सिमला व मनाली - रहायला चांगले ठिकाण सुचवा

Submitted by सुनिधी on 9 April, 2014 - 12:23

जुने १ ते ७ सिमला व मनाली ट्रिप करणार आहोत. प्रवासात १० लोक आहेत.

रहायला TripAdvisor वगैरेवर शोधत आहेच पण कोणाला अनुभव असेल तर दोन्हीकडचेही रहायला चांगले ठिकाण सुचवा. फार महाग, ५ स्टार नको आहे.

तिथे खायला जे मिळेल ते खाऊच पण तरी आवर्जुन काही जाऊन खावेच असे एखादे ठिकाण असेल तर तेपण सांगा.

आधीच धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बजेट हॉटेल हवी असतील तर तू HPTDC चे बुक करू शकतीस. मोस्टली बरे ह्या कॅटेगिरित मोडतात.

तू जिस्पाला एक दिवस दे. मनाली ते जिस्पा मध्ये रोहतांग पास पण लागतो. खूप जास्त मजा येईल. निसर्ग आवडत असेल तर जिस्पा मस्ट !

जिस्पाला जाताना केलाँग ( हे दोन्ही खूप जवळ जवळ आहेत) तिथे HPTDC चे चंद्रभागा आहे. मस्त आहे एकदम, जमले तर तिथे राहा दोन दिवस, निदान ओव्हरनाईट. (केलाँग आणि जिस्पा होऊ शकतील, तिथे पाँईट असे काही नाही, दोन्ही गावच पाँईट आहेत Happy

तिथेच माझी गाडी चंद्रभागेची भेट घेण्यासाठी धावत निघाली होती. Happy

मनालीच्या खूप जवळ स्पिती व्हॅली आहे. सांगला, कल्पा, नारकंड वगैरे तिकडे जा. खुद्द मनाली आणि सिमल्यामध्ये जास्त वेळ नको घालवू असा आपला अनाहुत सल्ला. मनाली सिमल्यात सगळे टूरिस्टी सर्किट आहेत. थोडे बाजूला गेले की अफलातून निसर्ग !

केदार, अरे फक्त ६ दिवसात स्पिती वगैरे जमेल का तिला?

सुनिधी, खरंतर शिमल्यात पण बघण्यासारखं काहीच नाहीये. मनालीमध्ये पण मणिकरण कॅन्सल केलं तरी चालेल, जाण्यायेण्यातच फार वेळ जातो.

अगदी मार्केटमध्ये HPTDC चं हॉटेल कुंजम होतं. सध्याची परिस्थिती नाही माहीत, पण शक्यतोवर मार्केटच्या आसपासचं हॉटेल बघा.

क्त ६ दिवसात स्पिती वगैरे जमेल का तिला? >> हं ६ दिवसांकडे लक्ष दिले नव्हते. Wink

पण मनाली / सिमल्यात राहण्यापेक्षा केलाँगला जा मनालीवरन. मग सिमला बिमला फारच टीपी वाटेल.

शिमल्यात त्या माल रोड शिवाय बघण्यासारखं काहीही नाही. माल रोडमध्येही बघण्यासारखं काय आहे, हा प्रश्न आहेच. मनाली निदान पिक्चरिस्क तरी आहे.

जुन १ चंण्डिगड - सिमला मुक्काम
२. सिमला - नारकण्ड मुक्काम
३. नारकण्ड - सांगला
४. सांगला - चित्कुल - परत सांगला.
४. सांगला - कल्पा - सांगला
५. सांगला - मनाली
६. मनाली पूर्ण दिवस
६ ची रात्र - टू चण्डिगड

किन्नूर व्हॅली - किन्नर कैलास दर्शन पण होईल. Happy सांगला व्हॅली जबरदस्त आहे. श्रीनगर वगैरे किस झाड की पत्ती.

चित्कुल भारतातले शेवटचे गाव. त्यापुढे तिबेट. Happy

https://www.google.com/maps/dir/Chandigarh,+India/Shimla,+Himachal+Prade...@31.4710154,76.4314843,8z/data=!3m1!4b1!4m38!4m37!1m5!1m1!1s0x390fed0be66ec96b:0xa5ff67f9527319fe!2m2!1d76.7794179!2d30.7333148!1m5!1m1!1s0x390578e3e35d6e67:0x1f7e7ff6ff9f54b7!2m2!1d77.1734242!2d31.1046052!1m5!1m1!1s0x390591661a142a1d:0x5feef9c405007657!2m2!1d77.4601581!2d31.2577718!1m5!1m1!1s0x39066b5c1f6033db:0x5423d2cb12e0d1e6!2m2!1d78.2649956!2d31.4254859!1m5!1m1!1s0x39066a28dd9e3323:0xbe5b52c8965c69db!2m2!1d78.2753776!2d31.5376578!1m5!1m1!1s0x39048708163fd03f:0x8129a80ebe5076cd!2m2!1d77.1887145!2d32.2396325!3e0

हा एक पर्याय होऊ शकतो.

वा, आला का प्लान >. Lol

तिने विपुत विचारला म्हणून दिला हां Happy

भारत खरचं महान आहे. इथे जेवढं मार्केटिंग होतं तेवढं आपण करत नाहीत, करायला हवं. टुरिझम इकॉनॉमी वाढेल.

विपुत विचारला म्हणून >>> द्या की, मी चांगल्याच अर्थाने म्हणलेय.

इथे जेवढं मार्केटिंग होतं तेवढं आपण करत नाहीत, करायला हवं.>> +१

<<शिमल्यात त्या माल रोड शिवाय बघण्यासारखं काहीही नाही. माल रोडमध्येही बघण्यासारखं काय आहे, हा प्रश्न आहेच. मनाली निदान पिक्चरिस्क तरी आहे.<< सायो +१

शिमला आणि मनाली ह्या दोन्ही ठिकाणी हल्ली प्रचंड गर्दी असते, त्यापेक्षा चैल, डलहौसी चा पर्याय चांगला आहे.
गेल्यावर्षी दिल्ली-हिमाचल-अमॄतसर्-चंदिगड-दिल्ली असा २० दिवसांचा दौरा केला होता, हवे असल्यास डिटेल्स मेल करीन.

मनालीमध्ये पण मणिकरण कॅन्सल केलं तरी चालेल, > अरे मणिकरण ला जाच अस लिहायला मी आले होते. मणिकरण पर्यंत चे ड्रायविंग मस्त एन्जॉय केले होते आम्ही, रस्ता मस्त आहे.

मनिकरणचा रस्ता जबरदस्त आहे. थरार आहे. आता रुंद केला असेल तर माहित नाही. नवर्‍याला पटवून खिडकीजवळच मी बसणार म्हटलं आणि थोड्याच वेळात बाहेर बघून श्वास रोखावा लागत होता. सृष्टीसौंदर्याने अवाक होऊन आणि भितीनेही. "बाजूला रस्ताच उरत नाहीये, डायरेक्ट दरीच आहे." हे वाक्य नवर्‍याला अनेकवेळा म्हटलं. पोहोचल्यावर जेमतेम तिथल्या गुरुद्वारात गेले पण पोटात गोळा उठला होता की ह्याच रस्त्याने आता परतही जायचंय.

मनालीला खूप वर्षांपुर्वी गेले होते तेव्हा मस्त होतं. आता ती परिस्थिती नसेल पण बियासच्या पलिकडच्या काठावर कदाचित अजून कमी गर्दी असेल. तेव्हाही तिकडे हॉटेल्स अगदीच तुरळक होती. आमच्या हॉटेलच्या पुढचा रस्ता तर अगदी सिनेमात असतो तसा होता "ये वादियाँ...." वगैरे टाईप Happy आम्ही खूप पायी फिरलो होतो तेव्हा.

सांगला व्हॅली जबरदस्त आहे. > +१

फक्त शिमला मनालीच्या गर्दित फिरण्या पेक्षा स्पितीला जा. पण १ जुनला मनाली मार्गे स्पितीच काय रोहतांग सुद्धा कठीण आहे.

अश्विनी अगदी एवढ आठवत नाहीये . पण मनाली सुंदर आहे एवढ नक्की आठवतंय. त्या मानानी सिमल्यात बघण्यासारख काहीच नाही एक मोल रोड सोडला तर .

मनालीत एका मराठी माणसाच हॉटेल आहे/होत. पूर्वी त्यांची खूप जाहिरात यायची. हल्ली बरेच दिवसात वाचली नाही. माझ्या मते "मकरंद कुलकर्णी" अस काही तरी नाव होत त्याचं . अर्थात त्याचं हॉटेल राहाण्याच होत का फक्त जेवणाखाण्याच ते मात्र आठवत नाहीये Happy

डलहौसी बेस्ट आहे. जास्त फिरायचे नसेल आणि शांत्,निवांत राहायचे असेल तर मस्त आहे डलहौसी.
तिथूनच खजियार, चंबा अश्या छोट्या छोट्या ट्रीप्स करता येतील.

सुनिधी तुमचा १० माणसांचा एज गु्रप माहिती नाही. पण एक सुचवते.
आम्ही घरचीच माणसं मागच्या वर्षी गेलो होतो. युथ होस्टेलचे दरवर्षी या भागात कॅम्प असतात. कॅम्प म्हणायचे पण तुम्हाला तुमच्या पद्धतीने पण फिरता येते. त्यांची निवास व्यवस्था कुलूमध्ये असते. रहाण्यासाठी चांगल्या दर्जाचे टेन्ट असतात. खाण्यापिण्याची उत्तम सुविधा असते. चहा-नाश्ता सगळं काही. ४ दिवसांसाठी चार माणसांच्या कुटूंबाचे जेमतेम ३ ते ४ हजार शुल्क असते. (टीप: स्वच्छतागृह, स्नानगृह स्वच्छ मात्र कॉमन असतात बरं का..) शिवाय त्यांच्याकडे तिथल्या टुरिस्ट गाड्यांचे दरपत्रक देखील असते. त्यामुळे सहकार्य चांगले मिळते.
आम्ही बघितलेले स्पॉट
१) रोहतांग पास
२) सोलंग व्हॅली
३) मनिकरण
मनिकरणला मुळ ठिकाणी नक्की जावे.
४) पाराशर लेक
५) बिजली महादेव..
अन्य ठिकाणी गाडी जाते. पण बिजली महादेवला मात्र चांगलीच चढाई करावी लागते. पण ही सगळी ठिकाणं आल्टीमेट. सगळा शीण घालवणारी आहेत.
त्या मानाने मनाली बर्‍यापैकी कमर्शियल आणि गर्दीचे ठिकाण वाटले. आम्ही कुलूहूनच मनालीचे काही स्पॉट केले.
तुमची गाडी असेल तर ठीक अन्यथा माझ्याकडे तिथल्या काही जणांचे संपर्क नंबर आहेत. सोलंग व्हॅलीतील ऍडव्हेन्चर गेम, पॅराग्लायठिग, राफ्टिंग हे सगळं आम्ही केलं ती माणसं विलक्षण विश्‍वासार्ह भेटली. त्यांचे देखील नंबर्स देता येतील. ती तुम्हाला सिमल्याचं देखील सहकार्य करतील असं वाटतं.
युथ होस्टेलला सगळ्यांना मजा येते.
त्यानंतर आम्ही येतांना आग्रा मथुरा देखील केलं.

सुजा, चैल, डलहौसी बेस्ट आहे, मुख्य म्हणजे अतिशय कमी टुरिस्ट असतात, त्यामुळे शांत.
प्राचीने लिहिल्याप्रमाणे डलहौसीवरुन चंबा-खज्जियार ट्रीप्स करता येतील.
डलहौसी-चंबा - ५२ किमी
डलहौसी-खज्जियार - २१ किमी