आम्रखंड (झटपट्/इंस्टंट)

Submitted by डॅफोडिल्स on 7 April, 2014 - 12:08
amrakhand puri
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रिकोटा चीज
हापूस आंब्याच्या फोडी
२ टेबल्स्पून दुध, केशर काड्या
जायफळ, वेलची स्वादानुसार
ड्रायफ्रूट्स चे काप, बेदाणे चारोळी आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 
  • दोन टेबल्स्पून कोमट दुधात केशराच्या काड्या खलवुन ठेवाव्यात.
  • रिकोटा चीज, आंब्याच्या फोडी आणि साखर प्रत्येकी एक कप किंवा समप्रमाणात घेउन ब्लेंडर मध्ये एकत्र करुन घ्याव्यात.
  • वरिल मिश्रणात केशर काड्या भिजवलेले दुध घालून आम्रखंड चांगले ढवळावे.
  • त्यात स्वादानुसार वेलची जायफळ पुड घालावी.
  • आम्रखंड एखाद्या डब्यात किंवा मोठ्या बोल मध्ये काढून २ तास फ्रिज मध्ये ठेवावे. छान सेट होते.
  • सर्व्ह करण्यापूर्वी आवडी प्रमाणे ड्रायफ्रूट्स चे काप, मनुके चारोळी वगैरे घालून सजवावे
  • गरमागरम पुर्‍यांसोबत फस्त करावे.
वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे
अधिक टिपा: 

* फ्रिज मध्ये सेट करण्याचा वेळ ऑप्शनल आहे. ब्लेन्डर मधुन फिरवुन लगेच सर्व्ह केले तरीही छान लागते.

* घट्ट आम्रखंड खाताना घश्याला तोठरा लागतो. म्हणून मी रिकोटा चीज सोबत स्प्रेडेबल ओरिजिनल स्विस क्रिम चे तीन चार क्युब्ज्स ब्लेन्ड केले होते. त्यामुळे मस्त क्रिमी आम्रखंड बनले.

माहितीचा स्रोत: 
माझे सत्यासाठी प्रयोग :)
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्रखंडात बाकी सुकामेवा नकोच वाटतो.>>> हो गं मंजुडी मला पण Sad फोटो पुरती चारोळी बस्स... Happy

पण खर सांगू मला त्या पुर्‍याच जास्त आवडल्या. सोबत बटाट्याची सुकी भाजी आणि ह्या पुर्‍या. मला पाठवून दे >>>>>

बी हे घे सोबत भजी आणि साधा वरणभात Happy

puribhaji.jpg

गोटाभजीट्रायकेलीआहेतीकाळपटअसल्यानेचिकित्सकलोकांनीकृप्यानावेठेउनयेवाहसूनये Wink

संपदा, तू वरण भातावर काय घातलं आहेस? दही?????? की वेगळंच तूप आहे?
माझ्याकडे सेम तसंच गायत्री मंत्र लिहिलेलं तांब्याचंच तबक आहे. कारणा कारणालाच काढून वापरते. माझंच तिथे ठेवून फोटो काढलायस की काय असं वाटलं Wink

मी परत परत येऊन श्रीखंड पुरी बघतेय Uhoh

फोटो छान आहे .. Happy

पण असं रिकोटा चीजचं श्रीखंड खायला मजा यायची नाही असं वाटतं ..

वरण भातावर तुपा सोबत चमचाभर दही वाढायची पद्धत आहे साबांची. आणि लिंबाची फोड नैवेद्याला मस्ट
चिनुक्स चा निळूभाउ झालाय Lol

सशल आणि अगो... रिकोटा चे बनव्लेय असं माहित नाही सम्जून खायचं Wink

माझ्याकडे सेम तसंच गायत्री मंत्र लिहिलेलं तांब्याचंच तबक आहे.>>> Happy तिन वेगवेगळ्या साईझ ची आहेत मी रोजच्या पूजेत वापरते मस्तेय्त ना Happy

नॉर्मली भाताच्या दोन मुदी बघितल्या आहेत. एक वरण-भाताची (जेवण स्टार्ट) आणि दुसरी दही-भाताची(जेवण एंड करण्या करता Happy )

एक्दम तोंपासु!! अस्ले फोटू टाकून जेवणाच्या वेळेला का त्रास देता??? कुफेहेपा?????? Wink
फोटो लै भारी आलाय!!

फोटो जबरी आहे पण संपदा, अतिशय दुष्ट आहेस तु!!! रिकोटा नव्हते म्हणून मी आत्ता क्रीम चीज, पल्प, मिल्क पावडर, वेलची पूड साखर मिक्सरमधून फिरवून खाल्ले तेव्हा जीव निवला Proud

फोटो जबरी आहे पण संपदा, अतिशय दुष्ट आहेस तु!!! रिकोटा नव्हते म्हणून मी आत्ता क्रीम चीज, पल्प, मिल्क पावडर, वेलची पूड साखर मिक्सरमधून फिरवून खाल्ले तेव्हा जीव निवला >>>> ज्ञाती Lol

Pages