ला क्ष वाटा मिळेल.
आता त्यालाही गरजच आहे पैशाची, मग तो ओमच्या आइला परत बोलवेल. आधी नाईलाज म्हणुन, आणि मग एकमेकांना गरज कळेल

मला वाटलं होतंच, सगळं ओमला मिळणार. मी नवऱ्याला परवाच म्हणाले सर्व ओमच्या नावावर केलं असेल आजीने. तो हिरो आहेना शिरेलीचा.

<< की ओम चे आइ-वडिल एकत्र राहाणार असतील तर अजित ला क्ष वाटा मिळेल >> मृत्युपत्र करताना आपल्या चिरंजीवाचे सेक्रेटरीबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत इतकंच माहित होतं त्या माऊलीला; घटस्फोट हा नंतरचा प्रताप असल्याने ही कंडीशन घालण्याचं कसं सुचेल त्या बिचारीला !
ही मालिका फारच लांबवणार आहेत याची कल्पना असती तर मात्र " ही सर्व ईस्टेट ओमला त्याचं लग्न ठराविक वयाच्या आंत झालं तरच मिळेल ", अशी अट घातली असती कदाचित त्या माऊलीने !! Wink

ही मालिका फारच लांबवणार आहेत याची कल्पना असती तर मात्र " ही सर्व ईस्टेट ओमला त्याचं लग्न ठराविक वयाच्या आंत झालं तरच मिळेल ", अशी अट घातली असती कदाचित त्या माऊलीने !!.. Lol

एक कायदेविषयक शंका. प्रॉपर्टी आजोबांनी मिळवलेली आहे. त्यांच्या मृत्युनंतर ती आज्जीची झाली. व आजोबांनी मृत्युपत्र केले नाहीये. तर मग आपोआपच तिचे ४ वाटे होतील ना. आई, व तीन भाऊ असे? मग आज्जीने कसे मृत्युपत्र केले? आई तर चौघा वारसदारांपैकी एक वारसदार असते ना अश्या वेळेस?

उद्याची झलक दाखवल्याप्रमाणे खरंच ओमने हे लग्न मोडावं. म्हणजे प्रेक्षकही सुटतील..!
इशा कोण परस्पर सगळे निर्णय घेणारी ओमच्या घरात कोण राहणार आणि कोण नाही? ओमला आवडतं नसताना...???? हे हिचं प्रेम?
किती irritating वागतिये इशा.

ओम जर खरंच त्या सगळ्याना- ईशासहीत- आपलं खरं कुटूंब मानतो, तर त्यानी आश्रितासारखं न वागतां ओमचं बोलणं, वागणं चूकीचं वाटलं तर त्याला तसं सांगणंच औचित्यपूर्ण आहे. व ओमनेही " हें माझं घर आहे व मला पाहीजे तेंच इथं होईल " असा पवित्रा घेऊन फक्त आपलंच तें खरं म्हणणं त्याच्याच कुटूंबाच्या व्याख्येशीं विसंगत आहे. " तुम्ही टॉवेल आणून देत नाही, कारण ओमला तें चालणार नाही', असं म्हणण्यात ईशाचा मुद्दा नेमका हाच आहे व तो ईशाने प्रभावीपणे मांडला आहे, हें आपलं माझं मत.

खर तर ओमच्या वडिलांनी ओम पेक्षाही जास्त ओम च्या आईवर अन्याय केलाय किव्वा तिला जास्त मानसिक त्रास दिलाय. तिच्याशी असलेले संबंध तोडून त्यांनी दुसर लग्न केलाय. पण इथे ओम तर त्याच्या आईला सुद्धा किंमत देत नाहीये अस दाखवलाय.
खरच इशा म्हणते तस माझ्या वरच फक्त अन्याय झालाय. मलाच एकट्याला काय ती दुखः मिळाली आहेत अस जे काही ओम ला सतत वाटतंय ना ती विकृतीच आहे अस म्हणाव लागेल

तो त्याच्या आईचा पण विचार करत नाहीये ? तो त्याच्या आईशी पण वाईट वागतोय. का? तिने त्याला शिक्षण दिल म्हणून?. तसच वार्यावर सोडलं नाही म्हणून ? तिने त्याला कमवण्या इतपत काबिल बनविल म्हणून ?. काहीही दाखवतात .कमालच आहे. Happy

इशा यात ढवळा ढवळ करतेय कारण कथानकाच्या मागणीनुसार इशाच्या आजोबांनी तिला ओम चे खरे आई- वडील आणून दाखवायला सांगितले आहेत . नाहीतर तिच ओम शी लग्न होणार नाही म्हणून तिचा आटापिटा ओमच्या आई-वडिलांना एकत्र आणायचंच .
आणि म्हणून ती पुढच्या भागात म्हणतेय ( इशा ) कि "या न्यायानी उद्या तू मला ही घराबाहेर काढशील ". नाही ना तू माझ्या मनासारखं वागत.? माझ्या वर अन्याय करतेस ना ?. मला दुखः देते आहेस ना? चल हो घराबाहेर कारण हे घर माझ आहे .
अशा रीतीने तो उरलेल्या लोकांना पण जरा मनाविरुद्ध झाल कि चुटक्या वाजवून बाहेर काढेल. "घर माझ आहे चला आपल चाम्बुगबाळ आवरा आणि निघा इथून ". तो आपल्याला कधीही घराबाहेर काढेल या भीती पायी घरातले त्याचे खोटे नातेवाईक त्याच्याशी खूप चांगल वागतील. म्हणजे ते प्रेमाने- त्याच्या वरच्या प्रेमापोटी चांगल वागतील का ? तर नाही. तो घराबाहेर काढेल या भीती पोटी Happy

सुमेधाव्ही
तुम्ही म्हणताय तो कायदा वडिलोपार्जित प्रॉपर्टीला लागू होतो स्वकष्टार्जित नाही. स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र केल्यास तशीच विभागणी होते जशी मृत्यूपत्रात लिहिले आहे

ती प्रॉपर्टी ओमच्या आजोबांची स्वकष्टार्जित. त्यांनी जर मृत्युपत्र केले नसेल तर ती प्रॉपर्टी फक्त त्यांच्या बायकोला ( ओम च्या आजीना ) मिळणार का त्यांच्या मुलांमध्ये आणि बायकोमध्ये विभागून जाणार असे सुमेधाने विचारले आहे. वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित प्रॉपर्टी कशाला म्हणायचे या मालिकेतली स्पेसिफिक या केस बाबत . ? अर्थात ती मालिका आहे म्हणून त्यांना तसे स्वातंत्र द्यायलाच पाहिजे.:)

थॅन्क्स पुविनिता. म्हणजे, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असल्याने वडिलांच्या विलनुसार ती आईची झाली व आता आईच्या मृत्युपत्रानुसार ठरेल कोणाची ते....असेच ना?

हो सुमेधा अगदी बरोबर,

पण काका शेती कसत असल्याने व वहिवाट त्याची असल्याने बहुधा रागावून मृत्यूपत्राला चॅलेंज करेल कोर्टात.... त्याला हे प्रुव्ह करावे लागेल की विलच खोटे आहे,

ते तो करू शकेल असे वाटत नाही कारण प्रधान वकीलच एक्झिक्युटर असल्याने तसे सिद्ध करणे शक्य होणार नाही. काकाला बाकी हक्क सिद्ध करता येतच नाही कारण आईने त्याला हक्क दिलेलेच नाहीत. आणि संपत्ती वडिलोपार्जित नाही त्यामुळे तो त्याचा वारस हक्क असल्याचे ही पुरावे असून सिद्ध करूनही उपयोग नाही.

सुजा, स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचे विल नसते तर सर्वांचे वारसपत्रावर नाव लागले असते, आई आणि ३ ही भाऊ, मग ओमला वडिलांच्या वाट्याचा हिस्सा नंतर कधीतरी वडील गेल्यावर अथवा वडिलांनी त्यांच्या हयातीत देऊ केल्यावर मिळाला असता.

बऱ्याच दिवसांनी शनिवारचा भाग पाहिला. इशा/स्पृहा खूप छान काम करते आहे! तिची सगळं जुळवून आणण्याची तगमग जाणवते!

स्पृहा आणि उमेश ह्यांचे भांडण मस्त होते परवाचे. एकदम खरेखुरे. उमेश तिला "गेलीस उडत" म्हणाला ते पण भारी. खूप मस्त अभिनय होता दोघांचा. सिरीअल एकदम मस्त चाललीये आता. बघत नसणार्‍यांनी परत सुरु करायला हरकत नाही.

<< स्पृहा आणि उमेश ह्यांचे भांडण मस्त होते परवाचे. >> मस्त नसतं झालं तरच नवल... फॅमिली कोर्टाचा एवढा अनुभव दोघांच्याही गांठीशी असून !! Wink
पण ज्याच्यावरून झालं तें कडाक्याचं भांडण, त्याला तसाच ओलेता उभा ठेवलाय कीं घालवलाय पुन्हा घराबाहेर ?

aefg_0.JPG

Pages