Submitted by डॅफोडिल्स on 7 April, 2014 - 12:08

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
रिकोटा चीज
हापूस आंब्याच्या फोडी
२ टेबल्स्पून दुध, केशर काड्या
जायफळ, वेलची स्वादानुसार
ड्रायफ्रूट्स चे काप, बेदाणे चारोळी आवडीप्रमाणे
क्रमवार पाककृती:
- दोन टेबल्स्पून कोमट दुधात केशराच्या काड्या खलवुन ठेवाव्यात.
- रिकोटा चीज, आंब्याच्या फोडी आणि साखर प्रत्येकी एक कप किंवा समप्रमाणात घेउन ब्लेंडर मध्ये एकत्र करुन घ्याव्यात.
- वरिल मिश्रणात केशर काड्या भिजवलेले दुध घालून आम्रखंड चांगले ढवळावे.
- त्यात स्वादानुसार वेलची जायफळ पुड घालावी.
- आम्रखंड एखाद्या डब्यात किंवा मोठ्या बोल मध्ये काढून २ तास फ्रिज मध्ये ठेवावे. छान सेट होते.
- सर्व्ह करण्यापूर्वी आवडी प्रमाणे ड्रायफ्रूट्स चे काप, मनुके चारोळी वगैरे घालून सजवावे
- गरमागरम पुर्यांसोबत फस्त करावे.
वाढणी/प्रमाण:
खाउ तसे
अधिक टिपा:
* फ्रिज मध्ये सेट करण्याचा वेळ ऑप्शनल आहे. ब्लेन्डर मधुन फिरवुन लगेच सर्व्ह केले तरीही छान लागते.
* घट्ट आम्रखंड खाताना घश्याला तोठरा लागतो. म्हणून मी रिकोटा चीज सोबत स्प्रेडेबल ओरिजिनल स्विस क्रिम चे तीन चार क्युब्ज्स ब्लेन्ड केले होते. त्यामुळे मस्त क्रिमी आम्रखंड बनले.
माहितीचा स्रोत:
माझे सत्यासाठी प्रयोग :)
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त फोटो आहे.
मस्त फोटो आहे. तोंपासु........
झक्कासच! फोटोचे तर क्या कहने
झक्कासच! फोटोचे तर क्या कहने
फोटो बघून खपलो आहे..
फोटो बघून खपलो आहे..
आम्रखंडात बाकी सुकामेवा नकोच
आम्रखंडात बाकी सुकामेवा नकोच वाटतो.>>> हो गं मंजुडी मला पण
फोटो पुरती चारोळी बस्स... 
पण खर सांगू मला त्या पुर्याच जास्त आवडल्या. सोबत बटाट्याची सुकी भाजी आणि ह्या पुर्या. मला पाठवून दे >>>>>
बी हे घे सोबत भजी आणि साधा वरणभात
गोटाभजीट्रायकेलीआहेतीकाळपटअसल्यानेचिकित्सकलोकांनीकृप्यानावेठेउनयेवाहसूनये
संपदा, तू वरण भातावर काय
संपदा, तू वरण भातावर काय घातलं आहेस? दही?????? की वेगळंच तूप आहे?
माझ्याकडे सेम तसंच गायत्री मंत्र लिहिलेलं तांब्याचंच तबक आहे. कारणा कारणालाच काढून वापरते. माझंच तिथे ठेवून फोटो काढलायस की काय असं वाटलं
मी परत परत येऊन श्रीखंड पुरी बघतेय
मस्त आहे फोटो एकदम. फक्त
मस्त आहे फोटो एकदम. फक्त रिकोटा चीज खायची कल्पना जरा नको वाटतेय.
फोटो छान आहे .. पण असं
फोटो छान आहे ..
पण असं रिकोटा चीजचं श्रीखंड खायला मजा यायची नाही असं वाटतं ..
रिकोटा चीजचं श्रीखंड खायला
रिकोटा चीजचं श्रीखंड खायला मजा यायची नाही असं वाटतं .. >>> + १
फोटो मात्र अत्यंत तोंपासु
काय सुरेख फोटो आहे
काय सुरेख फोटो आहे
चिन्मय मी तर हलतच नाहिये
चिन्मय
मी तर हलतच नाहिये इथून 
चीज आणि आंब्याचं प्रमाण सांगु
चीज आणि आंब्याचं प्रमाण सांगु शकाल का?
वरण भातावर तुपा सोबत चमचाभर
वरण भातावर तुपा सोबत चमचाभर दही वाढायची पद्धत आहे साबांची. आणि लिंबाची फोड नैवेद्याला मस्ट
चिनुक्स चा निळूभाउ झालाय
सशल आणि अगो... रिकोटा चे बनव्लेय असं माहित नाही सम्जून खायचं
माझ्याकडे सेम तसंच गायत्री
माझ्याकडे सेम तसंच गायत्री मंत्र लिहिलेलं तांब्याचंच तबक आहे.>>>
तिन वेगवेगळ्या साईझ ची आहेत मी रोजच्या पूजेत वापरते मस्तेय्त ना 
नॉर्मली भाताच्या दोन मुदी
नॉर्मली भाताच्या दोन मुदी बघितल्या आहेत. एक वरण-भाताची (जेवण स्टार्ट) आणि दुसरी दही-भाताची(जेवण एंड करण्या करता
)
सही दिसतंय आम्रखंड
सही दिसतंय आम्रखंड
कृपया क्रमवार पाककृती नंतरचा
कृपया क्रमवार पाककृती नंतरचा तोंपासु भाग काढून टाकावा ही नम्र विनंती.
एक्दम तोंपासु!! अस्ले फोटू
एक्दम तोंपासु!! अस्ले फोटू टाकून जेवणाच्या वेळेला का त्रास देता??? कुफेहेपा??????
फोटो लै भारी आलाय!!
मला आत्ताच्या आत्ता ती
मला आत्ताच्या आत्ता ती आम्रखंड पुरी हवीये

मस्तच
मस्तच
अहाहा..... फोटो लय भारि
अहाहा..... फोटो लय भारि आहे......काय सुंदर दिसतय ताट !!
तोपासू!! ताट बघून किती
तोपासू!! ताट बघून किती बघायचे. खायला मिळायला हवे
फोटो जबरी आहे पण संपदा, अतिशय
फोटो जबरी आहे पण संपदा, अतिशय दुष्ट आहेस तु!!! रिकोटा नव्हते म्हणून मी आत्ता क्रीम चीज, पल्प, मिल्क पावडर, वेलची पूड साखर मिक्सरमधून फिरवून खाल्ले तेव्हा जीव निवला
तिकडे केदारचा वजनवाला बीबी
तिकडे केदारचा वजनवाला बीबी बघुन मनात हवा भरली आणि इकडे हा फोटु बघुन फुस्स ...
फोटो जबरी आहे पण संपदा, अतिशय
फोटो जबरी आहे पण संपदा, अतिशय दुष्ट आहेस तु!!! रिकोटा नव्हते म्हणून मी आत्ता क्रीम चीज, पल्प, मिल्क पावडर, वेलची पूड साखर मिक्सरमधून फिरवून खाल्ले तेव्हा जीव निवला >>>> ज्ञाती
Pages